महाबली
रामानंद सागर यांच रामायण दूर्दर्शनवर झळकलं आणि उंबर गाव, बोर्डी यासारखी आडवाटेला असलेली गावं अचानक चर्चेत आली, भिल्लोरी सुद्धा असच गाव , जेमतेम सत्तर पंचाहत्तर उंबरठा असलेलं , समुद्रकिनारी वसलेलं तरी निसर्गरम्य म्हणता येणार नाही कारण तसं ओसाडच पण या बाकीच्या गावांमुळे हे गावही जरा लक्षात यायला लागलं कारण त्याकाळी मालिकांची शुटींग्ज अत्ता सारखी चोवीस तास सुरू नसायची सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ही ठरलेली वेळ, सहाचे साडेसहा व्हायचे पण सात व्हायचे नाहीत त्यात विजेचा लपंडाव सुरूच असायचा, दिवे गेले की हातावर हात ठेऊन बसायचं मग युनीटमधली काही हौशी माणसं आजुबाजुच्या प्रदेशात फेरफटका मारून यायची , तर अशा फेरफटक्यात भिल्लोरी गावाचा शोध लागला, गुजराती मराठी मिक्स अशी काहीतरी भाषा हे लोक बोलायचे बोलायला असायचं कोणं म्हणा, दिसायला घर दिसायची पण एकजात सगळी बंद , दोन पिंपळाचे पार होते तिथे मात्र जरा वर्दळ असायची समिद्रकिनारी एक खडकाचा सुळका होता त्याला हे लोक फार मानायचे, स्वयंभू शिवलींग समजायचे नात्यावर छत होतं ना चौथरा पाऊस पदेल तेंव्हा सुळक्याला अभिषेक व्हायचा एरव...