पराधीन

जयश्रीचं दार हल्ली बंदच दिसतय
आधी लक्ष गेलं नाही, आणि लक्षात आल्यावर सारखच लक्ष जायला लागलं
ही अशी नं सांगता कुठे जात नाही
फोन केला तर फोन बंद , आणि शेजारी कुणाला विचारायची सोयच नाही
कारण जयश्रीचा शेजार्‍यांशी फारसा संबंध नाही
त्याला कारणही तसच आहे, आमच्या जयश्री बद्दल बरेच गैरसमज आहेत 
आणि त्यात तसं तथ्यही आहे
हो! म्हणजे जयश्रीचे तिच्या मोठ्या मेव्हण्याशी संबंध आहेत
इन अ रिलेशनशीप म्हणतात तसे
पण म्हणून काही आम्ही जयश्रीला दोषी समजत नाही तिची कथाच तशी आहे
जयश्री आणि मनोरमा दोघी बहिणी, जयश्री पेक्षा मनोरमा पाच वर्षानी मोठी
इतकाच फरक नाही
तर मनोरमा रुपाने लावण्यवती, अप्रतीम सौंदर्‍याचा उत्कृष्ट नमुना
हेच सौंदर्य बिचारीला घातक ठरलं
हे जे काही नातेवाईक असतात ना! बोलू नये पण कळत नकळत बरेचदा ते तुमच्या आयुष्यात नको इतकी ढवळा ढवळ करतात
लहानपणापसून जयश्रीला या मनोरमाच्या सौंदर्‍यामुळे विनाकारण अवहेलना सोसावी लागली अगदी मनोरमा महाराणी तर जयश्री तिची दासी म्हणण्या इतपत मजल गेली होती पून्हा हे सगळं मजेत
जयश्री मुळातच समंजस त्यात तिला तिच्या शाळेतल्या बाईंचा आधार
बाईंंमुळे जयश्री अनेक उपक्रमांशी जोडलेली राहिली आणि प्रगल्भ होत गेली
मनोरमाचं तसं झालं नाही
सौंदर्य हा एक्मेव तिच्या आयुष्याचा आधार बनला
वय वाढत गेलं तसं सौंदर्य खुलत गेलं आणि समज कमी होत गेली
सौंदर्याच्या जोरावर आपण काहीही करू शकतो असा गैर समज वाढला आणि तो वाढवण्यात त्यांच्या रिकामटेकडी श्रीमंत आत्याचा हात होता
गोड गोंडस पपी पाळावं तशी आत्या मनोरमाला जपत होती
जयश्रीच्या वडिलांची परिस्तिथी उत्तम होती पण तरी मनोरमाचे वाट्टेल ते हट्ट पुरवण्यात ते कमी पडायचे ते हट्ट ही आत्या आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी पुरवायची तिचा जयश्रीवर राग होता कारण जयश्रीला तिच्याकडून काहीच नको असायचं
मनोरमा काँलेजात असताना आत्या तिचं लग्न आपल्या श्रीमंतीच्या जोरावर एका नावाजलेल्या फिल्मस्टार बरोबर करायला निघाली खटपट करून तिने मनोरमाला त्याला भेटवलं सुद्धा
बोलू नये, पण अशा लावण्यवती त्याला पैशाला पासरी मिळू शक्ल्या असत्या
त्यांच्या भेटी गाठी हे त्याच्यासाठी नेहमीचं होतं , आत्याने पैसे खर्च करून त्या दोघांचे फोटॊ मिडियात छापून आणले , शेजारी पाजारी जरा गाजावाजा झाला आणि विरून गेला त्या फिल्मस्टारवर त्याचा काही परिणाम झाला नाही पण आत्याच्या लक्षात आलं नाही मनोरमा मानसिक रित्या ढासळली
त्याच्या वरचढ स्थळ आणते म्हणत आत्या इरेस पडली आणि मनोरमाची फरफट वाढली आईबाबा मधे पडायला हे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं आणि जयश्री मनोरमाला सावध करत होती तर ते आत्या होऊ देत नव्हती
मनोरमाच्या ढासळत चाललेल्या मानसिक स्थितीचे पदसाद जेंव्हा रोजच्या आयुष्यात उमटायला लागले तेंव्हा बाबा जागे झाले
दिवसातून दहावेळा वजन चेक करणं, सतत केस विंचरणं , सतत चेहर्‍यावर हा ना तो लेप थापून बसणं आणि वर तो गाँडी बेढप मेकअप
त्याबद्दल जरा नाराजी दाखवली की टोकाचा त्रागा करणं सतत स्वत:ची तुलना कुठल्यातरी अभिनेत्रीशी नाहेतर माँडेलशी करत राहणं स्वताशीच बोलत राहणं
आजार बळावल्यावर जयश्रीने वैद्यकिय सल्ला घ्यायला भाग पाडलं लगेच आत्या म्हणाली मोठीला वेडी ठरवून स्वत:चा शाहणपणा सिद्ध करतेय
पण बाबानी ऐकलं नाही डाँक्टरांच्या मतेही आजार बळावला होता
शास्त्रीय भाषेत त्यानी आजाराचं लांबलचक नाव सांगितलं त्याचा मतितार्थ इतकाच होता की ती आभासी जगात रमायला लागली होती जिथे ती सर्वश्रेष्ठ होती आणि बाकीचे अगदीच सुमार
तिचे केस गळायला लागले होते, सौंदर्यप्रसाधनंच्या अती वापराने कांती निस्तेज कोरडी पडायला लागली होती जितके दुष्परिणाम आधीक तितकी ती हट्टी होत गेली
शेवटी बाबांच्या मर्जीविरुद्ध तिला अँड्मीट करावी लागली
महिनाभर हाँस्पिटल मधे राहून ती घरी आली पण औषधाच्या हेवी डोसेस मुळे ती स्वाभावीक कधीच वागू शकली नाही खूप उदासीन असायची
पण डाँक्टर म्हणाले या उदासिनेतूनच तिला बाहेर काढताना आपण वेगळी जाणीव तिला करून देऊ, जयश्रीशी बोलून डाँक्टर भलतेच इंप्रेस झाले होते तू तिच्या सानिध्यात राहिलीस तर नक्कीच फरक पडेल असं डाँक्टर म्हणाले
पण मनोरमाचा आत्याच्या बोलण्यामुळे सर्वाधीक जयश्रीवरच राग होता
ती काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती, मग कोणी म्हणालं हिचं लग्न लाऊन द्या त्यानी नक्की फरक पडेल.. पण ते ही सोप नव्हतं
कितीजणाना तिने न बघताच नाकारलं, फ्टकारलं
जे काही एक दोन बघायचे कार्यक्रम झाले त्यात ती इतका गाँडी मेकअप करून बसली की बोलणंही शक्य झालं नाही
मग सुधीर गोवत्रीकरचं स्थळ सांगून आलं
सहा फुटी आडव्या खंद्याचा तगडा गडी, एका परदेशी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी , आजारी आईमुळे लग्न टाळत होता दोन वर्षांपूर्वी आई गेली मग मित्रमंडळीनी समजावलं म्हणून लग्नाला तयार झाला
दाखवण्याचा असा खास कार्यक्रम केलाच नाही जस्ट दोघाना भेटवलं, त्याला मनोरमा पसंत पडली
जयश्री सांगत होती आपण त्याला मनोरमाच्या आजाराची कल्पना देऊया
पण बाबा हळवे झाले होते काही करून त्याना त्यांच्या लेकीचं लग्न उरकायचं होतं
मग मुहुर्त चांगला आहे मुहुर्त चांगला आहे म्हणत घाई घाईत दोघांचं लग्न लाऊन दिलं, तो मुहुर्त म्हणजे सुधीरच्या आयुष्याची वाताहात लावणारा मुहुर्त ठरला
पहिल्या दिवशी संशय आला आणि दुसर्‍या दिवशी त्याची मनोरमाच्या वेडेपणाबद्दल खात्रीच पटली
बाबानी हात जोडले माझ्या मुलीला टाकू नका
सुधीरनेही धीराने घ्यायचं ठरवलं पण ते त्याच्या एकट्याच्याने शक्य नव्हतं
तरी त्याने तिचे उपचार समजून घेतले सिमटम्स वर लक्ष ठवेलं डाँक्टरांशी कंसल्ट केलं ती पूर्ण बरी होणार नाही हे वास्त्व त्याला कळून चुकलं होतं, तो आतून पोखरला जात होता
जयश्रीला त्याची तडफड समजत होती आपल्याकडून तो फसवला गेला आपण त्याचे गुन्हेगार आहोत या जाणिवेने ती त्याच्या जवळ गेली, आत्या म्हणाली तू कशाला मधे पडतेस? त्यांच ते बघून घेतील
पण जयश्रीने ऐकलं नाही, तो मनोरमाची काळजी घेत होता तर ती त्याची काळजी घ्यायला लागली त्याच्या आवडीचा स्वैपाक कर, त्याच्या आवडीच्या विषयावर चर्चा कर कधी कँरम तर कधी मनोरमाला सोबत घेऊन पाच तीन दोन
मनोरमाला जयश्रीचं घरी असणं ही खटकत होतं तुम्ही मला वेडी समजता पण मी वेडी नाहिये उलट मी जास्त विचार करते
आत्या पण तिला चुचकारताना आगच लावत होती
आपल्याकडॆ बहुतेकजण फक्त हातात देगड घेऊन फिरणार्‍यालाच वेडा सामजतात
वेडेपणाचे सुद्धा प्रकार आहेत, स्तर आहेत, छटा आहेत हे कोणी लक्षातच घेत नाही
तसे पूर्ण शाहणे आपण कोणीच नाही पण स्वत:ला सतत सर्वश्रेष्ठ मानत राहणं आणि आपला इगो आणि मानपान बघत राहणं हा वेडेपणा नाहीतर काय आहे?
शेवटी ती आक्रमक झाली आणि डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला बेंग्लोरला एक नर्सींग होम मधे भरती करण्यात आलं
मधे जयश्रीचे वडील वारले जायच्या आधी त्याने सुधीरची क्षमा मागितली
मग जयश्री आणि सुधीर राजरोसपणे एकत्र राहयला लागले जयश्रीच्या आईनेही काही आक्षेप घेतला नाही कारण डाँक्टरानी स्पषट सांगितलं मनोरामाचा आजार बळावलाय, आणि तो बरा होण्याच्या पलिकडॆ आहे
मनोरमाचा आजार जयश्रीमुळे बळावला असा समज करून घेणारे काही शहाणे तिच्या अवती भवती होते आणि त्यावर विश्वास ठेऊन मिटक्या मारत चर्चा करणारे शाहणे तर बरेच होतेम्हणून जयश्रीचा कोणाशी फारसा संवाद राहिला नव्हता
पण म्हणूनच कुलूप लाऊन ही गेली कुठे? हा प्रश्न अस्वस्थ करणारा होता
पण आज तिचा फोन आला
म्हणाली आम्ही दोघे आईला घेऊन भोरला आलोय इथे सुधीरचं फार्म हाऊस आहे
येत्या पंधरा तारखेला आम्ही लग्न करतोय तुम्ही दोघानी नक्की यायचय
आणि उमाला फोन द्यायला सांगून तिने खरी गूड न्युज सांगितली जयश्री गरोदर होती आणि लग्नानंतर कायमस्वरूपी ते बेगलोरलाच स्थाईक होणार होते
आणि त्यालाही आईची हरकत   नव्हती ...

Comments

  1. Kas jamat avdha Chan..... �� khup khup Chan.. ������

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर.....👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी