प्रेमपत्र
पत्र लिहायची काय गरज? पत्र लिहायची काय गरज? असं स्वत:शी घोकत शेवटी पत्र लिहायला बसले..
खरच तसं काहीच कारण नाही.. सगळं छान आहे, बाबा रिटायर झाल्यावर तर काय... घरी धम्मालच चालू आहे..घराला जाग असते आता
खरच काय लिहू सुचत नाही... तू फोन केलास की कसं.. तुला काय बोलायचं सुचत नाही?
मी म्हणायचे असं कसं होऊ शकतं ?बोलण्यासाठी फोन केल्यावर बोलणं सुचत नाही?
हो, पण असं होऊ शकतं अत्ताच बघना मारे पत्र लिहायला बसले.. पण ...
एखादवेळेस खरच खास कळवण्यासारखं काही नाही.. तू कसा आहेस विचारलं तर परत चिडशील तसंही तुला चिडायला कारण लागत नाही म्हणा.. मीच समजुतदार म्हणून आपली मैत्री टिकली.हे तुला कबूल करावच लागेल
नाहीतर आपली ओळख झाल्यानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला तू मला काय गिफ्ट दिलस?
..... रस्त्यावरचं मांजरीचं पिल्लू पकडून आणलस आणि त्याच्या गळ्यात गुलाबी रिबिन बांधून ते पिल्लू माझ्या गळ्यात मारलस... आई अणि ताई खूप वैतागलेल्या तेंव्हा तुझ्यावर
माझ्यामुळे गप्प बसल्या... ते माऊचं पिल्लू सुद्धा रुळलं आमच्याकडे..पण तू नाही रुळलास....
रमलास जरासा पण तसा तू मुळचा तिथलाच... आई सारखी म्हणते आता.. मनस्वी आहे तो.. तो म्हणजे तू.. प्रत्येक गोष्टीची फोड करून सांगावी लागते ना तुला.. तू इथून गेलास आणि माझी ती सवयच गेली.. प्रत्येक गोष्टीची सवयच होते तुलाही प्रत्येक गोष्ट मला सांगायची सवय झाली होती... मान्य करणार नाहीस पण म्हणूनच अजूनही काही सांगायला फोन करतोस आणि स्वत:ला आवरतं घेतोस..
हो , खरं आहे तुझ्या गावच्या गप्पा ऐकण्यात मला काय इंटरेस्ट? .. असं तुला वाटत असेल तसं तू बोलूनही दाखवलयस..
अरे पण म्हणून काही आपल्यात भांडण नाही झालेलं
तुला वाटलं तू मला विचारलस..मला नाही पटलं. मी नाही म्हणाले..
कारण खरच मला मुंबईसोडणं शक्य नाही..खास करून माझं चारकोप माझा परिसर...
तू ठरवल्या प्रमाणे गावाला परतलास.. जाताना भेट्लाही नाहीस, खरं सांगते तेंव्हा मी ही नकार दिल्याच्या गुर्मीत होते... जायच्या आधी साधं भेटायला आला नाहीस याची मला तेंव्हा मज्जाच वाटली होती..
नाहीतरी तू जरा बोअर खडूस हटवादी...असाच आहेस.. कपाळावर कूंकू असायलाच हवं हातात बांगड्या चढवल्या की खुश..्साडीला पातळ म्हणायचास.. आता काय म्हणतोस रे? तिथे कुणाला सांगितलस की नाही पातळात छान दिसतेस... ओ के ओ के मजेत विचारतेय लगेच रागाऊ नकोस.. पण तू पातळात म्हणालास की मला पाताळात ऐकू यायचं म्हणून मी हसायचे आणी तू चिडून तरा तरा निघून जायचास.. तेव्हढं तुला बरोबर जमायचं.. जमतं अत्ताही नाही का गावाला जाऊन बसलास
.कसा रे तू.. इथे राहून जराही बदलला नाहीस...पण मग मी तरी का बदलू?...
पण आई म्हणाली अगं लग्न करून शेजारच्या घरात गेलीस तरी बदलावं लागतं अगदी लग्न करून नवर्याला घरी घेऊन आलीस तरी त्याच्यासाठी आपण बदलतोच..
हा बदल अपरिहार्य आहे.. अटळ आहे..
मग म्हंटल बदलायचच आहे तर कुणा अनोळखी माणसासाठी कशाला बदलू ?
हे सांगायला पत्र लिहितेय असं नाही...पण एक कबूली द्यायची होती मागच्या दिवाळीत तू आम्हाला सगळ्याना गावाला बोलवत होतास ना.. आई नाहीच म्हणाली
ते ते .. ते माझ्या सांगण्यावरून आई सध्या जमणार नाही म्हणाली होती, मला भीती वाटली, खरच मी कोकणात आले आणि तुझं गाव बघून मला खरच ते आवडलं तर?....
मला तो बदल नको होता... पण आता घरात लग्नाचा विषय निघतोय आणि रोज नव्या नव्याने मला हेच जाणवतय.. लग्न म्हणजे बदलाव आलाच..बाबा म्हणाले तुझ्या आईशी लग्न करून मी खूप बदललो... अगदी खाण्यापिण्याच्या आवडी निवडी पासनं ते राहणीमाना पर्यंत...तुझी आई माझ्यासाठी बदलली, थोडा मीही तिच्यासाठी बदललो...
आपण आपल्या माणसाला प्रेमाने जिंकायचं असतं म्हणजेच त्याच्या आयुष्यातलं अविभाज्य घटक बनायचं असतं... तुझ्या प्रत्येक आग्रहाचा अर्थ आता मला कळावयला लागलाय.. केसात गजरे माळताना मला माझ्या आधी तू सुखावलेला दिसतोस
बाबानी आज माझी पत्रिका त्यांच्या मित्राला दाखवली.. पत्रिका बघून ते म्हणाले अरे ही मुलगी सासरी राज्य करेल पण एकच प्राँब्लेम आहे जरा चक्रम नवरा आहे नशिबात...
मी म्हंटलं तो चक्रम म्हणजे तूच असणार... तू जन्मभर अविवाहीत राहशील मूंबईचं नाव टाकशील पण एकदाही माझी मनधरणी करणार नाहीस...
तरी मी एक मौका तुला देते... जर हे पत्र मी पूर्ण केलं आणि खरच पोस्ट सुद्धा केलं आणि जर तुला ते मिळालं आणि जर तू शांत डोक्याने वाचलस ... आणि अजूनही तुला वाटलं..तर तर...
तर तू आईबाबाना तुझ्या गावच्या उत्सवाच्या निमित्ताने गावाला बोलावशील?..
माझ्यासाठी तोच कौल असेल...मी येईन गावाला,,डोंगरावरच्या तुझ्या महादेवाला सुद्धा येइन तुझ्या बरोबर... तू बोलावलस तर मी...
....वाट बघते...

चंगो खरच अशीही मुलगी असते ? अनुभव तर उलटाच आहे पण तरीही
ReplyDeleteKhupch goad......
ReplyDeleteBharich
ReplyDelete