Posts

सो साल की एक बात

भिडे मास्तर दुपारची नीजानीज होण्याची वाट बघत  त्यांच्या चाळीच्या व्हरांड्यात अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होते. आज  व्हरांड्यात बसायला त्यांची हक्काची आराम खुर्ची नव्हती हे खरं की आरामखुर्ची खूप जुनी झाली होती त्याला डागडुजीची गरज होती, घरात बाकीचे व्यवहार पार पडत होते मिक्सर बिघडला तर नवा आणायला जमत होता भिंतीला चिकटून बसणारा चपटा टी व्ही मुलांची हौस म्हणून हप्त्यावर का होईना पण आणायला सवड होती पण भिडॆ मास्त्रांची खुर्ची दुरुस्त करायला सवड नव्हती आणि  मग काय खुर्ची काढायला त्यांच्या लेकाला कारणच मिळालं मधे एकदा दुपारची वामकुक्षी घेताना ते खुर्चीतून कलंडले ते त्यांच्या खांद्याला थोडी दुखापत झाली आणि मुलाच्या डोक्याला त्रास मग उपचार आले लाईट्स घेणं आलं चाळीतलं बिर्हाड, दार उघदं तसं व्यवहार उघडे मग काय सतराशेसाठ सल्ले, भिडे मास्तरांचं काही इतकं वय झालं नव्हतं पण  माईच्या आजाराने ते खचले होते निवृत्त झाल्यावर बर्‍यापैकी पेंशन हातात येत होतं पण सगळं माईच्या आजारपणावर जात होतं पटत नसताना भिक्षुकी करावी लागत होती सत्यनारायणाची पुजा त्याना अजिबात पटत नव्हती त्याची पोथी वाचतान...

रिलेशन

 आपल्याला वाटतं लहान मुलं अजाण असतात, तर तसं नसतं आम्ही उद्योगपती शिरवाडकरांची मुलं आहोत याची आम्हाला फार लहानापणी जाणीव होती आणि माणीक मावशीचं आमच्या घरातलं स्थान  वेगळं आहे याचीही समज होती भले माणीक मावशी आमच्याकडे राहत नव्हती, ती तिच्या मुलीसोबत आमच्या घराजवळच एका स्वतंत्र बंगल्यात राहत होती , फार क्वचीत ती आमच्याकडे यायची आमची आई सुभद्रा शिरवाडकर खरच साध्वी सात्वीक सूंदर बाई, आई म्हणून तर  ती कम्माल होतीच पण एकूणच तिच्यात वात्सल्य ठासून भरलं होतं पण तरी माणीकमावशी आली की तिच्या नकळत  खटाखट घराच्या खिडक्या कोणी बंद कराव्यात तशी आई बंद होऊन जायची हा तिच्यातला बदल आम्ही मुलं असून आमच्या लक्षात यायचा आईने माणीक मावशीचा अपमान  कधीच केला नाही पण मोकळा आपलेपणाही दाखवला नाही ... माणीक मावशीचा अपमान करायचा मक्ता सुची मावशीकडे होता सुची मावशी आईची धाकटी बहीण  तिचे यजमानही बाबांच्या बिझनेस मधे महत्वाच्या पदावर होते पण तरी माणीक मावशीचं पद त्यांच्या वरचं होतं सल्लामसलत करताना आमचे बाबा माणीक मावशीशी स्वतंत्र चर्चा करायचे आणि भाई काकांचं म्हणणं मिटींगमधे सगळ्यां...

कोरडी विहीर

जगाला कंटाळल्या सारखा प्रल्हाद जगत होता कर्तबगार होता , मेहनती होता, वृत्तीने सज्जन होता, पण तो काळ असा होता की तुमचा जन्म आणि  कूळ तुमच्या जगण्यावर फार परिणाम करून जायचे लहानपण आश्रमात गेल्याने फारसं जाणवलं नाही कधी आश्रमातल्या एका बाईने एकदा त्याला सांगितलं होतं तू शेवंताचा मुलगा हाईस, तिला तिच्या होणार्‍या बाळाला त्या तसल्या म्हणजे देवदासींच्या वातावरणात वाढवायचं नव्हतं मग मुलगा असो की मुलगी ती नाळ तोडून टाकायला तयार होती आणि तेंव्हाच मी सुद्धा नवर्‍याच्या जाचाला कंटाळून पोटच्या तान्ह्याला टाकून  पळाले  होते,पोराच्या ममते पुढे नवर्‍याचा मार असह्य झाला होता , दारची विहीर जवळ करण्यापेक्षा मी गावाची वेस ओलांडली पाय फुटेल तिथे पळत होते अशावेळी एका गावाबाहेरच्या हौदावर तुझी माय भेटली, मी परिस्थितीने मोडून पडलेली अन ती? कुणाचा आधार नसताना बी ताठ कण्यानं उभी असलेली  तेंव्हा तिचं बाळंतपण  जवळ आलं होतं मला तात्पुरता आश्रय हवा होता आणि तिला तिच्या  जगापासून  लपवून बाळाला जन्म द्ययचा होता आम्हाला नियतीने भेटवलं होतं म्हणून आम्ही दोघी एकमेकीच्या सोबतीने भ...

गोडाचा शिरा

फार फार जुनी आठवण आहे एका गावात एक गरीब कुटूंब राहत होतं , त्याना तीन मुलगे , तिघेही अभ्यासात हुशार, वृत्तीने शांत आणि अभ्यासू, वडील एका दुकानात कारकून तर आई तब्येतीने खंगलेली त्यात नजर अदू मोठा यशवंत मधला विद्याधर तर धाकटा सदानंद तिघांची  शाळा एक माध्यम एक, इयत्ता मागे पुढे काही खर्च एकदम यायचे म्हणजे शाळेच्या सुरुवातीला तिघांचा गणवेशाचा खर्च, पुस्तकं सेकंड हँड असली तरी पैसे तर मोजावेच लागायचे तिघांचे गणवेश, चपला , कंपाँस पेट्या इतर सामुग्री कितीही बेगमी केली तरी तारांबळ उडायचीच, त्यात तिघेही दिसायला सूंदर मदनाचे पुतळेच जणू मोठयानी दोन्हीवेळा  स्काँलरशीप मिळवली होती, मधल्यानेही पहिली  स्काँलरशीप सहज मिळवली होती आणि धाकटा सदा   स्काँलरशीप नक्की मिळवणार याची शिक्षकाना खात्रीच होती पण तरी धाकट्या सदावर  एका शिक्षिकेची खफा मर्जी होती कारण संकृत भाषेसाठी मिळणारी शिष्यवृत्ती त्याने जिद्दीने मिळवली होती ज्यावर  त्या शिक्षिकेच्या मते त्यांच्या कन्येचा हक्क होता, केवळ  तीन गुणाने तिची शिष्यवृत्ती गेली होती जी त्या काळात खूप प्रतिष्ठीत मानली जायच...

महाबली

रामानंद सागर  यांच रामायण दूर्दर्शनवर झळकलं आणि उंबर गाव, बोर्डी यासारखी आडवाटेला असलेली गावं अचानक चर्चेत आली, भिल्लोरी सुद्धा असच गाव , जेमतेम सत्तर पंचाहत्तर उंबरठा असलेलं , समुद्रकिनारी वसलेलं  तरी निसर्गरम्य म्हणता येणार नाही कारण तसं ओसाडच पण या बाकीच्या गावांमुळे हे गावही जरा लक्षात यायला लागलं कारण त्याकाळी मालिकांची  शुटींग्ज अत्ता सारखी चोवीस तास सुरू नसायची सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ही ठरलेली वेळ, सहाचे साडेसहा व्हायचे पण सात व्हायचे नाहीत त्यात विजेचा लपंडाव सुरूच असायचा, दिवे गेले की हातावर हात ठेऊन बसायचं मग युनीटमधली काही हौशी माणसं आजुबाजुच्या प्रदेशात फेरफटका मारून यायची , तर अशा फेरफटक्यात भिल्लोरी गावाचा शोध लागला, गुजराती मराठी मिक्स अशी काहीतरी भाषा हे लोक बोलायचे बोलायला  असायचं कोणं म्हणा, दिसायला घर दिसायची पण एकजात सगळी बंद , दोन पिंपळाचे पार होते तिथे मात्र जरा वर्दळ असायची समिद्रकिनारी एक  खडकाचा सुळका होता त्याला हे लोक फार  मानायचे, स्वयंभू शिवलींग समजायचे नात्यावर छत होतं ना चौथरा पाऊस पदेल तेंव्हा सुळक्याला अभिषेक व्हायचा एरव...

सुखाचा आलेख

आलेख हा श्ब्द जितका परिचयाचा तितका कठीण , मी तर त्याच्यापासून चार हात लांबच होतो पण तरी वाकप्रचारात का होईना हा शब्द येतोच अगदी प्रगतीचा आलेख , सुखाचा आलेख  वगैरे वगैरे तर  श्री. मनोहर शंकर दातार या साठी कडे झुकलेल्या सदगृहस्थाच्या सुखाचा  आलेख मांडला तर तो एक  यशस्वी कर्त्या कर्तबगार पुरुषाचा आदर्शच ठरेल, आणि ठरलाच आहे काही वर्ष नोकरी करून त्यानी व्यवसायात झोकून दिलं आणि टक्कर देत दहा वर्षात आपला वर्षाचा टर्न ओव्हर कोटींच्या घरात नेला , सुस्वरूप बायको, दोन लोभस सदगुणी मुली त्याही कर्तबगार, जावईही अगदी मनाजोगते लाखोमें एक म्हणतात तसे,  गेल्या एक दोन वर्षात एक दोन महत्वाचे पुरस्कार सुद्धा त्याना मिळाले अर्थात ते ही भाकीत शंकर दातारानी आधीच मांडून ठेवलं होतं त्यांचे वडीलच स्वत: उत्तम पत्रिका बघायचे आणि मांडायचे सुद्धा आपल्या आपत्यांची जन्मकुंडली पित्याने मांडू नये असा एक अलिखित नियम काही प्रांतातले ज्योतिशी मानतात हे पण त्यातलेच पण त्यावर त्यानी एक मार्ग शोधला आपल्या  साडवालाच त्यानी आपल्या तिनही अपत्यांची जन्मवेळ घेऊन यायला सांगितलं ... असं करून त्यानी ...

कोंडी

ती दिसल्यावर त्याने न पाहिल्यासारखं केलं तिने सुद्धा तो दिसल्यावर न दिसल्यासारख्ं केलं खरं तर एकमेककाडे न बघता  दोघाना एकमेकाचा अंदाज घ्ययाचा होता पण एकमेकाना बघून भेटून अगदी  खेटून बसल्यावर सुद्धा दोघाना एकमेकाचा अंदाज आला नव्हता मग आता इतक्या  दिवसानी अचानक दिसल्यावर कसा अंदाज बांधायचा? अंदाज बांधायचा म्हणजे नुसता मनाचा खेळ मनाचा खेळ म्हणजे एकतर्फी मन आपल्याशी खेळत राहतं , आणि आपण? निव्वळ विनाकारण सोसत राहतो ते दोघानाही मान्य नव्हतं दोघानी रस्ता क्राँस केला ,पून्हा दोघं समोरासमोर आले मग दोघाना राग आला स्वत:चा? की समोरच्याचा? पण रागापायी हसू आलं ,दोघानाही ते ही एकदम मग हसायला काय झालं ? हे विचारणं गरजेचं होऊन बसलं तिने धिटाईने पुढाकार घेत विचारलं हसायला काय झालं? त्याने नरमाईने विचारलं तुला रुसायला काय झालं ? ती म्हणाली हे तेंव्हाच का नाही विचारलस? तो म्हणाला तेंव्हा मी पण रागावलो होतो मग काय, आता राग गेला? तुझा रुसवा गेला? ती गप्पच बसली , तो ही गप्प बसला दोघे जागीच थांबले भर रस्त्यात भर  गर्दीत असं जागीच थांबून चालत नाही एक तर धक्के खावे लागतात नाहीतर त्रासीक सल्...