कुरघोडी

नाट्यमधुरा  या  हौशी कलाकारांच्या संस्थेचा तेंव्हा नाट्यरसीकात बर्‍यापैकी दबदबा होता
आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून  दहा पंधरा बाशींदे या संस्थेची धुरा सांभाळत होते
प्रत्येक नाट्य्स्पर्धेत भाग घेत होते
मधुरा गोरणकर ही या संस्थेची एकमेव नायिका होती
तिच्या अभिनय सामर्थ्याला बघून अनेक लेखकाना लिहिण्याची स्फुर्ती मिळत होती
मधुरा दिसायला सूंदर होतीच पण मुळात हुशार होती त्यात अखंड वाचानाने प्रगल्भ झाली होती ती प्रगल्भता तिच्या अभिनयात दिसायची
अनेक जण तिच्या मागे होते, काहीजण आग्रही होते तर काहीजण हळवे होते
पण ती स्थीर होती
कारण तिच्यावर घरची जबाबदारी होती म्हातारे आईवडील आणि मोठा जरासा अशक्त भाऊ
फार लहान वयात ती नोकरीला लागली, त्या काळात नाटकात नाव झालं तरी तशी सुरक्षीतता नव्हती आणि म्हणून  अनेक आँफर्स येऊनही ती व्यावसायीक नाटकाकडे वळली नव्हती
एकविसाव्या वर्षी  ती जे आयुष्य जगत होती त्याची अत्ताच्या फुलपाखरी आयुष्य जगणार्‍या मुली विचारही करू शकणार  नाहीत
नाट्यमधुरा हे संस्थेचं नाव सगळ्यानी तिच्यावरच्या प्रेमाखातरच संस्थेला दिलं होतं ती नसेल तर संस्थेचं काही होऊ शकत नाही अशीच सगळ्यांची  धारणा होती
आणि मग अल्पावधीत हा मान मिळवला तो औरंगाबादेहून आलेल्या संपत भामरेनी
तडफदार आणि कमालीचा आत्मविश्वास असलेल्या या तरुणाने पहिली एकांकिका दिगदर्शीत केली आणि नाट्यमधुराला सगळी च्या सगळी बक्षीसं मिळवून दिली सगळे त्याचा झपाटा बघून भारावले आणि तो भारावला मधूराच्या अभिनयाने, एकूणच व्यक्तिमत्वाने
मधुरा सुद्धा काहीशी विरघळली होती झुकली होती त्याच्या बाजूने , आणि ते साहजिक होतं
संपतला एक आई सोडली तर बाकी पाश नव्हता , कौटूंबीक वातावरणापासून तो कोसो दूर होता
आई असून तो समाजाच्या आश्रमात वाढला पदवीधर झाला आणि मग काही दिवस विचार करण्यात आईला समजवण्यात घालवून तो तडक मुंबईला आला
त्याला  याच क्षेत्रात नाव कमवायचं होतं आणि त्यासाठी तो केपेबलही होता
त्यात नाट्यमधुरा सारखी नामांकीत संस्था हाताशी आल्यावर तर त्याला एक भक्कम बेस मिळाला आणि त्यात  मधुरा गोरणकर सारख्या समंजस अभिनेत्रीची साथ
दोघं एकमेकासोबत खुश असायचे , रमायचे एकमेका सोबत , तो त्याचे सगळे मनसुबे तिला सांगायचा आणि त्यावर ती स्वप्न रंगवायची , नाही नाही म्हणता तो तिचच ऐकायचा
सध्या तो एका लाँजवर राहत होता ते ही तिघांबरोबर रूम शेअर करून
एक वेळचं जेवण मधुरा घेऊन येत होती, वर खर्चालाही मधुराच पैसे देत होती , तो ही तिच्या घरच्या कामात तिला मदत करत होता तिच्या घरी त्याचं  येणं जाणं वाढलं होतं पण तरी त्याला एक मर्यादा होती कारण मधुराच्या वडिलाना तो इतका पसंत नव्हता
पण  मधुराच्या दादाला तो अगदी मान्य होता लग्नाची घाई करू नका पण याला जोडीदार म्हणून निवडायला हरकत नाही असं दादा म्हणायचा
मधुराचे वडील मात्र म्हणायचे पाण्यात पडला म्हणून भिजेलच असं नाही , कुरघोडी करणारा दिसतो
खूप हुशार आणि धुर्त आहे हा, अशा माणसावर  पूर्ण विश्वास टाकू शकत  नाही
