गुंता
एक मस्तवाल व्याभिचारी इसम होता! गोष्टीची सुरुवात कशी वाटते ना?
पण ही गोष्ट त्याच्यामुळेच सुरू झाली, व्याभिचारी असण्यावर त्याला फार मिजास वाटायची, त्याचं व्यक्तिमत्व होतही तसच , जरा सैलावलेली कोणीही बाई त्याला भुलायची
पण अशा नवर्याची बायको महा खमकी, एखादी असती तर सोडून गेली असती पण ही म्हणायची "याला मनमानी करायला सोडू? मग तर काय ह वळू जिथे तिथे तोंड मारेल, त्याची तर काय मज्जाच मग
म्हणून त्याला न सोडता ती कायम त्याच्या पाळतीवर असायची.
त्या एरियात ही जोडी फेमस होती त्याच्या बायकोला वैनी हाक मारणारे खूप होते.
आणि याची खबर पुरवणारेही खूप होते.
हा मस्तवाल असला तरी बायकोला वचकून असायचा कारण तिचे पप्पा आणि मोठा भाऊ पोलिसात होते
एक रात्र कस्टडीत त्यानी घालवली होती, फटके खाल्ले होते
त्यामुळे आपण सुधारल्याची नाटकं त्याला वारंवार करावी ्लागायची
पण कुत्र्याचं शेपूट, सरळ होऊन होऊन किती होणार?त्याने आपला एरिया सोडून इतरत्र आपली नजर फिरवायला सुरुवात केली मग तसा त्याचा वावरही त्या त्या एरियात वाढायला लागला
बायको पाळतीवर होतीच
ती चुकीची का बरोबर? हा प्रश्न वेगळाकारण इरीस पडल्यावर सारासार बुद्धीचा आपल्याला विसर पडतो
त्याच्या बायकोचं तसं झालं होतं कारण तिच्या पप्पानी सांगितलं होतं रंगेहाथ त्याला पकड मग बघ मी त्याला कसा टायर मधे घालतो
आणि तेंव्हाच एक घटना घडली , आणि या गोष्टीला सुरुवात झाली
सायनला लेबर कँप जवळ याचा एक मित्र स्टाफ्क्वार्टर मधे राहत होता, मैत्री काही घनिष्ट वगैरे नव्हती
पण दोघे बरेचदा प्यायला एकत्र बसायचे
तर याला सुगावा लागला की हा मित्र शेतीच्या कामासाठी गावाला जायचा आहे, त्याची फँमेली गावालाच असायची त्यामुळे आता तीन महिने त्याची स्टाफक्वार्टर मधली रूम त्याच्या भाषेत एमटी राहणार होती
बंद रूम म्हणजे या सांडा साठी मोकळं कुरण
हा स्वत: राहयचा मानखुर्दला
मित्राची रूम होती लेबर कँपात
म्हणून हा सावज शोधायचा माहीम माटुंग्याला
एखाद महिना याचा अगदी मजेत गेला, पण वैनींचे खबरे सगळीकडे पसरलेले होते, त्यामुळे या नव्या पत्त्यासकट तिला सगळी खबर मिळाली
मग पून्हा तिची रात्रंदिवस पाळत सुरू झाली, याचा या मस्तवाल व्याभीचारी इसमाला पत्ताच नव्हता
पावसाचे दिवस होते, धो धो पाऊस पडतच नव्हता पण पावसाची रीप रीप कायम सुरू असायची
हवेतला दमट पणा वाढलेला त्यात रस्ते निसरडे, रात्रीचा अंधार जास्त गडद दिवसाचा प्रकाश जरा धुरकट
अशात नवं सावज शोधण्याची मौजच काही और
कधी एक तर कधी मिळाल्या म्हणून दोन दोन
उन्माद हा खरा आनंद नसतोच पण भानावर नसलेल्याला त्याचाच मोह पडतो.
हा भानावर नव्हताच, आणि त्या रात्री जरा जास्तच
त्यात पावसाचा मूडही वेगळा लागला होता, आणि अशा वेळी याला आरती नावाचा टंच माल मिळाला
आरती बांगला देशी होती, चोरी छुपे इथे रहात होती, मिळकतीतला फार मोठा हिस्सा तिला दलाला द्यावा लागत होता. एकूण परिस्थितीने गांजलेली होती
बेबी सिटींग करायचय सांगून तिला इथे आणली गेली आणि इथे आल्यावर पर सिटींग दलाल तिचे पैसे ठरवत होता.
स्वत: गिर्हाईक पटवलं तर तिला थोडा फार फायदा व्हायचा
म्हणून ती सुद्धा दलाला संशय येऊ न देता अधून मधून तिचा एरिया सोडून दुसरीकडे चांस मारायची
त्या रात्री सगळं जमून आलं
आरती अशी अलगद याच्या तावडीत सापडली, तिला बघता क्षणीच याच्या मनात भरली
तिला नेऊन चोळामोळा करायचे बेत हा मनात आखायला लागला
टँक्सीने तो लेबर कँपात आला , त्या आधी तो दोन चपट्या घ्यायला विसरला नाही, मित्राच्या रूम वर दोन उकडलेली अंडी तयारच होती चकण्याचा प्रशन नव्हता
तो हपापल्या सारखा झाला होता, आरती शांत होती, इमारतीत जायचं म्हणजे एक रात्र कोरड्या जागेत घालवायला मिळणार इतकाच तिला दिलासा होता
तो अधाशा सारखा तिला चवथ्या मजल्यावर घेऊन आला
तिलाही खूप दिवसानी इतक्यावर येऊन मोकळा परिसर पाहयला मिळत होता
अंधारात काय दिसणार? आणि हा अधाशी तिला काय पाहू देणार?
जेमतेम रूमचं कुलूप उघडेपर्यंत ती मोकळी होती, आणि दार उघडल्या उघडल्या त्याने तिला आत खेचली
दार बंद केलं आणि दिवा पंखा सगळं आँन केलं तो आँन होताच
त्याला तिला कपड्या शिवाय न्याहाळायची होती त्याच्या पेक्षा अर्ध्या वयाची तारुण्याने मुसमुसलेली मुलगी
ती कधीची तुंबलेली होती याचा आदेश धुडकाऊन ती फ्रेश व्हायला गेली
तो पर्यंत हा विवस्त्र झाला होता ती आली की तिलाही तो त्याच आवस्थेत आणणार होता.
आणि तेव्हढ्यात घाला पडला
तुम्हाला काय वाटलं? त्याच्या बायकोने दारावर थाप मारली?
ती याच्या पेक्षा हुशार, हे दोघं आत असताना तिने घराला बाहेरून कुलूप लावलं
चवथ्या मजल्यावरच्या घरात तिने त्याला मुद्देमाला सकट कोंडलं
आता जाणार कुठे? आणि कसा?
बाहेरच्या दाराचा आवाज ऐकून याला अंदाजच आला, त्याचा थरकाप उडाला, गाळण उडाली ही सौम्य वर्णन होतं, तो मुतायच्या बेतात होता
उष्ण श्वास केंव्हाच नाकातून फुत्करायला लागले होते
घशाला कोरड पडली होती आणि डोक्याला मुंग्या आल्या होत्या
त्याने कसेबसे हाताला लागतील ते कपडे घामफुटल्या अंगावर चढवले, आणि दार वाजवायला लागला
त्याची बायको विजयी स्वरात म्हणाली आता बस बोंबलत
पप्पाना घेऊन येते आणि तुम्हा दोघांची चामडीच लोळवते, आता नाही तुला पांगळा करून जलमभर काँटवर उताणा पाडला तर नावाची सोदामिनी नाय
ती दणादण पायर्या उतरून चालती झाली, आणि वातावरणात एक सन्नाटा पसरला, धास्ती पसरली
आरती समोर आल्यावर तर त्याला पुरतं वास्तवाचं भान आलं ती छान अंघोळ करूनच आली होती
कितीतरी दिवसानी तिला बक्कळ पाण्याने सुगंधी साबणाने तिचा मळलेला घामेजलेला कोंदलेला देह मोकळेपणाने धुवायला मिळाला होता
तिला बाहेरच्या परिस्थितीची कल्पनाच नव्हती.
ती अर्ध नघ्न होती याने तिला भराभर कपडे चढवायला सांगितले
तिला कळेचना काय झालं गिर्हाईक इतका मूड मधे होता , अचानक काय झालं
तू इधरसे जा तो खेकसला
तिला अशा अपमानाची सवय होती
मेरा पैसा दे\ मैं जाती
त्याने तिच्या अंगावर हाताला आले ते पैसे फेकले
ती खुश झाली पण जाणार कशी बाहेरून दार बंद होतं , बाहेरून दार बंद म्हंटल्यावर ती ही धास्तावली
ये क्या हुवा? किसने मजाक किया?
मैं जाऊ कैसे?
त्याने सुद्धा उगाचच दार हालवून बघितलं
कुलूप ठोकलेलं दार कसं उघडलं जाणार?
पण तरी तिचे पप्पा आणि भाई यायच्या आत इथून पसार होणं गरजेचं होतं
त्याला ऐनवेळी काय करायचं हे सुचेना
आणि जे सुचलं ते इतकं भयानक होतं , त्याने बेडशिटला दुसरं बेडशिट बांधलं आणि आरतीला गँलरीतून खाली उतरायला सांगितलं
एक तर पाऊस त्यात रात्रीचा काळोख अपरिचीत जागा आणि चवथ्या मजल्याची उंची
ती कशी तयार होईल?
हा तर पिसाटलाच होता रागाच्या भरात त्याने तिला मारायला सुरुवात केली.बेदरकार पणे तो तिला कानफटायला लागला, मस्तवाल बिथरलेल्या माणसाचा हात तो
मार खाण्यापेक्षा उतरलेलं बरं म्हणत ती थरथरत्या हाताने बेडशीट धरून उतरायला तयार झाली
त्याही परिस्थीत त्याने तिचं दीर्घ चूंबन घेतलं तिला आवळली आणि मग निरोप दिला
बेडशीटच्या आधारे तिने आपला देह बाहेर झोकला
आणि अंधारात त्याला तिची फक्त आर्त किंकाळी ऐकू आली
पण आता दार उघडलं जाईल तेंव्हा आपण एकटेच असू या विचाराने त्याला तातपुरतं हायसं वाटलं
पण ते हायसं वाटणं तातपुरत्च होतं हे लगेच त्याच्या लक्षात आलं
कारण याची बायको पप्पाना घेऊन येई पर्यंत आरतीच्या मृतदेहा भोवती बघ्यांची गर्दी जमली होती पोलिसात वर्दी देऊन झाली होती
चवथ्या मजल्यावरच्या गँलरीतून बेडशीट लटकतच होतं
तो बरोबर सापळ्यात अडकला
पोलीसतपास सुरू झाला
आरतीच्या मृतदेहाची रवानगी शवागृहात झाली
तिच्या देहाचे फोटॊ वितरीत झाले, ओळख पटवायला तिची मैत्रीण आली पण ती पण तशीच भूखी कंगाल
तिच्या मुळे आरती बांगलादेशी मुसलमान असल्याचं कळून आलं
त्यात एका प्रथीत यश डायरेक्टरला तिचा पुळका आला, मृतदेहाची ओळख पटली आहे तर तिचा मृतदेहं तिच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था भारत सरकारने करावी अशी मागणी त्याने घर बसल्या पोटातलं पाणी नं हलवता केली मग लगेच मूठभर स्वत:ला सामजिक कार्यकर्ते म्हणवणारे प्रतिष्टीत लोक प्रसिद्धीच्या हव्यासापायी
त्या दिगदर्शका सोबत आले मग चर्चा महाचर्चा
यात बराच कालावधी गेला, मग या सामाजिक हित जपणार्यानीच तिचा देह बांगला देशात पाठवण्याचा खर्च करावा अशी टूम कोणीतरी काढली , ती पथ्यावर पडली सगळे चिडी चूप झाले
आणि चार महिन्यानी त्या अभागी देहाला मूठमाती मिळाली
पण झालं काय? गोष्ट इथेच संपली नाही
पोलीसां तर्फे ही केस हाताळणार्या भालू मोंगडे ची बायको गरोदर होती, पहिलटकरीण होती, भालूचा प्रेमविवाह होता त्याच्या मामाच्या मुलीशीच त्याचे सूर जुळले होते
पण या तपासाच्या आणि सामजिक कार्यकर्त्यांच्या गदारोळात त्याला आपल्या बयकोकडे लक्ष द्यायला सवडच मिळेना
बायकोला कळा सुरू झाल्या तेंव्हा हा नेमका आरतीला मूठमाती द्यायला कब्रस्तानात होता
तिला पुरून हा सुन्न आवस्थेत असताना बहिणीचा फोन आला प्रमिलाला मुलगी झाली
कधी?
अर्ध्या तासा पुर्वी, अँडमिट केली आणि लगेच सुटका झाली जराही त्रास झाला नाही
भालूचा मित्र मजेत बोलला
अशा गोष्टी मित्र बरेचदा मजेतच बोलतात
मित्र म्हणाला, आयला या आरतीने पून्हा तुझ्या पोटी जन्म घेतला की काय?
