सो साल की एक बात
भिडे मास्तर दुपारची नीजानीज होण्याची वाट बघत त्यांच्या चाळीच्या व्हरांड्यात अस्वस्थपणे येरझार्या घालत होते. आज व्हरांड्यात बसायला त्यांची हक्काची आराम खुर्ची नव्हती हे खरं की आरामखुर्ची खूप जुनी झाली होती त्याला डागडुजीची गरज होती, घरात बाकीचे व्यवहार पार पडत होते मिक्सर बिघडला तर नवा आणायला जमत होता भिंतीला चिकटून बसणारा चपटा टी व्ही मुलांची हौस म्हणून हप्त्यावर का होईना पण आणायला सवड होती पण भिडॆ मास्त्रांची खुर्ची दुरुस्त करायला सवड नव्हती आणि मग काय खुर्ची काढायला त्यांच्या लेकाला कारणच मिळालं मधे एकदा दुपारची वामकुक्षी घेताना ते खुर्चीतून कलंडले ते त्यांच्या खांद्याला थोडी दुखापत झाली आणि मुलाच्या डोक्याला त्रास मग उपचार आले लाईट्स घेणं आलं चाळीतलं बिर्हाड, दार उघदं तसं व्यवहार उघडे मग काय सतराशेसाठ सल्ले, भिडे मास्तरांचं काही इतकं वय झालं नव्हतं पण माईच्या आजाराने ते खचले होते निवृत्त झाल्यावर बर्यापैकी पेंशन हातात येत होतं पण सगळं माईच्या आजारपणावर जात होतं पटत नसताना भिक्षुकी करावी लागत होती सत्यनारायणाची पुजा त्याना अजिबात पटत नव्हती त्याची पोथी वाचतान...