परंपरा
आमची शालमली आहे ना , तिच्या सासरी पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे
मुलगी मोठी झाली की तिला एकटीला दिवा घेऊन चैत्र गौरीला गाव देवीच्या देवळात पाठवतात ते ही तिन्हिसांजेला
आता ही त्या काळातली गावा गावात रुढ झालेली परंपरा
त्यावेळी मुलगी मोठी होण्याचा अर्थही वेगळा होता , वातावरणही त्याला पोषक होतं
गावं साधी त्याहून तिथली माणसं साधी
तिन्हिसांजेला कोणी मुलगी एकटी नटून थटून दिवा घेऊन देवळाकडे निघाली की सगळ्याना समजायचं अमूक अमूक मुलगी उपवर झाली , मग कोणाचे कान टवकारायचे तर कोणाचे डोळे बारीक व्हायचे
विचारणा व्हायची मग दर मौसमात चार दोन कार्य ठरायची
त्याकाळी पंचक्रोशीतच स्थळं बघायची पद्धत, एकमेकाचं एकमेकाला माहीत असायचं
कुणाकडे पूर्वापार चालत आलेलं वेड आहे, कुणी दाखवत असलं तरी प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती कशी आहे
कुणाचा मुलगा काय करतो आणि मुलगी गुणाने कशी आहे
त्यामुळे पूर्वापार परंपरा असली , दरवर्षी नेमाने होत असली तरी त्यातला नवेपणा कायम ताजा
पण आता काळ बदलला विचार बदलले थोडक्यात माणसं बदलली
पण मनातली श्रद्धा आहे ती नाही बदलत , खास करून आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत तर नाहीच नाही
मग त्यात भिती असते ,कौतूक असतं अगदी आपलं कल्चर आपण जपलच पाहिजे असा आपल्याला झेपेल असा अट्टाहास ही असतो
आपण पाळलं तर पुढच्या पिढीला कळेल ना असं मग दहा वेळा घोकलं जातं
आता शालमलीला दोन्ही मुलीच मोठीचं बरं होतं लकीली गावाला असतानाच जावेच्या मुलीबरोबर दीपदान उरकलं गेलं
पण धाकटी अडकली
गेली दोन वर्ष तिची चुटपुट ऐकतोय विशीची झाली विशीची झाली तरी अजून हिचं दीपदान राहिलय
आम्ही म्हणायचो अग इथे कुठे तुझ्या गावदेवीचं देऊळ असणार ?
त्यावर शालमलीचं ठरलेलं उत्तर सायनला कुठेतरी आहे आमच्या देवीचं देऊळ, उल्हासला कितिदा सांगते येता जाता बघून या पण हे अजून जातायत
अगं पण परंपरा देवळात एकटीने पाठवायची आहे ना ? ते ही दिवा घेऊन ?
तू एकटीला पाठवशील सायनला ?
मग ती गप्प
त्यापेक्षा उल्हासला चार दिवस सुट्टी घ्यायला सांग, गावची छोटीशी ट्रीप आखा आणि जाऊन या
सगळं मनासारखं होईल
हे जमण्या सारखं नव्हतं , इथले व्याप असे की मधेच चार दिवस उठून जायचं म्हणजे ..
पण मग त्यावर एक उपाय मिळाला इराणी वाडीच्या डावीकडे योगेश्वरी देवीचं जुनं देऊळ होतं , शालमली म्हणाली तिथे जमेल
इराणी वाडी पर्यंत मी जाईन तिच्या बरोबर. तीन तर गल्ल्या आहेत, मी थांबेन तिथे तिला सांगेन पुढे तू एकटी देवळात जा दिवा ठेव, दक्षीणा ठेव , प्रदक्षीणा घाल आणि प्रार्थना कर शंकरासारखा भोळा पती मिळुदे
आमच्या शालमलीने सुद्धा अशीच प्रार्थना केली असणार,म्हणून तिची प्रार्थना अगदी फळास आली,
भले तो तिचं काही ऐकत नसेल पण उल्हास शालमलीवर एकूणच घरावर आपल्या मुलींवर किती प्रेम करतो हे आम्हा सगळ्याना माहीत होतं
मग तिने आपला बेत उल्हासला सांगितला त्याने लगेच मान्यता दिली कारण त्यात त्याला काही करायचच नव्हतं
शालमली तिला नेणार होती आणि आणणार होती
मग सगळी जय्यत तयारी झाली, रेशमी गडद हिरव्या रंगाचं जरा लेटेस्ट फँशनचं परकर पोलकं शिवलं ,त्याला मँचींग कानातलं गळ्यातलं एकूण सगळं अधुनीक तरी पारंपारीक
पण तरी छान बाहुली सारखी तयार झाल्यावर शालमली तिला दाखवायला आमच्याकडे घेऊन आली, त्या आधी बाबाला फोटॊ पाठवून झाले,कारण तो चेन्नईला होता
खरच ती परी सारखी दिसत होती, हे उमलणं जे म्हणतो ना त्याची प्रक्रिया सुरू झाली होती
आम्ही मनापासून तिला आशीर्वाद दिले उमाने विपूसाठी घेतलेले पैंजण त्या दिवशी तिला देऊन टाकले
अगं मग विपूला?
तिला आणते नंतर ही उत्साहात म्हणाली
तिनेही उत्साहात पैंजण पायात चढवले मग काय तिच्या पावला बरोबर छूम छूम सुरू झाली
त्या छूम छूमचा नाद घेऊन दोघी गेल्या
आम्हीपण सोबत जायला हवं होतं असं तेंव्हा वाटलं जेंव्हा शालमलीचा घाबरून फोन आला मुन्नी दिसत नाहीये तिन्हिसांज उलटून रात्र झाली होती आम्ही दोघे इराणी वाडी कडे धवलो
शालमली रडत म्हणाली हे बघ मी इथे उभी राहिले आणि तिला म्हणाले या गल्लीतून जा पटांगणात डावीकडे देऊळ आहे दिवा ठेव प्रदक्षिणा घाल प्रार्थना कर आणि परत ये
देवळात जाऊन बघुया का? मी अधिरतेने म्हणालो
बघून आले, ती म्हणाली, दिवा आहे पुजारी म्हणाले एक मुलगी येऊन गेली पण कुठे गेली कळलं नाही
मी म्हणालो उल्हासला इतक्यात कळवू नकोस, एकतर तो परगावी आहे त्यात एकटा तुझ्यापेक्षा तोच पँनीक होईल
इथेच असेल , गल्ली मुळे कनफ्युज झाली असेल
इराणी वाडी काही आमचा एरिया नव्हता आणि ही हल्लीची मुलं कारणाशिवाय कुठे फिरत नाहीत
मग घरी शेजार्याना कळवलं इनकेस ती घरी आली तर लगेच फोन करून कळवा
कसं शोधायचं हा प्रश्न होता
ही बया ग्राऊंडच्या गेट मधून बाहेर पडायला चुकली तीन नंबरच्या गेटमधून बाहेर पडायचं तर दोन नंबरच्या गेटमधून बाहेर पडली , एक सारखी दुसरी गल्ली फरक लक्षात यायला तिला वेळ लागला त्यात ती बर्याच पुढे आली होती घाबरली होती त्यात फोन जवळ नाही
ती रडायलाच लागली
दोन वयस्कर बायका रिक्षेतून जात होत्या, इथे कुणाला कुणाकडे बघायला वेळ आहे त्यात इराणी वाडीतला अंधारा एरिया पण त्या बायकांचं लक्ष गेलं त्यानी रिक्षा थांबवली मायेनं तिला जवळ घेतलं म्हणाल्या आम्ही इथेच समोर राहतो तू घरी चल मग आपण तुझ्या आईला फोन करू ती तुला लगेच न्यायला येईल
ही म्हणाली मी रिक्षा घेऊन जाते पण तो रिक्षेवाला आठ नंबरला यायला तयार होईना त्याला त्याच्या मुलाना क्लासवरून आणायला जायचं होतं सगळच त्रांगडं
शेवटी नाईलाजाने ती त्यांच्याबरोबर जायला निघाली
खरच त्या दोघी समोरच्याच इमारतीत दुसर्या मजल्यावर राहत होत्या, ही त्यांच्याबरोबर घरी गेली तर तबल्याचे आवाज येत होते, घर छान होतं प्राशस्त
त्या बाईनी एका मुलीला हाक मारली तिला पाणी द्यायला सांगितलं , चहा ठेवायला सांगितला
आणि हिला म्हणाले तू फोन करून घे तिने फोन उचलला तर फोन बंद
ती कामवाली मुलगी म्हणाली कब से फोन बंद है दिदि
दुसरी मुलगी चहा घेऊन आली ती बाई म्हणाली काही हरकत नाही, तू चहा घे
माझा मुलगा तुला सोडून येईल घरी आठ नंबरलाच जायचय्ना?
ही सावधगिरी बाळगत म्हणाली मी चहा पित नाही
कधीच नाही?
उत्तरादाखल ती मानेनं नाही म्हणाली
मग काँफी घेणार का ?
उत्तरादाखल ती उठलीच म्हणाली मी जाईन घरी, काँर्नरला रिक्षा मिळेल
ती बाई हट्टाला पेटल्या सारखी उठली आणि तिला आडवत म्हणाली काहीतरी घेतल्याशिवाय तुला आम्ही जाऊ देणार नाही , ही घाबरली तरी निकरानं उभी राहिली तरी रडकुंडीला आल्याचं ती लपवू शकली नाही
दुसरी बाई मायेनं म्हणाली तुला जायचं असेल तर जा
पण आम्ही आग्रह करतोय कारण चैत्र गौरीच्या दिवसात कुमारी घरी आली तर तिला फुल पान देऊन पाठवायची परंपरा आहे आमची आणि तू म्हणजे साक्षात चैत्र गौरच आहेस
मग ही धीर करून म्हणाली मी पण इथे चैत्र गौरीचं दीपदान करायलाच आले होते
एकटीने यायचं म्हणून आई इराणी वाडीशी उभी राहिली आणि मला पाठवलं पुढे
म्हणजे तुम्ही सांबरखेड्याचे का? दोघी उस्फुर्तपणे ओरडल्या, परकर पोलकं बघितलं तेंव्हाच आम्हाला वाटलं
ती रीलँक्स होत म्हणाली "हो हो आम्ही सांबरखेड्याचे
मग कोण कोणाची विचारल्यावर शालमली उल्हासचं नाव निघालं तशी हसत ती बाई म्हणाली अगं मी तुझ्या आईची शिक्षिका होते अभ्यास करण्यावरून आई कधी ओरडली तर मला फोन लाव मी तिला आठवण करून देते, आईच्या आठवणीने मात्र ती परत कासावीस झाली
मग दोघीनी पटापट वाण देण्याची तयारी केली, तिला गजरा दिला तिच्या हाताला चंदन लावलं परफ्युमची बाटली दिली
दोघी पाया पडल्या
आणि त्या बाईनी आपल्या मुलाला हाक मारली त्याचा तबल्याचा रियाज सुरू होता
रियाज सोडून उठावं लागलं म्हणून तो जरा वैतागला होता
तो तणतणत बाहेर आला आणि हिला बघून थबकला
अन तिनेही त्या स्वप्नील डोळ्यांच्या ऊंच सडपातळ रूंद खांद्याच्या कुरळ्या केसांच्या मुलाला क्षणात न्याहाळून घेतलं
त्या बाईनी त्याला सांगितलं तुझा रियाज राहुदे, जरा हिला सोडून ये घरी
अन तिला म्हणाली तुझ्या आईला मला फोन करायला सांग इथे येऊन आम्हाला सहा वर्ष झाली अजून तुझी आई येतेय मला भेटायला
ती दोघींच्या मनापासून पाया पडली,त्या दोघीनीही मनापासून भरभरून आशीर्वाद दिले त्या मुलाने गजर्याची आठवण केली
कामवालीने तिच्या केसात गजरा माळला
रियाज सोडून मुलगा जायला तयार झाला याचा दोघीना आश्चर्य आणि आनंद झाला
आणि दोघे घरी जायला जोडीने जिना उतरले, कोणजाणे लगेच घरी गेले की नाही
कारण तिचा फक्त त्याच्या फोनवरून शालमलीला फोन आला आई मी घरीच येतेय
घरी आल्यावर बोलू.

baapre.. kahani mein 2 twist.. jabratach
ReplyDeleteWa...!
ReplyDelete