Posts

सुटका

मेघना सोपारकर शी माझी मैत्री खूप जुनी खूप जुनी म्हणजे अगदी काँलेजच्या जमान्यातली, तसं पाहिलं तर ,ती आमच्या काँलेजमधे नव्हती पण घना म्हणजे घनश्याम कामेरकर आमच्या बरोबर शिकत होता दिसायला देखणा आणि वागायला सज्जन त्याच्यात इतकेच प्लस पाँईंट होते, बाकी काही खास सांगण्या सारखं नव्हतं ना  आभ्यासात स्वारस्य ना इतर उपक्रमात रस खरं तर आवाज गोड होता, सुरात गुणगुणायचा पण तरी गाणं कधी त्यानी मनापासून केलच नाही खरं तर मेघनावर मनापासून जीव ओतून प्रेम करण्याशिवाय त्याने दुसरं काही केलं नाही त्याला कारणही तसच होतं त्यांचं एक स्टेशनरीचं मामुली दुकान होतं आणि प्रामाणिक नोकरांच्या भरवशावर ते ठीक ठाक चाललं होतं शिवाय चुलत्या  विरुद्ध कित्येक वर्ष सुरू असलेली घराची केस त्याची आई जिंकली होती त्या घराची किम्मत आज ना उद्या दिन दुगनी मिळणार याची त्याला खात्री होती म्हणूनच तो अंतर्बाह्य निवांत होता मेघना खरं तर तशी नव्हती, तिला प्रत्येक गोष्टीत रस होता ती कुशाग्र बुद्धीची होती पण तिचही आमच्या घनावर घनदाट प्रेम होतं आणि कसं असतं ना? जोडी जमायची तर  एका कुणाला तरी जरा बदलावं लागतं तर इथे आमच...

रंगीत तालीम

मीता मानगावकर म्हणजे निवृत्त कर्नल मानसींग मानगावकरांची मुलगी मिलेट्रीची शिस्त ही मानगावकराच्या घराच्या पायापेक्षाही भक्कम , कडक, की जोरदार काय म्हणाल तशी जसं वय होत गेलं तशा मानसींग यांच्या मिशा आणिकच झुपकेदार आणि आणि अधिकच टोकदार व्हायला लागल्या, त्यांच्या सौभाग्यवती मर्यादेत राहून जरा हसर्‍या  खेळकर होत्या म्हणून घरात निदान वार्‍याची झुळूक तरी मोकळेपणानी शिरायची आणि मानसींग मानकरांचं आपल्या सुशील सुस्वरूप पत्नीवर निरातिषय प्रेम होतं  तिच्याबद्दल स्वत:पेक्षाही जास्त विश्वास होता, ते  शाळेत असताना त्यांच्या मामीनी हळूच त्यांच्या कानात विचारलं होतं " आमच्या बेबीशी लगीन करशिला काय? तेंव्हा मामींची गोलामटोल बेबी मानसींगच्या कडेवरच होती हा प्रश्न अचानक ऐकून मानसींगाने बेबीला मामीकडे देऊन खोलीबाहेर धूम ठोकली होती पण जसजशी बेबी मोठी व्हायला लागली तशी ती बेबी राहिली नव्हती नावाप्रमाणे  शकुंतला झाली होती तेंव्हा प्रश्न ऐकून खूली बाहेर धूम ठोकणारा मानसींग ठरवल्या प्रमाणे मिलेट्रीत भरती झाला आणि त्याचं मन शकुंतलेच्या खोलीबाहेर घुटमळायला लागलं , त्यात ती आपल्यासाठी  हरताल...

ओघळ

भेट ठरलेली असताना  नेमकं आईने डोक्यावर तेल थापलं  म्हणाली आठवडाभर हाताशी लागत नाहीस, आज बरी तावडीत सापडलीस मी खरं तर वैतागलेच  आईच्या जागी दुसरं कोणी असतं तर लहानपणी ओचकारायचे तसं ओचकारलच असतं  ओचकारण्यात मी तरबेज होते त्यामुळे फेमस सुद्धा म्हणून् तर माऊ नाव पडलं  ओचकारणं कधीच थांबलं पण हे नाव चिकटलं ते चिकटलं त्याने पण ओळख होताना पहिलं लाडाचं नाव विचारलं मी ही उस्फुर्त्पण म्हणाले तू देशील ते तर त्यानेही उस्फुर्तपणे काही न ठरवता मला माऊच म्हंटलं आणि अजूनही तसच म्हणतो खरच माझ्यात आणि मांजरात काही साम्य आहे का? या विचाराने माझी मीच चमकले उठून पटकन आरशात पाहिलं आणि खुदकन हसायच्या ऐवजी दचकलेच हो! हल्ली तो भेटल्यापासनं आरशात स्वत:ला बघून खुदकन हसायची वाईट खोड लागली आहे मी नुसतच खोड म्हणते आई आवर्जून वाईट खोड म्हणते आईच्या मते असं आरशात बघून मुली उगाचच खुदकायला लागल्या की त्यांच्यासाठी स्थळं बघायची वेळ झाली असं पुर्वीचे पालक समजायचे आमची आई सुद्धा तशी पुर्वीचीच आहे अजून घरी यायला आठच्या जागी नऊ वाजले की असं काही आंतर्बाह्य बघते की चपापायला होतं हाँस्टेलची रेक्टर असती ...

माझ्या आईची गोष्ट

साधारण चाळीस बेचाळीस वर्षांपुर्वी विलेपार्ल्याला माझ्या आईचं बाल संगोपन केंद्र होतं  अगदी वीस दिवसाच्या बाळापासनं ते पंधरा वर्षाच्या धगुरड्या मुलांपर्यंत त्या बलसंगोपनात मुलं भरती होती पन्नासच्या खाली मुलांची संख्या कधी आली़च नाही आईच्या कित्येक सहकारी महिला वर्षोंवर्ष आईला धरून होत्या मुलांच्या बाबतीत हेळसांड हा शब्द आईला मान्यच नव्हता निव्वळ या मुलांसाठीच आईने बालवर्ग सुरू केले आणि ते ही कित्येक वर्ष चालू होते ते इतके फोफावले की मराठी इंग्रजी हिंदी माध्यमातून मुलं शिकत होती चित्रकार केतकरांच्या घरी किती वर्ष हे बालवर्ग भरत होते त्या बालवर्गातून मुलं डायरेक्ट पार्ले टिळक विद्यालय, महिला संघ इंग्रजी माध्यमात प्राथमीक वर्गात भरती होत सकाळी साडेसहाला पहिली दोन मुलं धावत पळत पालक सोडून जायचे, अर्धवट झोपेत असलेली ती मुलं मग आमच्या कुणाच्या तरी कुशीत गाढ झोपी जायची मग एक एक करत गोखल्यांचं घर जाग व्हायचं  मग आमचाही दिवस त्या मुलांच्या किलबिलाटात वाट काढत काढत पार पडायचा, सगळं अंगवळणी पडलं होतं पालकाना सुरुवातीला फक्त मुलांचं दूध आणि औषधं द्यावी लागायची, पण नंतर दूध सुद्धा आईच पुरवाय...

आंगण वाकडं

नाचता येईना आंगण वाकडं अशी एक म्हण आहे पण धामण गावात राहणार्‍या सरूबाईच्या चंद्रमौळी घराचं आंगण खरच वाकडं म्हणजे उताराला लागलेलं होतं सरूबाई त्या वाकड्या आंगणात बेभान होऊन नाचायची, कुठली कुठली लोकगीतं , पारंपारीक गीतं तिला त्यावेळी आठवायची, कुठला ताल आणि कुथले सुर ती शोधायची ते तिचं तिला माहीत नाचताना आपण कसे दिसतो हे बघायला तिच्या घरी आरसाही नव्हता, पण तरी ती जरा सवड मिळाली की नाचायची आणि त्यावरून माय बापाच्या शिव्या खायची.. वंगाल लकशान इतकाच ताशेरा ते मारायचे धामण डोंगर दर्‍यात विसावलेलं छोटसं गाव अगदी मुठभर लोकसंख्या असलेलं , शहरी लोकांसाठी निसर्गरम्य, नाहीतर तिथल्या लोकांच्या अडचणी समस्या त्याना माहीत, काबाडकष्ट आणि दारिद्र्य तर जन्माला पुरलेलं कडे कपारी असल्यामुळे दिवस लवकर मावळायचा चढ उतार असे की  भले भले जेरीस यायचे राजकिय लोकानी त्याला दुर्गम प्रदेश म्हणून अनेक योजना राबवल्या ज्या धामण पर्यंत पोहोचल्याच नाहीत धामण गावापासून उतरायला लागलं की दोन तीन फर्लांगावर धामण नदी लागायची भर पावसात दुथडी भरून वाहणारी नदी बाकीचे दिवस झूळू झुळू वाहती असायची भारी मधुर पाणी होतं त्या नदीचं ...

