पराकॊटी..

माझी एक मीराताई होती, दिसायला भारी गोड सदैव हसरी, आनंदात असल्यासारखी
जस्ट पन्नाशी उलटली आणि तिला कर्क रोगाने गाठलं घरात मुलीचं आणि पुतणीचं लागोपाठ लग्न होती..त्या गडबडीत सुरुवातीला जरा दुर्लक्ष झालं आणि ती संधी या दुर्धर रोगाने पकडली...
सांगायचं म्हणजे जसा रोग बळावला , जशी तिची तब्येत खंगत गेली, तशी भर गुंगीत ती बिनधास्तपणे  फक्त आपल्या प्रियकराबद्दलच बोलत राहयची.. कधी कधी तिची तार जुळली तर नाही नाही ते त्यांच्या प्रणयाचे तपशील तिला आठवत राहयचे. तेंव्हा तिचा स्वर तिची मुद्रा सगळं बदलून जायचं
. भारी हौशी आणि प्रेमळ होता तिचा प्रियकर..त्याला पाऊस आवडायचा, भरून आलेलं आभाळ आवडायचं,असं आभाळ भरून आलं की तो तिला घरी बसूच द्यायचा नाही..तिचा हात धरून कडेकपारी फिरायचा, किशोर कुमारची एकसे एक गाणी शीळ वाजवून गायचा, नाटकात काम करायचा,वाद्यवृंदात निवेदना सहं मिमिक्री  करायचा , आणि त्याला सतत ती सोबत लागायची,
जादूच्या गालीच्या.वरून फिरावं तसे दोघे त्या दिवसात तरंगले होते.. ते सगळं ऐकताना नवर्‍याची उगीच पंचायीत व्हायची... तो आक्षेप घ्यायचा नाही पण तरी जरा अवघडायचा,.. आमच्या लक्षात यायचं वय नव्हतं पण ती फार बोलायला लागली तर तिची जाऊ आम्हा लहान मुलाना बाहेर पिटाळायची आणि म्हणे तिला कसलं तरी चाटण चाटवायची, ्ते चाटण चाटलं की म्हणे दोन मिनिटात ती ग्लानीत जायची मग तिला सारखा संथपणे पाझरणारा प्राजक्त आठवायचातो सुद्धा त्यानेच आणलेला...तिचं बोलणं मंद मंद व्हायचं श्वास मंद व्हायचे भोवती एक सन्नाटा पसरायचा...
.. तिच्या नवर्‍याला तिचं असं ग्लानीत जाऊन निपचीत होणं आवडायचं नाही म्हणायचा बोलूदे तिला बोलत राहुदे.. जे खरं आयुष्य जगली ते ती सांगतेय.
. इथे आल्यावर काय., सगळच बदललं. एकत्र कुटूंब, चारजण मावू शकतील अशा घरात अकरा जण राहिले मोठी जाऊ तिसर्‍यांदा गरोदर असताना मोठा दिर परागंदा झाला. त्याला शोधण्यात आणि जावेची समजूत काढण्यात यांचे नव्यानवलाईचे दिवस कामी आले., दोन मुली झाल्या पण त्यातही कोडकौतूक जपूनच. तिला काय हवं काय नको विचारायला उसंतच मिळाली नाही समजुतदार असण्याचे सुद्धा तोटे असतात.. कधी कधी फायद्या पेक्षा तोटेच जास्त,

 मीराताईचं तसच झालं.. आयुष्यभर कसली तक्रार केली नाही.. आता जरा उसंत मिळू शकत होती तर या आजाराने गाठलं पाझरणारे प्राजक्त आठवतील नाहीतर काय..
तिच्या नवर्‍याने सुद्धा सुद्धा खूप सोसलं एकतर भाऊ परागंदा झाल्यावर घरची जबाबदारी येऊन पडली, घरचं वातावरण मुळात कर्मठ त्यात भाऊ नाहीसा झाल्यावर तर आणीकच स्तोम वाढलं त्यात नवनाथाची कसली परात का काय त्याला उचलावी लागली,.. ., बदली नको म्हणून प्रमोशन नाकारत राहिला नव्या जागेचे पैसे भरले होते ती स्वप्नांसकट सोडावी लागली एकामागे एक तो जखडतच गेला
... आता मीराताईच्या क्षीण आवाजात तिच्या प्रियकराचा तपशील ऐकताना कॊणाला अंदाजच येणार नाही की मीराताईचं तिच्या प्रियकराशीच लग्न झालं होतं .

Comments

  1. superb....aturata lagun asate tumchya navin kathechi..ek vachun zali ki vatata ata pudhchi kevha..atishay sundar lihita..agadi sahajata asate tyat..

    ReplyDelete
  2. Everyday I do wait for your new article. All are amazing. Just one suggestion- Is it possible to put all articles in list in the blog so if we want to go n read any old article, we do not have to go through all?

    ReplyDelete
    Replies
    1. If you see on a left hand side pane, all articles are well organized in a list manner monthwise. if you click on that you will get a list.

      Delete
    2. Oh, thanks! It will help me as I like to read few stories again n again :)

      Delete
  3. ग्रेट मामा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी