टी के एफ जी
टी के एफ जी ग्रूपची स्थापना वगैरे नं होता हा ग्रूप स्थापन झाला
बर! हा ग्रूप कोणी चार तरूण लोकानी येऊन स्थापन केला असं नाही
याचं सभासद होणं सोपं आहे, आणि याची शाखा आपण कुठेही सुरू करू शकतो
हे या ग्रूपचं वैशिष्टय आहे
पण नदीचाउगम जसा कधी छोट्याशा झर्याच्या रूपात दिसतो, कधी कधी थेंब थेंब पणी सुद्धा उगमस्थानाला पुरतं तसं अवघ्या तीन सभासदांसहीत हा ग्रूप सुरू झाला
त्या ग्रूपच्या सुरुवातीची ही गोष्ट
जानकी आणि प्रज्योत दोघी घनिष्ट म्हणजे अगदी घनिष्ट मैत्रीणी, इतक्या की दोघींची हस्ताक्षरं ही जवळ जवळ सारखी, त्या न्यायाने शैक्षणीक प्रगती ही सारखी म्हणजे उत्तम दर्जाची
त्यातही एकीला वर्गाबाहेर उभं केलं तर दुसरीला वर्गात बसून चैन पडायचं नाही, ही बाहेर गेली म्हणजे दुसरी स्वस्थ बसणार नाही याचा अंदाज असल्याने बाई दुसरीलाही बाहेर पाठवायच्या ओल्या बरोबर सुकं जळायला एका पायावर तयार,
तर या अशा घनिष्ट मैत्रीणी बघता बघता मोठ्या झाल्या
आणि जानकीने जातीबाहेर विवाहं जमवला, झालं! गहजबच झाला
दोन्हीकडून कडाडून विरोध झाला
उत्तमशी लग्न नाही झालं तर मी आत्महत्या करेन अशी धमकी जानकीने देऊन ठेवली
या चार पाच बहिणी असूनही त्या काळात त्यांचे आई बाप आपल्या मुलींच्या गोतावळ्यावर खुश होते
जिव की प्राण करत होते , तळ हाताच्या फोडासारखे जपत होते
पण हिने जातीबाहेर लग्न केलं तर बाकीच्या मुलींची लग्न कशी होतील? ही काळजी त्या काळाच्या नुसार आई बापाना लागून राहिली
त्यात जानकीने जिव दिला तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही अशी धमकी प्रज्योत ने आपल्या घरी दिली
प्रज्योतच्या घरचा आर्थीक स्तर जानकीच्या घरापेक्षा जरा... जरा काय बराच वरचा होता
पण या दोघींच्या मैत्रीमुळे त्या दोन्ही घरात घरोबा निर्माण झाला होता
जानकीला तीन तीन बहिणी होत्या प्रज्योत एकुलती एक होती
तिच्या आईबापाना धास्ती वाटणं साहजिक होतं , मग त्यानी जानकी कडे जाऊन ही बाब संगितली
नाहक दोन दोन तरूण मुलींचा जिव पणाला लावण्याइतके जानकीचे आईवडीलही हट्टी नव्हते, दुराग्राही नव्हते
शेवटी टम्याच्या घरी म्हणजे उत्तमच्या घरी त्यांचाही विरोध आहे हे माहीत असून ते भेटायला जायला तयार झाले
मग प्रज्योतचे आई बाबा आणि जानकीचे पप्पा मम्मी टम्याकडे अगदी शरणागती पत्करून गेले
खरं तर टम्याच्या घरचा स्तर यांच्यापेक्षा आणखी खालचा, त्यात जातपातीने ही जरा मागासलेलेच पण मुलाकडचे,
