गोडाचा शिरा

फार फार जुनी आठवण आहे
एका गावात एक गरीब कुटूंब राहत होतं , त्याना तीन मुलगे , तिघेही अभ्यासात हुशार, वृत्तीने शांत आणि अभ्यासू, वडील एका दुकानात कारकून तर आई तब्येतीने खंगलेली त्यात नजर अदू
मोठा यशवंत मधला विद्याधर तर धाकटा सदानंद
तिघांची  शाळा एक माध्यम एक, इयत्ता मागे पुढे
काही खर्च एकदम यायचे म्हणजे शाळेच्या सुरुवातीला तिघांचा गणवेशाचा खर्च, पुस्तकं सेकंड हँड असली तरी पैसे तर मोजावेच लागायचे
तिघांचे गणवेश, चपला , कंपाँस पेट्या इतर सामुग्री
कितीही बेगमी केली तरी तारांबळ उडायचीच, त्यात तिघेही दिसायला सूंदर मदनाचे पुतळेच जणू
मोठयानी दोन्हीवेळा  स्काँलरशीप मिळवली होती, मधल्यानेही पहिली  स्काँलरशीप सहज मिळवली होती
आणि धाकटा सदा   स्काँलरशीप नक्की मिळवणार याची शिक्षकाना खात्रीच होती
पण तरी धाकट्या सदावर  एका शिक्षिकेची खफा मर्जी होती
कारण संकृत भाषेसाठी मिळणारी शिष्यवृत्ती त्याने जिद्दीने मिळवली होती ज्यावर  त्या शिक्षिकेच्या मते त्यांच्या कन्येचा हक्क होता, केवळ  तीन गुणाने तिची शिष्यवृत्ती गेली होती जी त्या काळात खूप प्रतिष्ठीत मानली जायची
मग  अंतरशालेय विद्न्यान प्रदर्शन भरलं त्यातही सदानंदाला ग्रूप लीडर केलं गेलं , त्या शिक्षीकेच्या मुलीने सबमीट केलेल्या प्रोजेक्ट पेक्षा ठीबकसिंचनाच्या प्रोजेक्टला प्रदर्शनात स्थान दिलं गेलं जे सदानंदाने मांडलं होतं , त्या शिक्षिकेच्या मुलीला सदानंदाच्या हाताखाली काम करावं लागलं
जे तिने हसतमुखाने केलं वेळप्रसंगी सदानंदाचा ओरडा खाऊनही तिच्या चेहर्‍यावरचं हास्य कमी झालं नाही
पण बाईनी त्याचं ओरडणं बघितलं आणि त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली
मग  नाताळची सुट्टी आली तेंव्हा सुट्टी बारा दिवस असायची
एका मागे एक शिष्यवृत्ती मिळवत सदानंद नववीत पोहोचला होता, योग होता म्हणा किंवा त्या शिक्षिकेने योग जुळवून आणला म्हणा , लागोपाठ तीन वर्ष हीच शिक्षिका सदानंदाच्या वर्गावर आली
सदानंद क्रिकेट चांगलं खेळायचा, त्याच्या गल्लीत तर तो खेळायला नसेल तर खेळ काय कधी कधी मँचही रद्द व्हायची बाकी कशावरून नाही पण या क्रिकेटच्या वेडापायी धाकटा आपल्या बापाचा ओरडा खायचा
या शिक्षिकेने सदानंदचं नाव कौतूकाने नव्हे तर त्याचं लक्ष डायव्हर्ट होण्यासाठी शाळेच्या टीम साठी सुचवलं
त्याने आनंदाने त्या शिक्षिकेच्या मुलीकडे बघितलं त्याच्या नजरेत आनंद होता आत्मविश्वास होता
पण त्या मुलीच्या नजरेत ना  आनंद होता ना उत्साह
तिने बरोबर संधी साधली सदानंदने तिच्याकडे बघितल्यावर तिने अगदी त्याला कळेल इतपत नाही नाही अशी मान हलवली, त्यात सल्ला होता अधिकार होता आत्मियता होती
तिने नाही अशी हलवलेली मान बाईंच्या नजरेतूनही सुटली नाही
आणि अपेक्षीत रित्या सदानंदने आपलं नाव मागे घेतलं बाबा रागवतील असं कारण पुढे केलं
अरे खेळाचे वेगळे गूण मिळतील जे निकालात धरले जातील
 तो म्हणाला  बाई पण मी अभ्यासातच मेहेनत घेऊन पैकी च्या पैकी मार्क मिळवायचा प्रयत्न करेन
शिक्षीकेने उगीचच तो स्वत:चा अपमान समजून  त्याच्याशी उभा दावा साधला
पण त्यांच्या मुलीने त्याला धीर दिला समजावलं आता आय आय टी शिवाय दुसर्‍या कशाकडेही लक्ष द्यायचं नाही तुझी योग्यता खूप मोठी आहे
तिच्या बोलण्याने तो सुखावला... पण एकूण ते त्याचे दिवसच खडतर होते
नेमकं तेंव्हाच मोठया भावाला अपघात झाला त्या धक्क्याने आई आजारी झाली  तिलाही अँदमीट करावं लागलं
त्या धावपळीत त्याला शाळेचा गणवेश घालून  शाळेत येता आलं नाही
आणि त्या शिक्षिकेला त्याचा पाण उतारा करायची नामी संधी मिळाली
आणि तिने स्प्ष्ट सांगितलं गणवेश नसेल तर वर्गात बसायची गरज नाही, चला उठा
तो ही तरूण होता , जे झालं त्यात त्याची चूक नव्हती नाईलाज होता
या बाई समजून घेणार नाहीत याची त्याला खात्री होती , आपल्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही, आपल्या बाजूने कोणी बोलणार नाही याचीही त्याला जाणीव होती म्हणूनच आणखी शोभा करून घेण्यापेक्षा निघालेलं बरं म्हणत तो निघाला तेंव्हाच वर्गात एक कोवळा आवाज कमालीच्या करारी स्वरात गरजला
थांब सदानंद . वर्गाबाहेर जायची काही गरज नाही
त्याच्यासकट सगळा वर्ग त्या मुलीकडे अवाक होऊन पाहत राहिला
ती त्या शिक्षिकेचीच मुलगी होती हेमांगी उपाध्ये
तिने आपल्या बाईंसमोर म्हणजे स्वत:च्या आई समोर शाळेची दैनंदिनी धरत विचारलं यात शाळेच्या दोन्ही अधिवेशनांचे सर्व नियम दिले आहेत पण कुठेच गणवेशा शिवाय आल्यास  वर्गात  बसायचं नाही असा नियम नाही
उलट विद्यार्थ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गणवेशा शिवाय येण्याची मुभा यात नमूद केली आहे
घरच्या  विपरीत परिस्थितीमुळे त्याच्या लक्षात नाही पण आज त्याचा वाढदिवस आहे
सगळ्या वर्गात एकच कल्लोळ माजला आणि त्या शिक्षिकेला न जुमानता सगळी मुलं  सदानंदाच्या भोवती जमली, कळल्यावरही त्याला शुभेच्छा देण्याची तयारी त्या शिक्षिकेनी दाखवली नाही
हेमांगी खंबीरपणे  आपल्या आई समोर उभी राहिली
बाईनी उपहासाने विचारलं "ओह! म्हणजे आज डब्यात गोडाचा  शीरा हवा हा तुझा हट्ट याच्या साठी होता तर?
ती म्हणाली हो! पण आता यातला  एकही घास मी त्याला देणार नाही
बाई फणकार्‍याने निघून गेल्या
मधली वर्षही निघून गेली, सदानंद आय आय  टी मधून उत्तम गुणाने पास झाला, त्याने पी एच डी ही पूर्ण केली भारत सरकारनेही त्याच्या विद्वत्तेची कदर केली त्याच्या संशोधनाला मान्यता देत अधिकार दिले
पण अजूनही त्याच्या वाढदिवसाला जगभरातून शुभेच्छा आल्या तरी त्याच्या घरी त्याची बायको त्याचा आवडता गोडाचा शिराच करते
म्हणजे  त्याची बायको कोण?

Comments

  1. Shiryasarkhach God shevat👌

    ReplyDelete
  2. Bharati Hajare5 April 2018 at 12:22

    खूपच sunder.. अप्रतिम ��������

    ReplyDelete
  3. डोळे पाणावले🙏

    ReplyDelete
  4. sir, apli aai ani tichya balachi kavita havi hoti! Thaklelya aaicha chukun ekda dola lagla, teva ticha bal agdi shanyasarkha vagla! khup shodhliye pn sapdtch nahiye

    ReplyDelete
    Replies
    1. ती मेरुमणी वर आहे, जरा चेक करशील?

      Delete
  5. खूप दिवसांत तुमची नवीन कथा आली नाहीये मेरूमणी वर.
    आतुरतेने वाट बघतेय मी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी