आधे अधुरे
सेक्टर नंबर तीन मधे शंकराच्या देवळामागे दादूभाई चाळ आहे
चाळ आपलं म्हणायचं नाहीतर अशी ऐस पैस जागा कुणाला कुठे पाहयला मिळायची नाही, हे महत्वाचं नाही
तर त्या चाळीच्या तिसर्या इमारतीत दुसर्या माळ्यावर अजब कुटूंब राहतं
सोमण आणि गोम्स
ऐकायला कसं वाटत ना? कुटूंबात दोन जोडपी विनायक सोमण आणि शैलजा सोमण
दुसरे मार्टीन गोम्स आणि त्यांची पत्नी सँड्रा गोम्स
चौघांची वयं असतील आस पास पन्नास पंचावनच्या घरात
मार्टीन शैलजाला विनायकना सांभाळायला मदत करतात आणि शैलजा मुळे सँड्रा बेडरिडन असून तग धरून आहे
मुळचे ते इथले नाहीत, पण गेली चार वर्ष ते इथेच आहेत आणि इथून कुठे जातील असं वाटत नाही
तसे गोम्स मुळचे गोव्याचे मग सावंतवाडीला स्थायीक झाले होते आणि सोमण मुंबईचे सांगायला त्यांचही कुठलं गाव असेल पण हयात घालवली मुंबईत
तसा त्यांचा डबल बेडचा फ्लँट अजूनही बंद कुलपाआड धुळ खात पडलाय, पण ते परत तिथे परततील असं वाटत नाही, तशी एक मुलगी आहे दोन नातवंड आहेत पण ती सगळी परदेशात त्याना इथे यायला फुरसत नाही आणि याना तिथे जाण्यात रस नाही
मार्टीन आणि सँड्राला आता कोणी मुलबाळ नाही, एक मुलगा होता माँटो
हसत मुख , उत्साही, जरासा वांड तितकाच लोभस
त्याचा एक जिवलग मित्र होता अनुराग दोघांची घनीष्ट मैत्री योगायोग असा की दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी एकाच साली फक्त माँटो सकाळचा आणि अनुराग संध्याकाळचा
अगदी काँलेजच्या पहिल्या दिवसापासून दोघे जे एकमेकाला भेटले ते जणू एकमेकाला भेटण्यासाठीच या काँलेजात आले होते
त्या दोघांच्या घरात एकमेकांच्या धर्माबद्दल अढी होती, संस्कारच तसे , जशी मैत्री जुळत गेली तसे त्यांचे पालक सावध झाले , आपापाल्या परीने आपल्या मुलाला अडवायला लागले
पण यांच्या मैत्रीपुढे दोन्ही घराचं काही चाललं नाही
एक दोनदा तर हा त्याच्या घरी आणि तो ह्याच्या घरी असे सुद्धा राहिलेत
तसं शैलजानी सुद्धा अगदी मनापासून माँटोला स्विकारलं होतं अर्धा लाडू अनुरागला भरवला तर अर्धा लाडू माँटोला तिच्याकडून सहज भरवला जायचा
माँटो गिटार वाजवायचा तर त्यावर शैलजा केशवाsss माधवाsss गायची अनुराग अवघडून जायचा पण माँटोला काही फरक पडायचा नाही तो कसोशीने वाजवत राहयचा
विनायक दोघांवर वैतागायचे , दोघाना अकला नाहीत म्हणायचे , विनायक कधी शैलजा सारखं या कुटूंबात मिसळू शकले नाहीत कधी ही दोघं घरी आलेच तर विनायक हातचं राखून वागायचे
मार्टीनला कळायचं नाही असं नाही पण मुळातच तो खुल्या मनाचा , खिलाडू वृत्तीचा तो सगळं समजून घ्यायचा, जास्त गळ्यात पडायचा नाही
विनायकला कधी आपल्याच गळ्यात पडून ढसा ढसा रडायची वेळ नियती आणेल याची त्यालाच काय कोणालाच कल्पना नव्हती
दोघे हुबळीला गेले पुढचं शिकायला, हाँस्टेल मधे सुद्धा खूप प्रयत्न करून एकाच रूम मधे जागा मिळवली
अडीच वर्ष पूर्ण झाली होती अडीच वर्ष बाकी होती
मग दोघे मुंबईतच स्थायीक होणार होते, बेत अगदी दृष्ट लागतील असे होते आणि त्यानुसार दृष्ट लागली
जवळच्या गावात कुठेतरी जत्रा होती म्हणून दोघे मित्र गावातल्या मित्राची बाईक घेऊन निघाले
आणि निघाले ते ... ते गेलेच
कोणी कशी बातमी पोहोचवली कोणजाणे पण हे चौघं जे इथे येऊन पोहोचले ते इथून परतलेच नाहीत
माँटो आणि अनुरागला इथेच अँडमीट केलं
पंधरा दिवस हुलकावण्या देत दोघानी एकाच दिवशी या जगाच निरोप घेतला
माँटो जाताना बोलला तरी अनुराग ते ही नाही
जाताना माँटो आपल्या मम्माला साँरी म्हणाला आणि त्याची मम्मा ट्रांसमधेच गेली
अनुरागची कलंडलेली मान विनायकनी बघितली आणि ते ढासळले
त्या कसोटीच्या पंधरा दिवसाच्या काळात या दादूभाई चाळीनी त्याना आसरा दिला आणि ते चौघं इथेच राहते झाले , त्या चौघानी एकमेकांची सोबत मान्य केली
म्हणायला सोमणाना नातेवाईक होते मुलाच्या तेराव्याला येण्यापुरते
निघताना काळजी घ्या म्हणणारे, तेराव्याला सगळे जमले पण त्या आधीचे बारा दिवस या चौघानी एकमेकाच्या सोबतीने घालवले होते चौघांचे अहंकाराचे कंगोरे कधीच झिजून गेले होते
त्यामुळे कार्य पार पडल्यावरही दोन्ही मुलांचे आई वडील माघारी परतायला तयार नव्हते
दादूभाईंचा मुलगाही मोठया मनाचा त्याने रीतसर सोमणगोम्सच्या नावाने भाडेपावती तयार केली
आणि या चौघांच एक रुटीन सुरू झालं
विनायक थकले तर होतेच पण मधेच तारेत गेले तर पायात चपला अडकवून चालू पडायचे
मार्टीन डोळ्यात तेल घालून त्यांच्या वर लक्ष ठेवायचा त्याच्या मुळे वातावरण जरा सैलावलेलं असायचं
तो सगळं दू:ख पचवल्याचं दाखवण्यात पटाईत झाला होता
सँड्रा मात्र खचून गेली होती, जिवंत असून संपली होती तिच्या पायाचं सेंसेशन गेलं होतं आणि डाँक्टर म्हणत होते त्या अशाच गर्ततेत गेल्या तर हळू हळू सगळं शरीरच असं निर्जीव होईल
शैलजा खूप समजवायची तिच्याशी बोलायची पण सँड्रा प्रतिसाद द्यायची नाही
म्हणायची तुमच्या कडे दुसरा जन्म तरी आहे तुझा मुलगा तुला पुढच्या जन्मात भेटेल
माझं तसं नाही
मार्टीन हे ऐकून आतल्या आत तुटायचा
तरी नियमाने माँर्नींग वाँक , सनडे ची प्रार्थना, संध्याकळची मार्केटातली फेरी संध्याकाळची प्रार्थना सगळं सांभाळायचा आज काल विनायक सुद्धा त्याच्या बरोबर हात जोडून बसायला लागले होते
असे दोन पावसाळे गेले इथला पाऊस धुवांधार , शैलजाला पाऊस खूप आवडायचा
मार्टीनलाही आवडायचा , मग दोघे आप आपल्या पावसांबद्दल बोलत राहयचे
विनायक दोघांचे पाऊस ऐकत राहयचा
अशाच एका पावसात हे जग सोडून गेली
मग तिघांचा डाव सुरू झाला आता डाव रंगायचा प्रश्नच नव्हता डाव सुरू ठेवणं गरजेचं होतं
पण एक दिवस विनायक ने ही हातातले पत्ते निमूट ठेऊन दिले
आणि मार्टीन हवालदिल झाला , इतके दिवस विनायकची काळजी घेण्याची महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती आता ते कारणच उरलं नाही
आणि आता शैलजालाही इथे राहयचं कारण उरलं नाही
तिचे नातेवाईक तिची मुलगी हे गृहीतच धरून चालले होते
जिचा नवरा गेला मुलगा गेला तिच्या हिताची जबाबदारी आता त्यांच्यावरच होती तिला निर्णय घ्यायचा ना हक्क होता ना गरज
मार्टीनला कळत नव्हतं आपल्याला का याचा त्रास होतोय ?
आपला काय संबंध? आपण धट्टे कट्टे आहोत आपलं सावंतवाडीला घर आहे, इथे राहयचं म्हंटलं तरी आपल्याला कोणी अडवणारं नाही आपल्या आयुष्यात इतकी पडझड झाली आपण जिवंत आहोत म्हणून उरलोय म्हणायचं , मग आता आयुष्याकडून अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे ? आता आयुष्यात कशाने काय फरक पडणार आहे?
का या अपेक्षा संपत नाहीत म्हणजे आपण नाँर्मल आहोत?
बाकी नातेवाईक गेले फक्त शैलजाची मुलगी जावई आणि बहीण मेव्हणे राहिले
आणि त्यानी स्पष्ट निघायची भाषा सुरू केली
मार्टीन ओठ बंद ठेऊन ऐकत होता, हीच कसोटीची वेळ आहे अत्ताच शहाण्यासारखं वागायची गरज आहे
नाहीतर शैलजाला काय काय ऐकावं लागेल अशा विचाराना तो निकराने तोंड देत असताना शैलजाचे सौम्य आवाजातले ठाम शब्द कानावर आले मी इथून कुठेही जाणार नाही
इथे राहून काय करणार? एकच कल्लोळ
जे तुमच्या सोबत तिथे येऊन करणार तेच ,
पण इथे आहे कोण?
तिथे तरी कोण आहे? तू आज नाहीतर उद्या निघून जाशील
ही माझी धाकटी बहीण पण तिलाही तिचा संसार आहे व्याप आहेत
अग पण इथे तू एकटी?
एकटी कशाला , हे आहेत की
हे? आवाजातला कडेलोट मार्टीनला जाणवला
हे कोण तुझे?
माहीत नाही, आणि माहीती करून घ्यायची गरजही नाही
आम्ही दोघे समदु:खी आहोत
जे सोसलय ते आम्ही दोघानी एकमेकाच्या सोबतीने सोसलय आम्ही साक्षी आहोत एकमेकाच्या आयुष्याचे
आणि ते नाही म्हणाले तर?
ते नाही म्हणाले तर मग बघू
त्यांची भाषा मला पूर्ण समजत नाही आणि त्याना मराठी तितकीशी जमत नाही
तरी मला खात्री आहे ते नाही म्हणणार नाहीत
आणि खरच मार्टीनने तिची खात्री वाया जाऊ दिली नाही
नाकं मुरडून झाली, बोटं मोडून झाली आणि सरते शेवटी काळजी घे म्हणत ते चालते झाले
आणि सेक्टर नंबर तीन मध शंकराच्या देवळा मागच्या दादूभाई चाळीच्या तिसर्या इमारतीतील दुसर्या मजल्यावरचं सोमण गोम्स यांचं घर पुढच्या अनेक पावसात तसच अबाधीत राहिलं

उत्तम शेवट!
ReplyDeleteTouching
ReplyDeleteफारच अप्रतिम कथा
ReplyDeleteकस जमत हो सर शब्दांनी चित्र रेखाटन ?
ReplyDeleteवाह..वाह...क्या बात...क्या बात...क्या बात...👌
ReplyDelete