सो साल की एक बात
भिडे मास्तर दुपारची नीजानीज होण्याची वाट बघत त्यांच्या चाळीच्या व्हरांड्यात अस्वस्थपणे येरझार्या घालत होते. आज व्हरांड्यात बसायला त्यांची हक्काची आराम खुर्ची नव्हती
हे खरं की आरामखुर्ची खूप जुनी झाली होती त्याला डागडुजीची गरज होती, घरात बाकीचे व्यवहार पार पडत होते मिक्सर बिघडला तर नवा आणायला जमत होता भिंतीला चिकटून बसणारा चपटा टी व्ही मुलांची हौस म्हणून हप्त्यावर का होईना पण आणायला सवड होती पण भिडॆ मास्त्रांची खुर्ची दुरुस्त करायला सवड नव्हती
आणि मग काय खुर्ची काढायला त्यांच्या लेकाला कारणच मिळालं मधे एकदा दुपारची वामकुक्षी घेताना ते खुर्चीतून कलंडले ते त्यांच्या खांद्याला थोडी दुखापत झाली आणि मुलाच्या डोक्याला त्रास
मग उपचार आले लाईट्स घेणं आलं
चाळीतलं बिर्हाड, दार उघदं तसं व्यवहार उघडे
मग काय सतराशेसाठ सल्ले, भिडे मास्तरांचं काही इतकं वय झालं नव्हतं पण माईच्या आजाराने ते खचले होते
निवृत्त झाल्यावर बर्यापैकी पेंशन हातात येत होतं पण सगळं माईच्या आजारपणावर जात होतं पटत नसताना भिक्षुकी करावी लागत होती सत्यनारायणाची पुजा त्याना अजिबात पटत नव्हती त्याची पोथी वाचताना तर ते मनातल्या मनात दात ओठ खायचे भक्ती सारख्या उदात्त भावाला किती खालच्या दर्जावर आणून ठेवलय असं त्याना वाटायचं , देव आहे की हातचलाखी करणारा जादुगार? असे प्रश्न त्यांचा पिछ्चा सोडायचे नाहीत तरी पुजेची सुपारी आली की ते इमाने ऐतबारे जात होते, पूजा सांगत होते , पोथी वाचत होते , प्रसादाचा शिरा करत होते आणि दक्षिणा घेऊन घर गाठत होते माई झोपून असायची पण तरी मिळालेला पैसा माईच्या हातात देताना त्याना कोण समाधान मिळत होतं
समाधान मिळालं की ते त्यांच्या आरामखुर्चीत येऊन बसत होते
ती खुर्ची त्यानी त्यांच्या पहिल्या पगारातून त्यांच्या वडिलांसाठी घेतली होती, थोडी थोडकी नाही चाळीस वर्ष त्यांचे वडील त्या खुर्चीत बसले होते समाधानाने आपल्या आईविना लेकाचा संसार बघत होते भिडे मास्तर अगदी तान्हे असताना त्यांची आई देवाघरी गेली पण मुलाला सावत्रपणाचा जाच नको म्हणून त्यांच्या वडिलानी लग्न केलं नव्हतं , भिडे मास्तर अगदी आपल्या वडिलांप्रमाणेच देखणे आणि आई सारखे सात्वीक माई ही अगदी त्याना साजेशी त्याना अनुरूप फार फार प्रेम दिलं माईनी , अगदी सासर्याना सुद्धा मुलीच्या मायेने सांभाळलं भिडे मास्तराना तीन मुलगे एक मुलगी
दोघे आपापला संसार घेऊन वेगळे झाले धाकटा मात्र खोलीच्या आशेनं मास्तराना धरून राहिला
त्याची बायको पण तशी जमवून घेणारी नव्हती त्यात तिला चाळीत राहण्याचा तिटकारा आणि त्यात निवृत्त होऊन मास्तर ही पूर्णवेळ घरी आणि माई तर सतत अंथरुणावर , मग त्या घरचं वातावरण कसं असेल?