टी के एफ जी

टी के  एफ जी ग्रूपची स्थापना वगैरे नं होता हा ग्रूप स्थापन झाला बर! हा ग्रूप कोणी चार तरूण लोकानी येऊन स्थापन केला असं नाही याचं सभासद होणं सोपं आहे, आणि याची शाखा आपण कुठेही सुरू करू शकतो हे या ग्रूपचं वैशिष्टय आहे पण नदीचाउगम जसा कधी छोट्याशा झर्‍याच्या रूपात दिसतो, कधी कधी थेंब थेंब पणी सुद्धा उगमस्थानाला पुरतं तसं अवघ्या तीन सभासदांसहीत हा ग्रूप सुरू झाला त्या ग्रूपच्या सुरुवातीची ही गोष्ट जानकी आणि प्रज्योत दोघी घनिष्ट म्हणजे अगदी घनिष्ट मैत्रीणी, इतक्या की दोघींची हस्ताक्षरं ही जवळ जवळ सारखी, त्या न्यायाने शैक्षणीक प्रगती ही सारखी म्हणजे उत्तम दर्जाची त्यातही एकीला वर्गाबाहेर उभं केलं तर दुसरीला वर्गात बसून चैन पडायचं नाही, ही बाहेर गेली म्हणजे दुसरी स्वस्थ बसणार नाही याचा अंदाज असल्याने बाई दुसरीलाही बाहेर पाठवायच्या ओल्या बरोबर सुकं जळायला एका पायावर तयार, तर या  अशा घनिष्ट मैत्रीणी बघता बघता मोठ्या झाल्या आणि जानकीने जातीबाहेर विवाहं जमवला, झालं! गहजबच झाला दोन्हीकडून कडाडून विरोध झाला उत्तमशी लग्न नाही झालं तर मी आत्महत्या करेन अशी धमकी जानकीने देऊन ठेवली या चार पाच ...

प्रोजेक्ट

हल्ली मुलाना शाळेत पाठवायचं म्हणजे पालकांची शाळा असते, हे वाक्य अनेक पालकांच्या तोंडी ऐकायला मिळतं तसच ते आमच्या नेहाच्या तोंडीही बसलय नेहा तळपदेला दोन मुलं दोघेही  अभ्यासात हुशार, मोठा चवथीत तर धाकटा पहिलीत पूर्वी नेहा येता जाता भेटायची आता तिला तसा खरच वेळ नसतो, मुलांचा अभ्यास, मुलांचं वेळापत्रक, मुलांची शाळा सर्वांगीण विकासाच्या नावाखालची धावपळ या बरोबरच मुलाना शाळेतून दिली गेलेली प्रोजेक्ट्स हा जो काय प्रकार आहे तो अकलनीय आहे, आणि नेहाच्या एकूण धावपळीत भर घालणारा आहे नेहाने मुलांसाठीच नोकरीला राम राम ठोकला असला तरी ती काय तशी रिकामी नाही पर्सेस बनवण्याच्या तिच्या व्यवसायाने कधीच जोर धरलाय, एक नाही दोन नाही तर दहा दहा कारिगर तिच्या हाताखाली तिच्या आँर्डरप्रमाणे काम करत असतात , विकीच्या गँरेजला सध्या तिच्या व्यवसायामुळे दुकानाचं स्वरूप आलय, जरा पैठणी फाटली विरली जुनी झाली की नेहाला त्यात विविध आकाराच्या  स्टाईल्सच्या पर्सेस दिसायला लागतात त्यात घरच्या जबाबदार्‍या काही कमी नाहीत सासूबाईना पार्कींसन आहे, सासरे हट्टी आहेत, हेकेखोर सुद्धा आहेत त्यात विकीचं त्यांच्याशी अजिबात पटत...

राणूबाई

गौरीचे लांबसडक जाडजूड केस, दाट असे की कंगवा शिरणं मुष्कील कंगवा घेताना तिच्या केसात जाईल असाच कंगवा निवडावा लागायचा, वेणीचे पेड मोजले तर चाळीसच्या वर जायचे, तिच्या लहानपणी कोणी तिच्या वेणीचे पेड मोजायला लागले की आज्जी पाठीत धपाटा घालायची आणि लग बगीने थू थू करायची, म्हणजे थुकल्याचं नाटक मग गौरी मोठी झाली तसे तिचे केसही लांब सडक झाले म्हणजे खरच चालताना सडक झाडण्याचच बाकी होतं मग तिने प्रिंटींग टेक्नाँलाँजी मधे करियर करायला घेतलं त्यातच ती बिझी झाली सकाळी घर सोडायची ते रात्रीच उगवायची, आई आज्जी डोक्यावर बसायच्या म्हणून चार घास जेवायची इतकी दमलेली असायची की कधी कधी आई म्हणायची "जा हात धू जा, नीट चूळ भर आणि झोपून टाक, बाकीचं मी आवरते यावर सुटका झाल्याचा आनंद दाखवत ती नेहमीचं वाक्य बोलायचीच आई पाचचा गजर लाव, मला लवकर जायचय" तर , अशी ही मुलगी लग्न करून सून म्हणून आमच्या विभाच्या घरी आली विभाचा एकुलता एक मुलगा आधी लग्नाला तयारच नव्हता, पण गौरीला बघितलं भेटला बोलला आणि तिच्या विषयीच बोलत राहिला विभाला अप्रूप होतं ते तिच्या मोहक हसण्याचं आणि लांबसडक केसांचं आली की सारखं त्या विषयीच बो...

ओळ्खीची मामी

माझी एक ओळखिची मामी होती नात्यापेक्षाही जवळची खूप सात्वीक तितकीच दूर्दैवी, तिला घरात मानच नव्हता खरं तर घरची मोठी सून पण धाकट्या जावा जास्त स्मार्ट निघाल्या , आम्ही त्यानाही मामीच हाक मारायचो पण हिला मात्र मामी मानायचो एक तरणा मुलगा खंगत खंगत गेला आणि मोठा मुलगा विचारत नव्हता तसं कोणीच विचारत नव्हतं त्यात हा एक मामीला सून मिळाली ती पण हुशार तिने दोन दिवसात आपल्या सासूला जोखलं  पण तिची योग्यता नाही ओळ्खली श्रीधर स्वामींची निस्सीम भक्त होती मामी, त्यात द्न्यानेश्वरीवर श्रद्धा जडली, मग काय घरातल्या शुद्र राजकारणात तिचं म्न रमलच नाही मग कसले मान अपमान घरचे काबाड कष्ट उरकून ती दत्ताच्या देवळात जाऊन बसायची लेकीसुनानी भरलेलं घर पण वेळेला कधी कधी एक रुपया नसयाचा तिच्याकडे मधे पाय मोडला, त्याकडेही तसं दूर्ल्क्षच झालं  म्हणजे दूर्लक्ष केलं  त्यामुळे कायम लंगडेपण आलं  तरी ओट्याजवळची कामं झाली की बाथरूम मधे एक पाय पसरून बसत ती चार बादल्या कपडे धुवायची संसारातून विरक्त होणं वेगळं आणि संसारातून अंग काढून घेणं वेगळं  तर तिच्या सुनेने संसारातून अंग काढून घेतलं होतं  सण वार...