बहुमान
रात्रीची वेळ तिचं आटपतच आलं होतं, आता दुधाला विरजण लावलं आणि गंज टेबला वर ठेवला की ती निजायलाच जाणार होती, एका कामाला हात न लावता आटपलं की नाही तुझं? असं राजवाडे दोनदा विचारून गेले त्यानी आँनलाईन नवा मसाजर मागावला होता खास तिच्या साठी तिला वाटलं होतं हे वाढदिवसाचं गिफ्ट असेल, पण नाही!वाढदिवसाची छान तिच्या आवडीची साडी मिळाली होती, पण हा मसाजर केवळ तिच्या काळजीपोटी मागवला होता हल्ली तिची पावलं खूप दुखायची, रात्री झोप लागायची नाही, आणि लागली तरी ती झोपेत कण्हायची नव्या नवलाईचे दिवस, त्यांचे नाही मसाजरचे दोन दिवस स्वत: करतील मग म्हणतील" तुला दाखवलं ना कसं करायचं ? मग आता तू कर. स्पीड कमी जास्त करता येतो, एका हाताने मसाजर धरयाचा आणि एका हाताने ही कळ फिरवायची तिला त्यांची वाक्यही माहीत झाली होती मुलंही आज काल म्हणायची बाबा तुम्ही ठरल्या वेळी ठरल्या सारखे वागता ही हसली तरी असं काही बोलायची तिची हिम्मत नव्हती साधी माणसं फार लवकर दुखावली जातात, असा तिचा अंदाज होता, त्यानी तिसर्यांदा बोलवायच्या आत आपण निजायला जायचं अशा विचारात असताना दारावरची बेल वाजली अशी अवेळ...