इथे हिला पुरली आणि तिथे तुला मुलगी झाली
मित्र मजेत बोलून गेला आणि भालू त्यात पुरता अडकला
केस सोडवताना नाही म्हंटलं तरी आरतीची पूर्ण करूण कहाणी त्याला कळली होती, ती निरपराध होती तरी तिला सोसावं लागलं होतं आणि असा निर्दयी मृत्यू स्विकारावा लागला होता
तिचं जगायचच राहून गेलं होतं
ओळख पटवायला हाच सतरांदा शवागृहात तिच्या मृतदेहापाशी जात होता
आणि प्रत्येकवेळी तिला बघून याला भारी अनुकंपा वाटे , किती सूंदर सोज्वळ होती ही आणि काय जीणं नशिबी आलं ? लग्न होऊन कुणाकडे जाती तर सुखाने संसार करती
त्याला वाटलं म्हणूनच हिने पून्हा जन्म घ्यायला माझ्या घराची निवड केली
आता कोण कसं समजवणार? पण तो मनाने खट्टूच झाला
आता मेल्यानंतरचे व्यवहार आपल्याला कसे कळणार? तो काय पोलीसी तपास आहे अंदाजावरून अंदाज ठरवायला?
पण याच्या मनाला हाच चाळा लागला
बाबा झाल्याचा आनंद त्याला घेताच येईना, त्यात बारशाच्या दिवशी बाळ खूप रडलं हा म्हणाला तिचं नाव आरती ठेवा ती गप्प होईल, बोला फुलाला गाठ म्हणतात तसं आरती नाव ठेवलं आणि ती शांत झोपली
झालं ! मग तर त्याला हे बाळ घरात नकोसच झालं
आधी कुणाच्या लक्षात आलं नाही पण मग त्यानेच लक्षात आणून दिलं , खूप वाद झाले
प्रमिला बाळाला सोडेना आणि भालू तिला घरात ठेऊ घेईना
मग त्याची बहीण म्हणाली मी दत्तक घेते नाहीतरी मला दोन्ही मुलगेच आहेत
त्यालाही प्रमिला तयार होईना, त्यावरून नवरा बायकोत खटके उडायला लागले शेवटी बाळासाठी बाळाला घेऊन प्रमिला माहेरी परतली
तिच्या माहेरचे तसे अडाणीच होते पण सारासार विचार करणारे होते
तिच्या माहेरचे म्हणाले आम्हाला आमची मुलगी जड नाही
मग हा तोर्यात म्हणाला ठेऊनच घ्या
आणि खरच प्रमिला बाळाला घेऊन माहेरी राहिली
मग गैरसमज वाढत गेले दोघांचा घट्स्पोट झाला, वर्ष भराने प्रमिलाला परत लग्नाची मागणी आली तो ही बिजवर होता, व्यवसायाने शिंपी होता शिवाय होजिअरीचा होलसेलचा बिझनेस होता
काही वर्षांपूर्वी त्याची अख्खी फँमेली म्हणजे आई बायको सोन्यासारखी दोन मुलं एस टीच्या अपघातात मरण पावली होती, तो जगत होता पण उदासीन झाला होता
त्याला या प्रमिलाच्या लेकीने जिव लावला जरा सवड मिळाली की तो तिच्याशी खेळायचा
एक वयाचं अंतर सोडलं तर बाकी नाकारण्या सारखं काही नव्हतं
प्रमिलाने सारासार विचार केला, एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून भालूशी बोलायचा प्रयत्न केला
पण त्याची बहीण म्हणाली आता नको त्या भानगडीत पडूस तो पूर्वीचा राहिला नाही, हेकट झालाय
नाईलाजाने तरी मनापासून प्रमिलाने त्या शिंप्याशी लग्न केलं त्याने मनापासून मायलेकीना स्विकारलं मुलीला रितसर दत्तक घेतलं
आणि भालू आता ती मोठी होण्याची वाट बघत बसला
मोठी झाल्यावर ती आपला सूड घेतल्या शिवाय राहणार नाही असं त्याचं म्हणणं
कारण तीन वर्षाची जेल भोगून तो मस्तवाल सुटला, आणि त्याच्या बायकोच्या पप्पानी दोघाना बंदोबस्तात कणकवलीला पाठवलं आता नजर कैदेत असल्या सारखा तो तिथे बायको बरोबर नांदतोय
भालूच्या मते त्याला कल्पना नाही त्याचा खतरनाक मृत्यू इथे त्याच्या आयुष्याचा एक एक दिवस मोजतोय
हा गुंता कधीच न सुटणारा आहे ....

Comments
Post a Comment