ओघळ
भेट ठरलेली असताना नेमकं आईने डोक्यावर तेल थापलं म्हणाली आठवडाभर हाताशी लागत नाहीस, आज बरी तावडीत सापडलीस मी खरं तर वैतागलेच आईच्या जागी दुसरं कोणी असतं तर लहानपणी ओचकारायचे तसं ओचकारलच असतं ओचकारण्यात मी तरबेज होते त्यामुळे फेमस सुद्धा म्हणून् तर माऊ नाव पडलं ओचकारणं कधीच थांबलं पण हे नाव चिकटलं ते चिकटलं त्याने पण ओळख होताना पहिलं लाडाचं नाव विचारलं मी ही उस्फुर्त्पण म्हणाले तू देशील ते तर त्यानेही उस्फुर्तपणे काही न ठरवता मला माऊच म्हंटलं आणि अजूनही तसच म्हणतो खरच माझ्यात आणि मांजरात काही साम्य आहे का? या विचाराने माझी मीच चमकले उठून पटकन आरशात पाहिलं आणि खुदकन हसायच्या ऐवजी दचकलेच हो! हल्ली तो भेटल्यापासनं आरशात स्वत:ला बघून खुदकन हसायची वाईट खोड लागली आहे मी नुसतच खोड म्हणते आई आवर्जून वाईट खोड म्हणते आईच्या मते असं आरशात बघून मुली उगाचच खुदकायला लागल्या की त्यांच्यासाठी स्थळं बघायची वेळ झाली असं पुर्वीचे पालक समजायचे आमची आई सुद्धा तशी पुर्वीचीच आहे अजून घरी यायला आठच्या जागी नऊ वाजले की असं काही आंतर्बाह्य बघते की चपापायला होतं हाँस्टेलची रेक्टर असती ...