उपजत

एक गाव आहे तिथे म्हणे बहुतेक घरात सगळी जुळीच जन्माला येतात. तिथे जुळ्याचं अप्रूपच नाही
तसं महाजन नगरात सगळी बैठी घरं जुळी .दोन घराना मिळून चारही बाजूनी सलग ऐसपैस चौथरा
आणि चौथर्‍यावर चढायला चार चार पायर्‍या
मधोमध दोन जुळी दारं , एका रेषेत चार खोल्या शेवटी स्वैपाक घर
स्वैपाकघराला देखील दारं
अगदी दोन्ही घरं जरी कुणाच्या मालकीची असली तरी बाह्य आकार बदलायची परवांगी नाही
पण दोन्ही घरं मालकिची असणारे फार क्वचीत
बाकी सगळे सर्वसामान्य आपला संसार एका घरात मांडणारे.
बहुतेक घरात दृष्ट लागेल असा घरोबा
महाजन नगरात एकमेकाना घराच्या नंबरवरून ओळाखायची पद्धत, आज सी टू वाल्यांकडे पुजा आहे
डी फोर वाल्यांच्या मुलीचं लग्न ठरलं , अशी साधारण बोलायची पद्धत.
पण त्यात जास्त उठून दिसायचा  तो बी नाईन मधला घरोबा
यशोदा आणि रघुवीर पोळ आणि श्यामला आणि दिगंबर राव या घराचा घरोबा
घरोबा म्हणजे घनीष्ट मैत्री
शनिवार रविवार बहुतेक घरात सुट्टी असायची
तर समस्त महाजन नगराचं  बी नाईन वर लक्ष असायचं , हा वीकएंड दोन्ही घरं कसा साजरा करतायत?
फक्त वीकएंडच नाही तर  प्रत्येक सण उत्सव अगदी विनाकारण होणारा आनंद सुद्धा बी नाईन वाले वाजत गाजत हसत खेळत साजरा करायचे यशोदाची मुलं तशी मोठी होती श्यामलाची त्या मानाने लहान,पण चौघांचं इतकं चांगलं पटायचं की त्याना खेळायला इतर मुलांची गरजच पडायची नाही
लहान मुलं भांडली कधी तर मोठे त्यात पडायचे नाहीत
आणि मोठे कधी वाद घालताना दिसले तर बच्चे कंपनी टाळ्या वाजवून एंजाँय करायचे,त्यामुळे कुठलाच वाद फार काळ टिकायचा नाही
सगळ्यात छान वाटायचं जेंव्हा दोन्ही कुटूंब पौर्णीमेच्या रात्री चौथर्‍यावर जेवायला बसायची. हसत खेळत रमत गमत त्यांची जेवणं चालायची, आणि आज चार घास जास्तच जेवलो अशी कबुली चौघं एकमेकाकडे द्ययाचे
श्यामलाकडे गौरी गणपती दोन्ही असायचे
त्यात त्यांच्यात गौर घराच्या अंगणात बसवायची पद्धत होती, त्यासाठी तिचं आसन गेरूने सारवावं लागायचं पाठदुखी मुळे तिला ते जडच गेलं असतं पण अशावेळी यशोदा खमकी असायची
अगदी डोळ्यात तेल घालून त्या दोन्ही रात्री गौराबाईची राखण करायची, तर श्यामला वाळवणं घालताना दोन्ही घराचं मिळून वाळवण घालायची का तर यशोदाला इतकी आवड नव्हती
अनेकानी त्यांच्या या मैत्रीची काँपी करायचा  प्रयत्न केलाहोता पण उपजत ते उपजतच
त्याची सर नकलेला कशी येईल?
तर असे छान दिवस जात असताना एक दू:खद घटना अनपेक्षीत पणे घडली
नुसती दू:खद नाही तर विदारकच म्हणायला हवी
फँक्टरीच्या कामासाठी रघुवीरला सात दिवस तालुक्याच्या गावी जावं लागणार होतं जिथे दिगंबर नेहमी जात असे. कर्म धर्म संयोगाने दोघांची वेळही तशी सारखीच होती
दिगंबरला नेहमीचा प्रवास होता आणि रघुवीरला तो लांबचा प्रवास वाटत होता, कारण इतकी वर्ष महाजन नगरातून बाहेर पडलं की सातव्या मिनिटाला तो त्याच्या फँक्टरीत असायचा
आता सात दिवस रोज अर्धा पाऊण तासाचा प्रवास म्हणजे त्याला ते भारीच वाटत होतं पण सहा दिवस सुरळीत पार पडले आणि सातव्या दिवशी अघटीत घडलं
फायनल रिपोर्ट तयार करायला जरा म्हणजे बराच वेळ लागला
दिगंबर नेहमीच्या वेळेस सुटला होता पण तो रघुवीर साठी थांबला तरी रघुवीर म्हणाला तू निघ , मी बसने येतो पण तासाभराने काय होतय म्हणत दिगंबर रेंगाळाला निघायला रात्र झाली
त्याही पेक्षा घरी जायची घाई झाली
आणि परतीच्या वाटेला दुचाकी लागली आणि एका सामान लादलेल्या लाँरीनं घात केला
अशी धडक दिली की दोघं कायम एकत्र असणारे कुठच्या कुठे फेकले गेले
घरी बातमी आली ती दोघांपैकी एक आँन द स्पाँट गेला आणि एक तालुक्याच्या हाँस्पीटल मधे मृत्युशी झुंज देतोय, उजाडेपर्यंत घरून निघायचं नाही असं जवळपसच्या लोकानी सांगितलं
मुलाबाळंची पण सोय लावणं गरजेचं होतं दोघी एकमेकीच्या गळ्यात पडून रडत होत्या
पण नक्की कोण गेलय? हे नं कळल्याने तर त्या जास्तच कातर झाल्या होत्या
देवा माझं कुंकू वाचव म्हणताना जरा स्वार्थीपणाचच वाटत होतं अपराधी ही वाटत होतं पण तरी दोघी मनातल्या मनात असाच धावा करत होत्या
सकाळी बातमी आली दिगंबर गेला, आऊट झाला
रघुवीर अजून शुद्धीवर आला नव्हता आणि येण्याची शक्यताही नव्हती पण त्याचा श्वास चालू होता इतकाच काय तो आशेचा किरण होता
बुडत्याला काडीचा आधार म्हणातात तसं तो किरण यशोदेला बळ देत होता
नातेवाईक काय दिवस कार्य पार पडल्यावर पद्धतीचे चार शब्द बोलून रवाना झाले,तसा श्यामलाचा भाऊ खूपच धीर देणारा आणि पाठिशी उभा राहणारा होता पण तो खूप दूर राहयचा त्याचा स्वत:चा संसार होता व्याप होते
भावनेच्या भरात त्याचे नको ते सल्ले मान्य करणं शक्यच नव्हतं ,महाजन नगर सोडून जाण्याचा ती विचारही करू शकत नव्हती आणि या नजूक क्षणी जिवाभावाची अशी तिची मैत्रीण अधांतरी  निराधार असताना तर ती फक्त स्वत:चा विचार करू शकत नव्हती
पभ देवाची कृपा दोन महिने तळ्यात मळ्यात केल्यावर रघुवीरची प्रकृती स्थिरावली, मग तो शुद्धीवर आला आणि सहा महिन्यात चालायला बोलायला लागला
दिगंबरच्या जागी श्यामलाला सेवेमधे रुजू करवून घेण्यासाठी त्यानी खूप प्रय्त्न केले
आणि त्याला यशही आलं , श्यामलाला महाजन नगरच्या जवळच्या कार्यालयात कारकून म्हणून सामाऊन घेण्यात आलं , त्यातल्या त्यात आनंदाची बाब होती
यशोदा म्हणाली मुलांची काळजी करू नकोस! चौघाना मी व्यावस्थीत सांभाळेन, त्यांचं शाळेत जाणं येणं
खाणं पिणं तू आता फक्त कामावर लक्ष दे, स्वत:च्या हिमतीवर प्रगती कर
त्याने जगण्याला हुरूप येईल अर्थ प्राप्त होईल
श्यामलाला ते पटलं
म्हणाली तुला गम्मत सांगू? कसे योग असतात बघ
इतका मोठा आघात झाला त्याची पूर्वसुचना मिळाली नाही पण हे अपाँईनमेंट लेटर आलं ना त्या दिवशी पहाटे खूप छान स्वप्न पडलं
ते स्वप्न म्हणजे शुभं शकूनच होता
असं काय स्वप्न पडलं ? यशोदेने उत्सुकतेने विचारलं
श्यामला म्हणाली कुठेतरी , म्हणजे इथे नाही
दुसरीकडे कुठेतरी तू सत्यनारायणाची पूजा घातली आहेस, खूप प्रसन्न वातावरण आहे
मी आपली माझ्या मुलाना घेऊन मागे मागे बसलेय, तुझं अर्ध लक्ष माझ्याकडेच आहे, मग तू माझ्या जवळ येऊन म्हणालीस "काय असं मागे मागे राहतेस? घरची पूजा आहे ना?
जे व्हायचं ते होऊन गेलं आपण तिघं आहोत ना म्हणजे दिगंबर सुद्धा आहेच बरोबर
असं म्हणून तू प्रसादाचा वाडगा माझ्या हातात दिलास आणि त्याच दिवशी  आयुष्याची नवी सुरुवात करून देणारं हे लेटर आलं
स्वप्न ऐकून यशोदेचा  श्वासच कोंडला
तिला खूप खूप रडायला आलं
रात्री रघुवीरच्या कुशीत शिरून ती खूप खूप रडली
म्हणाली इतकं अपराध्या सारखं वाटतय, तुम्ही बरे होऊन घरी आलात ना
माझ्यासाठी तर तो चमत्कारच होता , देवाने साता जन्माचं दान टाकलं होतं पदरात.
पण समोर श्यामला होती
कशी गम्मत आहे? एकवेळ दुसर्‍याचा दू:खात स्वत:ला झोकून देणं सोप्प आहे
पण दुखर्‍या जिवाला आपल्या आनंदात सहभागी करून घेणं तितकच अवघड.का असं व्हावं ?
तुम्ही सुखरूप आल्याचा आनंद श्यामलालाही झालाच असेल की, का माझा तिच्या आनंदावर विश्वास नव्हता
का मी इथे सत्यनारायणाची पूजा घालायला बिथरले?
श्यामलानी जे स्वप्नात पाहिलं पूजा इथे घातली गेली असती तर मी तिच्याशी अशीच वागले असते
तिला असं मंगल प्रसंगी कोपर्‍यात किंवा मागे मागे बसलेलं मला तरी कसं बघवलं असतं
पण  नाही! माझा माझ्यावर, किंवा आपल्या मैत्रीवर भरवसा नव्हता
म्हणून मी ताईला फोन करून सांगितलं तू तुझ्याकडे माझ्यावतीने पूजा घाल मी खर्च पाठवते
आणि ताईने खरच यथास्थीत पूजा करवून घेतली
त्याचा कौल देवाने श्यामलाच्या स्वप्नात जाऊन दिला
तिला कौल दिला आणि मला?
मला एक विचार
रघुवीर म्हणाला यावर उपाय एकच आपण आपल्याकडे समारंभ पुर्वक पूजा घालू
आणि खरच महाजन नगर्‍यातला बी नाईन या जुळ्या घरावर एक दिवस मंगल तोरणं चढली, दोन्ही दारात रांगोळी थाटली
मंत्रघोष झाले
आणि यशोदे बरोबर श्यामलाही उत्साहाने लगबग करताना दिसली...





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी