जोशी काका

वीणा मावशी गेल्यापासनं दर रविवारचा नाष्ता करायला जोशी काका आमच्याकडे यायला लागले.
उमा घरी असेल तर बरेचदा दुपारचं जेवण सुद्धा, मग दुपारची झोप्मग संध्याकाळचा चहा झाला की आम्ही फिरायला बाहेर पडायचो,  जोशी काका रात्रीचे जेवायचे नाहीत,मग त्याना घरी सोडून येताना कुल्फीचा कार्यक्रम ठरलेला,  आधी एक कुल्फी, मग एकाने काय होतय म्हणून दुसरी आणि आग्रहाची तिसरी .. सगळं कसं ठरून गेल्यासारखं . त्यात हल्ली सुधारणा म्हणजे पुढच्या रविवारी काय कर हे काका  रविवारी घरी निघताना सांगायचे.... त्यात बरेचदा अप्पे कर हे टुमणं असायचच, आणि अप्पे केले की वीणाच्या हातचे अप्पे  काही औरच हे वाक्य ठरलेलं
पण सध्या ग्रील्ड सँड्विचचा जमाना होता , काय करू विचारलं की ग्रील्ड सँडविच कर हे ठरलेलं
म्हणून  या  म्हनजे मागच्या रविवारी उमाने विचारलच नाही काय करू? न विचरताच दाल ढोकलीचा बेत आखला, दाल ढोकलीला दोनदा उकळी आली पण आज काही जोशी काकांचा पत्ता नाही
तरी आम्ही वाट बघायला सुरुवात केली नाही
होऊ शकतो कधीतरी उशीर , अगदी वक्त के पाबंद असले म्हणून काय झालं ? आपली सत्तरी उलटली हे त्याना मान्य  नसलं म्हणून काय झालं ? घर तसं जवळ असलं म्हणून काय झालं?
तसे वीणा मावशी गेल्यापसनं काका जरा  जास्तच शिस्तीचे भोक्ते झाले, ती कामाला असलेली बाई मावशीच्या हाताखाली तयार झाली होती म्हणून  तिचा निभाव लागला नाहीतर तिने सुद्धा कोपरापासून हात जोडत निरोप घेतला असता..
मग आज काय तिने यायला वेळ लावला की काय?
नं राह्वून शेवटी फोन लावला फोन उचलेनात... एकदा दोनदा
खोटं  कशाला बोलू? त्यांची वाट बघत आम्ही नाश्ता करून घेतला, तेव्हढ्यात  भीत भीत उज्वला आली, ती दर रविवारी आमच्याकडे काकांच्या भितीने दबकतच येते, काकांच्या पाठी काय काय बोलून घेईल म्हतारा फार खट आहे अक्षय कुमार म्हातारा झालाकी असाच दिसेल, त्यांच दुसरं लग्न लाऊन द्या काय डोकं खायचं ते त्या बाईचं खा.. पण काका समोर आले की चडीचूप्प ... मग इकडे बघ कचरा आहे म्हंटलं की निमूट झाडणार
टी पाँय परत पुसायला सांगितला तर परत पुसणार...चपलांचा स्टँड नीट बाजूला करून केर काढणार आणि पून्हा काकांच्या मागे उभं राहून आम्हाला काय काय तोंड करून दाखवणार
मी सुद्धा हेच म्हणतो.. काका काहीतास येतात म्हणून मी सहन करू शकतो कायमचा असा माणूस ्डोक्यावर म्हणजे.. पण तरी काका आता यायलाच पाहिजेत असं वाटायला लागलं उज्वला पण चार वेळा म्हणाली आता परंत यायाला पाहिजे होतं नाही का? आता येऊन मला काय बोलले तर बघा हं ! मी फायनल पोतेरं वाळत घालतेय
शेवटी तिलाच सांगितलं जरा जाताना बघ गं काय करतायत? नाहीतर घरी रद्दी बांधत बसले असायचे आणि आपण इकडे... म्हणत आम्ही हसलो पण त्यात दम नव्हता
मी जाऊन बघून यावं असं उमाला फार वाटत् होतं पण बिचारीची ्जीभ रेटत नव्हती आणि मी ही त्याचाच फायदा घेत होतो
आणि दहा मिनिटात उज्वला धावत आली
काका घरातच आहेत पण दार उघडत नाहीत, बेडरूमचा फँनही चालू आहे
ग्राऊंड फ्लोअरच्या घराचा हा एक फायदा
आम्ही दोघे तसेच  किल्ली घेऊन धावलो... जाऊन धडकन दार उघडायलाही मन धजावेना
आधी शेजारी विचारलं काकाना सकाळपासनं बघितलं का?
ते म्हणाले हो! दूधवाला आला तेंव्हा दार उघडलं होतं त्यानी पण पेपर घेतला नाही आज , तो तसाच दाराला होता म्हणून मी घेतला काढून
दूध घेतलं  मग पेपर का नाही घेतला? मी घाई घाईत दार उघडलं
उज्वला पण होती , बेडरूम मधे धावलो तर फँन चालू होता , थोडा नेहमीपेक्षा पसारा जास्त  दिसत होता
पण काका घरात नव्हते
उज्वलाला जे घरात आहेत असं वाटत होतं त्याला कारण काकानी खुर्चीत ठेवलेलं सामान अशा पद्धतीने ठेवलं होतं की कुणी मान खाली बसून  बसलेलं असावं असच वाटत होतं
काका घरात नाहीत हे बघून हायसच वाटलं पण मग ते गेले कुठे? या प्रश्नाने ग्रासलं फोन घरी ठेऊन का बाहेर पडले असतील?
मग वाटलं ते  आमच्याकडे गेले असतील, घराला कुलूप बघून गोंधळतील
भूक लागली असेल त्याना  म्हणत आम्ही घरी धावलो, वाँचमनला  विचारलं काका आले होते का?
तो नाही म्हणाला
या क्राईम पेट्रोल सारख्या शो मुळेना कोणतीच गोष्ट स्वाभावीक राहिली नाही
 जोशी काकांसारखा धट्टा कट्टा समंजस माणूस , त्याची काळजी करायचं तसं कारण नव्हतं पण मन चिंती ते वैरी नं चिंती म्हणतात  तसं झालं
ते ही या क्राईम पेट्रोल मुळे... अख्खा एपिसोड डोळ्यासमोर उभा राहिला
उगीच नातेवाईकांक्डे जाणारे ते नव्हतेच, आणि वीणा मावशी गेल्यावर ते किती जवळचे आहेत हे त्या प्रत्येकानी दाखवून दिल होतंच
व्हाँट्सअप वर उगाच दोन दोन फँमेली ग्रूप बनवून आणि सकाळ संध्याकाळ गूड माँर्नींग गूड नाईट म्हणजे संवाद नसतो, ते काळजी ही नसते त्यातला फोल पणा या वयातच जाणवतो
काका मुळात समजुतदार त्यामुळे त्यानी ते सहज स्विकारलं  होतं
तरी मग जोशी काका गेले कुठे? दूध घ्यायला होते आणि पेपर घ्यायला नव्हते
म्हणजे इतक्या लवकर  गेले कुठे?
दुपारी मात्र आम्ही शोध मोहीम हाती घ्यायची म्हणून बाहेर पडायच्या तयारीत होतो
जर पोलिसानी  विचारलं तुमचा कुणावर संशय आहे का?  तर काय उत्तर देणार?
आणि पोलिसानी आपल्यावरच संशय घेतला तर या  अशा काल्पनिक प्रश्नाने आम्ही आम्हाला त्रास देत होतो
तेव्हढ्यात फोन वाजला
फोन डाँ. गरोडियांचा होता
बोला डाँक्टर मी संय्यम राखत म्हणालो, गरोडिया म्हणजे जोशी काकांचे  डाँक्टर.. त्यांचा असा आँड टाईमला फोन म्हणजे..
पण कालजीचा काय पन कारन नाय हाय म्हणत डाँक्टारानी बोलायला सुरुवात केली
जोशी काका तुमच्या कडे आहेत का? मी विचारलं
हां हां मी तेच सांगते.. अत्ता काय झाला मी घरला येत होता ने तर राजमहल समोर मी त्यानला पायलं
एकदम सांस फुलून गेली होती मी गाडी बाजूला लावत गेला तर त्यानला व्हँमेट झाली
मी घाबरलो..  डाँक्टर खरं सांगा घाबरायचं काही काही कारण नाही ना
ते तर मी आधीच बोलला ना, काळजीचं कारण नाय हाय त्यानेच मला वार्ता करताना सांगितलं
ते काय झालं ते एकदम भारीमंदी जेवले
त्याचा प्रेशर आला . मी त्याना घेऊन तुमच्या कडे आला पर घरी कोन दिसला नाय
म्हणून पण हे थोडॆ अपसेट  हाय
तुम्मी येऊन त्यानला नेणार काय? झोपला तर झोपुदे बाकी काय पन नाय
मी तसाच आणायला गेलो. घुश्शातच होते, घरी यायला तयार नव्हते, पण उमाशी फोनवर बोलले
आणि घरी येऊन सोफ्यावर बसले
उमानी पाणी प्यायला दिलं नको म्हणाले
मग उमा म्हणाली काका हे काय मधेच? एकटं जाऊन राजमहल मधे जेवलात?
का? मी जेऊ शकत नाही?
हो जेऊ शकता, पण आज रविवार आहे, आपला आजचा प्रोग्रँम फिक्स  असतो ना?
तो नेहमीच्या रविवारी
 म्हणजे? मी विचारलं
म्हणजे काही नाही , ते घुश्शातच म्हणाले
आम्हाला किती काळजी लागून राहिली माहितिये
तुम्ही असे कधी वागत नाही
असा म्हणजे कसा? वेड्या सारखा?
असं कोण म्हणतय? मी समजूत काढत म्हणालो
असं तोंडाने म्हणत नसालात तरी डोळ्यात दिसतय
डोळ्यातलं दिसायला तुम्ही आमच्याकडे बघितलत तरी कुठे? उमा त्यांच्या जवळ बसत म्हणाली
एकदम असं प्रेशर येण्या इतकं काय जेवलात काका?
तुला काय करायचय?  ते असं म्हणाले आणि उमा खरच रागावली.. आता मात्र मी  खरच रागवेन हं
हे काय वेड्यासारखं , काका पुढच्या चार तारखेला तुम्हाला बहात्तर पूर्ण होणार  याचं तरी भान राखा
ते चकीत होत म्हणाले पुढच्या तारखेला?  आम्ही दोघे गोंधळलो
हो चार एप्रील ना? मग पुढच्या महिन्याला
मग हा महिना कुठला आहे?
मार्च आम्ही दोघं म्हणालो
आणि काका खो खो खो हसायला लागले  साँरी साँरी म्हणत माझ्या पाठीत धपाटे सुद्धा घातले
काका काय झालं सांगा
अरे  या एक तारखेला कँलेंडरचं पान बदलताना डायरेक्ट दोन पानं  उलटली गेली
त्यामुळे सार्‍या जगात जरी मार्च अवतरला असला तरी माझ्या घरी एप्रिलच  सुरू झाला, वीणा असती तर हा गोंधळ झाला नसता
पण सध्या माझं काय, दिनांक तारखेशी काही संबंध येत नाही
पण चार एप्रील म्हंटल्यावर वाढदिवस आठवला
काल पासनं तुमचा अंदाज घेतोय, तुम्ही पठ्ठे काही बोलायला तयार नाही
रात्री शैलेश फोन करतो त्याचाही फोन नाही
कुणाच्याच लक्षात माझा वाढदिवस नाही याचा इतका राग आला की रागाच्या भरात राजमहल गाठलं आणि डिलक्स थाळी मागवून बका बका जेवलो  इतका जेवलो की विचारू नकोस
चांगली पन्नास रुपये टीप ठेऊन बाहेर आलो आणि मग त्रास व्हायला लागला
पण नशिबाने डाँक्टरनी मला बघितलं , मला गाडीत घालून ते इथे घेऊन आले तर इथे कोणी घरात दिसेना
कसे दिसणार ? आम्ही तुमच्याकडे गेलो होतो
 हो ना, मग डाँक्टर म्हणाला माझ्याकडे चला त्यांची डिस्पेंसरी आज बंद ना
मग गेलो त्यांच्या कडे
आता पुढच्या चार तारखेला आमचं  राजमहल नक्की झालय
आणि पेनल्टी म्हणून नाटक सुद्धा...








Comments

  1. Haha......but it also shows how man always wants to be social....

    ReplyDelete
  2. दुसर बालपण

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी