सुटका
मेघना सोपारकर शी माझी मैत्री खूप जुनी खूप जुनी म्हणजे अगदी काँलेजच्या जमान्यातली, तसं पाहिलं तर ,ती आमच्या काँलेजमधे नव्हती पण घना म्हणजे घनश्याम कामेरकर आमच्या बरोबर शिकत होता दिसायला देखणा आणि वागायला सज्जन त्याच्यात इतकेच प्लस पाँईंट होते, बाकी काही खास सांगण्या सारखं नव्हतं ना आभ्यासात स्वारस्य ना इतर उपक्रमात रस खरं तर आवाज गोड होता, सुरात गुणगुणायचा पण तरी गाणं कधी त्यानी मनापासून केलच नाही खरं तर मेघनावर मनापासून जीव ओतून प्रेम करण्याशिवाय त्याने दुसरं काही केलं नाही त्याला कारणही तसच होतं त्यांचं एक स्टेशनरीचं मामुली दुकान होतं आणि प्रामाणिक नोकरांच्या भरवशावर ते ठीक ठाक चाललं होतं शिवाय चुलत्या विरुद्ध कित्येक वर्ष सुरू असलेली घराची केस त्याची आई जिंकली होती त्या घराची किम्मत आज ना उद्या दिन दुगनी मिळणार याची त्याला खात्री होती म्हणूनच तो अंतर्बाह्य निवांत होता मेघना खरं तर तशी नव्हती, तिला प्रत्येक गोष्टीत रस होता ती कुशाग्र बुद्धीची होती पण तिचही आमच्या घनावर घनदाट प्रेम होतं आणि कसं असतं ना? जोडी जमायची तर एका कुणाला तरी जरा बदलावं लागतं तर इथे आमच...