मधुराचे बाबा आपल्या बद्दल काय विचार करतात याची संपतला पूर्ण कल्पना होती तरी तो ते खेळीमेळीने घ्यायचा तालमीच्या वेळी  कधी कधी मधुराला त्यावरून चिडवायचा कधी ती रुसायची कधी हसायची पण त्यामुळे तालमीना एक वेगळाच रंग चढायचा
त्या तीन वर्षात संस्थेला अगदी चार चाँद लागले संस्थेचं नाव झालच पण संपतला वेगळी ओळख मिळाली
मधुराचा दबदबा होताच पण संपतने जाहीर कौतूक केल्याने एक मान्यता मिळाली
संपतला पहिलं व्यावसायीक नाटक मिळालं त्याने  संस्थेतल्या दोन कलाकाराना उचललं आणि त्याचा नाट्यमधुरा मधला भाव वधारला त्याने मधुराला सुद्धा नायिकेच्या रोलसाठी खूप आग्रह केला पण ती नाहीच म्हणाली आणि हा ही आतून सुखावला आता तो आपला हक्क तिच्यावर समजायला लागला होता आणि आपल्या बायकोने  व्यावसायीक  रंगभूमीवर  येणं त्याला मान्य नव्हतं
आताच मधुराला बायको समजणं घाईचं होतं कारण लग्नाचा विषय काढायचा तर किमान राहण्यासाठी  एक खोली अपेक्षीत होती, घरखर्च चालवण्याइतकी कमाई हवी होती
त्याने दिगदर्शीत केलेलं नाटक तुफान सुरू होतं पण आता सातत्याने काम करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ हवा होता  थोडी मुभा हवी होती
ती मुभा मधुरा देऊ शकत होती, एक तर ती भारावलेली होती आणि कमावती होती
आणि मुख्य म्हणजे आँफीसतर्फे तिला क्वार्टर्स मिळू शकत होती
मग  त्याने नाट्यमधुराच्या ग्रूप समोरच तिला मागणी घातली,वर मानभावीपणाने घराची व्यवस्था करून मग लग्न करू असा आव त्याने आणला उतावीळ मित्रानी लगेच मधुरा समोर क्वार्टर्स मिळवायचा पर्याय ठेवला त्यातल्या एकाचे सासरे  मधुराला सहज  मदत करू शकत होते , क्षणात सगळे प्रश्न सुटल्या सारखे त्याला वाटायला लागले त्याचा आत्मविश्वास  फुरफुरायला लागला सगळं मिळवलं असं त्याला वाटायला लागलं मिळवलं यात आपली मधुराही आली त्याच  दिवासात त्याला एक दैनीक मालिकाही दिगदर्शनासाठी मिळत होती आणि त्या संदर्भात त्याच्या  मिटींग्जही सुरू झाल्या होत्या, काहीतरी क्रियेटीव्ह काम करायचय अशी घोकणी लावणारा हा माणूस काळाची गरज म्हणून पाट्या टाकायलाही  तयार झाला
आता त्याला आयुष्यात सेट व्हायची घाई  झाली होती
मग आईला भेटवायला मधुराला घरी न्यायची त्याला कल्पना सुचली  , पण तिला एकटीलाच कसं नेणार? म्हणून तिच्या मोठया भावाला आणि ग्रूप मधल्या एक दोघाना त्यानी बरोबर चलायचा आग्रहं केला
तरी मधुराचे वडील म्हणाले दादाला नका नेऊ त्याला तिथली थंडी सहन होणार नाही , आधीच त्याला कफाचा त्रास आहे पण उत्साहाच्या भरात मी सगळी काळजी घेईन म्हणत तो सगळ्याना घेऊन दरडीला म्हणजे आपल्या गावाला घेऊन गेला
ओसाड माळरानावर वसलेलं एक छोटसं गाव त्यात त्याचं छोटसं चित्रात शोभेल असं घर, थकलेली प्रेमळ मायाळू आई, चार  म्हशी  चार शेळ्या असलेला  गोठा, सगळच वेगळं
पण थंडी? अ  ब ब ब sss
चोवीस तास शेकोटी पेटवून ठेवावी लागायची ,  चार  तासात मधुराच्या दादाला त्रास सुरू झाला घरगुती उपाय करण्यात एक रात्र एक दिवस गेला आणि मधुराला दादाची लक्षणं काही नीट दिसत नव्हती शेवटी तिने दादाला परत न्यायची व्यवस्था करायला लावली आणि दोन तीन दिवस राहयच्या हिशोबाने आलेली मंडळी लगेच परतली तो मनातून जरा  वैतागला पण शिताफीने त्याने ते दाखवलं नाही
