मागलं अंगण
मित्राताई अशी हाक मारली तरी मित्रा आमची नात्याने वहिनी होती
नातं मानलेलं असलं तरी सख्ख्यापेक्षा वरताण, आमच्या आईने जोडलेली नाती तशी सख्ख्याच्या वरताणच होती, उद्धव दादा आमच्या आईच्या मैत्रीणीचा म्हणजे पारूमावशीचा मुलगा
आम्ही चिल्ली पिल्ली असताना हा उदूदादा डाँक्टरकी शिकायला मुंबईत येऊन राहिला होता, तो हाँस्टेल वर राहयचा पण बरेचदा सणावाराला घरी जेवायला यायचा, एकदा असाच एका श्रावण सोमवारी तो जेवायला आला , श्रावण असून धो धो पाऊस् कोसळत होता, श्रावणी सोमवारी आम्ही लवकर जेवायला बसायचो , ते ही केळीच्या पानावर
एरवी आम्ही जरा भाजी नको म्हणालो की आई म्हणायची बघा हं
दादा इंजिक्षन घेऊन आलाय , भाजी संपवली नाही की तो इंजिक्षन देईल, तो ही अगदी आव आणायचा तसा पण आज इंजिक्षना बरोबर तो या मित्राताईला घेऊन आला होता , टप्पोर्या डोळ्यांची नितळ कांतीची काटकुळी असली तरी रेखीव अशी मित्रा ताई
काही काही प्रसंग विसरता येत नाहीत त्यातला हा प्रसंग होता
धो धो पावसाने वातावरण ओलं झालं होतं संध्याकाळ व्हायच्या आधीच अंधारून आलेलं , त्यात आमचं ते जुनं घर झाडा झुडपानी वेढलेलं त्यात वार्याचा वेग आणि आवाज दोन्ही गुंतलेला
त्यात नखशिखांत भिजून हे दोघं दाराशी उभे
कसे दिसत होते दोघे? त्या बालवयातलं मी पाहिलेलं त्यांचं ते रूप
आईने दोघाना घरात घेतलं अंग पुसायला पंचा दिला ती पंचा हातात घेईना, मी आणलाय म्हणत ती तिच्या ओल्या गिच्च झालेल्या झोळीत हात घालायला लागली आई हसली म्हणाली त्या झोळीसकट तुझा पंचा वाळूदे मग तो घे, अत्ता हा पंचा धर
ती म्हणाली मावशी माझं नाव संघमित्रा भुवड
आई अगदी सहज म्हणाली उद्धवने सांगितलय मला सगळं पण नेमकी श्रावण सोमवारी आलीस, आज काही मी तुझी वधूपरिक्षा घेऊ शकत नाही , लवकर अंग पुसा , मी गरम गरम चहा देते मग जेवायलाच बसू तुला आवडतात म्हणून भोपळ्याचे घारघे केलेत मुद्दाम , मित्राताईचं अवघडलेपण क्षणात गेलं
मग या ना त्या कारणाने मित्राताई घरी येतच राहिली, कधी दादाबरोबर कधी एकटी, कधी तिच्या बहिणी बरोबर मित्राताई त्वचेच्या रचनेचा विशेष अभ्यास करणार होती
प्रेम बीम कळायचं आमचं वय नाही असं आपलं आईला वाटायचं नाहीतर हमजोली , जिगरी दोस्त, दो चोर सारखे चित्रपट बघून आम्ही प्रेमात पडलेली जोडपी ओळखण्यात तरबेज झालो होतो
पण यांचं लग्न मावशी कडॆ पसंत नाही ही बातमी कानावर आली, त्या पाठोपाठ एक दिवस मावशी घरी येऊन थडकली इतर वेळी आमच्याशी अगदी मायेनं बोलणारी मावशी आल्यापासनं ढीम्मं बसून होती
मग कळलं दादाने कोर्टात लग्न केलं होतं
आमच्या मावशीचं घर तालेवार, मुलाबाळानी भरलेलं, व्यापार असा की दहा माणसं नेमावी तर वीस माणसांची गरज पडावी , मावशीचे मोठे दोन्ही मुलगे घरच्या व्यवसायात अगदी काकांच्या तालमीत तयार झाले होते
उद्धव दादानी मात्र लहानपणीच डाँक्टर व्हायचं ठरवलं होतं तसा तो झाला, पण मित्रा ताईशी लग्न?
हे मात्र मावशीला सहन होणं कठीण होतं , त्यात तिची राजकिय वर्तुळात उठ बस होती,
दोनदा राज्यस्तरावर तिला आदर्श समाजसेविका म्हणून पुरस्कार मिळाला होता , त्यामुळे ती या लग्नला जाहीर विरोधही करू शकत नव्हती मुलानी अगदी कोंडीत पकडलं होss
असं ती दात ओठ खात म्हणाली पण दादा मित्राताईला घेऊन आला तेंव्हा सगळच चित्र बदललं
मावशी आव आणतेय हे आमच्याही लक्षात आलं आणि मित्राताईचं आमच्याकडे मोकळं वावरताना बघून तिला हे घर युज टू आहे याची चाणाक्ष मावशीलाही जाणीव झाली, खात्रीच पटली
सूंदर तू मला कल्पना द्यायला हवी होतीस म्हणत तिने जी मनात अढी धरली ती शेवट पर्यंत
पून्हा काही मावशी आमच्याकडे आली नाही
शिक्षण पूर्ण झाल्यावर दादा मित्राताईला घेऊन गावी परतला कारण तो यायच्या आधीच अद्ययावत सोईनुसार त्याचा दवाखाना सज्ज्य होता
पण पाच सहा किंवा त्याहून जरा जास्त वर्षाने दादा मित्राताईला घेऊन परत शहरात आला, आल्या आल्या मित्राताईनी आपला प्रबंध पूर्ण केला, गावात राहून तिने भरपूर संशोधन केलं अनेक नमुने जमवले
भौगोलीक परिस्थिती पेक्षाही आपला नित्याचा आहार हा त्वचेच्या प्रत्येक स्तराला कारणीभूत असतो असं काहीतरी त्या प्रबंधाचं स्वरूप होतं मित्राताई अगदी आपल्या सासर बद्दल भरभरून बोलायची, आई कशा प्रेमळ जाऊबाई कशा मनमिळाऊ, सासरे कसे उमद्या स्वभावाचे, सकाळची न्याहारी, दुपारचा चहा सगळं बसल्या जागेला मिळायचं , वेळ मिळाला तर आई सुद्धा माझ्यापाशी येऊन बोलत बसायच्या
मी कधी ह्यांच्या बरोबर बाहेर जायला निघाले तर अजिबात आडवयच्या नाहीत, सावकाश या म्हणायच्या
आम्ही ऐकत राहयचो, बरं वाटायचं ऐकून
पण मग परत का इथे आलात हा प्रश्न कधी आईने ओठावर येऊ दिला नाही
आम्ही विचारायचा प्रश्नच नव्हता
पण या न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दादाने दिलं
म्हणाला फार समजुतदार आहे माझी बायको, तिने सगळे अपमान , अवहेलना हसतमुखानं सोसली
माझीच माणसं इतकी कारस्थानी आणि आतल्या गाठीची असतील असं वाटलं नव्हतं
मारझोड केली उपाशी ठेवलं म्हणजेच सासुरवास असतो असं नाही , वगळलं जाणं जाणून बाजून वेगळं ठेवणं
हा सुद्धा सासुरवासच आहे माझ्या लक्षात यायला वेळ लागला पण मित्राच्या तर लगेच लक्षात आलं पण तिने जराही तक्रार केली नाही
म्हणजे नक्की तुझ्या आईने केलं तरी काय?
दादा खिन्न स्वरात म्हणाला आईने तिला कायम मागल्या आंगणात बसवलं , कधी देव घरात येऊ दिलं नाही की स्वैपाकघरात ओट्याशी जाऊ दिलं नाही
इतकच काय देवघरातल्या उपकरणाना तिचा स्पर्श झाला तर घासल्या शिवाय ती परत देवघरात घेतली नाहीत
बघावं तेंव्हा मित्रा आपली मागल्या अंगणात विटाळशी बाई सारखी बसलेली
आमच्या खोलीत तर आई यायचीच नाही, बाहेरून हाक मारून मला बाहेर बोलवायची
आणि कोजागीरीच्या उत्सवाला तर हद्द झाली
अभिषेका नंतर उपाध्ये आमच्या समस्त जांभळेकुटूंबावर तिर्थ शिंपडून आशीर्वाद देतात नेमकं तेंव्हाच आईने मित्राला लुगडं बदलून यायला सांगितलं , मी मित्रासाठी थांबायला सांगितलं पण ते थांबले नाहीत याचाच अर्थ आईने त्याना बजाऊन ठेवलं असणार
हे लक्षात आल्यावर मी पण तिथे थांबलो नाही
नाहीतरी नगरकर सर मला इथे सारखे बोलवतच होते , निर्णय घेतला आणि आलो निघून
दादाकडून हे सगळं ऐकल्यावर आई मित्राताईशी या विषयी बोलण साहजिकच होतं
आई म्हणाली तुझी सासू माझी बालमैत्रीण पण तरी मी तिला ओळ्खलं नाही, ती असं वागू शकते हे मला खरच वाटत नाही
त्यावर सौम्य हासून मित्राताई म्हणाली त्यात त्यांची काही चूक नाही , मी उद्धवला तेच सांगत होते
मी वेगळ्या संस्कारातून वेगळ्या जातीतून अचानक तुमच्यमधे टपकले, त्यांची कशी तयारी असेल?त्यानी काय काय स्वप्न बघितली असतील सुनेसाठी. मी सगळी उधळून लावली
मुलाला जपू? की आपली प्रतीमा जपू? की या नव्या आलेल्या मुलीला जपू?
साहजिक यात माझा शेवटचा नंबर लागला
पण मावशी आईंपेक्षासुद्धा कावेबाज निघाल्या त्या मोठया जाऊबाई
एस एन डी टीच्या का होईना त्या पदवीधर होत्या, त्यानी थोडं आईना समजवायला हवं होतं
पण त्यांचा वेगळाच प्राँब्लेम?
कसला प्राँब्लेम? आईनी विचारलं
त्याना सुद्धा गोड बोलून आईंकडून घराची सत्ता काबीज करायची होती
सध्या त्यांची उमेदवारी चालू आहे , गोड बोलून त्या प्रत्येक गोष्ट आपण आईंच्या मताने करतोय असं दाखवतात त्यात मी शिकलेली , प्रेमविवाह करून आलेली मुलगी म्हंटल्यावर त्याना डोईजड होणारच , मग त्यानी ही युक्ती शोधून काढली आणि मला मागच्या अंगणत बसवली
बसल्या जागी चहा पाणी नाश्ता न्याहारी सगळं काही मिळायचं स्वत:शी हसत ती म्हणाली म्हणून मी माझं संशोधन करू शकले
मागच्या आंगणात असंख्य कुणबी, कुरवाडी बायका वाड्याच्या कामासाठी यायच्या
मी त्यांच्यात रमले , माझ्या संशोधनसाठी आयती उदाहरणं मिळाली
त्याना असंख्य शारीरीक समस्या होत्या ज्या त्या लाजेकाजेस्तव कोणाशी बोलू शकत नव्हत्या त्यांचे उपचार मी करत गेले औषधं द्यायला हे होतेच त्यामुळे माझा प्रबंध पूर्ण झाला
ह्यानी शहरात जायचा निर्णय घेतला एकूण घरचा रागरंग बघून मी ही निघून आले
हां हां म्हणता शहरात दोघानी खूप प्रगती केली , मधे दोन तीन वेळा परदेशातही जाऊन आले पण तरी मित्राताईने घराशी असलेला संवाद सोडला नाही
दर चार दिवसानी ती घरी फोन करायचीच, मग तिच्या लक्षात आलं हल्ली आई फोनवर येत नाहीत
काय झाल काय झालं चौकशी केल्यावर मोठी जाऊ म्हणाली बाहेरगावी असताना नासका सुरण पोटात गेला त्याची अँलर्जी आलिये
हिला काही स्वस्थ बसवेना
दादाला यायला शक्य नव्हतं तर मित्राताई आमच्या आईला घेऊन गेली
घरी पोहोचून बघते तर मागच्या अंगणात जिथे ती बसायची तिथे उद्धवच्या आईची बैठक
तसच चहाचे कप पाण्याचे ग्लासेस
ती धावतच आईं जवळ गेली, वैद्यकीय नजरेतून तिने न्याहाळलं
आईंच्या हातावरच्या जखमा साध्या नव्हत्या , पायाच्या बोटांच्या बेचक्यातही जखमाना सुरुवात झाली होती
चेहर्यावर नाकाच्या शेंड्यापाशी चट्टा उमटला होता, कानाच्या पाळ्या गरजेपेक्षा जाड दिसत होत्या डोळेही गढुळलेले आई सोबत असल्याने ती एकटी नव्हती मोठया जावेशी भांडून उद्धवच्या बाबाना समजाऊन ती दोघाना घेऊन शहरात आली
लगेच सगळ्या टेस्ट केल्या आणि मित्राताईची शंका खरी ठरली मावशीला कुष्ट रोगाची लागवण झाली होती
मावशीसाठी हा धक्का होता
मला कसा काय झाला? मावशीचा बाळबोध प्रश्न
मित्रा म्हणाली कुष्टरोग कुणालाही होऊ शकतो आणि योग्य उपचाराने तो बराही होऊ शकतो
तो संसर्गजन्य आहे पण तरी योग्य खबरदारीने त्याला आळाही बसतो
मावशीला उपचारासाठी मित्राताईने ठेऊनच घेतलं , मावशीची मानसिक अवस्था ढासळली होती आमच्या आईने आणि मित्राताईनेतिला सावरली
मावशीला दादाकडे राहून आपल्या सुनेची खरी ओळख पटली
किती नीटनेटकी आणि निर्मळ मनाची सून आहे आपली आणि आपण तिच्याशी कसे वागलो हे आठवून तीला सारखं भरून येई
पूर्ण बरी झाल्यावर ती परत गावी गेली
पण तो पर्यंत सत्ता मोठया जवेच्या ताब्यात गेली होती
मायाममतेचा दाखला देत मित्राताईची जाऊ हातचं अंतर ठेऊनच वागत होती, मावशी तशी मनाने खचली होतीच पण इन्डायरेक्टली मोठी जाऊ गावभर बातमी पसरवायची धमकी देत होती
आपण आपल्या कर्माची शिक्षा भोगतोय या जाणिवेने मावशीने आलेलं प्राक्तन निमूट स्विकारलं
समाजसेवीका म्हणून आपण स्वत:ला मिरवतो पण इथे मागल्या अंगणात बसून आपल्या सुनेने किती समाज प्रबोधन केलय या बायकाना किती मदत केलीये हे आता तिला या कामाला जमणार्या बायकांकडून कळत होतं
आणि एक तरी चूक निस्तरायची म्हणून मावशीने दादाला सांगितलं
कोजागीरीला माझ्या सुनेला घेऊन ये
पूजा तुमच्या दोघांच्या हस्ते घालून आशीर्वादाचं तीर्थ तुमच्या अंगावर पडेपर्यंत माझं समधान होणार नाही
दादा म्हणाला सध्या मित्राला प्रवास झेपणार नाही
तू आज्जी होणार आहेस..
पण तरी मित्राताई गेलीच, दोन तासात तिला घराची कल्पना आली
यथासांग पुजा झाली , मित्रा इतक्यावेळ बसू शकणार नाही म्हणून पूजा मोठया जावेच्या हातूनच झाली
पण तीर्थ शिंपडताना जाऊबाई उपाध्ये गुरुजीना मागच्या अंगणात धाडायला लागली
तिथे मात्र मित्रानी अडवलं, आई नको नको म्हणत असताना त्याना घेऊन ती पुजेच्या इथे आली
उपाध्ये गुरुजीनी तीर्थ शिंपडलं
जावेला ते अजिबात आवडलं नाही
उद्धवची आई भीत भीत परत मागल्याअंगणात जायला लागली
पण मित्राताईनी तिला अडवलं
आई आता मागचं आंगण सोडा मित्राताई म्हणाली
मावशी हताश होत म्हणाली आता माझं तेच स्थान आहे
मित्राताई म्हणाली नाही आई जरा बाहेर बघा, समजाला तुमची फार गरज आहे
तुम्हाला समाजसेवेची आवड आहेना, ते तुमचं व्रत आहे
अहो मग कुष्टरोग कुणालाही होऊ शकतो आणि योग्य उपचाराने तो बराही होऊ शकतो हे तुम्ही स्वत:च उदाहरण देऊन लोकाना सांगू शकता केव्हढी मोठी जनजागृती होईल
कित्येकजण मागल्यादारी कोंडले गेले असतील त्याना तुम्ही जगाचा जगायचा मार्ग खुला करून द्याल
घर सांभाळायला जाऊबाई खमक्या आहेत तुम्हाला दाही दिशा मोकळ्या आहेत
आणि आमच्या मावशीला ते पटलं , नुसतं पटलं नाही तर स्फुरण चढलं
तिने बाहेर पाऊल टाकलं तेच एका ध्येयानं
समाज सेवा करणं आणि समाज सेवेचं ढोंग करणं यातला फरक तिचातिलाच कळला, समाजानेही मोठे मानस्न्मान देऊन तिच्या कार्याचा यथोचीत मान राखला
आता वयाचा ऐंशीव्या वर्षी तिने आपलं आत्मचरित्र लिहिलं मागलं आंगण
आणि चाळीस वर्षा पूर्वीचा काळ जसाच्या तसा उभा केला
आणि सगळ्यात मोठा मान आमच्या मित्राताईला मिळाला कारण मागलं आंगण मावशीने तिला समर्पीत केलं आहे आणि मावशीने या वयात ताईला गुरूचा मान दिलाय, सासू कडून असा सन्मान होण्यासारखा दुसरा मान कुठला?

Superb.... khupach mast
ReplyDeleteसर्वात सुंदर कथा।
ReplyDeleteSuperbb
ReplyDelete