समजूत
वहिदा रेहमान म्हंटलं की तुम्हाला एकच वहिदा आठवत असेल ना?
आम्हाला दोन आठवतात, आम्हला म्हणजे आमच्या आळीतल्या लोकाना, कारण आमच्या कडे आणखी एक वहिदा आहे म्हणजे होती, कदाचीत तिच्यापेक्षा सरस.. प्रत्यक्षाहून प्रतिमा सूंदर म्हणावं तसं
आमच्या वेलणकर बाईंचं हसणं असं मोहक लाजवाब आहे म्हणजे होतं
वेलणकरबाईंचं नाव वसूधा पण तरी त्याना वहिदा म्हणून हाक मारणारे सुद्धा बरेचजण आहेत म्हणजे होते
कोणी त्याना वय विचारलं की त्या हळूच म्हणतात म्हनजे म्हणायच्या तुला म्हणून खरं वय सांगते पण तुला कोणी विचारलं तर दहा वर्ष कमीच सांग
दहा काय त्या आहेत त्यापेक्षा वीस वर्ष लहान दिसतात म्हणजे दिसायच्या
बाईना दोन मुलगे दोन सूना , सुना सुद्धा आपल्या सासूवर मनापासून फीदा, धाकटी तर पून्हा पून्हा म्हणायची मी मिहिर कडे बघितलच नाही मी आईना बघूनच हो म्हंटलं मग याला बघितलं आणि म्हंटलं बरा आहे तिच्या या बोलण्यावर आम्ही सगळे हसतो म्हणजे हसायचो
मोठा पुण्याला शिफ्ट झाला आणि मिहिरचा मुन्ना घरात आला, मुन्ना आल्यावर मात्र वेलणकर बाई वहिदा बीहीदा काही राहिल्या नाहीत, त्या आनंदाने आज्जी झाल्या
आमच्या मते वहिदा नातवाच्या सेवेत रमली
मान्यवर काँलेजात त्या केमेस्ट्रीच्या विद्यार्थीप्रिय प्रोफेसर होत्या
तिथल्या लँबच्या इन्चार्ज आणि कुठल्यातरी डिपार्ट्मेंटच्या हेड होत्या, संस्कृतीक मंडळाच्या त्या माननीय सल्लागार होत्या आणि काँलेजतर्फे होणार्या एकांकीकेच्या स्फुर्तीस्थान
आता त्या तशा रिटायरच झाल्या होत्या पण कुठल्यातरी आँर्गनायझेशनची माणसं काँलेजला भेट द्यायला यायची होती म्हणून प्रिंसीपलच्या विनंतीवरून त्याना आठ दिवस काँलेज अटेंड करणं भाग होतं
सकाळी नऊ ते दुपारी तीन , केवळ प्रिंसिपलने विनंती केली म्हणून त्यानी हे मान्य केलं होतं , पण त्यामुळे मुन्नाला कोण बघणार ? हा प्रश्न उभा राहिला
आम्ही समोरच राहयचो, आणि मुन्नाला तशी उमाची सवय होती, मुन्नाला अंघोळ घालताना बरेचदा बाई उमाला बोलवायच्या कारण तो खूप मस्ती करायचा आणि हल्ली हल्ली जरा बाईंचा डावा खांदा दुखायचा हाताची हालचाल पहिल्या इतकी सहज सफाईदार व्हायची नाही
उमा पण वेळ असेल किंवा वेळ काढून जायची, बाकी मुन्नाचं सगळं दिवसभर बाईच बघायच्या सुनेला जरा म्हणून काळजी नव्हती
वहिदाचं हे आज्जीवालं रूप सुद्धा खूप सूंदर होतं आम्ही ते मनसोक्त पाहिलं
मुन्ना बरोबर त्या रांगायच्या, त्याच्या बरोबर दुडू दुडू धावयच्या, दोघांचा लपाछपीचा खेळ सुरू झालाकी मुन्ना पेंगाळून झोपे पर्यंत थांबायचाच नाही
मग वहिनी आमच्याकडे जेवायला असायच्या कारण मुन्नाच्या नादात स्वैपाकघराकडे बघायला वेळच नसायचा, त्याचा गुरगुट्या भात सकाळी अकरा वजताच भरवला जायचा तो भरल्या पोटी खेळायचा आणि आमची वहिदा बिचारी उपाशी.मग उमाच्या हातचं जेवल्याकी बाई तृप्त होत आशीर्वाद द्यायच्या
.अशी चार वर्ष गेली मुन्ना कधी मोठा झाला हे त्याच्या आईला कळलच नाही
अत्ताही दूपारी त्या मुन्नाला न्यायला आल्या की उमा चहा बरोबर त्याना काही खायला द्यायची, त्या कधी नाही म्हणायच्या नाहीत, त्या स्वत: सुग्रण होत्या त्यामुळे निगुतीने केलेलं त्याना सगळं आवडायचं
त्यांच्या सुनेला स्वैपाकाची इतकी आवड नव्हती पण त्यावरून बाईनी कधी नाक मुरडलं नाही की टोमणे मारले नाहीत. अत्ताही बाई दुपारी काँलेजातून यायच्या तेंव्हा खाऊन पिऊन दंगा करून मुन्ना झोपलेला असयाचा त्याला झोपतून उचलायची घाई,बाई करायच्या नाहीत त्यापण तिथेच जागा करून जराशा लवंडायच्या
आज शेवटचा दिवस होता छोटीशी पार्टी होती त्यामुळे बाईना यायला जरा उशीर होणार होता हे माहीतच होतं
पण जरा जरा म्हणता म्हणता बराच उशीर झाला
मुन्ना उठला, त्याला जाग आल्या आल्या आजीला बघायची सवय.. अगदी रडला नाही पण .. बेचैन झाला
आम्ही फोन केला काँलेजात कोणी उचलेना
तेव्हढ्यात मिहीर आणि त्याची बायको आली, दोघेही धास्तावले होते, त्याना काँलेजातून फोन आला होता बाईंचा मेजर अपघात झालाय तुम्ही तातडीने या. मोठाही लगेच यायला निघाला होता
मिहीर आणि मी तातडीने हाँस्पीटलला पोहोचलो
बाई सिरियस होत्या , प्रचंड गर्दी जमली होती, काँलेज तर्फे सांगण्यात आलं होतं खर्चाची काळजी करू नका जो खर्च होईल ते काँलेज तर्फे होईल पण बाईना वाचवा, आम्हाला त्या हव्या आहेत
पण असं झालं काय होतं?
समारोपाची पार्टी चालू असताना बाईंचं लक्ष गेलं एक माथेफिरू मुलगा गेटच्या बाहेरून त्वेशाने धावत येत होता त्याच्या हातात काय होतं हे बाईना कळलं नाही पण काहीतरी अँक्षन घेणं गरजेचं होतं त्या आजुबाजुच्या गोंधळात कुणाचं तरी लक्ष वेधून सावध करत सांगण्यात वेळ वाया घालवणं शक्य नव्हतं
बाई स्वत: वेगानं धावल्या त्याना काही करून त्या माथेफीरूला आवरायचं होतं
अंतर कमी झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं त्याच्या हातात अँसीडचा बल्भ होता आणि त्याला तो शिप्रा देसाईवर फेकायचा होता, तो मुलगा वेगात होता तशा आणि तितक्याच बाईही वेगात होत्या
दोघे समोरा समोर आले दोघे जिद्दीला पेटले होते
बाईना फक्त त्याच्या हातातला बल्भ दिसत होता आणि त्याला शिप्रा दिसत होती
याला खाली पाडला तर याच्या हातातला बल्भ सुटेल इतकच त्याना त्या क्षणी सुचलं आणि बाईनी त्याच्या कमरेत लाथ मारली पण बाईंचाच तोल गेला बाई पडल्या आणि तो ही धडपडला आणि सुडाने पेटलेल्या त्या नराधमाने हातातला बल्भ बाईंवर फेकला तरी बाईनी त्याही परिस्थीतीत चपळाई दाखवली पण चेहर्याचा काही भाग आणि मान होरपळली गेली
तो माथेफिरू लगेच जेरबंद झाला, शिप्राला आपल्यावरचं केव्हढं मोठं संकट टळलं याची कल्पना आली
आणि बाईंची मात्र शुद्ध हरपली
शुद्धीवर आल्या तेंव्हा त्यांचा वर्तमानकाळ भूतकाळाशी पूर्ण तुटला होता
नवा गडी नवा राज तसं नवं रूप नवी ओळख असं त्यांच झालं होतं
दोन्ही सूना बाईंच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडल्या, मुलांची आवस्थाही तशीच होती
प्रश्न मुन्नाचा होता, आपल्या शुंदल शुंदल आजीचा चोळामोळा झालेला खडबडीत चेहरा तो ओळखेल की नाही?

त्याही पेक्षा स्विकारेल की नाही हा प्रश्न होता?
आणि त्याचं उत्तर नाही असं आलं , मुन्ना उमाच्याच कडेवर होता , मुद्दाम बाईना भेटवायला त्याला हाँस्पिटल मधे आणला होता, बाईनी आपला विद्रूप चेहरा झाकला होता, बाईनी आधी हाक मारली तो आजीच्या आवाजानी स्वैरभैर झाला कुथेश तू कुथेश तू म्हणत त्याने सगळी कडे बघितलं आणि बाईनी धीर करून चेहर्यावरचं आवरण दूर केलं परत हाक मारली आणि त्याना बघून मुन्ना भितीने ताठरला.. अवाक झाला उमा त्याला घेऊन बाहेर धावली तो पर्यंत त्याने डोळे फिरवले होते .
आणि डाँक्टरानी सांगितलं मुन्नावर आजीला स्विकारायची जबरदस्ती करता येणार नाही
त्याचं बाल मन आजीला स्विकारेल तेंव्हा स्विकारुदे.. नाहीतर टोकाचे परिणाम दिसून येतील
मग सुरू झाली आजी नातवाची नं संपणारी लपाछपी
डिस्चार्ज मिळाल्यावर मिहीरची बायको मुन्नाला घेऊन काही दिवस माहेरी गेली, मग बाई स्थीर स्थावर झाल्यावर ती परत आली आणि बाई आमच्याकडे राहयला आल्या दूरून का होईना त्या मुन्नाला बघू शकत होत्या
त्या ही काळात बाईना चमत्कारीक अनुभवाना सामोरं जावं लागलं
एक बाई म्हणाल्या की माझी नात जेवायला त्रा द्यायची आता वेलणकर आजीला बोलवू? असं विचारलं की पट पट जेवते,एक जण म्हणाल्या झोपेत तुम्हाला तुमचा आधीचा चेहरा आठवतो? की हा अत्ताचा?
त्या दिवसात उमाने बाईना खूप सांभाळलं बाई म्हणायच्या सख्खी मुलगी करणार नाही इतकं तू केलस पण तरी मुन्नाला समजावणं उमालाच काय कुणालाच जमलं नाही
बाईना आमच्या घरी असताना तो दूरून बघायचा पण काहीच प्रतिसाद द्यायचा नाही
हे किती दिवस असं चालणार? या अवघड प्रश्नाचं उत्तर नियतीनेच दिलं
मुन्ना एव्हाना दुसरीत गेला होता , पावसाचे दिवस होते .आणि शाळेतून फोन आला काही कारणाने शाळा लवकर सोडण्यात येईल तर आपल्या पाल्ल्याना न्यायची व्यवस्था करा
आम्हीही घरी नव्हतो मुन्नाची आई सुद्धा साईटवर गेली होती आणि मिहीर असाच कुठेतरी
तरी बाईनी शक्य तितके चार पाच फोन करून बघितले पण कोणीच अँव्हेलेबल नव्हतं , बाई धीर करून स्वत: शाळेत जायला निघाल्या
कसाबसा पदर चेहर्या भोवती गुरफटून घेतला एक डोळा जबरदस्ती खोबणीत बसवल्याने जरा बाहेर आल्या सारखा दिसायचा त्यामुळे गाँगल लावावा लागायचा, गुरफटलेल्या चेहर्यावर गाँगल म्हणजे इन्व्हिजिबल मँन सारखं वाटायचं .. तरी त्या कशा बशा शाळेत पोहोचल्या जे त्याना ओळखत होते ते आदबीने बोलले मुलं अत्ता सोडायला लागलेत अत्ता येईल तुमचा नातू तुम्ही इथे बसा वगैरे
पण काही हूड मुलं असतात, सगळीच काही निरागस नसतात काहीना व्यंग कळतं काहीना उणीवा कळतात तर अशा टारगट मुलांच टोळकं बाईना चिडवायला लागलं काहीजण त्या आवरत होते रागवत होते पण तरी ती मुलं ऐकत नव्हती साहजिक आहे इतकं विद्रूप असं काहीतरी ते पहिल्यांदी बघत होते स्वत:चा अंगा खांद्यावर खेळवलेला नातू आपल्याला ओळखत नाही तर .. भोवतीची गर्दी कमी झाली पण ती मुलं आपली तिथेच आणि मिहीरचा पत्ता नाही, बाईना अगदी मेल्याहून मेल्या सारखं झालं होतं
चिडवणार्या मुलांच्या अगदी अंगात आलं होतं आणि तितक्यात शिपाई मुन्नाला घेऊन आला त्याच्या समोर हा तमाशा व्हायला नको होता असं बाईना मनापासून वाटत होतं
शिपाई म्हणाला तुम्ही इथे का थांबलात? वर्गाशी यायचं ना , जी मुलं पालकांबरोबर जातात त्या पालकाना आम्ही वर्गाशी यायला.. शिपाई बोलतोय मुलं चिडवतायत मुन्ना जागीच थरथरला आणि शिपायाचा हात सोडून परत आत पळाला वेलणकर बाई गयावया करत शिपायाला म्हणाल्या तुम्ही याला घरी आणून सोडाल का?
त्याना कळून चुकलं आता हा आपल्या बरोबर नाही येणार, त्या तसं म्हणाल्या मला घाबरतो तो
त्या मुलाना हे ऐकून अजूनच चेव आला आणि ते खिदळायला लागले शिपायाचं काही चालत नव्हतं
तेव्हढ्यात बाई बघतायत तर काय ? मुन्ना चक्क दोन शिक्षीकाना घेऊन आला होता
आणि सांगत होता ही मुलं माझ्या आजीला चिडवतायत... मुलं पळायच्या बेतात होती पण शिपायानी त्याना धरलं , आणि शिक्षकानी लेक्चर दिलं या बाई नुसत्याच मुन्नाच्या आज्जी नाहियेत शी इज अ ब्रेव्ह लेडी
एका मुलीला वाचवताना त्यानी हल्ला स्वत:वर घेतला... आज त्या मधे पडल्या नसत्या तर एका मुलीचं आयुष्य पणाला लागलं असतं आपला मुन्ना किती लकी आहे त्याला अशी ग्रेट आज्जी मिळाली... त्यांच्या पाया पडून क्षमा मागा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या , मुन्ना हे सगळं बघत होता, तो आजीला भीत होता हे खरं आहे पण त्याही पेक्षा सत्य स्विकारणं त्या बालमनाला जड जात होतं
पण आज्जी आज आपल्या साठी शाळेत आली आणि मुलं तिला चिडवतायत.. आज्जी केविलवाणी झालेली बघून मनातल्या नकारात्मक भावनेवर दयेने विजय मिळवला, दया तात्पुरती नसेल तर ती अर्थपूर्ण ठरते तसं मुन्नाचं झालं त्याला आपल्या आजीची ओळख आधीपेक्षा जास्त पटली म्हणून तो बाईना बिलगला आणि सगळ्यात ज्याची त्याला घाण वाटत होती त्या चेहर्याच्या खदबडीत भागावरूनच त्याने हात फिरवला, इवलासा मुलगा पण आज्जीला मिठी मारून रडला, आमच्या बाईंचं काय झालं असेल कल्पनाच करा
पुढे शिप्राच्या लग्नाच्या आल्बम मधे शिप्रा बरोबर बाईना कृतार्थपणे स्टेजवर उभं राहिलेलं बघून आमचेही डोळे पाणावले
आणि अजूनही वेलणकर बाई आठवल्या की....

डोळे भरून आले शेवट वाचता वाचता...
ReplyDeleteHridaysparshi....
ReplyDeleteApratim👌
ReplyDeleteGreat......
ReplyDeletekhup chan kaka.
ReplyDelete