राणूबाई
गौरीचे लांबसडक जाडजूड केस, दाट असे की कंगवा शिरणं मुष्कील कंगवा घेताना तिच्या केसात जाईल असाच कंगवा निवडावा लागायचा, वेणीचे पेड मोजले तर चाळीसच्या वर जायचे, तिच्या लहानपणी कोणी तिच्या वेणीचे पेड मोजायला लागले की आज्जी पाठीत धपाटा घालायची आणि लग बगीने थू थू करायची, म्हणजे थुकल्याचं नाटक मग गौरी मोठी झाली तसे तिचे केसही लांब सडक झाले म्हणजे खरच चालताना सडक झाडण्याचच बाकी होतं मग तिने प्रिंटींग टेक्नाँलाँजी मधे करियर करायला घेतलं त्यातच ती बिझी झाली सकाळी घर सोडायची ते रात्रीच उगवायची, आई आज्जी डोक्यावर बसायच्या म्हणून चार घास जेवायची इतकी दमलेली असायची की कधी कधी आई म्हणायची "जा हात धू जा, नीट चूळ भर आणि झोपून टाक, बाकीचं मी आवरते यावर सुटका झाल्याचा आनंद दाखवत ती नेहमीचं वाक्य बोलायचीच आई पाचचा गजर लाव, मला लवकर जायचय" तर , अशी ही मुलगी लग्न करून सून म्हणून आमच्या विभाच्या घरी आली विभाचा एकुलता एक मुलगा आधी लग्नाला तयारच नव्हता, पण गौरीला बघितलं भेटला बोलला आणि तिच्या विषयीच बोलत राहिला विभाला अप्रूप होतं ते तिच्या मोहक हसण्याचं आणि लांबसडक केसांचं आली की सारखं त्या विषयीच बो...