माझ्या आईची गोष्ट
साधारण चाळीस बेचाळीस वर्षांपुर्वी विलेपार्ल्याला माझ्या आईचं बाल संगोपन केंद्र होतं
अगदी वीस दिवसाच्या बाळापासनं ते पंधरा वर्षाच्या धगुरड्या मुलांपर्यंत त्या बलसंगोपनात मुलं भरती होती
पन्नासच्या खाली मुलांची संख्या कधी आली़च नाही
आईच्या कित्येक सहकारी महिला वर्षोंवर्ष आईला धरून होत्या
मुलांच्या बाबतीत हेळसांड हा शब्द आईला मान्यच नव्हता
निव्वळ या मुलांसाठीच आईने बालवर्ग सुरू केले आणि ते ही कित्येक वर्ष चालू होते ते इतके फोफावले की मराठी इंग्रजी हिंदी माध्यमातून मुलं शिकत होती
चित्रकार केतकरांच्या घरी किती वर्ष हे बालवर्ग भरत होते
त्या बालवर्गातून मुलं डायरेक्ट पार्ले टिळक विद्यालय, महिला संघ इंग्रजी माध्यमात प्राथमीक वर्गात भरती होत
सकाळी साडेसहाला पहिली दोन मुलं धावत पळत पालक सोडून जायचे, अर्धवट झोपेत असलेली ती मुलं मग आमच्या कुणाच्या तरी कुशीत गाढ झोपी जायची
मग एक एक करत गोखल्यांचं घर जाग व्हायचं
मग आमचाही दिवस त्या मुलांच्या किलबिलाटात वाट काढत काढत पार पडायचा, सगळं अंगवळणी पडलं होतं
पालकाना सुरुवातीला फक्त मुलांचं दूध आणि औषधं द्यावी लागायची, पण नंतर दूध सुद्धा आईच पुरवायला लागली कारण कधी कुणाच्या डब्यातलं दूध नासायचं , तर कोणी दूध आणायला विसरायचं तो गोंधळ टाळायला आईनेच ती जबाबदारी स्विकारली आणि दुधाच्या पंधरा वीस बाटल्या घरात यायला लागल्या फार मोठ्या पातेल्यात दूध बघायची सवय त्यामुळे जडली
घरच्या गडबडी मुळे आम्हा सगळ्यानाच मोठ्याने बोलायची सवय झाली होती
आम्ही जेवताना कुठल्या बाळाने शी सू केली तरी आम्हाला काही वाटायचं नाही,आमच्या कडे आलेले पाहुणे नाक मुरडायचे कोणी ताटावरून उठायचे
आँफीसला जाता जाता आया किंवा मुलांचे बाबा त्याना आमच्याकडे सोडून जायचे
किती सासुरवाशिणी असायच्या सासरचा जाच सोसत नाईलाजाने मुलाना जन्म देत होत्या आणि नोकरी सुद्धा नाईलाजाने करत होत्या
ना त्याना मुलाची हौस असायची ना नोकरीची
आई अशा मुलींचं प्रबोधन करायची, त्यांच्यात पडलेला बदल आईच्या बोलण्याने आम्हाला कळायचा
सांगितलं तर खोटं वाटेल पण कोण उपाशी पोटी मुलाना सोडायला आलय हे आईला नुसतं बघुन कळायचं
अशा या बायका खरं तर मुलीच उभ्या उभ्या पोळी भाजी खाऊन म्हणजे घास तोंडात कोंबून भरल्या पोटा पेक्षा भरल्या डोळ्याने आमच्याकडून जाताना मी बालवयात पाहिल्या आहेत
भुकेल्या भाकरी आणि बसाया ओसरी अशी साईंची शिकवण होती जी पोथी वाचायच्या आधीच आई करवी त्यानी आमच्या अंगवळणी पाडली
आई अगदी आईच्या मायेनं त्याना खाऊ घालायची,त्यात कसला अविर्भाव नसायचा त्यामुळे आला गेला किती खाऊन गेला हे कळायला मार्ग नसायचा
म्हणूनच पोळ्याना बाई असून शरयु, माईला सुद्धा शाळेत जायच्या आधी पोळ्या करून जावं लागायचं
धबडगाच असा होता
एव्हढ्या धबडग्यात मला आठवत राहिली ती रूपा पोवार
तेंव्हा ती दोन वर्षांची होती, दिसायला अतिशय सूंदर, तिच्या आईच्या वळणावरच ती गेली होती, बाप दिसायला सेम शत्रुघ्न सिन्हा
तसाच तगडा आणि रंगाने काळा कुट्ट, पण चेहर्यावर हास्य असं की
पुछो मत
पण बाकी प्रकारही पुछो मतच होता
हे आईला कळायचं काही प्रश्नच नव्हता
पण नाँर्मली पालक आँफिसात जाताना मुलाना आमच्याकडे सोडून जात आणि घरी येताना येऊन घेऊन जात, फार तर कोणी येता येता बाजारहाट उरकून येई, कोणी घरी आँफीसची बँग टाकून येई
पण फार कमी आया घरी येऊन छान एक झोप काढून चहा पिऊन मग मुलाला न्यायला येत आणि वर मग! पैसे देतोना आम्ही अशी भाषा करत
रुपालीची आई तशी नव्हती पण हल्ली तिला नेहमी यायला उशीर व्हायचा
सगळी मुलं गेली की रुपा हिरमुसली होऊन वाट बघत बसायची
वयाच्या मानाने ती खूप लवकर बोलायला लागली होती, आणि तिला समजही खूप होती तिची आई उशीरा येण्यावरून कामाला असलेल्या बायकांपैकी कोणी टाँट मारला तर तो ही तिला कळायचा ती मुसमुसल्या सारखी रडू आवरत डोळे पुसत राहयची, ही ओळ लिहिताना माझे ही डोळे अत्ता डब्डबलेत कारण मला तिचं ते रूप आठवतय
पण आमच्या आईला चाईल्ड सायकाँलाँजी इतकी समजायची
की तिला धीर द्यायला रुपाली समोर आई त्या बाईला सज्जड दम द्यायची
तिला रुपालीला साँरी म्हणायला लावायची
तिच्यासाठी मी तुला जास्तवेळ थांब म्हणाले का?
तुझी वेळ झाली की तू जा
या बाळाला सांभाळायची माझी जबाबदारी आहे, मी सांभाळेन ,माझी शहाणी बाहुली आहेती असं म्हणून आई तिला कडेवर घ्यायची,भराभर तिचे पापे घ्यायची त्या इवल्याशा जिवाला तेव्हढा आधार पुरेसा असायचा
रुपालीला आमच्या बद्दल फार प्रेम आणि विश्वास होता
कधी कधी फार सुचक बोलायची ती, तिची आई नेहमी धावत पळत अपराधी भावनेने यायची आणि काहीतरी कारणं पुढे करून रुपाला उचलायची
पण एकदा रुपानीच सांगितलं पप्पा दुसर्या मम्मी वर प्रेम करतात तिच्या बरोबर जातात, मम्मी त्याना शोधायला त्यांच्या मागे जाते
इतकासा छोटासा जिव तो, त्याला काय कळतय, पण घरी घडणार्या प्रसंगावरून आणि एकूण बोलाचालीवरून तिला कळलं होतं
आणि हे तिची आई आम्हाला सांगणं कधी शक्यच नव्हतं
माझ्या आईचं वेगळेपण कुठे येतं? आई तिला काही नं विचारता ती आली की निघायच्या आधी तिला खाऊ पिऊ घालायला लागली, किती हडकत चालली आहेस बघ हे आईचं वाक्य मी कधीच विसरणार नाही
आई तिच्या जवळ बसून तिला खाऊ घालायची आणि रुपालीलाही भरवायची
शेवटी असं सात आठ वेळा झाल्यावर त्या बाईचा बांध फुटला आणि तिने काय तो प्रकार सांगितला म्हणाली आमचा प्रेमविवाहं असून तो आता दुसर्या बाईच्या म्हणजे त्याच्या बाँसच्या बायकोच्या प्रेमात पडलाय ती त्याच्या पेक्षा दहा वर्षानी मोठी आहे पण तिच्या पुढे त्याला सगळ्याचा विसर पडतो तिच्या पायी तो रोज मला मारतो
पण मग तू का त्याच्या मागे जात्येस?
मला त्याला रेडहँड पकडायचय
त्यानी काय होणारे?
तिच्या समोर थोबाडून काढणार आहे मी, त्याच्या जिवावर गावातून इथे आले मरायला, मग त्याला काय अशीच सोडू?
अशी सोडूच नकोस! आईने तिला समजावलं, पण त्याच्या मागे धाऊन तू स्वत:चं आयुष्य बरबाद करू नकोस
स्वत:कडे लक्ष दे स्वत:च्या पायावर अशी उभी रहा की चरजण तुझं नाव आदरानं आणि अभिमानाने घेतील
तुझ्या नावापुढे तुझ्या नवर्याला आपलं नाव थिटं वाटेल
बघ काय करता येतय?
जिथे नोकरी करतेस तिथेच प्रगती होतेय का बघ, आणखी पर्याय शोध
शिकायचं असेल तर शिक
मी तुला वचन देते तुझी धडपड सुरू असे पर्यंत तुझ्या या बाळाला मी माझ्या पोटाशी धरून वाढवेन, सांभाळेन जशी मला माझी नात तशीच ही
आपणहून नवर्याला काही सांगायला जाऊ नकोस
आणि त्याला कळलं तर नाकारू नकोस
पण त्याच्या मागे धावणं सोड त्यापेक्षा तो वेळ स्वत:ला दे
स्वत:ला सांभाळ
खात्रीने सांगतो त्या रात्री रुपाची आई रात्री झोपलीच नसणार
आणि खरच त्या नंतर दोन अडीच वर्ष आई त्या मायलेकींच्या मागे अशी उभी राहिली किती वेळा दोघी रात्री जेऊनच घरी जायच्या
कितीवेळा रुपाली रात्री आमच्याकडेच राहयची
कारण तिची आई तेंव्हा काँम्प्युटर शिकत होती
काँम्प्युटर हा उल्ल्लेख आम्ही तेंव्हा फक्त त्रिशूल सिनेमात पहिल्यांदी ऐकला होता तो इतका नवा होता की ्त्रिशूल मधे शशीकपूर राखीला सारखा काँम्प्युटर काँम्प्युटर म्हणत असतो शेवटी संजीवकुमार त्याला विचारतो "काय तू तिला सारखं काँम्प्युटर म्हणत असतोस?
त्यावर शशी कपूर उत्तर देतो "पापा ये ऐसी मशीन है।जिसे सब पता रेहेता है। जैसे गीता को कोईभी जानकारी पुछो वो उसके जुबान पर रेहती है
बस तेंव्हा या यंत्राची इतकीच माहीती आम्हाला झाली नंतर कित्येक वर्ष हा शब्द गायबच झाला आणि आला तो झंजावाता सारखा म्हणजे इतका की ज्याला काँम्प्युटर येत नाही तो अंगठबहाद्दर म्हणायची पाळी
पण रुपालीच्या आईचं तसं झालं नाही आमच्या आईने तिला उद्युक्त केल्यावर ती जी शिकत राहिली ती थांबलीच नाही
तिने कधी भरारी घेतली, ती कधी स्काँटलंडला निघून गेली
कधी रुपाली तिकडेच शिक्षण घेऊन स्थायीक झाली आम्हाला कळलच नाही
आणि आज हे सगळं आठवलं कारण दीपक धर्माधिकारी नावाचा एक मुलगा आईच्या बाल्संगोपनात होता तो स्काँटलंडला गेलेला असताना त्याला रूपा भेटली गम्मत म्हणजे रूपानीच त्याला ओळखला
पन्नाशीला आलेली रुपा आता छायामवशी हयात नाही म्हंटल्यावर डोळ्याला रूमाल लावती झाली
दीपक म्हणाला शेखरमामा ती एक वाक्य छान म्हणाली
की छाया मावशी राह्त होती त्या रोडला छायमावशीचच नाव द्यायला हवं
सौ छायामावशी गोखले मार्ग

अशा आठवणी चटकन भिडतात मनाला...खूप जबरदस्त..👌👌👌
ReplyDeleteफारच सुंदर
ReplyDeleteaprarim
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteछाया मावशी ना दंडवत
ReplyDelete__/\__
❤❤🙌
ReplyDeleteपाणी आलं डोळ्यांत.. अप्रतिम !
ReplyDelete