Posts

Showing posts from August, 2018

गुंता

 एक मस्तवाल  व्याभिचारी इसम होता! गोष्टीची सुरुवात कशी वाटते ना? पण ही गोष्ट त्याच्यामुळेच सुरू झाली, व्याभिचारी असण्यावर त्याला फार मिजास वाटायची, त्याचं व्यक्तिमत्व होतही तसच , जरा सैलावलेली कोणीही बाई त्याला भुलायची पण अशा नवर्‍याची बायको महा खमकी, एखादी असती तर सोडून गेली असती पण ही म्हणायची "याला मनमानी करायला सोडू? मग तर काय ह वळू जिथे तिथे तोंड मारेल, त्याची तर काय मज्जाच मग म्हणून त्याला न सोडता ती कायम त्याच्या पाळतीवर असायची. त्या एरियात ही जोडी फेमस होती त्याच्या बायकोला वैनी हाक मारणारे खूप होते. आणि याची खबर पुरवणारेही खूप होते. हा मस्तवाल असला तरी बायकोला वचकून असायचा कारण तिचे पप्पा आणि मोठा भाऊ पोलिसात होते एक रात्र कस्टडीत त्यानी घालवली होती, फटके खाल्ले होते त्यामुळे आपण सुधारल्याची नाटकं त्याला वारंवार करावी ्लागायची पण कुत्र्याचं शेपूट, सरळ होऊन होऊन किती होणार?त्याने आपला एरिया सोडून इतरत्र आपली नजर फिरवायला सुरुवात केली मग तसा त्याचा वावरही त्या त्या एरियात वाढायला लागला बायको पाळतीवर होतीच ती चुकीची का बरोबर? हा प्रश्न वेगळाकारण इरीस पडल्यावर  ...

उपवर

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धतच होती तेंव्हा, उपवर मुलींचे खास लग्नासाठी दाखवण्यासाठी म्हणून फोटो काढले जायचे, आणि यात माझा मित्र अगदी माहीर झाला होता त्यामुळे अनेकजणींचे फोटॊ त्याने काढले होते आणि अनेकींची लग्न जमली होती पण आज आलेल्या मुलीची गोष्ट्च वेगळी होती तिच्याकडे पाहिलं तर काहीच खास नव्हतं आणि पहात राहीलं तर खरच खूप काही खास होतं , खास करून तिचा बांधा आणि खोबणीत बसवल्या सारखे रेखीव डोळे, ज्यात वेदनेशिवाय काही नव्हतं , केस पातळ पण सिल्की सरळ , मधे भांग आणि शेवटपर्यंत वेणी वळायची जुनी पद्धत त्यात चांदीची नक्षीदार क्लीप तिच्या बरोबर तिचे तीन मोठे भाऊ आणि आई आली होती. भाऊ सांगत होते "चाहे तो सो रुप्पैय्या जादा लो पर इसे गोरा दिखाओ" हे सांगणारे स्वत: काळे मिचकुट होते, पण ते पुरुष होते. निव्वळ हिच्यामुळे त्यांचं लग्न आडत होतं आई म्हणत होती" जब देखो रोनी सुरत लेकर बैठती हैं" जबतक ठीक से हसेगी नही तब तक फोटॊ मत निकालना बागेत सापडलेलं पोपटाचं बाव...

उपजत

एक गाव आहे तिथे म्हणे बहुतेक घरात सगळी जुळीच जन्माला येतात. तिथे जुळ्याचं अप्रूपच नाही तसं महाजन नगरात सगळी बैठी घरं जुळी .दोन घराना मिळून चारही बाजूनी सलग ऐसपैस चौथरा आणि चौथर्‍यावर चढायला चार चार पायर्‍या मधोमध दोन जुळी दारं , एका रेषेत चार खोल्या शेवटी स्वैपाक घर स्वैपाकघराला देखील दारं अगदी दोन्ही घरं जरी कुणाच्या मालकीची असली तरी बाह्य आकार बदलायची परवांगी नाही पण दोन्ही घरं मालकिची असणारे फार क्वचीत बाकी सगळे सर्वसामान्य आपला संसार एका घरात मांडणारे. बहुतेक घरात दृष्ट लागेल असा घरोबा महाजन नगरात एकमेकाना घराच्या नंबरवरून ओळाखायची पद्धत, आज सी टू वाल्यांकडे पुजा आहे डी फोर वाल्यांच्या मुलीचं लग्न ठरलं , अशी साधारण बोलायची पद्धत. पण त्यात जास्त उठून दिसायचा  तो बी नाईन मधला घरोबा यशोदा आणि रघुवीर पोळ आणि श्यामला आणि दिगंबर राव या घराचा घरोबा घरोबा म्हणजे घनीष्ट मैत्री शनिवार रविवार बहुतेक घरात सुट्टी असायची तर समस्त महाजन नगराचं  बी नाईन वर लक्ष असायचं , हा वीकएंड दोन्ही घरं कसा साजरा करतायत? फक्त वीकएंडच नाही तर  प्रत्येक सण उत्सव अगदी विनाकारण होणारा आनंद सुद्धा बी ...