क्लब हाऊस
उद्योगपती बिलमोरियानी त्या काळात या छोट्या शहरात क्लब संस्कृती आणण्याचा असफल प्रयत्न केला होता.
असफल अशासाठी की एक तर ते शहर लहान, आणि क्लबसाठी जी टोलेजंग इमारत उभी केली ती शहरापासून थोडी दूर, त्यात त्या शहरापासून जवळच रेल्वे जाण्याचे संकेत होते ते बारगळले, मग थोडं थोडं करत बरच दूर्लक्ष झालं आणि जी वास्तू झगमगायला हवी ती काहीशी बाजूला पडली
तसे माँर्नींग वाँक घेणारे काही तुरळक हौशी सकाळचे इथे येतात
त्या मानाने संध्याकाळी जरा वर्दळ दिसते एक नावाला चहाची टपरी आहे क्लबचं किचन अजून तरी शनिवार रविवार उघडतात आणि तिथले पनीर पकोडे चाखायला काही खवय्ये आवर्जून येतात
एकूण त्या एरियासाठी चार रखवालदार तैनात केलेत त्यांची कुटूंबही तिथेच नांदतायत... भोगीरामला तर इथे येऊन चाळीस वर्षा पेक्षा जास्त काळ लोटला
कुछ नही बदला असं तो बोलताना एकदा तरी म्हणतोच
आता चाळीस वर्ष वास्तव्य म्हंटल्यावर काही लागेबांधे जोडले जातात, काही अधिकार प्राप्त होतात
त्यानुसार भोगीरामने पुढाकार घेऊन मुलांच्या क्रिकेट्साठी ग्राऊंडवर पीच तयार करून घेतली आणि मग मुलांची वर्दळ वाढली रविवारी तर मुलांच्या क्रिकेट मुळे सारा परिसर फुलून जायचा
मग त्या ग्राऊंडवर जमणं हे मुलात फेमस झालं
त्यात काही वर्षांपूर्वी या क्लब पासून काही अंतरावर काँलेज सुरू झालं आणि मग या पडीक एरियात मुलं पडीक राहयला लागली
चंदू फार क्वचीत तिथे यायचा, एकतर त्याचं घर त्या एरिया पासनं लांब होतं आणि त्याच्या वडिलाना उगाच टाईमपास केलेला चालत नसे, त्यात घरचा व्यवसाय असा की कधी टेंपो बरोबर बाहेर जावं लागेल सांगणं कठीण
तसा चंदू होनहार मुलगा, अभ्यासात सुद्धा हुशार त्यात वडिलाना लहानपणापासून व्यवसायात मदत करणारा
त्यामुळे कधी तो मित्रांबरोबर जातो म्हणाला तर घरचे अडवायचे नाहीत, फक्त लवकर ये, उशीर करू नकोस म्हणायला विसरायचे नाहीत आणि खिशात शंभराच्या नोटा सारायला विसरायचे नाहीत
त्याला आणखी एक कारण होतं आता क्लबहाऊसच्या इमारतीत चोरी छुपे काही गोडाऊंस झाली होती तशी अनाधिकृतच पण तरी राजरोस असलेली
मुळात छोटं शहर, त्यांची उलाढाल ती केव्हढी, पण तरी गोडाऊनची गरज पडायचीच
तर आपला मुलगा तिथे कुणासमोर कमी पडायला नको ही काळजी चंदूच्या वडिलाना होतीच
या अनेक कारणांमुळे आता त्या ओसाड बनत चाललेल्या वास्तूत थोडी जान यायला लागली होती
त्यात चंदूचा ग्रूप तीन नंबरच्या जिन्यापाशी दुसर्या मजल्यावर कोंडाळं करून गप्पा मारत बसायचा, खेळणं बिळणं त्यांच्या फितरत मधे बसतच नव्हतं
बसल्या बसल्या गप्पा झोडायच्या गाणी म्हणायची कुठेतरी जाण्याचे प्लँन आखायचे मग ते पोस्टपोन करत रद्द करायचे किचन सुरू असेल तर हादडायचं नाहीतर आहेच टपरीवरचा चहा, खारी, कचोरी
तर एक दिवस कसाकोणजाणे या मुलांच्या हाती प्लँचेटचा बोर्ड लागला अगदी बिनचुक बनवलेला
काशाची वाटी पण उपलब्ध झाली
चंदूला पोहोचायला जरा वेळ लागला तो पर्यंत हे सगळे प्लँंचेट मधे घुसले होते प्रत्येकाकडे एक तरी सांगण्यासारखा किस्सा होता त्यामुळे एक माहोल बनला होता
चंदू तिथे पोहोचला तेंव्हा हे सगळे त्या माहोलचे पाईक झाले होते, चंदूला मुळात प्लँचेट हा प्रकारच नवा होता
मित्र म्हणाले जी व्यक्ती आपल्यातून गेली तिच्या आत्म्याला या तंत्रा द्वारे बोलवता येतं
चंदूला साँलीड त्रिलींग वाटलं आणि अचानक त्याला शालू मावशी आठवली
शालू मावशी दिसायला भारी गोड, स्वभावाने चुलबुली तितकीच मेहनती, एकदा प्रेमभंग झाल्यावर तिने लग्नच केलं नाही, चंदूचे बाबा तिच्यावर खुश असायचे कारण तिने एकटीने स्वत:च्या हिमतीवर तयार कपड्यांच्या व्यवसायात जम बसवला होता, बाबाना तिचं कौतूक वाटायचं म्हणून आईचा तिच्यावर राग होता
पण चंदूला मात्र ही मावशी मनापासून आवडायची
एक तर दहावीला तिने चंदूला अभ्यासात खूप मदत केली होती
आणि ती चंदूचे लाडही करायची
पण दोन अडीच वर्षांपूर्वी ती एका ग्रूप बरोबर सायकलवरून मानस सरोवराच्या दिशेने गेली ती परत आलीच नाही...आई बोटं मोडत म्हणायची बरं झालं गेली, नसती ब्याद
आई असं म्हणाली की चंदूला फारच वाईट वाटायचं
त्यामुळे सांगितल्याप्रमाणे त्याने वाटीवर बोट ठेवत नकळत शालूमावशीलाच हाक मारली शालू मावशीssssss
शालूमावशीssssss
आणि काय आश्चर्य खरच शालू मावशी वरच्या मजल्यावरून यावी तशी आली
केसात गवताच्या काड्या जरा मळलेले कपडे
मला चंदूने हाक मारली कारे म्हणत ती या मुलांसमोर आली
सगळ्यांची बोबडी वळली ते अवाक झाले
चंदूला मावशी समोर बघून आनंद झाला
मावशी तू लगेच आलीस?
हो मी इथेच असते पण तू इथे कसा? ते ही यावेळी?मुलांची पाचावर धारण बसली ते गडबडत धडपडत तिथून पळून गेले मावशी भेटल्याच्या आनंदापुढे मित्र गेल्याचं चंदूच्या लक्षातच आलं नाही
चंदूने खूप गप्पा मारल्या
मुलं जिला दिवंगत समजत होते ती हयात होती, हातीपायी धडधाकट
ती गायब झाली होती म्हणजे चंदूच्या बालविश्वातून गेली होती
चंदूच्या आईने तिच्यावर आणि बाबांवर संशय घेतला म्हणून ती येईनाशी झाली होती
वरती तिचं गोडाऊन होतं तिथे तिची साफसफाई चालली होती तिथून ती आली होती म्हणून तिचा हा अवतार झाला होता,मृत्यू पावलेल्या व्यक्ती प्लँचेट द्वारे येतात हे आपल्या हिरोच्यानीट लक्षात आलं नव्हतं त्यामुळे मावशीशी बोलताना तो अँट इझ होता
पळून गेलेली मुलं पून्हा या इमारती कडेच काय या क्लबकडे फिरकली नाहीत
आणि पून्हा हा क्लबहाऊसचा ओसाड प्रदेश चर्चेत आला
मग काय सांगायला प्रत्येकाकडे काही ना काही अनुभव असतोच

Hahaha
ReplyDelete😂😂😂😂
ReplyDelete