नं संपणारी गोष्ट

 मला गणीतातलं फारसं कळत नाही, पण तरी लक्षात राहिला तो हच्चा
जो  गरजेपुरता घ्यायचा असतो आणि गरज सरल्यावर परतही करायचा असतो नाहीतर हिशोब गडबडतो
तसेच आपल्या लहानपणातही काही हच्चे असतात जे गरजे पेक्षा  जास्त आणि बरेचदा गरज नसताना आपल्यात लुडबुडतात आणि ते हच्चे म्हणजे आपल्या न कळत्या वयात आपली ज्यांच्याशी तुलना केली जाते अशी आदर्श मुलं  जी लवकर उठतात, भर भर आवरतात दुध प्यायला खळखळ करत नाहीत त्यांचे पाढे पाठ असतात, गृहपाठ पूर्ण करून ते रोज मनाचा जास्त अभ्यास करतात रोज पाच ओळी शुद्धलेखन खळ खळ नं करता लिहितात, विना तक्रार डोक्यावर तेल थापून घेतात, घरच्यानी केस कापायला सांगितले की  तत्परतेने केस कापून घेतात
तो बघ कसा म्हंटलं की कोणी नंसांगता त्या परफेक्ट मुलाची छबी आपल्या डोळ्यासमोर जरा जास्तच आकारमानासह उभी राहते
आमच्या लहानपणी तो बघ कसा हे वाक्य कानावर आलं की आमच्या आळीतल्या समस्त मुलांच्या डोळ्यासमोर तुळपुळ्यांचा उमेश उभा राहयचा
रमाकांत तुळपुळ्यांचा हा चिरंजीव, तसा नवस सायास करून प्रतिक्षा करायला लाऊन  झालेला
लहानपणापासूनच  कांताकानी त्याला शिस्तीत वाढवला, कारण एकच अतीलाडानी  मुलगा वाया जायला नको
प्रत्येक गोष्ट करायची ती कांताकानी सांगितली म्हणून
सकाळी दुध प्यायचं कांताकांचा हुकूम आहे म्हणून दुधात साखर घालायची नाही का तर कांताकानी सांगितलं म्हणून घरची इतकी सुबत्ता पण कधी टोस्ट बिस्कीट त्याला घरी चाखायला मिळायचं नाही का तर कांताकांच्या मते त्यामुळे मैदा पोटात जाऊन चरबी वाढते
रोज सूर्य नमस्कार घालून झाले की पोळी भाजी खायची शाळेच्या डब्यात मुरांबा
कधी कधी वहिनी त्याच्या हातावर दहा पैसे लपत छपत ठेवायच्या तेंव्हा त्याचा इवलासा जिव बाहेर ऐकू जाईल इतका धडधडायचा
तरी तो आमच्या आळीतला कायम आदर्श मुलगाच राहिला
आम्ही मोठे झालो तो नुसताच वाढला, अभ्यासात ठीक ठाक पण व्यवहार द्न्यानच नाही
दिसायला गोरागोमटा पण डोळ्यात तेज नाही चमक नाही आपल्याकडे काही कमी नाही याची जाणीव नाही
आम्हाला आमच्या बापानी वेळप्रसंगी मारलं झोडपलं  कान पिळले पण जगायला शिकवलं
आम्ही घरात कमी आणि नाक्यावर जास्त
आणि उमेश तो घरात दिसला तरी कुठेच नसायचा
अगदी दर शनिवारी मारुतीला तेल वाहयला जातानाही कांताका त्यांच्या जुन्या नोकराला बरोबर पाठवायचे
गजाबाला कळायचं या मुलानी आपल्या वयातल्या मुलांच्यात मिसळायला हवं खेळायला हवं पळायला हवं
मग तोच पाच मिनिटासाठी त्याला आमच्यात सोडून जरा फिरून यायचा
पण ती पाच मिनिटं सुद्धा याला जड जायची कारण बोलायलाच काही नसायचं, साधे साधे पी जे सुद्धा त्याला कळायचे नाहीत, त्यातल्या त्यात माझ्याशी बोलायचा पण ते ही असं खास नाही
असं होता होता म्हणायची पद्धत असते ना  तसं इथे म्हणायची गरज आहे
कारण काही घडतच नव्हतं उमेशच्या आयुष्यात.. जसा सोमवार तसा रविवार
