उपवर
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.
तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती पण आज आलेल्या मुलीची गोष्ट्च वेगळी होती
तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती पण आज आलेल्या मुलीची गोष्ट्च वेगळी होती
तिच्याकडे पाहिलं तर काहीच खास नव्हतं आणि पहात राहीलं तर खरच खूप काही खास होतं , खास करून तिचा बांधा आणि खोबणीत बसवल्या सारखे रेखीव डोळे, ज्यात वेदनेशिवाय काही नव्हतं , केस पातळ पण सिल्की सरळ , मधे भांग आणि शेवटपर्यंत वेणी वळायची जुनी पद्धत त्यात चांदीची नक्षीदार क्लीप
तिच्या बरोबर तिचे तीन मोठे भाऊ आणि आई आली होती.
भाऊ सांगत होते "चाहे तो सो रुप्पैय्या जादा लो पर इसे गोरा दिखाओ" हे सांगणारे स्वत: काळे मिचकुट होते, पण ते पुरुष होते. निव्वळ हिच्यामुळे त्यांचं लग्न आडत होतं
आई म्हणत होती" जब देखो रोनी सुरत लेकर बैठती हैं"
जबतक ठीक से हसेगी नही तब तक फोटॊ मत निकालना
बागेत सापडलेलं पोपटाचं बावरलेलं पिल्लू, त्याच्यासाठी पिंजरा आणेपर्यंत उंदीर पकडायच्या खटक्याच्या लाकडी पिंजर्यात ठेवावं तसं त्या जिवाचं झालं होतं
माझ्या मित्राची जुनी सवय होती.
ज्याचा फोटो क्लीक करायचा त्याला तो आधी बराच वेळ निरखत राहयचा
तसाच तिलाही तो निरखत राहीला.
आणि एक तरूण मुलगा आपल्याला निरखतोय या विचारानेच तिने जे हावभाव चेहर्यावर आणले जी काही आपली वेणी एकदा मागे पुढे केली , जो काही आधीच गुरफटून घेतलेला पदर आणखिनच गुरफटून घ्यायचा प्रयत्न केला माझा मित्र पुरता घायल झाला.
आणि तेव्हढ्यात लाईट गेले.....
आणि क्षणात त्याला तिच्या घरच्यांचं जे दर्शन झालं ते इतकं विदारक होतं.
म्हणजे आई म्हणजे ममतेची देवता सुद्धा तिच्यावर कोपली.
अवदसा आहे अगदी स्पेशल टँक्सी करून आणली, हाँटेलात नाश्ता करवला, म्हंटलं आधीच रडकं थोबाड त्यात भुकेमुळे बिनसायला नको.
माझा मित्र म्हणाला इतके काय वैतागताय? लाईट जाणं ही आम बात आहे इथली.
ते एका सुरात म्हणाले पण हिच्या बाबतीत नेहमीच असं घडतं'.
तिने कष्टाने डोळ्यातलं पाणी अडवलं होतं स्वत:वर ताबा मिळवायला ती आपली भुवई खाजवल्या सारखी करत होती, तिची ती अदाही त्याला आवडली.
आणि उस्फुर्तपणे तो म्हणाला ''हिच्या लग्नाचाच प्रश्न आहे ना?''
तिचे भाऊ म्हणाले ''तुम्हाला नाही कळणार त्यातील गांभिर्य''
मित्र म्हणाला ''मला इतकच कळतय, हल्ली माझ्या घरात माझ्या लग्नाचा विषय वारंवार निघतो, आणि मला ही मनापासून पसंत आहे.''
हा स्टुडियो माझा स्वत:चा म्हणजे माझ्या मामाने माझ्या नावावर केलाय
आणि माझ्याकडे घर सुद्धा आहे
आम्ही दोघे भाऊ आणि आईच घरी असतो.
आई निवृत्त शिक्षिका आहे , भाऊ महेश भट कडे असिस्टंट आहे.
तुमच्या मुलीला मी पसंत असेन तर मी लगेच लग्नाला तयार आहे.
तसा एखादा महिना तारांबळ उडते नाहीतर पोटापुरतं कमवायला लागलोय.
एक चित्रपट बघण्याचं व्य्सन सोडलं तर बाकी कसली बुरी आदत नाही.
काय झालं कोणजाणे इतक्यावेळ स्वत:वर ताबा मिळवण्यात यशस्वी झालेली ती उनमळून रडायलाच लागली.
तिच्या मोठ्या भावाला असह्य झालं , "नही करनी तो मत कर, पर ये रोनेका नाटक अब बस हुवा असं म्हणत तिला मारायला त्याने हात उचलला आता पाठीत जोरात गुद्दा बसणार या कल्पनेने ती सावरून बसली आणि पाहते तर काय भावाने उचललेला हात माझ्या मित्राने वरच्यावर अडवला होता.
''खबरदार तिला मारलत तर" तो दरडावला.
सगे भाई होकर ऐसा बर्ताव? जर का हिने माझ्याशी लग्न केलं तर सगळ्यात आधी मी तुमचं आमच्या घरी येणं जाणं बंद करेन.आपल्या मुलीशी कोण असं वागतं?
त्याच्या बोलण्याने ते चपापले आणि तिला कंठ फुटला.
मुझे पसंद हैं ये, जैसे बनेगा वैसे रह लेंगे हम आपको चिंता करनेकी जरुरत नही. माझ्या मित्राला एकदम काँलर टाईट झाल्या सारखी वाटली.
त्याना विचारून त्यानी आईलाच स्टुडियोत बोलाऊन घेतलं , सगळ्यांसाठी चहा सांगितला.
आई आली बघता क्षणीच ती मनात भरण्यासारखी नव्हतीच.
पण तिला आपल्या मुलाच्या चेहर्यावरचे भाव कळत होते, ते मनापासून आहेत हे कळत होतं
आणि तिने उस्फुर्तपणा आणत होकार दिला.
घरून येताना प्रसंगावधान राखून फुलांचा गजरा आणला होता
तो ती कौतूकाने तिच्या केसात माळायला गेली.
तत्परतेने तिची आई पुढे येत म्हणाली हमारेमें कुंवाँरी लडकियाँ बालोमें फुल नही सजाती
आई ठामपणे म्हणाली " वो आपके घरका रिवाज होगा! हमारे यहाँऐसी कोई पाबंदी नही होती।
आई ठामपणे म्हणाली " वो आपके घरका रिवाज होगा! हमारे यहाँऐसी कोई पाबंदी नही होती।
तुम्हाला हे लग्न मान्य असेल आणि मुलीची मर्जी असेल तर ’त” हा फुलांचा गजरा केसात माळेल, घरच्या सायलीचा आहे.घरच्या सायलीचा आहे म्हणताना आईचा स्वर जरा हळवा झाला तो ही त्या मुलीने बरोबर टिपला आणि हे माझ्या मित्रानेही बरोबर ताडलं
तिने अगदी हक्काने तो गजरा आईकडून घेतला आणि आपल्या केसात माळला, ते करताना एक कटाक्ष माझ्या मित्राकडे टाकयाला ती विसरली नाही.
म्हणजे तशी हुशार होती आणि तो कटाक्ष म्हणजे त्यांच्या प्रेमकहानीची सुरुवात होती
अक्षरश: माझा मित्र नंतर मला म्हणाला "खरच रे! त्या क्षणाला सार्या जगात फक्त आम्ही दोघेच होतो"
इतक्यात चहा आला चहापान झालं आणि आई तिच्या भावाना आणि आईला घेऊन घरी जायला निघाली म्हणाली" मी पुढे होते, तू याना घेऊन ये"
आई जायला लागली तशी तिने हाक मारली माँ जी आई थांबली
आणि ती पाया पडायला वाकली आणि तेंव्हाही तिने माझ्या मित्राकडे असं पाहिलं की त्याला नजरेतली आद्न्या समजली तो ही आईच्या पाया पडायला धावला आणि त्या क्षणी आईच्या मनातही एक नातं निर्माण झालं.
दोघानी नमस्कार केल्यावर आईनी दोघाना घट्ट पोटाशी धरलं .तो समजून चुकला आपल्या आईला सुद्धा ही आवडली.
तिच्या आईला पून्हा एकदा यायचा आग्रह करत आई बाहेर पडली
आणि पून्हा चित्र बदललं दोघं तिच्या आईच्या पाया पडायला वाकले तर ती बाई ऊर भरून वाहिल्या सारखी रडली.
त्याने पाहिलं तर तिचे भाऊ सुद्धा मुसमुसत डोळे पुसत होते, बहोत सताया हमने उसकी क्या गलती? असं काहीतरी बोलत होते
आणि तेव्हढ्यात दिवे आले, सगळं लख्ख दिसायला लागलं
भावाना आपली बहीण सूंदर दिसत होती आणि आई तर भरून पावल्यासारखी झाली होती....
-चंद्रशेखर गोखले
-चंद्रशेखर गोखले
नेहमप्रमाणेच एक नंबर 👍👍
ReplyDeleteMastach ...
ReplyDeleteअप्रतिम.....,😢
ReplyDeleteखुपचछान
ReplyDeletePrasang kay hota ya peksha tyachi mandani khup sundar keliye Sir tumhi...!!!!
ReplyDeleteTumhi heva vatava Ase lihita. Khupch Sundar.
ReplyDeleteV nice
ReplyDelete😓👌👌
ReplyDelete😍😍😍😍
ReplyDelete1 no
ReplyDeleteअप्रतिम.......😊😢
ReplyDelete