सुखाचा आलेख
आलेख हा श्ब्द जितका परिचयाचा तितका कठीण , मी तर त्याच्यापासून चार हात लांबच होतो पण तरी वाकप्रचारात का होईना हा शब्द येतोच
अगदी प्रगतीचा आलेख , सुखाचा आलेख वगैरे वगैरे
तर श्री. मनोहर शंकर दातार या साठी कडे झुकलेल्या सदगृहस्थाच्या सुखाचा आलेख मांडला तर तो एक यशस्वी कर्त्या कर्तबगार पुरुषाचा आदर्शच ठरेल, आणि ठरलाच आहे
काही वर्ष नोकरी करून त्यानी व्यवसायात झोकून दिलं आणि टक्कर देत दहा वर्षात आपला वर्षाचा टर्न ओव्हर कोटींच्या घरात नेला , सुस्वरूप बायको, दोन लोभस सदगुणी मुली त्याही कर्तबगार, जावईही अगदी मनाजोगते लाखोमें एक म्हणतात तसे, गेल्या एक दोन वर्षात एक दोन महत्वाचे पुरस्कार सुद्धा त्याना मिळाले अर्थात ते ही भाकीत शंकर दातारानी आधीच मांडून ठेवलं होतं
त्यांचे वडीलच स्वत: उत्तम पत्रिका बघायचे आणि मांडायचे सुद्धा
आपल्या आपत्यांची जन्मकुंडली पित्याने मांडू नये असा एक अलिखित नियम काही प्रांतातले ज्योतिशी मानतात हे पण त्यातलेच पण त्यावर त्यानी एक मार्ग शोधला आपल्या साडवालाच त्यानी आपल्या तिनही अपत्यांची जन्मवेळ घेऊन यायला सांगितलं ... असं करून त्यानी कुणाला फसवलं
का कुणाची समजूत काढली कोणजाणे पण त्यानी मांडलेलं तीनही आपत्यांचं भाकीत खरं ठरलं
फक्त एक सोडून
तशी तीनही मुलं भाग्यवान, हुशार, कर्तबगार
मधली मुलगी परप्रांतियाशी लग्न करणार हे आधीच त्याना माहीत असल्या कारणाने तिने मारवाडी मुलगा निवडला त्यावरून काही खटके उडाले नाहीत, बरं दातार कुटूंबही प्रतिष्ठीत उच्च विद्या विभुषीत त्यामुळे त्या घरानेही काही आक्षेप घेतला नाही
धाकटा मयुरेश परदेशात जाणार तिथेच स्थायीक होणार हे ही भाकीत त्यांचच त्यामुळे तो परदेशात रमला याचही कुणाला आश्चर्य वाटलं नाही
फक्त मनोहर शंकर दातारांच्या बाबतीत एक भाकीत खोटं ठरलं म्हणजे तसं होऊ शकलं नाही
मनोहरांचा आपल्या पित्याच्या भाकीतावर इतका विश्वास होता की त्यांच्या तरुणपणी मेघनासारखी सूंदर लाघवी मुलगी त्यांच्या आयुष्यात आलेली असताना त्यानी पित्याच्या वचनावर विश्वास ठेऊन तिला डावलून म्हणजे कानाडोळा करून कालींदी केतकरच्या गळ्यात वरमाला घातली, त्याचे वडील म्हणाले होते मेघना सोमण चांगलीच मुलगी आहे तुमची पत्रिका ही जुळते पण कालिंदी केतकरच्या पत्रिकेने तुला जो जोर मिळेल जो सपोर्ट मिळेल तो मेघनाच्या पत्रिकेत दिसत नाही , लगेच याने कालिंदीचा विचार पक्का केला, त्याने त्यावेळी फसवलं असेल तर स्वत:ला फसवलं कारण मेघना बरोबर तसा शाब्दीक करार झालेलाच नव्हता
त्यावेळी शब्दाच्या पलिकडेही काही असतं याची ओळख मनोहरला व्हायची होती
अर्थात तसं वाईट काही झालं नाही फक्त मेघना बद्दल एक सल राहिली मनात जी शंकर दातारानी पत्रिका मांडताना मांडली नव्हती
आणि एक खंत सुद्धा राहिली जी जन्मपत्रिकेत लिहायची राहिली होती
त्यांच्या पत्रिकेत दोन कन्या एका पुत्राचा योग होता, तो पूत्र काही झाला नाही
धाकट्या भावाला दोन्ही मुलगे , बहिणीलाही एक मुलगा एक मुलगी
फक्त यांच्याकडे दोन्ही मुलीच
इतकच नाही तर मेघनाला सुद्धा एक मुलगा जो टेक्सासला रवाना झाला आणि हल्ली मेघना सुद्धा हल्ली तिथेच असते
आणि सगळ्यात मोठी हळ हळ ही की मनोहर शंकर दातारांसारखा सुखी माणूस या बद्दल आपल्या वडीलाना विचारू शकला नाही.. पंत असं कसं झालं? तुम्ही तर म्हणाला होतात दोन कन्या एक पुत्र नक्की
तो पुत्रही कर्तबगार किर्तीवंत असेल
मग काय झालं ?
इथे मनोहर शंकर दातारांचा चढता आलेख जरासा डळमळीत होतो
कारण या बद्दल ते ना कुणाशी बोलू शकत होते ना कुणाला जाब विचारू शकत होते
जे झालं ते फक्त त्यानाच माहीत होतं
तो योग पत्रिकेत होता की त्यानी आपल्या हातानी ओढून आणला होता माहीत नाही पण कालींदी जेंव्हा दुसर्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती तेंव्हा सुवर्णा कळंबळेकर ही स्वैपाकाला असलेली साधी सुशील बाई निव्वळ योग होता म्हणून त्यांच्या संपर्कात आली आणि ध्यानी मनी नसताना जे घडू नये ते घडलं
तरी ती कामावर येत राहिली पण कालिंदी बाळाला घेऊन आल्यावर तिने बदलीची बाई देऊन काम सोडलं
बदलीच्या बाईनी सांगीतलं लग्ना नंतर पंधरा वर्षानी सुवर्णाला दिवस गेलेत , डाँक्टरानी खूप काळजी घ्यायला सांगितली आहे म्हणून तिच्या नवर्याने तिला सगळी कामं सोडायला सांगितली आहेत
लग्ना नंतर पंधरा वर्षानी दिवस गेले? ते ही नेमके अत्ताच?
व्हाँट्ट अ को इंसिडंस म्हणायची ही सोय नाही
मग कळलं तिला मुलगा झाला तिने त्याचं नाव सुरज ठेवलं
मी असतो तर मुलाचं नाव आदित्य ठेवलं असतं , असं मनोहर चुकून बोलून गेला
त्याने एकदा चुकून सुवर्णाला भेटायचाही प्रयत्न केला पण ती भेटली नाही
मग तो एकदा बिझनेस टूरवर असताना ती मुलाला घेऊन घरी येऊन गेली, कालींदीने रितीला धरून तिची ओटी भरली मुलाच्या हातातही घसघशीत रक्कम ठेवली
मनोहर आल्यावर त्याला कळलं ....
आणि मग एक एक कळतच गेलं ... करंबळेकर कुटूंब पुण्याला शिफ्ट झालं
आणि सध्या बुद्धी बळाच्या क्षेत्रात जे नाव गाजतय तो सुरज करंबळेकर त्या सुवर्णाचा मुलगा आहे
त्याने ही स्काँलर्शीप मिळवली त्याने तिथे हाय केलं
त्याला कँपस इंटर्व्ह्यु मधे चांगल्या चांगल्या आँफर्स आल्या आहेत
धाकटीच्या लग्नाला सुवर्णा आली होती पण मुलाला नव्हतं आणलं तो टुर्नामेंट साठी लंडनला गेला होता
त्याच्या लग्नाला मात्र आमंत्रण आल्यावर मनोहर आवर्जून जाणार होता
पण तेंव्हाच पंत गेले आणि त्याला मंडवळ्या बांधलेलं बघायचं राहिलं
सुखाचा चढता आलेख असून त्या सुखाशी त्यांचा काही संबंध नसल्यासारखं झालय
कालींदी सारखी मुलीना म्हणत असते "हल्ली यांच काय बिनसलय ? कळतच नाही !आणि नाहीच कळायचं कारण मुलगा नाही हे दू:ख एकवेळ पचवण्या सारखं किंवा स्विकारण्यासारखं आहे
पण दुसर्याच्या घरात वाढणारा सदगुणी सुस्वरूप मुलगा आपला असू शकतो ही शंका ज्याला ग्रासते त्यातली वेदना तोच जाणे

खूप छान
ReplyDeleteHmm. .. .nahi kalali complicated vatali goshta
ReplyDeleteTragic
ReplyDelete