योग

"योग असतात" दोन शब्दी वाक्य पण संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारं
जसं वामनाने तीन पावलं जमीन मागून अख्खी पृथ्वी पादांक्रीत केली तसं , खरच विचार केलात तर अनेक अतर्क्य प्रश्नाना एकच उत्तर असतं योग होता किंवा योग असतात . आणि असे योग असल्याशिवाय खरच
दयानंद च्या मुली बाबत असे हेलकावे बसलेच नसते
दिसायला सूंदर, वागायला सोज्वळ , वृत्तीने रसीक आणि मनाने संस्कारी अशी होती ऋता
तुम्हाला माहितिये? अहो एका दिवशी पाच घरातून मागणी  घातली गेली पोरीला, पण तेंव्हा तिची कसलीशी परिक्षा जवळ आली होती दया म्हणाला अत्ता तिचं लक्ष डाय्व्हार्ट नको व्हायला म्हणून हा विषय तिच्यासमोर काढुयाच नको , म्हणून दोन महिने कशीबशी कळ  सोसली पण त्या पाच जणांपैकी प्रधान मंडळी तर जणू लक्ष लाऊनच बसली होती कधी हिची परिक्षा आटोपतेय आणि आपण आपलं घोडं पुढे  दामटवतोय
ऋताला धाकटी बहीण होती तर प्रधानांकडे रोहीतला मोठी बहीण होती, तिचं लग्न झालं होतं आणि गेली अनेक वर्ष ती न्युजर्सीला स्थायीक होती. रोहीत सुद्धा तिथे आरामात सेटल होऊ शकला असता पण रोहीतला   भारताशिवाय कुठेच करमणारं नव्हतं आमच्या ऋताचं ही असच होतं , म्हणजे चला भेटायच्या आधीच एक दुवा जुळला होता
त्यामुळे परिक्षा संपल्याच्या संध्याकाळी रोहीतच्या आईने फोन केला , म्हणाली घाई करतेय असं नाही  पण एकदा दोघं एकमेकाला भेटली तर मग पुढचं सावकाश ठरवू फक्त ही लक्ष्मी आमच्याकडेच येतेय हे नक्की होऊदे की मी निवांत
दयानंदने मग शक्य तसं तिला समजावलं, दोघात सहा वर्षांच अंतर आहे याची कल्पना दिली .
 ऋता तशी समजुतदार होती शाहणी होती तिने आपल्या आई बाबांच्या भावना समजून घेतल्या , आता  आई बाबांचही वय होत चाललय, त्यांचा जिव तरी किती टांगणीला लावायचा? आपल्या नंतर परत धाकटी लग्नाला येईल आपलं जरा लवकर झालं तरी हरकत नाही पण त्यामुळे धाकटीच्या लग्नाला उसंत मिळेल, आज ना उद्या लग्न करायचंच आहे मग अत्ताच  विचार करायला काय हरकत आहे?
मग  बघण्याचा कार्यक्रम ठरला आणि ठरला तसा  पारही  पडला
रोहीतनेही ऋता सकट सगळ्यांचं मन जिंकून घेतलं धट्टा कट्टा ऊंचा पुरा रोहीत काहीशा नाजूक रेखीव ऋता समोर अगदी अनुरूप वाटत होता त्याना तर मुलगी पसंत होतीच पण आपल्या मुलीनेही देखादेखी होकार देऊन टाकला.देणं घेणं हे अगदी गौण होतं त्यामुळे चट मंगनी पट शादी करायचं ठरलं
दोन्ही घराना लग्नाचे वेध लागले
मग  जावयाचं येणं जाणं सुरू झालं
कधी मस्का मारून तर कधी आईला मध्यस्तीला घालून तो ऋताला बाहेर न्यायची परवानगी घेतच होता
एकदा दोनदा तीनदा चारदा ऋता त्याच्या बरोबर गेली
पण जितक्यावेळा गेली तितकी ती मलूल होत गेली ,  हे उज्वलाच्या म्हणजे ऋताच्या आईच्या लक्षात आलं
मग तो न्यायला आला की ऋता धास्तावलेली असायची
जायला टाळा टाळ करायची , मग शेवटी एकदा उज्वल म्हणालीच तुला योग्य वाटत नसेल तर मोडून टाक लग्न अजूनही उशीर झालेला नाही आणि आपल्यालाही तशी घाई नाही योग आला असं वाटलं म्हणून आम्ही हो ला हो करत गेलो
मग दयानंद्शी बोलणं झालं आणि दोघे प्रधानांकडे गेले आणि नम्रपुर्वक हे शक्य  होईल असं वाटत नाही म्हणून सांगितलं रोहीतही घुश्श्यात होता त्यानेही बेफिकीरपणे ते मान्य केलं इट्स ओ के  म्हणत त्याने विषय आवरता घेतला
मग धाकटी जवळ बोलताना ऋता म्हणाली फार आरेरावी करायचा गं
आपल्या बाबानी सुद्धा कधी चार चौघात आपल्यावर आवाज चढवला नाही
आणि हा ?
पण  आवाज  चढवायचीवेळ का आली?
ऋता म्हणाली त्याला बाईकशिवाय करमत नाही , तो कायम बाईकच वापरतो, आणि अगदी रफ चालवतो
मी कधी कुणाच्या मागे बसलेली नाही मला बाईक ची राईडच माहीत नाही  आणि हा  नुसता उधळायचा
सावरून बसता  बसता माझ्या  नाकीनऊ  यायचे पाठ अवघडायची त्यात हा सतरांदा ओरडायचा नीट बस नीट बस  नीट बस म्हणजे त्याला मागनं असं चिकटून बसायचं
मला नाही जमत असं
परवा  तर त्याने  कमालच केली लगेच जाऊन येऊ म्हणत मला खोपोलीला घेऊन गेला
आणि त्याच्या ग्रूप मधले  सगळे उडाण टप्पू बाईक  वाले त्यात मी आयती मिळाले टाँट मारणार नाही तो आळशी सुचना करणार नाहीतो वेडा
मग मी त्याला सांगितलं बाईक मला काही सूट होत नाही तसा त्याला राग आला काय काय बोलायला लागला
मग मी ही बोलले.. किती गप्प बसणार  होते ?
उद्या याच्या अगाऊपणामुळे  अपघात झाला  आणि मी लिळीपांगळी झाले धाकटीने ऋताच्या तोंडावर हात ठेवला  तिला ती कल्पनाही सहन झाली नाही
जाऊदे आता नाही सांगितलस ना ? आता फिरवत बस म्हणावं बाईक
आपण मात्र आता ही अट घालायची
पण योग बघा कसा लाईनीत जितकी स्थळं आली ती सगळी बाईक्सवारांचीच, जणू हाच मुद्दाम निवडून निवडून स्थळं पाठवत होता
मग शेवटी ऋतानेच विचार केला  शहरात राहयचं तर बाईकवर बसणार नाही असं म्हणून कसं चालेल?
आपल्याला सवय करून घ्यायला हवी
नाहीतर किती स्थळं नाकारणार? म्हणून मग तुषार दळवीचं स्थळ तिने मान्य केलं
खरं संगायचं तर रोहीत नंतर ती कुणालाही मान्यच करणार होती
पसंत असणं जे म्हणतात ते तिच्या बाबतीत घडून गेलं होतं , पण  ती हा विचार शिताफीने झटकायला शिकली होती तुषार पण चांगला होता हौशी होता प्रायोगीक रंगभूमी वर त्याचा वावर होता एक दोन जाहिरातपटात तो झळकला होता आणि मुख्य म्हणजे त्याला ऋता बेहद पसंत होती तिचं आधीचं लग्न ठरून मोडलय याने त्याला काही फरक पडत नव्हता
पण योग बघा कसा त्याने सुद्धा  सेकंड हँड बाईक नुकतीच घेतली होती , गाडी चांगली होती उत्तम कंडीशन मधे होती त्यामुळे तो खुशीत होता आणि त्याने पण सरप्राईज द्यायला ऋताला घेऊन एकवीरा दर्शन ट्रीप ठरवली ही दोघं आणि शिवाय सोबत अजून त्याचे दोन बाईकस्वार मित्र
निघाले आणि चेकाळले .. ही प्रचंड घाबरली याचं लक्षच नाही
शेवटी जसा योग होता तसं घडलं आणि  बाईक कलंडली तो सराईत होता तो उडी मारून बाजुला झाला
हिचा पाय चालत्या बाईक मधे अडकला बिचारी फरफटली गेली आणि बाईक पायावर पडून  मेजर फ्रँक्चर झालं
अगदी  बावळट मुलगी आहे तो वैतागून म्हणाला जरा बँलंस करता येत नाही म्हणजे काय ? तो खूप तणतणला . ऋताला अँडमीट करावं लागलं मांडीचं हाड मोडलं होतच पण पाठीच्या मणक्याला जिवघेणा मार लागता लागता वाचला होता पण तरी पंधरा दिवस तिला  हाँस्पीटल मधे रहावं लागणार होतं
आणि डाँक्टरांच्या मते शा महिने तरी नाँर्मल चालायला लागणार होते, तुषार एकदाही हाँस्पीटल मधे डोकावला नाही त्याचे आई  बाबा येऊन गेले म्हणाले तो सध्या बदामीला जायच्या गदबडीत आहे एका मोठया अँडचं शूट आहे, लग्न मोडल्यातच जमा होतं उगीच कशाला लटकवत ठेवायचं म्हणून दयानंदनेच सांगून टाकलं तरी त्याचे आई बाब म्हणाले तिला पूर्ण बरी  होऊदे मग बघू
तरी दयानंद म्हणाला ते नंतरचं झालं पण अत्ता आम्ही तुम्हाला मोकळे करतोय
मग आता हा विषय कोणीच काढायचा नाही असं ठरलं पण एक अजबच योग आला , काय झालं असेल सांगा?
 एका मलुल संध्याकाळी रोहीत सूंदर टवटवीत फुलं घेऊन तिला भेटायला आला
सोबत गेटवेल सून चं कार्ड आणि खूप सारी  चाँकलेट्स
त्याचं येणं अनपेक्षीत होतं त्याहून अनपेक्षीत होतं त्याने भरल्या डोळ्याने तिच्याकडे बघणं
तो कोसळलाच तिच्या जवळ, त्याचा आवेग सांगत होता  ते नाटक नव्हतं
त्याचा हात हातात घेत ऋता म्हणाली इतकं काही झालं नाही सहा महिन्यात तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला तू कधी आणि किती बरी होणारेस या वर मला चर्चा करायची नाही, एकच रिक्वेस्ट आहे आता मला  अव्हेरू नकोस... मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत मग दयानंद उज्वला दोघेही रिलँक्स झाले तेंव्हा तो  परत आला तेंव्हा  तो म्हणाला होनी को कौन टाल सकता है
का ? असं का  म्हणतोय्स? एक सामुहीक प्रश्न उभा राहिला
तो हासून म्हणाला त्या दिवशी मोठया मिजाशीत  मी हिच्याशी भांडलो त्या नादात ठरलेलं लग्न मोडलं पण व्हेरी नेक्स्ट मुव्हमेंट मला रियलाईज झालं ते आयुष्याला आलेलं भकास पण , स्वत:शी हे मान्य करायला वेळ लागला की मी ऋता शिवाय जगूच शकत नाही
मग मान्य केल्यावर मी पहिली गोष्ट काय केली तर माझी प्राणप्रिय बाईक विकायला काढली
दोन तलवारी एक म्यानात राहू शकत नाही म्हणतात ना सगळे हसले  तसं हसू आवरतं  घेत तो म्हणाला ती बाईक नेमकी विकत घेतली तुषारने, तो पण जाम खुष झाला म्हणाला नुकतच लग्न ठरलय  आणि अशी कंडा बाईक मिळाली आहे
तू बाईक ओळ्खली नाहीस?
ती मान खाली घालून म्हणाली नाही ओळ्खली, इतकं लक्ष नव्हतच
माझी पण काही वेगळी परिस्थीती नव्हती
आई बाबांचा विचार करून मी हे लग्न मान्य केलं होतं , मग आता जमवुनच घ्यायचं तर ..
दोघानी एकमेकाकडे बघितलं त्यात बरच काही एकमेकाना सांगून झालं
मग एकदम तो म्हणाला पण तू पडलीस  कशी?  तू बाईकवर  नीट सावरून बसायचीस ती लाजली म्हणाली काय सांगू?
तुषार जरा फिल्मी होता ना त्याला प्रेम व्यक्त करण्याचे ते च मार्ग परिचीत
आरशात बघून डॊळे मारणं वगैरे
 मी सांगतेय पुढे बघून चालव पुढे बघून चालव
मग तर तो चेकाळलाच चालत्या बाईकवर  तो माझा हात खेचायला लागला
का? रोहीतने विचारलं
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवावा म्हणून
धाकटी म्हणाली  म्हणजे साधा  खांद्यावर  हात पण ठेवायला तयार नव्हतीस?
या अचानक आलेल्या प्रश्नावर ऋता अशी फक्कड लाजली
आणि रोहीत का दिल तो गार्डन   गार्डन हो गया
आता लग्नाचा योग असेल तेंव्हा दोघांवर अक्षता पडतील तेंव्हा पडतील
पण  दोघं एकत्र येण्याचा सुवर्ण योग दोघांच्या नशिबात होता तो मात्र जुळून आला
हे खरं



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी