सुटका
मेघना सोपारकर शी माझी मैत्री खूप जुनी
खूप जुनी म्हणजे अगदी काँलेजच्या जमान्यातली, तसं पाहिलं तर ,ती आमच्या काँलेजमधे नव्हती पण घना म्हणजे घनश्याम कामेरकर आमच्या बरोबर शिकत होता
दिसायला देखणा आणि वागायला सज्जन त्याच्यात इतकेच प्लस पाँईंट होते, बाकी काही खास सांगण्या सारखं नव्हतं ना आभ्यासात स्वारस्य ना इतर उपक्रमात रस
खरं तर आवाज गोड होता, सुरात गुणगुणायचा पण तरी गाणं कधी त्यानी मनापासून केलच नाही
खरं तर मेघनावर मनापासून जीव ओतून प्रेम करण्याशिवाय त्याने दुसरं काही केलं नाही
त्याला कारणही तसच होतं
त्यांचं एक स्टेशनरीचं मामुली दुकान होतं आणि प्रामाणिक नोकरांच्या भरवशावर ते ठीक ठाक चाललं होतं शिवाय चुलत्या विरुद्ध कित्येक वर्ष सुरू असलेली घराची केस त्याची आई जिंकली होती
त्या घराची किम्मत आज ना उद्या दिन दुगनी मिळणार याची त्याला खात्री होती म्हणूनच तो अंतर्बाह्य निवांत होता
मेघना खरं तर तशी नव्हती, तिला प्रत्येक गोष्टीत रस होता ती कुशाग्र बुद्धीची होती
पण तिचही आमच्या घनावर घनदाट प्रेम होतं आणि कसं असतं ना? जोडी जमायची तर एका कुणाला तरी जरा बदलावं लागतं तर इथे आमची मेघनाच पूर्ण बदलली
तिच्या घरी हे लग्न इतकं पसंत नव्हतं पण घना ला बघितल्यावर त्याच्या बद्दल प्रेमच वाटायचं
तसं झालं आणि मेघना सोपारकरची घनाशी लग्न करून विनातक्रार मेघना कामेरकर झाली
आमच्या लग्नाला दोघे आले तेंव्हा खूप सुखी समाधानी एकमेकावर विसावलेले दिसत होते
आमच्या लग्नाच्या वेळी त्यांचं लग्न नवं राहिलं नव्हतं
पण त्या दोघांचा नवेपणा नावालाही कमी झाला नव्हता
उलट दोघे जरा जास्तच उजळले होते, कशामुळे?
निव्वळ एकमेका वरच्या प्रेमामुळेच
नाहीतर दुसरं कारण काय असू शकतं? कारण ना दोघे काही नोकरी करत होते ना दुकानात लक्ष घालत होते
चोवीस तास एकमेका सोबत त्या जुन्या घरात निवांत बसलेले असायचे
सकाळचा नाष्ता दुपारचं जेवण मग दुपारचा चहा मग संध्याकाळी एक दुकानावर फेरी, ती ही फिरता फिरता दुकान वाटेवर यायचं म्हणून
ना मुल ना बाळ ना इअतर कोणी नातेवाईक ना कुणाचं येणं जाणं
तसं आमचंही जाणं येणं नंतरच्या काळात कमीच झालं होतं कारण त्यांची लाईफस्टाईल किती म्हंटलं तरी पचनी पडत नव्हती
लग्नाला इतकी वर्ष झाली पण गुडन्युज नव्हती
कुतुहल म्हणून सुद्धा त्याना वैद्यकीय सल्ला घ्यावासा वाटत नव्हता
इतकं उदासीन कोणी कसं असू शकतं ?
पण दिवस बदलतात तसं झालं , योग जुळून आले की सगळं जुळून येतं म्हणतात ते यांच्या बाबतीत अगदी शंभर टक्के खरं ठरलं
डँनी शिरोडकरने अपेक्षेपेक्षा जास्त पैसा देऊन घनाची इस्टेट रिडेव्हलप्मेंट साठी घेतली
घनाची चार पिढ्यांची ददाद मिटली
सगळी कडे आनंदी आनंद झाला कारण त्याच दर्म्यान लग्ना नंतर तब्बल सोळा वर्षा नंतर
मेघनाला दिवस गेले .मेघनाचं वय तसं जरा पुढे गेलं होतं पण डाँक्टरानी हमी दिली काही काळजीचं कारण नसल्याचं सांगितलं, आम्ही तसे येऊन जाऊन असायचो त्यांच्याकडे
मग अगदी जानेवारीच्या ऐन थंडीत मेघनाला मुलगा झाला, घना तर अगदी आय़ूष्यात पहिल्यांदी हरखून गेला
थँक गाँड घनाचा मुलगा त्याच्या वळणावर गेला नाही, त्याला दंगा मस्ती करायला चोवीस तास कमी पडायचे
आम्ही कधी त्याला आमच्याकडे घेऊन आलो तर सार्या सोसायटीला कळायचं यदुनाथाची स्वारी आमच्याकडे आली आहे, बघता बघता यदूनाथ मोठा झाला, चंदा है तू मेरा सुरज है तू हे गाणं त्याला अगदी तंतोतंत लागू पडत होतं आम्हाला वाटलेलं तो अभिनय क्षेत्राकडे वळेल पण त्याने आमचा अंदाज खोटा ठरवत वैद्यकिय क्षेत्र निवडलं
त्याची शालेय प्रगती वाखाणण्या जोगीच होती पण एकूणच सगळं दृष्ट लागण्या सारखं सगळं होतं
फक्त यदुनाथ बेळगावला गेला आणि काही दिवसानी मेघनाला पहिल्यांदी हाय बी पीचा जोरदार अँटेक आला
म्हणजे मेघना चार पाच तास बेशुद्ध होती
यदुनाथला हे काही घनाने कळवलं नाही, मग मेघनाला आम्ही आमच्या कडे विश्रांतीला घेऊन आलो
साधारण महिनाभर ती राहिली पण तरी घरी जाताना ती इतकी उत्साही नव्हती
आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं , घनाला सुद्धा काही कळेना
पण त्या नंतर दर एक दोन महिन्यानी ्मेघना अशीच अचानक घरी येऊन थडकायला लागली आणि तीन तीन चार चार दिवस रहायला लागली
बरं येऊन मजेत राहिली असती तरी आमची काही ना नव्हती
पण ही आली की शेवटच्या खोलीत खिडकीशी बसून असायची, मागे लागून लागून जेवायला लावलं की चार घास बळे बळे खायची
शेवटी उमाने एकदा तिला पकडलच , म्हणाली"नक्की काय झालय सांग"
कसलं दू:ख तुला आतल्या आत खातय? कसली काळजी लागून राहिली आहे?
का सगळं खूप छान आहे दृष्ट लागण्या सारखं आहे असं वाटतय म्हणून खरच दृष्ट लागेल अशी तुला भिती वाटतेय?
हा प्रश्नांचा भडिमार झाल्यावर ती उमाच्या गळ्यात पडून खूप रडली
आणि मग म्हणाली आता काय दृष्ट लागायची आहे? आँलरेडी दृष्ट लागली
असं का म्हणतेस? उमाने धक्का पचवत विचारलं
या वर ती म्हणाली कसं सांगू? तू माझा तिरस्कार करायला लागशील
उमा म्हणाली काय वेडी आहेस का? हीच का आपली मैत्री? हेच तू मला ओळखलस?
काय झालय ते सांग
आणि मेघनाने यदुनाथचं जन्मरहस्य सांगितलं , म्हणाली यदूनाथ घनाचा मुलगा नाही
घराचे व्यवहार चालू होते त्या दिवसात एकदा अगदी नकळत एका निसटत्या क्षणी मी आणि डँनी एकत्र आलो
डँनी म्हणजे दिनानाथ शिरोडकर
तो ही सज्जन पापभिरू तरुण होता त्यावेळी, झाल्या गोष्टी बद्दल त्यालाही पश्चाताप झाला त्या नंतर तो कधिही आमच्या घरी आला नाही,माझ्या समोर उभा राहिला नाही
मग यदुनाथच्या जन्मानंतर माझ्या मनातली बोचही कमी झाली त्याला वाढवण्यात मी मनापासून रमून गेले,बरं तो ही माझ्या रूपावर गेला त्यामुळे मातृमुखी सदा सुखी म्हणत आम्ही निवांत होतो
त्याला मेडिकलला बेळगावची सीट मिळाली, हाँस्टेलची रूम मिळायला जरा वेळ लागला
आणि एका रात्री त्याचा फोन आला म्हणाला " आई असं म्हणतात ना , एका सारख्या हुबेहुब जगात सात व्यक्ती असतात तर त्यातली एक व्यक्ती माझी रूम मेट आहे त्या व्य्क्तीचं नाव आहे अनिरुद्ध शिरोडकर
त्याची फँकल्टी वेगळी आहे पण आमच्या काँलेजचं प्रिमायसेस एकच आहे
इथे सगळे आम्हाला ट्वीन ब्रदर्स म्हणूनच ओळखतात
अंगावर नुसती वीज पडली नाही तर ती आतल्या आत घुमत राहिली
शेवटी केलेली प्रतारणा घना जवळ कबूल करायची मी हिम्मत जमवत होते
तर घनाने चिठ्ठी लिहून त्याचा गुन्हा कबुल केला माझ्या जवळ त्या दरम्यान .....
कधी कधी वाटतं घनाने माझी समजुत काढायला हे स्वत:वर घेतलं असेल
पण तरी मी माझ्या तोंडानी कबुली देणं म्हणजे त्याला उनमळवून टाकण्या सारखं आहे... कितीही सांगायचा मोहं झाला तरी मी हे त्याला नाही सांगू शकत
आणि त्याने कबूल केल्या प्रमाणे ते खरं असेल तर एक वेळ मी समजून घेईन, कारण त्याला मी ओळखते
पण माझ्या हातून हे पातक घडलेलं घना कितपत सहन करेल मला क्ल्पनाही करवत नाही
म्हणून सांगायची उर्मी अनावर झाली की मी इथे येऊन राहते, ती उर्मी काबूत आली की घरी जाते
मला माहीत आहे की कधी ना कधी बोलल्या शिवाय ह्यातून सुटका नाही
पण त्या सुटकेलाच मी भीत आहे... तुम्हीच समजून घ्या प्लीज

Comments
Post a Comment