पण एक गम्मत झाली, प्रज्योतचे बाबा नेमके टम्याच्या बापाचे साहेब निघाले
एव्हढे मोठे साहेब टम्यामुळे भेटायला आपल्या वस्तीत आपल्या घरी आले, याचं टम्याच्या बापाला काय अप्रूप
त्याने शेजार्यांकडून कँमेरा आणून फोटो बिटॊ काढून आपल्या साहेबांची ही भेट अगदी चार चौघात मिरवली
आणि गोडी गुलाबीने लग्न त्यांच्या ऐपती प्रमाणे थाटात पार पडलं
उत्तम कामसू होता, हुशार होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक होता
जानकीची निवड चुकली नाही याचं समाधान तिच्या मम्मी पप्पाना लवकरच मिळालं
मग प्रज्योतचंही लग्न थाटामाटात त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यात रीतसर स्थळ बघून झालं
प्रज्योतचा जोडिदारही समंजस सज्जन समजुतदार होता, सगळ्यांची सोय बघून तो घरजावई व्हायला तयार झाला, तशी प्रज्योतही अगदी हसून खेळून सासरच्यांशी संबंध धरून होती, जावा नणंदा भाचे पुतण्या कुणालाही प्रज्योतचं घर परकं नव्हतं जानकीला लगेच दोन मुलं झाली
प्रज्योतची कूस उजायला जरा वेळ लागला पण तिलाही मुलगा झाला
पण इथे मैत्रीत जरासं अंतर पडायला लागलं , मुलींच्या बाबतीत तर हे बरेचदा होतच
या मुली आपल्या घर संसारात मुलांपेक्षा जास्त रमतात किंवा गुरफटून घेतात तसं झालं
शिवाय आर्थीक स्तर होताच
भेटी गाठी पहिल्या सारख्या व्हायच्या नाहीत
झाल्या तरी पहिल्या सारखं बोलणं जमायचं नाही,
संसाराची जबाबदारी पेलायला जानकीला नोकरी करण्ं गरजेचं होतं , आणि प्रज्योतचा नवरा त्याच्या वकिलीत
इतकं कमवत होता की तिला नोकरीची गरज नव्हती
त्यामुळे सुद्धा दोघींचं सर्कल बदललं , भेटल्या की जानकी आँफीसमधल्या गोष्टी सांगायची ज्यात प्रज्योतला रस नसायचा, आणि प्रज्योत तिच्या क्लब मधल्या नाहीतर किटी पार्टीच्या गमती सांगायची ज्या जानकीला कळायच्या नाहीत, हीच वेळ होती मैत्री धरून ठेवायची
आणि तसा योगही जुळून आला कंपनीत आँन ड्युटी असताना उत्तमला कंपनीच्या गलथानपणामुळे एक गंभीर अपघात झाला
आणि मँनेजमेंट सगळी चुक उत्तम वर ढकलून हात झटकायचा प्रयत्न करत होती
उपचारांचा खर्च तर अवाक्याबाहेरचा होता
जानकीच्या बहिणी तर होत्याच पण तेंव्हा जबाबदारीचा मोठा वाटा प्रज्योतने उचलला, सगळ्यात आधी तिच्या दोन्ही मुलाना आपल्याकडे घेऊन आली, त्यांची शाळा क्लासेस अभ्यास जेवणखाण कशाचच टेंशन जानकीला राहिलं नाही शिवाय आर्थीक मदत केली ती वेगळीच
त्याहून मोठी गोष्ट म्हणजे प्रज्योतचा नवरा विना मोबदला उत्तमची केस लढला आणि जिंकला
दाम दुपटीने त्याने कंपनीकडून मोबदला मिळवून दिला, एक उपकाराचं विनाकारण ओझं आल्या सारखं झालं
जितके जवळचे तितके हळवे असतो आपण आणि परिस्थितीने जास्तच होत जातो
जानकीचं तसं झालं जे प्रज्योतच्या लक्षात आलं नाही
उत्तम हाँस्पिटल मधे होता तेंव्हा प्रज्योत कडूनच डबा जायचा
आणि उत्तमला प्रज्योतकडचे काही पदार्थ विशेष आवडायचे, मग हे लक्षात ठेऊन उत्तम घरी आला तरी प्रज्योत न चुकता त्याच्या आवडीचे पदार्थ घरात बनले की त्याला म्हणजे घरी सगळ्याना पुरेल इतके पाठवायची, बर ! हे पाठवणही राजेशाही, प्रज्योतला स्वत:ला यायला जमायचं नाही
पण तिची आलिशान गाडी जानकीच्या घरापाशी यायची मुलांचे ड्रायव्हर काका तो सरंजाम घेऊन यायचे
त्या बरोबर एक निरोप डब्यात काही देत बसू नकोस, डबे तसेच पाठव
पण या मुली संसारात पडल्या ना की खरच बदलतातच, मग त्याना बर्याचशा पद्धती कसोशीने पाळायची जिद्द निर्माण होते, आता कोणी काही दिलं तर भांड रिकामं परत करायचं नाही ही अगदी सहज सुरू झालेली पद्धत असेल पण तो नियम झाला आणि त्याचं स्वरूप जाचक बनलं , बनत गेलं
जानकीचं तेच झालं नोकरी संसार मुलांचा अभ्यास त्यात उत्तमची काळजी यात प्रत्येक वेळी घरात डब्यात भरून द्यायला काही नसायचं मग डबा मग पाठवते हे ठरलेलं उत्तर
बरं! प्रज्योतच्या डोक्यात हे काही नव्हतं ती आपली सुरू झालेला सिलसिला प्रेमाने सुरू ठेवत होती, पण चार डबे जानकी कडे अडकल्यावर ती एकदा पोळ्या करायला येणार्या बाईंजवळ अगदी स्वत:शी बोलावं तसं बोलली की निदान डबे तरी वेळेवर पाठवायचे ना हिने
कानगोष्टीत सुरुवातीचं वाक्य कधीच तसच्या तसं राहत नाही, तसच झालं
त्या पोळेवाल्या बाईंची बहीण नेमकी जानकीची शेजारीण निघाली, तशीही ती जनकीवर उगीच जळत होती
मोठी गाडी दाराशी येते , ते ड्रायव्हर हिच्या मुलाना फिरवून आणतात, मिस्टराना दवाखान्यात नेऊन आणतात
म्हणून ही माज करते अशी तिची भावना होती त्यात जानकी नोकरी करते यावरूनही तिला घरी ऐकून घ्यावं लागत होतं त्यामुळे तिच्या कानावर ही गोष्ट म्हणजे माकडाच्या हातात कोलीथ
तिने लगबगीने जानकीला ही माहिती पुरवली
आधीच घरच्या व्यापाने गांजलेली, त्या क्षणाला प्रज्योतपेक्षा शेजारीण जवळची झाली
ती उद्वेगानं म्हणाली" कितिदा सांगते नको पाठवत जाऊस, पण ऐकतच नाही, आणि याना सुद्धा पुळका येतो
ती काय स्वत: स्वैपाक करत नाही, बाईच येते स्वैपाकाला
कल्पना करा हे वक्तव्य प्रज्योतच्या कानावर गेल्यावर तिचं काय झालं असेल?
त्यात मुद्दाम चार पदार्थ करून जानकीने तिचे राहिलेले सगळे डबे पाठवून दिले त्यात अगदी चुकून प्रज्योतने काही निमित्ताने सप्रेम भेट दिलेले डबेही पाठवले गेले
खल्लास! दोघी भांडल्या नाहीत पण गप्पच होऊन गेल्या
नक्की काय झालय हे बाहेरच्यानाच काय दोघींच्या घरीही कळायला मार्ग नव्हता
जसा काळ पुढे गेला तशी ताठरता वाढत गेली, प्रेम संपलं की व्यवहार उरतो हा तर मानवी स्वभाव आहे
मग काय काय केलं याचे हिशोब होतात उजळणी सुरू होते
मग काही ना काही कानावर येत राहतं पण तोंड उघडलं जात नाही
जानकीच्या बहिणीला तर आश्चर्यच वाटलं जेंव्हा तिला बघून प्रज्योतने गाडी थांबवली नाही, ना हात केला
हे कसं शक्य आहे? तिने जानकीला विचारलं
जानकी म्हणाली इतकी बडी माणसं पण चार डब्यांसाठी मला बोलणी ऐकून घ्यावी लागली
बहीण समजली काय झालय ते
आणि गोष्टी जुळून आल्या की योग जुळून येतात तसं झालं
पावसाळा तोंडावर आला होता म्हणून ती जानकी बरोबर महत्वाची खरेदी करायला बाहेर पडली होती
पावसाळा तोंडावर म्हणता म्हणता पावसाचा शिडकावा तोंडावर झाला दोघी भर बाजारात बेसावध
धावल्या दुकानाच्या आश्रयाला
तेव्हढ्यात प्रज्योतची रणगड्यासारखी गाडी गर्दीतून वाट काढत जाताना दिसली
ध्यानी मनी नसताना जानकीची बहीण गाडी समोर उभी राहिली
प्रज्योतचा नाईलाज झाला, अगं झालं काय म्हणत ती गाडीतून उतरली
पाऊस पडतच होता, तिचा हात धरून जानकीची बहीण जानकी समोर आली
प्रज्योत तू चार डब्यांसाठी ताईला काही बोललीस?
प्रज्योतच्या लक्षातच काही येईना, मग बहिणीनेच सुरुवातीपासून आठवण करून दिली
प्रज्योतने कपाळाला हात लावला म्हणाली अगं सहज म्हणाले होते, कागाळी करायच्या दृष्टीने नाही
आणि जानकीच्या पाठीत धपाटा घालत प्रज्योत म्हणाली आणि तुला कोणी सांगितलं ग? माझ्या घरी स्वैपाकीण स्वैपाक करून जाते
तुझ्या मुलाना विचार ओट्याशी कोण राबतं ते?त्यानी पाहिलय मला स्वैपाक करताना
पोळ्याना बाई ठेवली म्हणजे काय, आईच्या काळापासनं ती पोळ्या करत होती म्हणून
तू आँफीसला जातेस, त्यात उत्तमची प्रकृती तेंव्हा बरी नव्हती, तुझी सोय म्हणून मी काही ना काही करून पाठवत होते
जानकी काही बोलली नाही, चक्क भर पावसात भर मार्केट मधे प्रज्योतच्या गळ्यात पडून रडायला लागली
इतकी आपली घट्ट मैत्री आणि असं झालच कसं आपल्यात? हा प्रशन दोघीना पडला होता
त्यावर बहीण खूप अर्थपूर्ण बोलून गेली, "सावली पायाशी आली की अखुडच होते
अखुड्ते म्हणून पायाशी येते, नाहीतर दूरवर पसरते
तुम्ही दोघीही आधी एकमेकींचा विचार करायचात, आता आधी स्वत:चा करत असाल
नाहीतर ताड की फाड बोलून मँटर संपवायला कितीसा वेळ?या आधी काय एकमेकींशी ताड की फाड बोलत नव्हतात?, घनिष्ट मैत्री कधी भांड्ल्याशिवाय सिद्ध झाली आहे?
त्या वरून या ग्रूपची सुरुवात झाली, ताड की फाड ग्रूप
कुठेही असे उगाच मतभेद दिसले की प्रज्योत त्या दोघाना समोर उभं करून ताड की फाड बोलते खडाजंगी होते कधी कधी पण बरेचदा कोंडी सुटते अबोला संपतो दुरावा रहात नाही
जानकी सुद्धा आपल्या परीने यात हातभार लावत असते
जिने ही सुरुवात केली तिचं माहीत नाही पण टी के एफ जी ची व्याप्ती मात्र दिवसेंदिवस पसरत चालली आहे
पसरत जाणार्या सावली सारखी

Mast
ReplyDeleteTad ki fad shevat :-)
ReplyDelete