शेवटी औरंगाबादेस्च दादाला अँडमीट करण्यात आलं पेशंटला मुंबईला हालवा मुंबईला  हालवा  म्हणताना  दादानेच आपला  मुक्काम हालवला
आणि दादाचा निष्प्राण देहं घरी घेऊन येण्याची पाळी आली
क्षणात सगळं  उधळलं, रीत म्हणून तो देहाने तिच्या जवळ बसला पण मनाने कधीच तो पाखरा सारखा भुरर्कन उडून गेला होता
आणि उडून गेलेल्या पाखराला काय दाही दिशा मोकळ्या
संपतचही तसच झालं मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आणि तो संस्थेकडे फिरकेनासा झाला , तिला भेटला तरी तो स्वत:च्याच व्यापात गढलेला असायचा, तिलाही हे जाणवण्या  इअतका वेळ नव्हता फुर्सत नव्हती
श्रावणबाळाचे आई वडील शाप देऊन तरी मोकळे झाले  ती ताकदही या आईबापात उरली नव्हती, मधुरासाठी ते मुक्याने  अश्रू पीत राहिले
आणि संपत एकावर एक यशाचे प्याले रिचवत होता, मधुराला वास्तव जाणवायला लागलं ती काही खुळी नव्हती प्रेमात खुळावली होती पण आता ती  सावध झाली ती अजिबात गळ्यात पडायला गेली नाही
तरी तिला एक धक्का पचवणं जड गेलं
या कुणालाही कल्पना नं देता संपतने आपल्या निर्मात्याच्या मुलीशी आपलं लग्न जमवलं
आणि मग काय तो असा प्रसिद्धिच्या झोतात आला की जणू नाट्यमधुरा सकट त्याच्या आयुष्यातला तो कालखंड कुठच्याकुठे अंधारात लोटला गेला
मधुरा लोटली गेली म्हणजे हताश झाली आपण वापरले जात होतो आणि हे आपल्या लक्षात आलं नाही या भावनेनं तिला ग्रासलं आणि त्याच्या लग्नाच्या दिवशीच तिने आत्महत्या केली , म्हणजे तसा प्रयत्न केला
ती बाल बाल बचावली पण खूप मोठं नाट्य घडलं
एका वृत्त वाहीनीने मधुराचं हे प्रकरण उचलून धरलं आणि त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळाली
आणि संपतचं लग्न वादग्रस्त ठरलं , तो इतका बनेल आणि नालायक होता की त्यातही मधुराने आपल्यासाठी आत्महत्या केली याचं सूप्त समधानच मिळालं त्याचा इगो सुखावला
त्यानी आपल्या चर्चेत आलेल्या नावाचा असा फायदा  करून घेतला की त्याने या विषयावरच एक फिल्म बनवली आणि असा मेसेज दिला की आत्महत्या करणं किती  कमकुवत पणाचं लक्षण आहे, त्यापेक्षा आयुष्याचं आव्हान किती तरी पटीनं मोठं आहे  वगैरे वगैरे
सत्यकथेवर आधारीत म्हणत त्याने आपली सफाई दिली आपण कसे इनोसंट हे सांगितलं
मधुराला मिळालेली प्रसिद्धीही तिने वाया घालवली नाही ती मालिकांकडे वळली तिने नोकरी सोडली दिमाखात मालिकां मधे दिसायला लागली , ती सूंदर होतीच पण आता एक श्रीमंतीची नजाकत तिच्यावर दिसायला लागली  माझा आत्महत्येचा प्रयत्न हा एक अविचार होता असं म्हणत म्हणत ती छोट्याशा घरातून
सोळाव्या मजल्यावर टुमदार फ्लँट मधे राहयला गेली
याला तिच्या प्रगतीचा आलेख बघून खद्खदायला होत होतं
नाट्यमधुराचीही चुणूक अधून मधून दिसतच होती
आणि  अशावेळेस एका मान्यवर  संस्थेने एक आशयघन लघुपटाची  स्पर्धा आयोजीत केली
आणि संपतला आपली एक जुनी राखून  ठेवलेली संहिता आठवली, त्या  प्लाँटवर त्याने मधुराशी घंटो चर्चा केली होती महत्वाचे मुद्दे मांडताना वाद घातले होते नायिकेच्या रुपात त्याला मधुराच दिसत होती
आता इतक्या वर्षानी अचानक तो प्लाँट आठवल्यावर तो जरा संभ्रमीत झाला होता
त्यामुळे डीटेल त्याला काही संदर्भ लागत नव्हते
शिवाय मधुराशी संवाद  साधायची त्याला नामी संधी वाटत होती
त्याने मनापासून तरी अभिनयासाहीत तिला फोन केला इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट विषयाला हात घातला, आणि त्या  कथेविषयी विचारलं नायिकेची भूमिका तुझ्या शिवाय कोणी करणार नाही अशी हमी देत कथा कशासाठी हवी आहे हे सांगितलं
मधुरा नम्रपणे म्हणाली चर्चा आठवतेय पण बाकी इतकं काही लक्षात नाही
आणि  आयुष्य बदललं साँरी घर बदललं तेंव्हा बर्‍याच गोष्टी जुन्या घरीच राहून गेल्या त्यामुळे माझ्या हातात काही नाही
तो खूप हळहळला , त्याने परत तो  प्लाँट आठवून आठवून मांडायचा प्रयत्न केला
पण छे जमेचना
मग सासर्‍याने सुचवलेला विषय घेऊन त्याने  स्पर्धेत भाग घेतला
नाट्यामधुरा सुद्धा काहीतरी प्रोजेक्ट करतेय हे ऐकून त्याला हसायला आलं , मानभावीपणाने त्याने फोन करून शुभेछ्चा दिल्या आणि दिगदर्शन मधुरा स्वत:करतेय हे ऐकल्यावर  तो आचंबीत झाला
अनेक लघुपट आले पण त्यात शाँर्ट लिस्ट मधे मोजकेच लघुपट निवडले गेले त्यातही नाट्यमधुराचं नाव होतं
आणि निवडलेल्या  लघुपटांच जेंव्हा स्पर्धकांसाठी सादरीकरण झालं तेंव्हा संपत पांढारा फटक आण संतापाने लालेलाल  झाला , तोंड दाबून बुक्क्याचा मार तो सोसत होता
मधुराने त्याच प्लाँटवर जुजबी बदल करून तो  लघुपट बनवला होता यलो मून सारखी नामांकीत निर्मीती संस्था तिच्या पाठीशी असल्याने तिला व्यवस्थीत तो विषय मांडता आला अभिनयाचा मोह टाळून तिने  नाट्यमधुराच्या उदयोन्मुख मुलीला नायिका म्हणून पुढे आणली होती
आनि नियतीने कौल द्यावा तसा स्पर्धेचा निकाल लागला आणि प्रथम पारितोषीक नाट्यमधुराला मिळालं अभिनयाचं सर्वोत्कृष्ट बक्षीस त्या मुलीला मिळालं महत्वाची सगळी बक्षीसं मधुराने आपल्याकडे घेतली
आणि संपतला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावं लागलं
तो आपल्याला  गाठणार याची मधुराला कल्पनाच होती आणि त्याप्रमाणे संतापाने फणफणत त्याने मधुराला गाठलच  जे बोलायचं ते तो बोललाच
पण जे तिने ऐकवलं ते तर फारच भयंकर होतं
ती म्हणाली तुझे सगळे आरोप मला मान्य आहेत, अरे पण तुला फसवण्याला खूप आधीपासून सुरुवात झाली
तो गोंधळला
ती म्हणाली तुझ्या लग्नाच्या वेळी मी अत्महत्या केल्याची जी वावडी उठवली  ते नीट जमवून आणलेलं नाटक होतं  त्या वृत्त संस्थेला महिनाभर हँमर करता येईल असं नाट्य हवं होतं कबीर माझा जुना मित्र त्याला तुझ्या बाहेरच्या कारवायांबद्दल माहीती होती त्यामुळे त्यानी सांगितल्याप्रमाणे मी करत गेले
त्याबद्दल्च मला हा सोळाव्या मजल्यावरचा फ्लँट एक पैसा न खर्च करता मिळाला
प्रसिद्धी मुळे माझा चेहरा लोकांसमोर आला आणि मालिकांचं क्षेत्र  मला खुलं झालं
आणि तुझा या संहिते साठी फोन आला नसता तर मी या वाटेलाही गेले नसते पण आता प्रथम पारितोषीक मिळवून मी माझा बदला पूर्ण केला
 आता माझ्यावर कुरघोडी करायला  जाऊ नकोस
कारण जे आपल्यात घडलं त्यावर मी चित्रपट करतेय नेहेले पर देहला
संहिता रजिस्टर झाली आहे  यलो मूनच निर्माते आहेत  दिगदर्शन अर्थात मीच करतेय
प्रेक्षकाचं काम तू कर






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी