रिलेशन
आपल्याला वाटतं लहान मुलं अजाण असतात, तर तसं नसतं
आम्ही उद्योगपती शिरवाडकरांची मुलं आहोत याची आम्हाला फार लहानापणी जाणीव होती आणि माणीक मावशीचं आमच्या घरातलं स्थान वेगळं आहे याचीही समज होती
भले माणीक मावशी आमच्याकडे राहत नव्हती, ती तिच्या मुलीसोबत आमच्या घराजवळच एका स्वतंत्र बंगल्यात राहत होती , फार क्वचीत ती आमच्याकडे यायची
आमची आई सुभद्रा शिरवाडकर खरच साध्वी सात्वीक सूंदर बाई, आई म्हणून तर ती कम्माल होतीच पण एकूणच तिच्यात वात्सल्य ठासून भरलं होतं पण तरी माणीकमावशी आली की तिच्या नकळत खटाखट घराच्या खिडक्या कोणी बंद कराव्यात तशी आई बंद होऊन जायची हा तिच्यातला बदल आम्ही मुलं असून आमच्या लक्षात यायचा आईने माणीक मावशीचा अपमान कधीच केला नाही
पण मोकळा आपलेपणाही दाखवला नाही ... माणीक मावशीचा अपमान करायचा मक्ता सुची मावशीकडे होता सुची मावशी आईची धाकटी बहीण तिचे यजमानही बाबांच्या बिझनेस मधे महत्वाच्या पदावर होते पण तरी माणीक मावशीचं पद त्यांच्या वरचं होतं सल्लामसलत करताना आमचे बाबा माणीक मावशीशी स्वतंत्र चर्चा करायचे आणि भाई काकांचं म्हणणं मिटींगमधे सगळ्यांबरोबर ऐकून घ्यायचे पण त्यावर माणीक मावशीने काही आक्षेप घेतला तर त्याचा विचार आधी करायचे
याला कारण बाबानी नोकरी सोडून जेंव्हा बिझनेस मधे उडी मारली तेंव्हा मावशीच त्यांच्या बरोबर उभी राहिली आम्ही सगळे लहान होतो , माझा तर जन्मही झाला नव्हता आणि बाबांनी हा अचानक निर्णय घेतला आई धीर देण्यापलिकडे काही करू शकत नव्हती पण ज्या प्रमाणे कैक्यीने रथाच्या चक्रात हात घालून रथ धावता ठेवला ते काम मावशीने केलं तेंव्हा नुकतीच ती नवर्यापासून विभक्त झाली होती तान्ह्या मुलीची जबाबदारी तिच्यावर होती मग आमच्या आईनेच दर्शनाची जबाबदारी घेतली रात्री मावशी उशीरा दर्शनाला न्यायला आली की आई तिला जेऊनच पाठवायची सुरुवातीला खूप सगळं छान होतं
बिझनेस भरभराटीला आला तसं या दोघांचं नातंही चर्चेत आलं आमचे बाबा दिसायला देखणे रुबाबदार होते तर मावशी पण काही कमी नव्हती आमच्या आईचं सात्वीक सौंदर्य तर हिचं वेधक
त्यात मावशी खूप शिकलेली होती, मावशी आली म्हणून बाबांचं आईवरचं प्रेम काही कमी झालं नाही, मावशीचाही तसा प्रयत्न नव्हता ती आपलं दुसरं स्थान ओळखून होती
बोलायचं नाही पण सुची मावशीनी प्रयत्नपुर्वक ती तेढ जागृत ठेवली होती हे ही आम्हाला लहानपणापासून कळत होतं आता दर्शनाला आईने लहानपणापासून सांभाळलं होतं आणि तिच्या आईवरचा आकस मुलीवर काढण्या इअतकी आमची आई संकुचीत नव्हती दर्शनालाही आमच्या घरी कधी परक्या सारखं वाटायचं नाही पण ती घरात मोकळेपणाने वावरली की सुची मावशीला आपल्या मुलीचा हक्क कमी झाल्या सारखा वाटायचा
आई पण धाकटी बहीण म्हणून तिचं म्हणणं ऐकून घ्यायची कधी कानाडोळा करायची
माणीक मावशीकडे डायनींग प्लेसमधे तिचा आमच्या बाबांबरोबरचा मोठा फोटॊ होता , आता त्या दोघांचं रिलेशन हे ओपन सिक्रेट होतं त्यावर घर बसल्या चर्चा करायची मुभा सगळ्याना होती पण त्या विषयी बाबाना विचारणा करण्याचा अधिकार कोणालाच नव्हता कारण स्वत: आईने कधी बाबाना या बाबतीत कटघर्यात उभं केलं नव्हतं
आमच्याशी बोलताना एकदा आई म्हणाली होती तुमचे बाबा कर्तुत्ववान आहेत विद्वान आहेत त्यांच्या जाणीवा वेगळ्या गरजा वेगळ्या माझ्यासारखी साधीसुधी बाई त्याना कशी पुरी पडणार?
तिच्यासाठी तिच्यासमोर त्यानी कधी माझी अवहेलना होऊ दिली नाही यातच मी स्वत:ला धन्य मानते
इव्हन माणीक मावशी सुद्धा कधी आई समोर आली तर अतिषय आदबीनं वागायची , आई जरी जेव्हढ्यास तेव्हढं बोलत असली तरी मावशी आपणहून चार शब्द बोलायची
आम्हा मुलांच्या शिक्षणाबाबत तर मावशी फारच चोखंदळ राहिली भुषण दादाला आक्रीटेक्ट तिच्यामुळेच होता आलं नाहीतर बाबा तयार नव्हते त्याना वाटत होतं भुषणने बिझनेस मधे लक्ष घालावं
मावशी म्हणाली त्याच्यामुळे वेगळं क्षेत्र आपल्याला मिळेल आणि धाकटे दोघे आहेतच की त्याना अत्ताच सामाऊन घ्या त्यांच्यावर जबाबदारी टाका त्यांच्या निर्णयाचा मान राखा अपोआप ते रमतील
माणीक मावशीचं हे बोलणं सुची मावशीच्या मिस्टराना रुचायचं नाही
सुची मावशीचे मिस्टर संधी मिळाली की घोळ करतात हे दर्शनाने आम्हाला सांगितलं होतं अर्थात तिला ते तिच्या आईकडून समजलं होतं पण बाबा कानाडोळा करत होते आणि मावशी तिथल्या तिथे निस्तरत होती
असं होता होता ... हे तीन शब्दी वाक्य अवाक्याने खूप मोठं आहे
या तीन शब्दात खूप काही सामावलेलं आहे
तर आमच्या बाबतही तसच झालं रक्ताच्या नात्याच्या जोरावर सुची मावशी माणीक मावशीला घरापासून दूर ठेवण्यात यशस्वी झाली असली तरी आम्ही मुलं माणीक मावशीच्या अगदी जवळ होतो म्हणजे भुषण दादाच्या लग्नात ही मोनालिसा सह मावशीच्या पाया पडताना भुषण दादा म्हणाला होता असं म्हणतात माय मरो मावशी जगो पण आपण म्हणूया माय इतकीच सुखात आणि आनंदात ही आपली मावशी पण जगो
माणीक मावशी ज्या पद्धतीने दादाच्या गळ्यात पडून रडली होती ते बघून बाबा तर भरून पावलेच पण आईचे डोळेही पाणावले
फक्त सुची मावशीच्या कपाळावर मैलावरून दिसतील अशा आठया चढल्या होत्या
मग आम्ही पण बाबांबरोबर आँफीस अटेंड करायला लागलो, माणीक मावशीच्या डब्यातला शेअर वाढला
आणि एक दिवस कळलं बाबा आता फार दिवसाचे सोबती राहिले नाहीत
आई तर हताशच झाली तिच्या जिवाचा बाबा म्हणजे आधार होता
मावशी आमच्याबरोबर आँफीसच्या व्यवहारात गढली होती कारण बाबांची तब्येत आणखी ढासळायच्या आधी तिला बिझनेस दोन पावलं पुढे नेलेला दाखवायचा होता आणि काकाना संधी साधून मोठा हात मारायचा होता
अशा सिच्युएशन मधे घराची सगळी सुत्र सुची मावशीकडे गेली आणि तिने पहिलं काय केलं असेल तर दर्शना आणि मावशीला घरापासून दूर ठेवलं हे आधी आमच्या लक्षात आलं नाही
बाबा कोमात गेले आणि माणीक मावशी धावली तेंव्हा हे उघड झालं सुची मावशीने सरळ सरळ माणीक मावशीला बाबाना बघायला सुद्धा विरोध केला "जन्मभर माझ्या ताईच्या नवर्याला वाटून घेतलस तेव्ह्ढं पुरे , जितकं लुटायचं होतं तितकं लुटलस आता तुझा सबंध संपला" असं काय काय ती तिला म्हणाली नेमके तेंव्हा आम्ही कोणी तिथे नव्हतो नंतर नोकराकडून हे समजलं
आणि त्याच रात्री बाबा गेले
माणीक मावशी आणि बाबांमधे वयाचं बरच अंतर होतं पण दोघे गेले कित्येक वर्षात एकमेकात मिसळून गेले होते आता भेटणं बघणं हा केवळ उपचार होता मावशी तमाशा करेल हे ओळखून दर्शना आणि मावशी दोघी घरीच थांबल्या सुची मावशी जिंकली असं तिला वाटत होतं पण आईने वेगळाच पवित्रा घेतला
तिने माणीक मावशीला फोन केला
माणीक आपलं सौभाग्य गेलं , तू घरी बसून काय करतेस?
सुची मावशीचा तीळपापड झाला, आई तिला म्हणाली तुला सुनवायचं ते मग सुनवेन ती ही वेळ नाही
पण नाती आणि नात्याचे अधिकार मलाही कळतात
माणीक मावशी धावत आली बाबांच्या समोर जायच्या आधी ती आमच्या आईच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली ताई आय अँम साँरी तिने टाहो फोडला आईने धीर देत म्हंटलं साँरी कशासाठी उलट तुझ्या अधिकारापासून तुला वंचीत ठेवलं याचे मला खंत आहे
जा डोळे भरून बघून घे साहेबाना
आणि मग सगळं आटोपल्यावर आईने सुची मावशीला आणि तिच्या यजमानाना समोर उभं करून असं धारेवर धरलं आम्ही सगळे चाट पडलो आम्हाला वाटलं आईला व्यवहारातलं फारसं कळत नाही
पण तिला बरच माहीत होतं काकानी केलेली अफरातफर राँमटेरियल मिळणार नाही अशी त्यानी केलेली कारस्थानं सगळच तिला माहीत होतं अर्थात दर्शनामुळेच पण ती ते मुद्देसूद बोलू शकली
सुची मावशीने घारातही हात मारला होता हिर्या मोत्याच३ए दागिने उचलले होते ते ही आईने निमूट द्यायला सांगितले
मग सुची मावशी शी आमचं रिलेशन उरलं नाही
पण आईने माणीक मावशी शी रिलेशन निभावलं बाबा माणीक मावशीला खाजगीत मणी हाक मारायचे ती हाक आईने उचलली
आणि हक्कानं सांगितलं ज्या जबाबदारीने शिरवाडकरांच्या बरोबरीने उभी राहिलीस त्याच जबाबदारीने माझ्या मुलांच्या बरोबर उभी रहा तू कर्तूत्ववान आहेस धडाडीची आहेस
तुझी सोबत हेच यांच्या यशाच खरं गमक आहे याची त्याना जाणीव होती मला आहे
आणि आईने आम्हाला सांगितलं मावशीला तिचा मान आणि स्थान द्या तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही

खूप छान...
ReplyDelete