एका पायावर
आमच्या इथे गोडांबे म्हणून राहयचे
बदलीवर आलेल्या लोकाना भाड्यानी त्यांच्या खोल्या द्यायचे
अनेक जोडपी लोकं कुटूंब राहून गेली
प्रत्येक वेळी त्यानी घर सोडलं , सामान हालवलं
की ते रिकाम्या खोल्या बघून यायचे, किती आवरलं
उपसलं बांधून नेलं तरी काही ना काही सामान मागे राहयचं त्या वरून गोडांबे त्या
माणसांचं मोजमाप करायचे, त्यांची जिवन पद्धती कशी असेल
ठरवायचे...
कोणी कधी काही विसरलं तर गोडांबे संपर्क साधून कळवायचे आणि ते सामान किंवा
वस्तू पोहोचवली जायची
यावेळी जे जोडपं आलं होतं ते त्याना फारसं भावलं नव्हतं
एकतर त्यांच्या जगण्याला शिस्त नव्हती
आणि नंतर कळलं के ते दोघे पती पत्नी म्हणून असेच राहत होते
मग तर त्यांची कुठलीच गोष्ट गोडांब्याना मान्य नसायची
घरी आले की सांगायचे गोखले तुम्हाला सांगतो काल अचानक माझ्या पाठीत अशी उसण
भरली की मी कळवळलोच
कसे काय कोणजाणे दोघे दिवटे घरात होते
माझी आरोळी ऐकून दोघे धावले, काय त्यांचा अवतार ती तर चक्क
अर्ध्या चड्डीत माझ्या समोर आली
मी म्हंटलं तुम्ही नं बोलावता, तुम्हाला ते
पसंत नाहीत हे कळत असताना ती दोघं धावली ते बघाना, अर्धी चड्डी
कसली बघताय?
अहो बापाच्या हाकेला उठावं लागेल म्हणून डोक्यावर चादर घेऊन झोपणारी मुलं
पाहिली आहेत मी
म्हणून काही ही दोघं ग्रेट ठरत नाहीत
मी स्प्ष्ट सांगितलं तुम्हाला यायची गरज नाही माझं मी बघून घेईन
मग काय ती गेली?
कसली जातायत?जबरदस्ती मला हाताला धरून खुर्चीत बसवलं मागे टेकायला
उशी दिली हातात फोन दिला आणि गेली
आता एकदाची इथली मुदत संपली की जातील इथून तो दिवस खरा मी बजवलय दारूच्या
रिकाम्या बाटल्या मागे ठेवल्यात तर डिपाँझीट् कट करून देईन, मला हसायला
आलं
आणि मग एकदा गोडांबे आले
मी आपलं सहज विचारलं गेले का? तुमचे अनचाहे भाडेकरू?
ते हताशपणे म्हणाले काही कळेनासं झालय
का? नाही गेले?काय म्हणतायत?
ते म्हणाले ती दोघं गेली होsss
मग?
पण शिरस्त्याप्रमाणे रिकाम्या खोल्या बघायला गेलो तर त्यानी घरात काय ठेवलेलं
माहितिये?
काय?मला काही अंदाजच बांधता येईना
गोडांबे म्हणाले अहो चांदीची समयी ठेऊन गेले
इतके बेजबाबदार? समयी विसरले? चला म्हणजे
देवधर्म मानत होते तर
काका मला आडवत म्हणाले गोखले तुम्ही लेखक असून कल्पना करू शकणार नाही असं घडलय
म्हणजे?
अहोssss ते समयी विसरले नाहीत
माझ्यासाठी ठेऊन गेले.. गेले
काssssय? आता दचकायची
माझ्यावर वेळ आली
लग्न न करता कसलीही बांधिलकी नं मानता राहणारे भाडेकरू जाताना चांदीची समयी
ठेऊन गेले?
हो बघाना गोडांबे जरा हसत म्हणाले
मी त्याना फोन केला , म्हणालो तुम्ही समयी विसरलाय
तर तो म्हणतो विसरलो नाही मालक, तुमच्यासाठीच
आणली होती पण येऊन देण्याचं धाडस होईना?
मग?
तर तो म्हणाला रोज घराला कुलूप लाऊन बाहेर जाताना आम्ही तुमच्या टीपाँय वर
ठेवलेल्या मुरलीधराला नमस्कार करून जायचो
आम्ही उडपीला गेलो होतो तेंव्हा गोडांब्यानी मनापासून भावली होती म्हणून ती
मुर्ती घेतली होती आणि टीपाँय वर ठेवली होती इतकच
येता जाता हे त्याला नमस्कार करून जायचे याचा याना पत्ताच नव्हता
पण सांगण्या सारखा किस्सा पुढेच आहे
काय?
अहो म्हणे परवा या इसमाला स्वप्नात या मुर्तीजवळ चक्क चांदीची समयी तेवताना
दिसली खूप छान स्वप्न होतं म्हणाला मन एकदम शांत शांत झालं
आणि दुसर्या दिवशी त्या बयेनं ती गरोदर असल्याची टेस्ट केली आणि ती पाँझेटीव्ह
आली त्याला तो शुभशकूनच वाटला आणि आता ते दोघे लग्न करणार आहेत
मग?
मग काय... अहो कन्यादान करायला मला बोलावलय
याल ना माझ्या बरोबर?
मी म्हणालो एका पायावर.......
Waaaaaaaaaaaah Waaaaah... Bahot hi badhiya!!! :) :) :)
ReplyDeleteकथा छानच...नेहमीप्रमाणे...
ReplyDelete"...काय भुललासी वरलीया रंगा" ह्मणतात ते आठवलं
Wa Wa ani waach wa
ReplyDeleteWa wa lovely..
ReplyDeleteWow!
ReplyDeleteसुंदर.. :)
ReplyDeleteHahaha...never be judgemental....
ReplyDelete....खुप... छान .... कथा ....
ReplyDelete