Posts

Showing posts from December, 2017

अजब प्यार की....गजब कहानी

 मी दादर माँडेल ला फाउंडेशन कोर्स साठी प्रवेश घेतला म्हणून पद्माकर शिल्ले माझ्या परिचयाचा झाला मी फायनली फी भरायला त्या इमारतीत गेलो तेंव्हा सगळ्यात आधी हाच भेटला काळा सावळा म्हणायची पद्धत  म्हणून म्हणायचं , नाहीतर काळाच मुंबईबाहेरचा आहे हे बघताच लक्षात येईल असं व्यक्तीमत्व,गरीबी पण लपवता येणार नाही अशी त्यातल्या त्यात धड कपडे घालून तो कशीबशी जमवलेली फी भरायला आला होता तो गरीब होता, गावाकडनं आला होता , तसा साधाच बिच्चारा वातेल असा होता, पण त्याच्या डोळ्यात स्वप्न होती त्यावर  कशाचंही सावट नव्हतं , भीती नव्हती , आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशाबद्दलही शंका नव्हती त्यामुळे पद्माकर वेगळाच  होता हातात असामान्य  ओघवती रेष होती आणि गावात आयुष्य गेल्याने कायम ब्राईट कलर्स तो चित्रासाठी निवडायचा एखादा माणूस सगळ्यांचा आवडता होऊन जातो ना तसा पद्माकर झाला होता आमची मैत्री तर पहिल्या भेटीतच झाली होती , त्याचं विलक्षण सूंदर हस्ताक्षर बघून मी अवाक झालो होतो आणि त्याच्या चेहर्‍यावरचं हासू म्हणजे मला अगदी निर्मळ आनंदाचा झरा वाटून गेलं होतं काँलेज सुरू झाल्यावर फार लवकर ...

मागलं अंगण

मित्राताई अशी हाक मारली तरी मित्रा आमची नात्याने वहिनी होती नातं मानलेलं असलं तरी सख्ख्यापेक्षा वरताण, आमच्या आईने जोडलेली नाती तशी सख्ख्याच्या वरताणच होती, उद्धव दादा आमच्या आईच्या मैत्रीणीचा म्हणजे पारूमावशीचा मुलगा आम्ही चिल्ली पिल्ली असताना हा उदूदादा डाँक्टरकी शिकायला मुंबईत येऊन राहिला होता, तो हाँस्टेल वर राहयचा पण बरेचदा सणावाराला घरी जेवायला यायचा, एकदा असाच एका श्रावण सोमवारी तो जेवायला आला , श्रावण असून धो धो पाऊस् कोसळत होता, श्रावणी सोमवारी आम्ही लवकर जेवायला बसायचो , ते ही  केळीच्या पानावर एरवी आम्ही जरा भाजी  नको म्हणालो की आई म्हणायची बघा हं दादा इंजिक्षन घेऊन आलाय ,  भाजी संपवली नाही की तो इंजिक्षन देईल, तो ही अगदी आव आणायचा तसा पण आज इंजिक्षना बरोबर तो या मित्राताईला घेऊन आला होता , टप्पोर्‍या डोळ्यांची नितळ कांतीची काटकुळी असली तरी रेखीव अशी मित्रा ताई काही काही प्रसंग विसरता येत नाहीत त्यातला हा प्रसंग होता धो धो पावसाने वातावरण ओलं झालं होतं संध्याकाळ व्हायच्या आधीच अंधारून आलेलं , त्यात आमचं ते जुनं घर झाडा झुडपानी वेढलेलं त्यात वार्‍याचा वेग आ...

आधे अधुरे

सेक्टर नंबर तीन मधे शंकराच्या  देवळामागे दादूभाई चाळ आहे चाळ आपलं म्हणायचं नाहीतर अशी ऐस पैस जागा कुणाला कुठे पाहयला मिळायची नाही, हे महत्वाचं नाही तर त्या चाळीच्या तिसर्‍या इमारतीत दुसर्‍या माळ्यावर अजब कुटूंब राहतं सोमण आणि गोम्स ऐकायला कसं वाटत ना? कुटूंबात दोन जोडपी विनायक सोमण आणि  शैलजा सोमण दुसरे मार्टीन गोम्स आणि त्यांची पत्नी सँड्रा गोम्स चौघांची वयं असतील आस पास  पन्नास पंचावनच्या घरात मार्टीन शैलजाला विनायकना सांभाळायला मदत करतात आणि शैलजा मुळे सँड्रा बेडरिडन असून तग धरून आहे मुळचे ते इथले नाहीत, पण गेली चार वर्ष ते इथेच आहेत आणि इथून कुठे जातील असं वाटत नाही तसे  गोम्स मुळचे गोव्याचे मग सावंतवाडीला स्थायीक झाले होते आणि सोमण मुंबईचे सांगायला त्यांचही कुठलं गाव असेल पण हयात घालवली मुंबईत तसा त्यांचा डबल बेडचा फ्लँट अजूनही बंद कुलपाआड धुळ खात पडलाय, पण ते परत तिथे परततील असं वाटत नाही, तशी  एक मुलगी आहे दोन नातवंड आहेत पण ती सगळी परदेशात त्याना इथे यायला फुरसत नाही  आणि याना तिथे जाण्यात रस नाही मार्टीन आणि सँड्राला आता कोणी मुलबाळ नाही, एक मुलगा ...

कुरघोडी

नाट्यमधुरा  या  हौशी कलाकारांच्या संस्थेचा तेंव्हा नाट्यरसीकात बर्‍यापैकी दबदबा होता आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून  दहा पंधरा बाशींदे या संस्थेची धुरा सांभाळत होते प्रत्येक नाट्य्स्पर्धेत भाग घेत होते मधुरा गोरणकर ही या संस्थेची एकमेव नायिका होती तिच्या अभिनय सामर्थ्याला बघून अनेक लेखकाना लिहिण्याची स्फुर्ती मिळत होती मधुरा दिसायला सूंदर होतीच पण मुळात हुशार होती त्यात अखंड वाचानाने प्रगल्भ झाली होती ती प्रगल्भता तिच्या अभिनयात दिसायची अनेक जण तिच्या मागे होते, काहीजण आग्रही होते तर काहीजण हळवे होते पण ती स्थीर होती कारण तिच्यावर घरची जबाबदारी होती म्हातारे आईवडील आणि मोठा जरासा अशक्त भाऊ फार लहान वयात ती नोकरीला लागली, त्या काळात नाटकात नाव झालं तरी तशी सुरक्षीतता नव्हती आणि म्हणून  अनेक आँफर्स येऊनही ती व्यावसायीक नाटकाकडे वळली नव्हती एकविसाव्या वर्षी  ती जे आयुष्य जगत होती त्याची अत्ताच्या फुलपाखरी आयुष्य जगणार्‍या मुली विचारही करू शकणार  नाहीत नाट्यमधुरा हे संस्थेचं नाव सगळ्यानी तिच्यावरच्या प्रेमाखातरच संस्थेला दिलं होतं ती नसेल तर संस्थेचं काही होऊ श...

काळजाचा तुकडा

रणरणतं ऊन म्हणजे काय ते मला आज कळलं मला घरात बसून "बाप रे काय ऊन आहे " बापरे काय ऊन आहे करायला फार आवडतं.. त्यावर चर्चा करायलाही आवडतं पण अत्ता नाईलाज झाला.. पामूचा फोन आला, मला वाटलं त्याच्या मेव्हणीचं लग्न ठरलं एकदाचं सांगायला फोन असेल पण तो भलताच हवालदिल झाला होता प्रचंड दडपणाखाली जाणवत होता.. असशील तसा लिबर्टी गार्डनला ये म्हणाला.. लिबर्टी गार्डन? इतक्या उन्हाचं? अमिताभने बोलावलं तरी येणार नाह ी असं ठणकाऊन म्हणालो या वर तो एकच वाक्य आवंढा आवरत म्हणाला गुंडू हरवला रे .. दिसत नाहीये खल्लास! यापुढे ऐकण्या बोलण्यासारखं काही नाहीच समोर आले ते कपडे चढवले, आणि समोर आली त्या रिक्षेत बसलो.. लिबर्टी गार्डन म्हणालो आणि पामूला फोन लावला.. निघालो म्हंटलं पामू रडत रडत हो हो म्हणाला.. रणरणत्या उन्हाचा एक फायदा रस्ता नेहमीपेक्षा मोकळा मिळाला. बँकेजवळच्या गेट पाशी पामू उभा राहणार होता , मी तिथे पोहोचलो.... मला बगह्ताच त्याचं संपूर्ण अवसान गळालं... जरा शांत झाल्यावर तो म्हणाला अरे नेहमीसारखा फिरायला आणला होता रे.. मग? मी अधीरतेने विचारलं काय झालं त्याने काय पाहिलं कोण जाणे? हिसका देऊन पळाल...

योग

"योग असतात" दोन शब्दी वाक्य पण संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारं जसं वामनाने तीन पावलं जमीन मागून अख्खी पृथ्वी पादांक्रीत केली तसं , खरच विचार केलात तर अनेक अतर्क्य प्रश्नाना एकच उत्तर असतं योग होता किंवा योग असतात . आणि असे योग असल्याशिवाय खरच दयानंद च्या मुली बाबत असे हेलकावे बसलेच नसते दिसायला सूंदर, वागायला सोज्वळ , वृत्तीने रसीक आणि मनाने संस्कारी अशी होती ऋता तुम्हाला माहितिये? अहो एका दिवशी पाच घरातून मागणी  घातली गेली पोरीला, पण तेंव्हा तिची कसलीशी परिक्षा जवळ आली होती दया म्हणाला अत्ता तिचं लक्ष डाय्व्हार्ट नको व्हायला म्हणून हा विषय तिच्यासमोर काढुयाच नको , म्हणून दोन महिने कशीबशी कळ  सोसली पण त्या पाच जणांपैकी प्रधान मंडळी तर जणू लक्ष लाऊनच बसली होती कधी हिची परिक्षा आटोपतेय आणि आपण आपलं घोडं पुढे  दामटवतोय ऋताला धाकटी बहीण होती तर प्रधानांकडे रोहीतला मोठी बहीण होती, तिचं लग्न झालं होतं आणि गेली अनेक वर्ष ती न्युजर्सीला स्थायीक होती. रोहीत सुद्धा तिथे आरामात सेटल होऊ शकला असता पण रोहीतला   भारताशिवाय कुठेच करमणारं नव्हतं आमच्या ऋताचं ही असच होतं , म्हणजे...

रुठे रुठे पिया

मी रेणूला फोन करून म्हणालो रेण्या जीभ बाहेर काढून जरा तुझा सेल्फी पाठव, वैतागलीच माझ्यावर, म्हणाली म्हातारचळ लागलय तुला मी म्हणालो नाही गं ! मला जरा चेक करायचं होतं असं म्हणतात जिभेवर काळा तीळ असेल तर त्या व्यक्तीचं बोललेलं खरं होतं मग माझं कुठलं बोलणं खरं झालं? तिने तोर्‍यात विचारलं मी म्हणालो तू म्हणाली होतीस ना सहा महिन्यात रिंकू नाथाला सोडून परत येईल?.. तशी ती चारच महिन्यात आली रेणूनी फोन ठेवला, रात्रीचे दहा वाजून गेले होते इतक्या रात्री कुणाच्या घरी जाणं रेणूच्या एथीक्स मधे बसत नाही, ती जरावेळाने परत फोन करेल असा अंदाज असताना जरावेळाने दाराची बेल वाजली रिंकू मला म्हणाली मम्मा असेल तर मला तिच्याशी बोलायचं नाही ही निक्षून म्हणाली ती तुझी आई आहे, वीकएंडला तू इथे आलेली नाहीस घर सोडून आलीयेस तुला रेणूशी बोलावच लागेल मम्मा म्हणाली तसं झालं म्हणजे ती जिंकली असं ती ही म्हणत नाहीये पण तू तिचा अंदाज खरा ठरवालास.. नाईलाज झाला माझा हो ना? मग हेच तुझ्या मम्माला सांग रेणू येईपर्यंत बोलून झाल्यासारखे आम्ही तिघ गप्प बसलो.. रेणू सुधाकरला घेऊन आली होती... सुधाकर हवलदिल दिसत होता रेंणू घरी रडून आल्य...

झुंजूमुंजू

आंबेवाडीची  रचना अशी होती की  फाटकातून आत  शिरल्यावर सहा बिर्हाडंं रांगेत अंग चोरून बसल्या सारखी दिसायची, आणि त्याना वळसा घालून गेलं की मागच्या बाजूला आंबेवाडीच्या मालकाचं बिर्हाड  यायचं वाडीचे मालक असल्याने त्यांचा व्हरांडा जास्त मोठा होता आणि घरासमोरचं अंगण जास्त विस्तीर्ण होतं दुपार नंतर घरात  प्रकाश पोहोचायचा नाहीतर   सकाळ  ट्युबलाईटच्या प्रकाशानी उजळायची आंबेकरांच्या मालकीची आंबेवाडी, आधी खूप  इस्टेट होती पण जाता जाता सगळं गेलं आता फक्त ही वाडी या  बाईनी म्हणजे  यश्याच्या आईने जिकरीने राखून ठेवली. वाडीत सामाऊन घेतलेलं एक किराणा मालाचं जुनं दुकान होतं त्याच्या  मिळणार्‍या  भाड्यावर सध्या ह्या कुटूंबाची गुजराण चालायची घरात माणसं फार नाहीत यश्या म्हणजे यशवंत त्याची बायको अलका आणि आंबेकर बाई यश्याच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत, यश्या पदवीधर आहे पण नोकरी टिकवता  आली नाही, मग केमिकलच्या व्यवसायात पडला तर तिथे जम बसायला वेळ लागतोय अलकाने परिस्थीती ओळखून  बालवाडीत नोकरी धरली पण ती पण इतके वर्ष परमनंट होण्याची वाट ब...

उलाघाल

आव देखा ना ताव म्हणतात तसं आम्ही नाचणीकरांच्या घरात राहयला आलो. आणि केवळ दोन तासात समजलं इथे राहणं केवळ अशक्य आहे. एक तर दरवाजा थेट रस्त्यावरच उघडायचा. रहदारीही बर्‍यापैकी, शिवाय दार लाऊन बसायची सोय नाही कारण घरात मिट्ट काळोख व्हायचा, बाहेरच्या रहदारीमुळे घरात मोठ्याने बोलावं लागायचं साधं साबण संपलाय हे सुद्धा ओरडून सांगावं लागायचं, आता नवरा बायको म्हंटलं की वाद होणारच आणि नवरा बायकोच्या वादाला तस ं खास कारण लागत नाही.. आता त्यात कोण जिंकायचं? हा प्रश्न आपण सोडून देऊया पण जरा वादाची पहिली फैरी पार पडली की क्रिकेटची मँच बघायला रिकामटेकडॆ टीव्हीच्या शोरूम भोवती गर्दी करतात तशी अनाहूत श्रोत्यांची गर्दी फुटपाथवर जमा व्हायची, उमाला रियाज पाहटेलाच उरकून घ्यावा लागायचा नाहीतर त्याचा एक वेगळा उपद्रव सोसावा लागला असता... तेंव्हा मी अजय सिन्हांकडे काम करत होतो. नाचणीकरांच्या घराचा तो एकमेव फायदा होता की बस घरासमोर मिळायची .थेट अजय सिन्हांच्या आँफीसपाशी जाता यायचं. आँफिसला जायची पक्की वेळ नव्हती पण नियमीत जावं लागायचं आणि मी जायचोही... अजयजींच्या आँफिसमधेच अरूण बोगानीशी ओळख झाली. उमदा माणूस, ...

अथक

वीणामावशी आणि जोशी काका रस्त्यात दिसले की हल्ली मला तर रस्ताच बदलावासा वाटतो, नाहीतर नजर चुकवाविशी वाटते. तोंड लपवावसं वाटतं.म्हणजे मी काही त्यांच्याकडून उधार पैसे घेतले नव्हते, की त्यांच्याकडची कुठली मौल्यवान वस्तू उचलली नव्हती. काकांचं आणि आमचं छान जमतं म्हणजे जमायचं. गोकूळधामला आल्यापासनंचे ते आमच्या ओळखीचे आहेत. गोकूळधामच्या घरात पथारी पसरली त्या रात्री आयता गरम गरम मेतकुट तूपभात या वीणामावशीन ीच खायला घातला होता . आमच्या घरात सदा सर्वकाळ जो स्वादीष्ट मोरंबा भरलेला दिसतो तो ही कायम या वीणा मावशीच्याच हातचा असतो. आम्ही चारकोपला आलो तेंव्हाच कधीतरी अचानक त्यांचा एकुलताएक मुलगा आदित्यं ...कायमचा लंडनला स्थाईक झाला ते ही काकांच्या मनाविरुद्धं. मग काकाही वीणामावशीचा हात धरून चारकोपला स्थाईक झाले . माझी पन्नाशी उलटली तरी हे जोशी दंपत्यं आमचा उल्लेख मुलं असाच करतात. किती दिवसात मुलांकडे गेलो नाही किती दिवसात मुलं आली नाहीत. केळफुलाची भाजी केलिये मुलांकडे पोहोचवून या , मुलानी पाठवलेला स्वेटर अगदी मापाचा असल्या सारखा ह्यांच्या अंगावर बसला ही सरावाची वाक्य नेहमीच्या संवादातली मधे आदित्य दोघ...

घटना की गोष्ट?

काही योग नं ठरवता जुळून येतात तसा आज एक योग जुळून आला जोगळेकरांच्या दोन्ही मुली आज साडी नेसल्या म्हणजे लहानपणी घर घर खेळताना आईची नाहीतर आत्याची ओढणी.. साडी म्हणून गुंडाळली असेल, किंवा फँसीड्रेस च्या स्पर्धेच्या वेळी कधी साडी नेसली असेल तेव्हढीच त्या नंतर इतक्या वर्षानी प्रथमच साडी नेसण्याचा घाट घातला गेला मोठीला बघायला मुलगा येणार होता, आणि मोठीने साडी नेसावी असा तिच्या मावशीचा आग्रह होता.. आणि ध ाकटीच्या शाळेचा सेंडाँफ होता, त्या निमित्ताने सगळा ग्रूप साडी नेसणार होता.. दोघी एकदम तयार होत होत्या आणि जोगळेकरांचे डोळे सारखे पाणावत होते.. बाई त्याना दटावत होत्या तुमचं ना अतीच झालय हल्ली सारखे कसे डोळे भरून येतात हो तुमचे? मुलगा फक्त मुलगी बघायला येतोय,... ताईला लगेच आजच्या आज हात धरून घेऊन जाणार नाहिये.. आणि धाकटी तर अजून लहानच आहे आणि आपल्यावेळी मला काय बजावलं होतत आठवतय का? उगीच पाठवणीला रडू नकोस, मला गिल्टी वाटेल, रीतसर लग्न करून नेतोय पळवून नाही, तिघी हसल्या पण त्याकडॆ जोगळेकरांच लक्षच नव्हतं कारण धाकटी तर अजून लहानच आहे या वाक्यावर धाकटी जी रिआक्ट झाली, तिने जो लूक दिला ते जोगळेकरा...

पराकॊटी..

माझी एक मीराताई होती, दिसायला भारी गोड सदैव हसरी, आनंदात असल्यासारखी जस्ट पन्नाशी उलटली आणि तिला कर्क रोगाने गाठलं घरात मुलीचं आणि पुतणीचं लागोपाठ लग्न होती..त्या गडबडीत सुरुवातीला जरा दुर्लक्ष झालं आणि ती संधी या दुर्धर रोगाने पकडली... सांगायचं म्हणजे जसा रोग बळावला , जशी तिची तब्येत खंगत गेली, तशी भर गुंगीत ती बिनधास्तपणे  फक्त आपल्या प्रियकराबद्दलच बोलत राहयची.. कधी कधी तिची तार जुळली तर नाही नाही  ते त्यांच्या प्रणयाचे तपशील तिला आठवत राहयचे. तेंव्हा तिचा स्वर तिची मुद्रा सगळं बदलून जायचं . भारी हौशी आणि प्रेमळ होता तिचा प्रियकर..त्याला पाऊस आवडायचा, भरून आलेलं आभाळ आवडायचं,असं आभाळ भरून आलं की तो तिला घरी बसूच द्यायचा नाही..तिचा हात धरून कडेकपारी फिरायचा, किशोर कुमारची एकसे एक गाणी शीळ वाजवून गायचा, नाटकात काम करायचा,वाद्यवृंदात निवेदना सहं मिमिक्री  करायचा , आणि त्याला सतत ती सोबत लागायची, जादूच्या गालीच्या.वरून फिरावं तसे दोघे त्या दिवसात तरंगले होते.. ते सगळं ऐकताना नवर्‍याची उगीच पंचायीत व्हायची... तो आक्षेप घ्यायचा नाही पण तरी जरा अवघडायचा,.. आमच्या लक्षात या...

कारंज

कधिचं बंद पडलेलं कारंजं होतं तिच्या दारापुढे, तसं दारही सतत बंद असायचं खिडकिचंएक दार उघडं तर एक बंद असायचं जाळी जरा फाटलेली म्हणून घरातलं थोडं दिसायचं , दिसण्यासाठी घरात होतं काय म्हणा.. ती बसायची ती मोडकी खुर्ची आणि कलंडत्या टेबलावर कधीचा राहून गेलेला पेला त्यातलं पाणी सुद्धा आता वाळून गेलं ती गेली तेंव्हा तिचा घसाही कोरडा होता.. पाणी समोर होतं पण म्हणे प्यायचं तिच्या लक्षातच आलं नाही.. दिवसभर तस ा अंधारच असतो घरात रात्री जास्त गडद होतो इतकच.. कसली चाहूल नाही हालचाल नाही पालींच सरपटणं ते कसलं त्याने कधी हालचाल होते का?कुबट वास येतो तो म्हणे तिच्या राहून गेलेल्या कपड्यांचा असेल.. मी डोकावतो कधी कधी तिच्या घरात,तिच्या गावाला गेलो की.. आणि तिच्या गावाला काय ,तिच्या घरात डोकावण्यासाठीच जातो.... तसे इथले गावकरी सांगतात वेळी अवेळी येऊ नका ती अजूनही कोणाकोणाला दिसते अंगावर चवताळून येते... जिवंतपणी जे जमलं नाही ते तिला गेल्यावर कसं जमेल? पण मी कोणाशी फार बोलत नाही, नाहीतर माझ्याच तोंडून निघायचं तिने ही वास्तू माझ्याच नावावर केल्याचं.. नसते प्रश्न उभे राहयचे ते विचारायला आणखी चारजण यायचे चारजण...