कोडगा
"कोडगा" या शब्दाला समानार्थी शब्द खूप असतील, आहेतच! पण मुळात या शब्दाचा जो अर्थ आहे तो भयंकर आहे ज्याला कोडगं म्हंटलं जातं त्याला एका अर्थी वाळीतच टाकलं जातं , ज्याने हे अनुभवलं असेल त्याला मी काय म्हणतोय ते बरोबर कळेल आणि ज्यानी हे अनुभवलं नसेल तो माझ्यामते खरा भाग्यवान रामाच्या कृपेनं असं भाग्य जन्माला येणार्या प्रत्येकाला मिळो, पण तसं होत नाही निदान या आपल्या कथेच्या नायकाच्या नशिबी तरी हे भाग्य नव्हतं भालू दामोदर दरडे, वय वर्ष बत्तीस भावंडात शेंडेफळ दिसायला देखणा, उंचा पुरा, सावळा पिळदार अंगाचा मोठी पाच भावंड तीन बहिणी दोन भाऊ, सगळे विवाहीत संसाराला लागलेले याचा संसाराचा प्रश्नच नव्हता कारण कमावता नाही तर लग्न कसं होणार? बारावी पास त्यानंतर शिक्षण झेपेचना, वडील निवृत्त झाले भावानी हात वर केले, बहिणी काय बोलून चालून सासुरवाशीणी तरी बहिणींचा तसा जिव तुटायचा, मधल्या भावोजींचा तर भालूवर जिवच होता तसा एका वहिनीचाही जिव होता त्याच्यावर,जिव होता की डोळा? पण भालू मुळात वृत्तीने सज्जन, तिने किती इशारे केले तरी हा कानाडोळा करायचा जपून राह्यचा आणि भालूचा एकटेपणा समजून...