मूक अभिनय
एक विस्मरणात जात असलेला प्रकार मायमींग... मायमींग हा शब्द सुद्धा मी विसरलो होतो
आमच्यावेळी खूपच फेमस होता हा प्रकार, अँन्युअल डे म्हंटलं तर तोंडावर पांढरा मेक अप चढ्वून काळे कपडे घालून एक तरी मुलगा तयार असायचाच
काँमेडियन पेंटल , कल्पना अय्यर आणि चार्ली म्हणजे उल्टा चश्मा मधला अब्दुल्ल आमच्या वेळी या मायमीन्साठी अगदी प्रसिद्ध होते
एकही शब्द न उच्चारता विविध रस अभिनयातून प्रसवले जायचे
पेंटल करुण रस सादर करण्यात माहीर होता तर चार्ली त्याच्या नावाप्रमाणे त्या ढंगाची काँमेडी करायचा
बर्याच वर्षात या प्रकाराचा कुठे नामोनिशान राहिला नव्हता
पण आज इतक्या वर्षानी मी मनमुराद या मायमींगचा आनंद लुटला
कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता, गर्दीही होती पण कितीजणानी लक्ष देऊन बघितला आणि कितीजणांच्या तो लक्षात आला कोणजाणे
येताना एक नंबर सेक्टरच्या अलीकडे एका आजोबाला एक नातू बाय बाय करायला गेटपाशी आला होता
नातू असेल पाच वर्षांचा आणि
ऊंच सडपातळ अंगकाठीचा स्मार्ट शहरी आजोबा असेल ऐंशी जवळ केलेला
मी तिथे पोहोचायच्या आधी नातवाची सगळी वसुली करून झालेली दिसत होती पण तरी तो आजोबाला जाऊ नको म्हणून गळ घालत होता
पाच वर्षाचं पिल्लू आजोबा काही बोलला तरी अरे यार अरे यार करत होता पण सोडत नव्हता
मग माझं लक्ष गेलं त्याची मम्मा सोसायटीच्या गेटशी उभी राहून मायमींग केल्याच्या थाटात त्याला आबाना जाऊ नको देऊस असं सुचवत होती आणि नातवाला ते कळत होतं ही कमाल
खेळ रंगणारच होता
मी लक्ष देऊन बघत होतो, मम्मा तिथून अभिनयाद्वारे म्हणायची उद्या जायला सांग मग नातू म्हणायचा उद्या जा
मम्माने हट्ट करायची अँक्टींग केली की तो पण अगदी लाडात येऊन म्हणायचा नक्का ना जाऊsss
मम्मा खुणेने म्हणा्ली जेवण तयार आहे , तो म्हणाला आपण जेउया
आजोबा म्हणाले अरे अत्ता तर खाल्ल ना , माझं पोट बघ किती भरलय
आणि मी रात्री जेवत नाही रे
मम्मा दोन्ही हाताचा वापर करत म्हणाली आज जेवा
ते त्याला बरोबर कळलं , त्याना बिलगत नातू म्हणाला आज जेउया नाsss
आजोबा म्हणाले तुझी मोठी मम्मी वाट बघत असेल
मम्मा तयारच होती तिने फोन करायची खुण केली
लगेच हा पोपट म्हणाला फोन करुया, मम्मा बोलेल
अरे पण मी कपडॆ नाही आणले माझे
लगेच मम्माने सुचवलं आणि लुंगी गुंडाळायची अँक्टींग केली
लगेच हा म्हणाला मम्माची साडी आहे ना, आजोबा हसायला लागले आणि मम्मा सुद्धा हसत पुढे आली म्हणाली यडू माझी साडी नाही रेsss लुंगी आहे ना पप्पांची आपल्याकडॆ? नातवाच्या ते लक्षात आल्यावर तो लाजला
आणि नातवाला पुढे करून त्याची मम्माच आपल्याला राहयचा आग्रह करतेय हे बघून तो म्हातारा नक्की सुखावला असेल
तितक्यात त्या बाळाचा बाबा आला
मग त्यांच्यात काय बोलणं झालं ते कळलं नाही,पण मुलांचा आग्रह म्हातार्याला मोडवला नसेल
मग नातवाचा हात धरून तो आजोबा परत गेटकडे वळलेला बघितला आणि मीच खुश झालो... हँपी एंडींग

Comments
Post a Comment