ब्लाँक मधे स्वतंत्रपणे राहणार्या भावांवर जळफळत तो मास्तरांबरोबर राहत होता, हे घर विकून जरा मोठं घर घेऊ म्हणून त्यांचा पिछा पुरवत होता ज्याला मास्तर तयार नव्हते हे घर विकलं तर हा आपलं पोतेरं करून टाकेल याची त्याना कल्पना आली होती आणि मुलगा त्याचा राग बापावर या ना त्या स्वरूपात काढत होता
त्या रागापायीच एका छोट्याशा वादावर त्याने व्हरांड्यातली मास्तरांची खुर्ची भंगार वाल्याकडे देऊन टाकली होती , इतक्या वर्षांची ती आराम खुर्ची, ती गेल्यावर व्हरांडा मोकळा मोकळा झाला आणि मास्तर बेवारशी झाले , आराम खुर्चीत बसलं की त्याना आपल्या प्रेमळ पित्याजवळ बसल्या सारखं वाटायचं
पण आता?
माई समोर ते रडू शकत नव्हते तिला वाईट वाटेल काळजी वाटेल म्हणून मुलाला बोलू शकत नव्हते
पण म्हणून दुपारची नीजानीज होण्याची ते वाट बघत होते म्हणजे कुठे जातोय हे सांगत बसायला नको ते दुकानात जाऊन खुर्ची परत मिळवायचा प्रयत्न करणार होते
आणि खुर्ची परत मिळाली तर व्हरांड्यात न आणता मालकाची परवांगी घेऊन फाटकापाशी असलेल्या डेरेदार वडाखाली ठेऊन त्यावर ते बसत जाणार होते
त्यानी मनोमन बेत आखले होते पण त्यासाठी खुर्ची परत् मिळणं आवश्यक होतं आणि त्यासाठी ते रामरक्षा पुटपुटत होते
निजानीज झाल्याची खात्री पटल्यावर त्यानी पायात चपला अडकवल्या आणि हळूच ते दार लोटून जायला निघाले तरी शेजारच्या नानानी हटकलच अरे इतक्या उन्हाचा कुठे निघालास?
माझं औषध घेऊन येतो मास्तरानी मोघम उत्तर दिलं
थांब ! माझी छत्री घेऊन जा, ऊन बघ किती आहे? भोवळ येऊन पडलास कुठे तर मनोज पून्हा वैतागायचा
मास्तराना त्यांच म्हणणं पटलं त्यानी पुढे केलेली छत्री मास्तरानी निमूट घेतली आणि ते जिना उतरले
त्या परिसरात एकच भंगाराचं दुकान होतं
त्यामुळे आधी त्याच्याकडे चौकशी करायची मग मोठया बाजाराची वाट धरायची असं मास्तरानी मनोमन ठरवलं त्यातून खुर्ची नाहीच मिळाली तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही असं ते स्वत:ला समजावत राहिले तरी खुर्ची नसेल तर आपण घरात बसायचं कुठे? हा प्रश्न त्याना आतल्या आत छळत होता
तरी पावलं खेचत ते अल्लाह मालीक नावाच्या भंगार वाल्याच्या दुकानाशी पोहोचले
माझ्या मुलाने आज एक जुनी आराम खुर्ची आणून दिली आहे का? हा प्रश्न त्यानी दुकानाशी पोहोचेपर्यंत हजारदा मनात घोकला होता पण दुकानाशी आल्यावर त्यांचा घसा कोरडा आणि डोळे पाणावल्या सारखे झाले
पण मास्तराना बघितल्यावर खुर्चीत बसलेला अफजल धावत समोर आला त्याला ओळखायच्या मनस्थितीत मास्तर नव्हतेच
पण त्याने मास्तराना ओळखलं आणि अगदी आदबीने बोलला पाँव लागू मास्तरजी , तुम्ही इतक्या लवकर कसे आले ?
म्हणजे? मास्तरानी गोंधळून विचारलं
ती खुर्सी मर्रमतला पाठवली ना तुम्ही, ती श्यामला भेटेल
मर्रमतला? मास्तर अजून गोंधळले
हाँ मियाँ बता रहे थे आप एक बार गिर पडे थे, म्हणाले ठीक से एकदम नयी जैसी कर के दो
ये हमारी बाबाकी जान है
आता मास्तरांचा गळा भरून आला आणि डोळे.... घरून निघताना तर केव्हढा वैतागला होता त्यांच्यावर , येता जाता अडखळायला होतं म्हणून खुर्ची पहिल्या मजल्यावरून भिरकवायला निघाला होता
कुठाय ती खुर्ची? मास्त्रानी विचारलं
मर्रमत करने बडे बाजार भेजी है श्याम तक आ जायेगी
कितना खर्चा होगा ?
इसकी फिकीर आप क्युँ करते हो? जिसने लाकें दी वही चुकता करेगा
आप कुछ ठंडा लेंगे? लस्सी फालुदा कुछः मंगवाऊ? त्यानी आदरानी विचारलं पण उत्तर न देता मास्तर तसेच उन्हाचे घराकडे परतले
त्यांची पाठ वळल्यावर अफजलने नकळतपणे वर बघत अल्ला ला याद केलं आणि शुक्रीया अदा केली
की मनोज सकाळी खुर्ची घेऊन आला तेंव्हा तोच गल्ल्यावर होता त्याने मनोजला नाही पण मास्तरांची खुर्ची ओळखली
किती वर्ष रद्दी घ्यायला हा त्यांच्याकडे जायचा तेंव्हा आधी मास्तरांचे वडील नंतर मास्तर या खुर्चीत बसलेले असायचे, मास्तरांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय तो कधी त्या घरातून परतला नव्हता माईंशी सुद्धा तो खूप आदबीने बोलायचा गुटखा खण्यावरून त्याच्या अम्मी नंतर दम भरणार्या माईच होत्या
मनोज खुर्ची घेऊन आल्यावर अफजलने पहिला प्रश्न मनोजला हाच विचारला होता पिताजी का इंतकाल हो गया क्या
नही तो! क्युँ? मनोजने विचारलं होतं
फीर उनकी बैठक क्युँ छीन रहे हो? किस बात से नाराजगी दिखा रहे हो?
तुम उनके साथ रेहेते हो या वह तुम्हारे साथ ये सवालही नही है, तुम एक साथ रेहेतो ये मत भुलो
ये खुर्सी बेचकर तुम्हे कितने पैसे मिलने वाले है? उससे दुगने मैं तुम्हे देता हूँ पर ये खुर्सी वापस उसी जगह रख जहाँ पर वो इतने सालोंसे थी, देखना कितनी खुशी मिलेगी बेटे के नाते
हमारी पेहेचान पुरानी है इस खुर्सीसे और तुम बेटे होकर पेहेचान भूल गये?
ऐसाही रवैय्या रहा तो ईकदीन तुम्हारी खुदकी पेहेचान नही रहेगी..... अपले वालीद के नाम से पेहेचाने जाते हैं तो उसमे उनकी दुवा रेहेती है
हम अभी भी अपनी अब्बा के याँद में आँखे बहाते है और उपर वालेकी दुवासे तुम्हारे मास्तरजी जिंदा है तो तुम क्या कर रहे हो
मनोज उभ्या उभ्या रडला अफजलनेच त्याला शांत केलं म्हणाला मैं मर्रम्मत करके रखता हूँ अगले सो साल इस खुर्सी को कुछ नही होगा
तुम श्याम को जाते वखत खुर्सी लेके जाना और कल मुझे बताना कैसा लगा
मास्तर संध्याकाळीची वाट बघत होते आणि खुर्ची घेऊन परतणारा मनोज त्याना कलंडत्या ऊन्हात दिसला...

Mastach👌🙏 kahi goshti anmol astat
ReplyDeleteअफजल .... ग्रेट
ReplyDeleteSundar
ReplyDeleteNishabda ... Kaka kamaal kelit
ReplyDelete