जानेवारी तसाच डिसेंबर.. दिवाळीला  नवीन कपडॆ मग वाढ्दिवसाला, वाढदिवसालाही फक्त आम्हालाच बोलावणं मी आणि आमच्या घरचे  बेतही ठरलेला गोडाचा शिरा आणि बटाटेवडा
असं होता होता कांताकाना मुलच्या लग्नाचे वेध लागले
चांगली सुशील संस्कारी एकारांती गोरीपान सून हवी होती कांताकाना, उमेशला कशी हवीये बायको? मुळात हवी आहे की नको? हा प्रश्नच  कांताकाना पडला नाही
त्यांच्यामते निर्व्यसनी  पदवीधर सधन घरातला मुलगा म्हंटल्यावर स्थळांची लाईन लागेल
मुलींचे बाप सकळ संध्याकळ आपल्या घरच्या चकरा मारतील
पण तसं काही झालं नाही , एक दोन स्थळं आली पण उमेशाचा अवतार बघून मुलीनीच नकार दिला
एक दोघी तोंडावर हसल्या
आणि  कांताकानी आपल्या बालमित्राला गळ घातली  त्याचीही एकुलती एक मुलगी लग्नाची होती
अनघा ने ऐकूनच प्रस्ताव नाकारला  आणि वर उपदेशाचे चार शब्द कांताकाना सुनावले
पदवीधर झालेला शाळकरी मुलगा म्हणाली ती उमेशला
आमच्या लहानपणचा हा हच्चा आता वेगळा पडला होता , मागे पडला होता
आणि अशावेळी दामलेमास्तरानीच अनघा बरोबर त्याला जागृती मंच या समाजसेवी संस्थेत पाठवलं
त्यांचं कार्यालय तसं आमच्या परिसरातच होतं , बरेच आमच्या नेहमीच्या भेटण्यातले दोस्तलोक त्या संस्थेचे  सभासद होते, संस्थेची प्रत्येक मिटींग अटेंड केलीच पाहिजे ही एकच  अट सभासदाना असायची
अनघा  उमेशला घेऊन गेली तेंव्हा टाळ्या वाजवून आणि चाँकलेट देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं
आणि तिथे एक भलामोठा आरसा होता त्यात दोन मिनिटं स्वत:ला निरखून  जे  स्वत: बद्दल  मनात येईल ते सभासदांसमोर  बोलायला सांगण्यात आलं ही तिथली पद्धतच होती
आणि हाच ठीणगी पाडणारा क्षण ठरला
त्या भल्यामोठया आरशात स्वत:चा  सुबत्तेने पोसलेला देह बघताना उमेशला भलामोठा हवा भरलेला फुगा पहात असल्याचा भास झाला
या आधी कांताकाना चालत नाही म्हणून त्याला मनसोक्त आरशातही  पाहयला मिळालं नव्हतं
तो फक्त रडला रडला आणि आणि रडून रडून मोकळा झाला
दोन तासानी घरी परतला तो वेगळाच उमेश होता
आणि मग जागृतीमंचनी उमेशचा ताबाच घेतला , इथे असं होता होता इथे म्हणणं योग्य ठरेल , कारण जागृती मंचच्या प्रत्येक उपक्रमात उमेश आग्रभागी दिसायला लागला , आपणहून सहभाग घेऊन कार्यक्रम आखायला लागला
तो काळ असा होता की गिरण्या संपामुळे बंद पडल्या होत्या आणि बारबालांचा प्रश्न उग्र रूप धारण करत होता
जबरदस्ती अनेक मुली त्यात लोटल्या जात होत्या आणि आपल्याला कोणी वाली नाही या भावनेने त्या ग्रस्त झाल्या होत्या
अशावेळी शांतपणे त्याना विश्वासात घेऊन त्यांच प्रबोधन करणं गरजेचं होतं स्थानीक पोलीसांचं सुद्धा जागृती मंचच्या  लोकाना सहकार्य होतच
आता कांताकांच्या कह्यात आपला नायक राहिला नव्हता आणि त्याचं खापर ते अनघावर फोडत होते
आता आपला मुलगा रात्री बार मध्ये जातो हे ही त्यांच्या कानावर गेलें आणि कांताका खरे बिथरले
कोकणात जाऊन याच्यासाठी नक्षत्रासारखी सूंदर मुलगी घेऊन येतो या जिद्दीने ते बायकोला घेऊन ते कोकणात आपल्या गावी गेले उमेश इथे एकटाच असताना एक अन्पेक्षीत घटना घडली
 एक दोन केसेस कळल्यावर  डांसबार वर लक्ष ठेऊन ज्या वयाने खूप लहान पण फसवून मुंबईत आणून दलदलीत अडकवलेल्या मुलीना सोडवायचं चँलेंज या संस्थेने घेतलं आणि धाडस दाखवत कारवाई के्ली त्यात आपला धडाडीचा नायक पुढे होताच
ज्या तीन मुली सोडवल्या त्यात कजरी मोहोत्ताय  ही सतरा  अठरा वर्षांची काळी सावळी  गोबर्‍या गालांची नितळ कांतीची कुरळ्या केसांची मुलगी  संस्थेच्या भरवशावर पोलीसानी त्यांच्या सपूर्द केली
आधी  हिला लपवा, हिचा पत्ता कुणाला लागू देऊ नका आणि मग तिची माहीती घेऊन सुखरूप तिच्या गावी पाठवायचं बघुया असं पोलीसांच्या मताने ठरलं
मग सुरक्षित जाग कुठे तर उमेशकडेच कुणालाच संशय येणार नाही
म्हणून तिची रवानगी तुळपुळ्यांच्या कर्मठ घरात करण्यात आली , सहा महिन्यात डांसबारच्या लाईफला सेट झालेली मुलगी अशा बंदीस्त घरात आश्रयाला आली
तिला फसवून आणली होती हे खरं आहे पण तिची या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती
हे चांगलं हे वाईट असा विचार करायची सुद्धा तिला गरज वाटत नव्हती
रात्रभर जागायचं दिवसा झोपायचं पाचला उठून मशेरी लाऊन मेकपला बसायचं डोळ्यात चंपावती सुरमा घालायचा आणि टेंपो न्यायला आला की टेंपोत बसायचं ठुमके लावायचे  त्याची प्रँक्टीसही एकमेकीचं बघून करायची ही  लहान होती म्हणून हिला कोणी  फ्रंटला पाठवायचं नाही त्याही परिस्थीत जपणं असायचं
 तरी एक दोघांची या उफाड्याच्या मुलीवर नजर जातच होती
आणि त्याची हिला जाणीव आणि गम्मत दोन्ही वाटत होती
पण  या घरी आल्यावर तिला इतकं जाणवलं की आपल्या भल्यासाठी हे लोक धडपडतायत, आणि हे जर भलं आहे तर आपण जे करत होतो ते वाईट होतं
तरी ती आपल्या सवयी बदलू शकत नव्हती , तिला सुरमा लागायचाच जर्दा लागायचा कधीतरी मच्छी करीच्या स्वादाने ती  बेचैन   व्हायची
पण तरी तिने याघरात आपणहून  एक रुटीन सुरू केलं होतं आंगण झाडणं, झाडाना पाणी घालणं धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं .. तिचं  वावरणं अवती  भवती असणं उमेशला आवडायला लागलं होतं
तिचं तोंडातल्या तोंडात भर भर बोलणं आता उमेशला कळायला लागलं होतं
तिच्या  गावाला तिच्या लोकांशी संपर्क साधला जात नव्हता दिवसा मागे दिवस जात होते आणि नाईलाजाने तिला सुधार गृहात पाठवायचं ठरलं त्याला अनेक कार्यकरत्यानी विरोध दर्शवला
सुधार गृहात पाठवणे हा उपायच होऊ शकत नाही , हिचं लग्न लाऊन दिलं तर खर्‍या अर्थाने तिचं पुनर्वसन होईल आणि आपल्याकडे एक उदाहरण असेल
मग तिच्यासाठी सुयोग्य असा मुलगा बघितला जाऊ लागला आणि उमेश अस्वस्थ झाला त्याने आमच्याकडे येऊन हे सांगितलं आम्ही हादरलोच कांताकांचा विचार कर आम्ही म्हणालो
एकदा लग्न झालं की ते काही करू शकणार नाहीत, मला कजरी आवडते तसा मी ही तिला आवडतो मला माहीत आहे तोसंकोचत म्हणाला तरी आमच्या आईने तिला विचरलं उमेशसे शादी बनायेगी? ती लाजून कहीतरी बोलली आणि आमची खात्री पटली
गावाला कांताकांच्या कानावर घरी मुलगी आणून ठेवल्याची खबर गेलीच होती पण तेंव्हा च उमेशच्या आई न्हाणीघरात  घसरून पडल्या होत्या आणि मांडीचं हाड मोडलं होतं त्यात यांच्या धकाखाली राहून त्या अशक्त होत्या त्यामुळे तडकाफडकी निघून येणही शक्य नव्हतं
पण तरी ते कसे बसे आलेच पण तो पर्यंत म्हणजे आधी दोन दिवस घरातल्या घरात लग्न उरकून दोघे पती पत्नी झाले होते आणि जागृती मंचनी या विवाहाला बरीच प्रसिद्धी दिली होती
तेंव्हा काही अत्तासारखे भरमसाठ चँनल्स नव्हते पण तरी या विवाहाची चर्चा खूप झाली , जागृती मंचचं हे एक मिशन होतं पण उमेशच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग होता हे कॊणी लक्षातच घेत नव्हतं इथे उमेश थोडा संस्थेपासून दुरावल्या सारखा झाला गाजा वाजा इतका झाला होता की कांताका उघड उघड विरोध करू शकत नव्हते त्यात वहिनींची तब्येत अशी तोळामासा
पण कोणी नं सांगता कजरीने वहिनीची सेवा करणं सुरू केलं शुश्रुशा म्हणजे  प्रत्येक गोष्टीत त्यांना कजरी लागायची ,
आता कजरीला मराठी समजायला लागलं होतं जर्दा खाणं बरच कमी झालं होतं आणि तिला हवा असलेला सुरमा  घरपोच  येईल याची सोय उमेशनी केली होती
कांताकानी बायकोला बजावलं ही माझ्या नजरेसमोर येणार नाही याची जबाबदारी तुझी
पण ते कसं शक्य होतं एका घरात राहयचं तर ?... एकुलता एक मुलगा लोकांच्या नादी लागून फसला असं कांताका डोक्याला हात लाऊन म्हणत असले तरी
 उमेश खरच  भाळला होता तिच्यावर
ती अडाणी आहे तर मी तरी कुठे शहाणा आहे? असा  सवाल करून तो  स्वत:च हसायचा
दोघात आठ वर्षांच अंतर होतं पण दोघं एकत्र असले की ते जाणवायचं नाही गप्प बशा इतकं मराठी ती शिकली होती  उमेशच्या आईला आपल्या लेकाचं सुनेशी असं  समरसून जाणं फार फार आवडायचं हे सौख्य तिच्या वाटेला कधीच आलं नव्हतं
आणि कांताकाना तेच पहावत नव्हतं
त्याना तिडिक जात होती आणि ते कोणाच्या नकळत भुयार खणायला लागले होते
इथे कजरी सासूबाईंच्या सुचने नुसार फोडण्या मसाले , आमटी खिचडी यांचे धडे घेत होती आणि कांताका तिच्या विरुद्ध मोहीम उघण्यात व्यग्र होते
त्यानी खूप बंधनं लादली त्या मुलीवर,  देवघरात यायचं नाही
ते जेवत असताना समोर जायचं नाही, सुर्योदयाआधीच अंघोळ उरकायला हवी
पाहुणे आले तर मागच्या अंगणात बसायचं , उमेशसमोर त्यांचं काही चालायचं नाही पण हल्ली कांताका घरी असल्याने व्यवसाय त्याला बघावा लागत होता त्यामुळे बराच काळ तो बाहेरच असायचा
कजरी हळू हळू कांताकांच्या तावडीत येत गेली आणि उमेशच्या हे लक्षात यायला जरा वेळ लागला
त्यात व्हायचं ते झालं साधा कांताकांचा अडकित्ता घेण्यावरून कांताकाना  संधी मिळाली
आणि त्याचा त्यानी गहजब केला कजरी भेदरली वहीनी कासावीस झाल्या नवर्‍याला बोलू शकत नव्हत्या त्या कजरी वरच फुटल्या
कजरी संपलीच , रात्री उमेश आला थकला होता तरी त्याला बळे बळे जेवायला घालून झाकपाक उरकून तिने दिवे मालवले
सकाळी उमेश उठला तर उशाशी एक कागदाचा चिटोरा  मिळाला त्यावर इतकच लिहिलं होतं नही जमता
अंगावरचे सगळे दागिने तिने उतरवून ठेवले होते फक्त मंगळसुत्र तेव्हढं नव्हतं
कांताकानी मनातल्या मनात विजयोत्सव साजरा केला , वहिनी ढासळल्या त्या ढासळल्या
अवघ्या सात आठ  महिन्याचा संसार असा मुका होऊन गेला
उमेशने खूप शोधलं खूप शोधलं  संस्थेच्या लोकाना त्यानी लांबच ठेवलं ती पून्हा बार मधे जाणार नाही याची त्याला खात्री होती पण तरी त्याने चकरा मारल्या
पण कजरी नाही मिळाली
पून्हा असं होता होता  दहा बारा चवदा  वर्ष गेली
लग्नाचा वाढदिवस आणि कजरीला आवडायची म्हणून दिवाळी उमेश दणक्यात साजरी करतो
बापावर सूड उगवल्या सारखा पैसा कमावतो आणि खर्च करतो
कांताकांशी एक शब्द बोलत नाही, ते काही बोलले तर असं रोखून बघतो की त्यांची वर बघायची हिम्मत होत नाही , वहिनी अंथरुणाला खिळून आहेत पैसा इतका आहे की दोन दोन नर्सेस त्यांच्या दिमतीला आहेत तरी त्या अजून कजरीची आठवण काढतात, जाताना सगळे दागिने काढून गेली पोर
तिला कसलाच मोहं नव्हता या माणसाने आपला शब्द खरा करायला त्या निष्पाप भोळ्या  मुलीला घालवली
फारमोठं पाप घडलं म्हणत टीपं गाळतात, त्यांची कशानेच समजूत पटत नाही, आम्ही गेलो की विचारतात कुठे दिसली का रे , ती येईल का रे परत?
आणि  परवा  भल्ला बंगल्यात  एका चित्रपटाचं शुटींग होतं मी युनीट मधे असल्याने जातीने हजर होतो
जेवणाचे  डबे आले  शमीम साहब सांगायला आले चलिये आज महाराष्ट्रीयन लझीज खाना है आप पसंद करोगे
टेबलं लावली होती तिथे मी जायला लागलो तर मुगाच्या खिचडीचा अ गदी ओळखीच सुगंध
चाखल्यावर तर माझी खात्रीच पटली अगदी वहिनींच्या हातचे चव
मी  लक्षमणला म्हणालो तुमच्या शेटचं कार्ड दे रे  तो म्हणाल शेट नही है  दीदी है
त्याने बोटाने दाखवलं त्या दिशेला मी पाहिलं तर हिशोब करत बसलेली कजरी दिसली
निटनेटकी स्मजुतदार आता वयानुसार थोडी शांत झालेली
मी तिच्या समोर जायचा मोहं टाळला मी लक्ष्म्णलाच म्हणालो जा उनका नंबर ले आ
त्याने जाऊन कार्डच आणून दिलं
सातरस्त्याचा पत्ता होता आणि लँडलाईनचा नंबर
आणि ठळक अक्षरात नाव होतं कोजरी ओमेश
कल्पना करा हे कार्ड जेंव्हा उमेशच्या हातात देईन तेंव्हा काय होईल?



Comments

  1. KHOP chan Tinetan kastha karun Paisa kamvacha chan nav pan navrache lavle khop chan

    ReplyDelete
  2. Kharach na sampnari gosta👍

    ReplyDelete
  3. अतिशय सुन्दर कथा...आशयघन......ह्या कथेवर आधारित एक चांगला चित्रपट काढू शकता तुम्ही काका...👌👌

    ReplyDelete
  4. केवळ अप्रतिम.......👌👌🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी