रंगीत तालीम
मीता मानगावकर म्हणजे निवृत्त कर्नल मानसींग मानगावकरांची मुलगी
मिलेट्रीची शिस्त ही मानगावकराच्या घराच्या पायापेक्षाही भक्कम , कडक, की जोरदार काय म्हणाल तशी
जसं वय होत गेलं तशा मानसींग यांच्या मिशा आणिकच झुपकेदार आणि आणि अधिकच टोकदार व्हायला लागल्या, त्यांच्या सौभाग्यवती मर्यादेत राहून जरा हसर्या खेळकर होत्या म्हणून घरात निदान वार्याची झुळूक तरी मोकळेपणानी शिरायची
आणि मानसींग मानकरांचं आपल्या सुशील सुस्वरूप पत्नीवर निरातिषय प्रेम होतं तिच्याबद्दल स्वत:पेक्षाही जास्त विश्वास होता, ते शाळेत असताना त्यांच्या मामीनी हळूच त्यांच्या कानात विचारलं होतं " आमच्या बेबीशी लगीन करशिला काय? तेंव्हा मामींची गोलामटोल बेबी मानसींगच्या कडेवरच होती
हा प्रश्न अचानक ऐकून मानसींगाने बेबीला मामीकडे देऊन खोलीबाहेर धूम ठोकली होती
पण जसजशी बेबी मोठी व्हायला लागली तशी ती बेबी राहिली नव्हती नावाप्रमाणे शकुंतला झाली होती
तेंव्हा प्रश्न ऐकून खूली बाहेर धूम ठोकणारा मानसींग ठरवल्या प्रमाणे मिलेट्रीत भरती झाला आणि त्याचं मन शकुंतलेच्या खोलीबाहेर घुटमळायला लागलं , त्यात ती आपल्यासाठी हरतालिकेचा निर्जळी उपास करते कळल्यावर तर त्यांची प्रेमकहाणी अपनेआप शुरू हो गयी
पण म्हणून काय त्यांच्या मुलीना प्रेमविवाह करायला सहजी परवानगी मिळेल अशी परिस्थिती नव्हती
कारण मुली तरूण व्हायला लागल्यावर मानसींग तर फारच कर्नल सारखे वागायला लागले होते
एका मागे एक मानगावकराना तीन कन्यारत्न झाली आणि अक्षरश: रत्नांच्या खाणीतून निवडावीत तशी ही रत्न होती तिघी दिसायला सुंदर अभ्यासात हुशार घरकामात तरबेज
खरंतर शकुंतलेच्या सांगण्यावरूनच कर्नल मुदती आधी जरा मनाविरुद्धच या मुलींसाठी मिलेट्रीतून निवृत्त झाले होते आणि आता या तिघींची लग्न उरकल्याशिवाय ते याभूमिकेतून बाहेर पडणार नव्हते
त्यानी ही पाहरेकर्याची भूमिका जरा जास्तच मनावर घेतली होती
धाकट्या दोघींची याब्द्दल काहीच तक्रार नव्हती कारण त्यांच रुटीन लाईफ सामान्य होतं त्यात मानसींगांची स्पेशल पर्मिशन घेण्याची वेळ कधी येतच नव्हती
पण मीताचं तसं नव्हतं
गेली तीन वर्ष झाली तिची एक प्रेम कहाणी सुरू होती
एरव्ही आई मध्यस्ती करू शकली असती, पण जर्दान बाबतीत तिचं ही काही चालणार नव्हतं
कारण जर्दान धर्माने ज्यु होता
अनेकाना वाटायचं जनार्दनचा शाँर्ट्फाँर्म जर्दान आहे
पण तसं नव्हतं तो खरच धर्माने ज्यु होता पण संस्काराने विचाराने पूर्णपणे या लोकातलाच झाला होता
दिसायला देखणा तरतरीत उंचापुरा रंगाने गोरा बदामी डोळ्यांचा
हजारात बसला तरी उठून दिसेल असा
त्याचं मीताकडे लक्ष जाणं जितकं साहजिक होतं तितकच मीताचही लक्ष त्याच्याकडे जाणं गैर नव्हतं
त्याने मुद्दाम मीताशी ओळख करून घेतली होती, वाढवली होती
त्याच्या घरीही मीता सगळ्याना खूप आवडायची
पण त्याच्या बापानी आधीच सांगितलं होतं "तो कर्नल सटक डोक्याचा आहे"
त्याने आँब्जेक्षन घेतलं तर ये शादी भूल जाओ मुझे कोई झमेला नही चाहिये
आणि मीताला खात्रीच होती पापासाहेब काही या लग्नाला सहजी परवांनगी देणार नाहीत
एकच जमेची बाजू होती मीताची फायनल एक्झाम झाल्या शिवाय घरात तिच्यासाठी स्थळं बघणार नव्हते
म्हणजे जर्दानकडे जरा अवधी होता
तरी जर्दान मानसींगाना भेटायला येण्याचा हट्टच धरून बसला होता
हे ऐकून शकुंतलाबाईना कापरं भरलं होतं
खरच जर्दान मधे नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं , सज्जन सधन घरातला कर्तुत्ववान मुलगा होता
फुटबाँल सारख्या खेळात नावाजलेला होता, स्थानीक नाटकातही लोकांची वहाव्वा मिळवत होता
पण तो आपल्या धर्माचा नव्हता आणि हे मानसींगांच्या पचनी पडणारं नव्हतं
काही जणांचे काही आदर्श ठरून गेलेले असतात, तसं त्यांच होतं
आणि एका संध्याकाळी जर्दान घरी आला आणि मीता सकट तिची आई पांढरी फटक पडली
जर्दान मीतालीला म्हणालाच होता "आज येतो आणि पर्मिशन घेऊनच दाखवतो"
आणि म्हणाल्या प्रमाणे तो आला म्हणजे त्याला वाटल्याप्रमाणे पापासाहेब लगेच रुकार देतील असं नव्हतं
उलट त्याला घरा बाहेर काढून मीताचं घराबाहेर पडणं त्यानी बंद केलं असतं
ठरल्या प्रमाणे पाचच्या ठोक्याला जर्दान घरी आला, पापासाहेबांची क्लबात जायची वेळ
दोन मिनिटं उशीरा आला असता तर पापासाहेब त्याला घरी भेटले नसते
जर्दानने फोनवर वेळ मागून घेतली होती याची मीताला कल्पना नव्हती
पापासाहेबानी त्याचं हसून स्वागत केलं त्याला बसायला सांगितलं मीताचा मित्र म्हणून मीतालाही बाहेर बोलावलं
मीता आईचा हात धरून आली , आई देवाचा धावा करत आली
आणि आता काय होतय पहायला देव शकुंतलाच्या मागे उभे राहिले
पापासाहेबांसमोर बसल्यावर जर्दान दहा मिनिटात पाच ग्लास पाणी प्यायला
नेहमी उकळता चहा पिताना" आयला कसला चहा रे पिचकवणी म्हणणारा
पापासाहेबानी चहाची आठवण केल्यावर गारढोण चहा घशा खाली गटा गटा उतरवता झाला
वातावरणच तंग होतं मीताची शुगर ब्लड प्रेशर सगळं लो झालं होतं
आणि शेवटी जर्दानने बोलायला तोंड उघडलं
आणि ध्यानी मनी नसताना त्याने पापासाहेबाना नाटकात काम कराल का विचारलं
नाटक कुठलं? तर तरुण तुर्क म्हातारे अर्क
मीता बेशुद्ध होता होता शुद्धीवर आली आणि त्याची विचारणा ऐकून सगळ्याच्या पार गेली
पापासाहेबाना हा नाटकात काम कराल का विचारतोय?
या पुढे तिची विचारशक्तीच संपली तिला फक्त पापासाहेबांचं गडगडाटी सात मजली हसणं ऐकू येत होतं
जे ती पहिल्यांदी ऐकत होती
त्याहून हास्यक्ल्लोळ जर्दानच्या ग्रूपमधे पसरला जेंव्हा त्या लोकानी हाझालेला किस्सा ऐकला
मानसींगाना नाटकाची आँफर?
ज्यांच्या मिशा टोकदार त्याही पेक्षा करडी नजर टोकदार
त्याना तरुण तुर्क म्हातारे अर्क मधे काम कराल का विचारायचं? एकजण म्हणाला अरे त्या पेक्षा मला तुमच्या मुलीशी लग्न करायचय, परवांनगी मिळेलं का? विचारणं सोप्प होतं रे
फारतर काय पार्श्र्वभागावर लाथ बसली असती पण ती एकदाच
जर्दान म्हणाला मी घाबरलो हे खरच आहे पण माझं पिल्लू भितीने अर्धमेलं झालं रे आणि तिच्या आईने तर मला हात जोडून मुक्याने विनंती केली नको विचारूस
मग काय, ऐन वेळी जे तोंडावर आलं ते विचारून टाकलं , पण डोंटवरी ते काय माझी आँफर स्विकारणार नाहीत
त्या निमित्ताने त्यांच्या घरी जाणं तर झालं त्यांच्या समोर तर बसलो
पण वरी करायची वेळ तेंव्हा आली जेंव्हा मीतालीने कळवलं पापासाहेब नाटकात काम करायला तयार आहेत
तालमी कधी सुरू करायच्या ते कळवा
आता आली का पंचायीत
पैशाचं सोंग आणता येत नाही, तसच खोटं खोटं नाटकही करता येत नाही
म्हणजे नाटक खोटं असलं तरी ते खरं मानूनच करावं लागतं
पण एक झालं डोकं धरून बसलेल्या ग्रूपमधे अचानक चैतन्य सळसळलं
आपल्या जर्दानचा शब्द खाली पडू द्यायचा नाही असं एकमताने सगळ्यांच्या मनाने घेतलं
अरे पण नाटक करायचं कशासाठी? आता जर्दानलाच एक एक प्रश्न पडायला लागले
ना संस्थेचा वर्धापनदिन ना कुठली स्पर्धा ना कुणाचं बोलावणं
सगळे म्हणाले तालमी तर सुरू करू
फार वर्षांपुर्वी जर्दानने तरुणतुर्क पुण्याच्या ग्रूप बरोबर केलं होतं
पण इतक्या वर्षाने म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात
इथे शकुंतलाने मानसींगाना खूप समजवायचा प्रयत्न केला नाटकात काम करणं सोप्प नाही
आणि इतक्या अचानक रंगमंचावर उभं राहणं तर त्याहून सोप्प नाही वगैरे वगैरे
पण मानसींगानी उत्साहाने नाटाकाचं पुस्तक मागवलं आणि त्यातल्या अजागळ विसराळू तरी प्रामाणीक प्रोफेसरच्या भूमिकेत ते पार रंगून गेले
ह्याचं हे आणि त्याचं ते हा हे ही हो च्या भाषेने तर त्याना खुळच लावलं
आता तेच जर्दानच्या बोलावण्याची वाट बघायला लागले
वेळ मारून न्यायला जर्दान एक एक अडचणी पुढे करत होता आणि पापासाहेब आपल्यापरीने त्यावर सहकार्य करायला तत्पर होते
नाटकाचं वाचन करायला शांत जागा हवी होती
पापासाहेबानी लगेच आपल्या अलिशान बंगल्याची गच्ची देऊ केली
त्या निमित्ताने मीतू भेटणार हे खरं होतं पण नाटक करायलाही निमित्त हवं होतं जे मिळत नव्हतं ही जान खा जानेवाली गोष्ट होती
पण तरी प्यारेलाल पासनं ते कुंदा भागवत पर्यंत सगळे कलाकार नियमीत पापासाहेबांसोबत गच्चीत जमायला लागले वाचन सुरू झालं जर्दान बाकी टेंशन विसरून दिगदर्शन करण्यात रमला पहिले दोन दिवस पापसाहेबांची भंबेरी उडत होती, कारण नाटक तोंडपाठ असून उपयोग नव्हता ते अंगवळणी पडायला हवं होतं
पापासाहेबाना आपल्या भरदार व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध अजागळ प्रोफेसर उभा करायचा होता
तोडरमलानी तो आधीच अजरामर करून ठेवला होता पण पापासाहेबानी तो पाहिलेला नव्हता
दिगदर्शनाच्या निमित्ताने पापासाहेबांची रोज या पोराबरोबर खडाजंगी व्हायची
आणि कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या पापासाहेबाना हा तरणाबांड तडफदार तरुण जास्तच आवडायला लागला होता त्याचा हट्टी स्वभाव सहजी हार न मानणारा बाणेदार बाज
समोरच्याकडून काम काढून घेण्याचं त्याचं कसब
अजागळ व्यक्तिमत्व दाखवताना त्याने हजारो लकबी त्यांच्या समोर उभ्या केल्या होत्या
आणि त्या बघता बघता पापासाहेबांसारख्या करारी माणसाला विसराळू प्रोफेसर मिळत गेला
आणि जर्दान एक माणूस म्हणून कळत गेला
त्यात फुटबाँलचं त्याचं प्राविण्य कळल्यावर तर पापासाहेब त्याच्याबरोबर शाळेच्या ग्राऊंडवरही दिसायला लागले
या वयात आपल्याला तरूण मित्र मिळू शकतो यावर मानसींगांचा विश्वासच बसत नव्हता
जर्दान ला ते जनू म्हणायला लागले त्यांची लेक जानू म्हणतच होती
पण आता पाणी नाकातोंडाशी आलं
कारण देशपांडॆ बाई मिळाल्याबरोबर स्टँडींग रिहर्सल सुरू झाली, आणि प्रयोग करायला निमित्त मिळत नव्हतं
त्यांच्या इथल्या शाळेला अनुदान मिळत असल्याने सरकारी अनुमतीशिवाय वेगळा निधी उभा करणं नियमात बसत नव्हतं
अशावेळी गँसचेंबरचा रोल करणार्या मुलाचा बाप यांच्या मदतीला धाऊन आला,त्याला मानसींग यात भूमिका साकारतोय याची सुतराम कल्पना नव्हती, म्हणजे तशी तो कल्पनाही करू शकत नव्हता आणि या मुलानीही कोणाला तशी कल्पना येऊ दिली नव्हती त्यामुळे ते उत्साहात म्हणाले मी माझ्या मित्राशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो
सगळेच खुश झाले कारण त्याना कल्पना नव्हती
त्यांचे मित्र म्हणजे दस्तुरखुद मानसींग्मानकरच होते निवृत्त कर्नल
मित्राच्या नात्याने अधिकाराने आणि मैत्रीच्या जोरावर ते त्याना आणखी एका नाटकात सामील करून घ्यायला आले होते
मानसींगाना आपल्याला काय ऐकावं लागणार याची कल्पना नव्हती
आणि मित्र सांगायला लागला
मित्रा जगात सगळ्यात पुण्याचं काम काय असेल तर दोन प्रेमिकाना भेटवणं
माझा मुलगा म्हणजे माझा मुलगाच समज इतका तो मला जवळचा आहे, तो एका हेकेखोर बापाच्या मुलीच्या प्रेमात पडलाय, ती मुलगी सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करते
मग अडचण काय आहे? मानसींगानी विचारलं मुलाला नोकरी हवी आहे का?
ते हसले अरे त्याला नोकरीची काय गरज त्याच्या घरचा पिढीजात व्यवसाय आहे, चार चार गाड्या उभ्या आहेत आंगणात
मग अडचण काय आहे? माम्नसींगानी सय्यम राखत विचारलं
अरे सगळ्यात आधी मुख्य अडचण सांगतो, कारण तातडीने ती सोडवायला हवी
काय झालं माझा मुलगा सांगत होता तो त्या मुलीच्या बापाकडे गेला होता मुलीचा हात मागायला
पण ती मुलगी इतकी घाबरली की त्याला वाटलं ती चक्कर येऊन पडेल तसा तो ही घाबरलाच होता पण एकूण त्या परिस्थित त्याला जे विचारायचं होतं हे जमलं नाही
आणि खुळ्यासारखं नाटकात काम कराल का विचारून आला
मग तो हेकेखोर बाप नाटकात काम करायला तयार झाला की काय?
मानसींगानी बेमालूमपणे विचारलं
हो ना! तो तिरसट गृहस्थ तयार होईल असं त्याच्या मुलीलाही वाटलं नव्हतं
मग आता? बोलणं पुढे नेत मानसींग म्हणाले
अरे कमाल ही आहे की ते काम खरच तरबेज कलाकारासारखं करतायत
पण अडचण ही आहे की हा प्रयोग करायला त्यांच्याकडे निमित्तच नाही
तसा प्रयोग लाऊन ते नाटक करू शकतात पण त्या मुलीच्या बापाला संशय यायला नको
मग यात मी काय करू शकतो?
तू क्लबच्या कमीटी मधे आहेस ना?
क्लबचा अन्युअल प्रोग्रँम अजून ठरायचाच आहे
तू या नाटकाची शिफारस करून बघ ना?प्रयोग होणं गरजेचं आहे रे
हे बघ त्या मुलाचं काही त्या इसमाला फसवायचं इंटेंशन नव्हतं पण तरी तो बोलून गेला
आणि निव्वळ त्याच्यासाठी सगळे झटायला उभे राहिले
खूप मेहेनत घेतायत रे,
इतका चांगला मुलगा आहे मग अडचण काय आहे?
अरे तो धर्माने यहूदी आहे ज्यु
तो क्षण मानसींगानी कसा पेलला कोणजाणे ? कदाचीत इतक्या दिवसांचा सहवास कामी आला असेल
जनूची अनेक भावलेली रूपं त्याचे गुण त्याना स्मरले असतील
दिगदर्शन करताना त्याच्यातलं नेतृत्व त्याच्यातली जबाबदारी घेण्याची वृत्ती त्यानी आजमावली असेल
रोज घरी यायची संधी मिळूनही त्यानी कधी संधीचा गैरफायदा घेतला नाही याची जाणीव त्याना त्या क्षणी झाली असेल
पण ताकास तूर न लागू देता ते मित्राला इतकच म्हणाले कमीटीपुढे प्रस्ताव तू मांड मी दुजोरा देतो
साधारण काय बजेट असेल
जे तुम्ही द्याल ते रे... मित्र खुश होत म्हणाला जर्दानसाठी प्रत्येक्जण मानधनाची अपेक्षा न करता काम करतोय वेळ पडली तर थोडा आर्थीक भार मी सुद्धा उचलेन जर्दानच्या बापाला हे नाटकं वगैरे आवडत नाही
पण आईला कौतूक आहे ती पण देईल
पण एक प्रयोग करायला साधारण किती खर्च येतो?
आपण करू तेव्हढा.... लग्न किती थाटात करायचं ते आपल्यावर असतं
एक लाख बास होतील?
अरे खूप झाले, इतके पण नकोत खरे
आमच्या पोराचं सगळं मार्गी लागो म्हणजे झालं
आजारपणाचं कारण सांगून मानसींगानी जरा दोन दिवसांची गँप घेतली
इकडे क्लबच्या कमिटीसमोर तरुणतुर्कचा प्रस्ताव आला
सगळ्यानाच आनंद झाला या वर्षी जरा वेगळं , नाहीतर दरवर्षी ठरलेला हिंदी गाण्याचा आँर्केस्ट्रा
किती नाही म्हंटलं तरी मानसींगांचं वागणं बदललं ते जरा जाणवण्या इतके गंभीर झाले
सगळ्याना वाटलं नाटकाचं टेंशन आलं असेल, आजारपणाचा थकवा आला असेल...पण ते जर्दानला आता वेगळ्या नजरेने निरखत होते
आणि जर्दान त्याना धीर देत होता समजावत होता
रंगीत तालीम क्लबच्या हाँलमधेच ठरली, आणि मानसींग त्यात काम करत असल्याची कुण कुण सगळ्याना लागली त्यामुळे उत्सुकता फारच ताणली गेली
त्याचा ताण अर्थात या सगळ्यांवरही आला
आणि रंगीत तालमीला जर्दान मानसींगांचे आशीर्वाद घ्यायला आला
एकूण मानसींगांची चर्या बघून तो धीर एक्वटून इतकच म्हणाला, कर्नलसाहेब तुम्ही टेंशन घेऊ नका
तुम्ही माझ्यामुळे या सगळ्यात गोवले गेलात
इनकेस तुम्हाला नाही जमलं काही चूक झाली तर त्याची सर्व जबाब्दारी माझी असेल
असं म्हणून त्याने खिशातून एक लिफाफा काढला आणि त्यांच्या हाती देत म्हणाला जर तुम्ही रंगीत तालीम करायचं ठरवलं असेल तर लिफाफा मग उघडा, रंगीत तालीम म्हणजे जवळ जवळ प्रयोगच असतो
आणि करणार नसाल तर अत्ता उघडलात तरी हरकत नाही
असं म्हणून तो त्यांच्या पाया पडला
मानसींगानी त्याच्या देखत तो लिफाफा खिशात घातला
आणि पडदा उघडल्या बरोबर ते चढाईवर जाताना जसे तयार असायचे तसे तयार राहिले लिफाफ्यात काय लिहिलं असेल या प्रश्नाची उत्सुकता त्याना जास्त एन्करेज करत होती
प्रवेशा मागे प्रवेश पार पडत होते ह्याचा हा आणि ह्याची ही करत मानसींग हा हा ही ही हे हे करायला प्रेक्षकाना भाग पाडत होते , अतिशय रंगतदार चीरकाळ स्मरणात राहील असा प्रयोग झाला
आणि एका नाटकावर पडदा पडला
मानसींगानी मेक अप उतरवायच्या आधी लिफाफा उघडला
तर आत कागद कोरा होता, संतापाची लाट उसळली, त्यानी फर्मान सोडलं " जर्दानला बोलवा
तो समोर हजर झाला
कोरा कागद त्याच्या समोर नाचवत ते गरजले हे काय आहे?
जर्दानने दुसरा लिफाफा त्यांच्या समोर धरला यात मी लेखी माफी आणि आभार मानले आहेत
मग हा कोरा लिफाफा कशासाठी?
जर्दान म्हणाला क्षमा करा पण मी तेंव्हा एक दिगदर्शक होतो
उत्तम दिगदर्शकाला आपल्या कलाकाराची नस न नस माहीत असावी लागते
तालीम सुरू व्हायच्या आधी तुमची मनस्थिती अस्थीर होती, अनेक स्तरांवर तुमचे विचार सुरू होते
क्लबकडून आँफर आली तेंव्हाच मला शंका आली होती की तुम्हाला सगळं खरं समजलय
पण ती वेळ कबुली देत बसण्याची नव्हती पण तुमची मनोवृत्ती एकाच विचारावर स्थीर करण्याची गरज होती म्हणून तो रिकामा लिफाफा दिला, कारण पूर्ण तालीम तुम्ही खिशातला लिफाफा जपत चाचपडत स्थीर झालात
ाअणि तो उघडल्यावर तुम्ही मला बोलावणार याची मला खात्री होती त्यायोगे मला सुद्धा बोलायची संधी मिळणार होती,
पण शेवटी ती रंगीत तालीम होती नाटकाची
आणि आपल्या खर्या नात्याची सुद्धा
कारण माझी आई म्हणते तुम्ही दोघं एकत्र येणार म्हणजे तुमच्यामुळे दोन कुटूंब दोन संस्कृती एकत्र येणार
तेंव्हा कोणताही गैरसमज वितुष्ट उरता कमा नये
जसा प्रयोग झाल्यावर पडदा पडतो तशी तुमची मर्जी नसेल तर मी सगळ्यावर पडदा पाडायला तयार आहे
फक्त एक विनंती आहे की फायनल प्रयोग आपण करुया
कारण काँट्रँक्टचा शो आम्हा नाटकमंडळींसाठी महत्वाचा असतो
त्याला थोपटत मानसींग म्हणाले प्रयोग नक्की करू फक्त एका अटीवर
तुमच्या लग्नाच्या निमित्ताने होणार्या संगीत समारंभात आपण हाच प्रयोग पून्हा करू ज्यात देशपांडे बाई म्हणून तुझी सासू उभी असेल......

Awwwww... काका...👌👍 अल्वेज लब्यु...😍😍😍
ReplyDeleteखूप दिवसानी एक नवीन मस्त गोष्ट वाचायला मिळाली. छान जमून आली आहे. वाचल्यावर मन कसे ताजेतवाने झाले आहे. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteMastch
ReplyDeleteekdam mast, Mama. Khoop divasani mast goshta wachayala milali
ReplyDelete