जागरुक

कोपरगावला आमच्या विजीमावशीच्या अंगणात कदंब वृक्षाच्या ढोलीत गजाननाने आपलं रूप साकारलं होतं
ही गोष्ट साधारण पन्नास वर्षांपुर्वीची, तेंव्हा मावशीचे यजमान आणि मोठे दीर मुंबईत एका नामांकीत डाँक्टर म्हणून ओळ्खले जात होते
पण मुलं लहान आणि थकलेल्या सासूबाई म्हणून विजीमावशी जाऊबाईंसबोत कोपरगावातच राहीली होती, मावशीला चार मुलं आणि जावेला सहा, धाकटी दोन जुळी होती
घरचा व्याप खूप पण तरी विजीमावशीचे उपास तापास व्रतं वैकल्य सुरूच असायचं तर अशा घराच्या अंगणात श्री गजाननाने रूप धारण केलं होतं
जरा निरखून बघितल्यावर मावशीला चार हात असलेलं लंबोदराचं प्रसन्न रूप स्पष्ट दिसलं म्हणजे जाणवलं
नशिबाने मावशीचे यजमानही तेंव्हा घरीच होते, त्यानी बघून खात्रीने सांगितल्याशिवाय मावशीचं समाधान झालं नसतं म्हणून मावशी दूपरची जेवणं होईपर्यंत थांबली
आणि दूपारचे सगळे लवंडल्यावर ती हळूच यजमानाना म्हणाली जरा बागेत येता ? मला काहीतरी दाखवायचय
त्याना वाटलं परत गोड बातमी आहे की काय?
त्यानी साशंक स्वरात विचारलं सगळं ठीक आहे ना?
मावशी लाजत म्हणाली तुमचं आपलं काहीतरीच
काका निर्धास्त होत म्हणाले काहीतरी असल्याशिवाय तुम्ही आम्हाला असं बागेत बोलावणार नाही
काहीतरी आहे पण तुम्ही बघून ओळखलत तर
काका अक्षरश: डोकं खाजवत मावशीच्या मागून निघाले
पण डोकं खाजवून सुद्धा काकांना बागेत पोहोचेपर्यंत मावशीला काय म्हणायचय ते उमगलं नाही
कदंबापाशी उभं राहत झाडाकडे दाखवत मावशी म्हणाली जरासं निरखून बघा
आणि अगदी सहज काही दिसलं तर मला सांगा
काकाना निरखायचीही गरज पडली नाही इतका श्री गजाननाचा आकार स्प्ष्ट दिसत होता त्याचं लंबोदर त्याचे चार हात उजवीकडे वर फिरवलेली सोंड
किंचीत कललेली मान एक डोळा तर समोर उभ्या असलेल्या भक्ताच्या अंतर्मनाचा ठाव घेईल असा जिवंत
काका थक्कं झाले, नकळत हात जोडत म्हणाले कसं शक्य आहे?
साक्षात गजाननच अवतरलाय.. हो ना हो ना मला बघताक्षणीच कळलं अत्यानंदाने मावशी घरी सांगायला धावली
पण सावध होत काकानी तिला अडवलं
थांब थांब माझं जरा ऐक
काय झालं? गोंधळत मावशीने विचारलं
बघ पटतय का?
काय? मावशीचा स्वर नकळत जरा त्रासीक झाला
मला अगदी मान्य आहे की ही साजरी करायचीच घटना आहे तरी मी तुला सांगेन हा अनंद तू तुझ्यापाशीच ठेव
का? मावशीला कळेचना कारण म्हणायला ते सासर होतं नाहीतर माहेरापेक्षा तिला इथे प्रेम माया म्मिळाली होती म्हणायला सुद्धा इतकासा दुरावा दोन्ही भावात नव्हता
काका म्हणाले समजून घे
गणरायाने तुला सांगितलं का? मी इथे आलोय, त्याची इच्छा होती त्याने तुला साद घातली तू बघितलस तुला जाणवलं
तसच इतरांबाबत पण असुदे ना.. ज्यांच्या नशिबात असेल त्याना तो समोर बोलऊन दर्शन देईल, ते काम तू का करतेस?
मावशीला जरा पटलं .. मग पूजा पण नको करू?
त्यावरही काकानी एक उपाय सुचवला
या कदंबा शेजारी जरा अंतरावर तुला मी एक तुळशी वृंदावन बांधून देतो
त्याला नमस्कार करून तू तुळशीला फुल पान वहा
कारण तू दोन दिवस या कंदंबाला फुलं वाहीलीस तर चार दिवसात काय होतय ते बघ
आणि चार महिन्यात तर अशी परिस्थिथी येईल की तुझ्या हातात काही राहणार नाही, इथे देऊळ उभारल्या शिवाय लोक राहणार नाहीत, दिवस रात्र रीघ लागेल माणसांची
माणसांची म्हणतोय, भक्तांची असं नाही म्हणत आहे मी,माणसं पुजा करतात, प्रार्थना करतात, प्रदक्षीणा घालतात पण भक्ती नाही करत, तू मात्र भक्ती कर
म्हणजे?
मी सांगतो! तू मानस पूजा कर, मानस पुजेसारखं दुसरं साधन नाही, ध्यानाची ही पहिली पायरी आहे असं समज
या ढोलेश्वराचं रूप डोळ्यासमोर आणून त्याची पाद्यपुजा कर त्याला स्नान घाल त्याला गंधानी लिंपण कर परत जलाचा अभिषेक कर पंचामृताने नाहू घाल,अगदी तुझ्या पदराने पूस मग विविध अलंकाराने सजव, रेशमी तलम वस्त्राने त्याची शोभा वाढव
अनमोल अलौकीक रत्न माणकं त्याच्यावरून ओवाळून टाकं
बघ मगमानसपुजेची किमया... तुला याचं दर्शन घ्यायला कदंबासमोरही यावं लागणार नाही
आणि तुला नित्य दर्शन घडावं म्हणून हा ही कुठे जाणार नाही
पण तुझ्या घाईने इथे माणसं जमायला लागली तर मात्र सगळं विचलीत होईल
मन एकाग्र होण्यासाठी भगवंताने रूप धारण केलं
तू तुझं मन एकाग्र कर
आणि त्याचा प्रत्यय मावशीला चारच वर्षात आला एकदा कोपरगावात असं वादळ झालं मावशीच्या अंगणातली बाग भूईसपाट झाली
फक्त कदंब ठाम असल्या सारखा उभा होता, सगळे आश्चर्य करत होते पण मावशी सगळं माहीत असल्या सारखी शांत होती, तिची मानसपुजेतली एकाग्रता विलक्षण होत चाललेली, तसा तिच्या व्यक्तीमत्वातही बदल होत गेला
पुढे सगळं माहीत असल्यासरखच मावशीच एकूण वागणं असयाचं
सासूबाईनी अखेरचा श्वास घेतला तेंव्हा त्याना थोडा साक्षातकार झाला
धाप लागलेली असताना आपल्या लाडक्या सुनेचा हात हातात घेत त्यानी विचारलं तू तू कोण आहेस?
सगळ्याना वाटलं सासूबाईना भ्रम झाला
मावशी म्हणाली तुम्ही मला ओळखलय आई शांत रहा शांत व्हा
आणि आई सारखी ती सासू सुनेचा हात हातात घेऊन डोळे मिटती झाली
पुढे मावशी ध्यनाला बसली की बागेतला कदंब वारा यावा तसा झुळझुळायचा
ते फार कुणाच्या लक्षात आलं नाही
पण एकदा जाऊबाईने बघितलं तर मावशी बसलेल्या खोलीत तिला दिव्य तांबूस प्रकाश दिसला आणि ती थक्क झाली
तिने मावशीची पाठ सोडली नाही.. नक्की मी काय पाहिलं
तो भास नक्कीच नव्हता?
मावशी म्हणाली जरा आधी विचारलं असतस तर सांगू शकले असते, आता माझ्या काही हातात राहिलं नाही
जाऊबाई गप्प बसली पण नं बोलता आपल्या जावेची सेवा करत राहीली
पुढे अलौकीक सुगंध पसरायला लागला आणि मावशीने ओळखलं आता जायची वेळ आली
अगदी संसारी बाई सारखा तिने त्या दिवशी सुग्रास स्वैपाक केला
सगळ्या मुलाबाळाना नोकरा चाकराना आग्रहाने जेऊ घातला, जाऊबाई घाबरली म्हणाली बाई तुमची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत
मावशी हसली, म्हणाली कदंबासमोरच्या तुळशीची नित्यनियमाने सेवा कर तुझीही घडी येईल
रात्री निजायला जाताना ती यजमानांच्या पाया पडली
अग हे काय? आपल्यात नवर्‍याच्या पाया पडत नाहीत
मावशी सौम्य हासून म्हणाली पती तर माझे आहातच पण मी तुम्हाला माझा गुरू मानलय, मानसपुजेची दिक्षा तुमच्या कडून मिळाली, एका क्षणीक मोहाला मी बळी पडत होते पण तुम्ही सावरलत, तुम्हीच माझे गुरू आहात, आता एकच विनंती आहे
मला आता आद्न्या असावी...
काकांच्या काळजाचा थरकाप उडाला... अगं काय बोलतेस काय?
मी कसा राहीन तुझ्याशिवाय?
माहितिये ते मला, तुमची काही कर्तव्य बाकी आहेत ती पार पडली की तुळशी वृंदावनापाशी येऊन म्हणा मला बोलवायची व्यवस्था कर काका उतावीळ होत म्हणाले मला सांग
मी अत्ता तुझ्यासाठी काय करू?
मावशी म्हणाली कोजागिरीला एकदा रात्री आपण बाहेर व्हरांड्यात उभं राहून दूध प्यायलो होतो तसं अत्ता पिउया?
काका त्याही परिस्थितीत हासत म्हणाले अगं पण आज पौर्णीमा कुठय?
ती म्हणाली आपण समजुया तसं... आपण दोघे तर आहोत ना?
मी दूध घेऊन येते
काका तिला अडवत म्हणाले थांब दूध मी आणतो, आठवतं? त्या दिवशी सुद्धा मीच दूध घेऊन आलो होतो वेलची केशर घालून
काका बोलल्याप्रमाणे गेले
आणि दूध घेऊन ते व्हरांड्यात आले तर भोवतीचा परिसर बघून थक्क झाले असा चंदेरी मंतरलेला चंद्रप्रकाश त्यानी या आधी कधीच अनुभवला नव्हता
अंगणातला प्रत्येक खडा आणि दगड चमकत होता, चंद्राची किरणं  अशी पाझरत होती की त्यांचा स्पर्श जाणवावा, काका हिने जाण्याची मागितलेली आद्न्या विसरले
आणि त्यांच्या सोबत त्यांच्या समोर तिने हसत मुखाने वैकुंठ गाठलं
मग यथावकाश सगळं घडत गेलं
जाऊ मनोभावे तुळशी वृंदावनाला पुजत राहीली.. तिच्यामुळे त्या वृंदावनाला सतीचं वृंदावन म्हणून लोक ओळाखायला लागले
जावेचही कल्याण झालं कदंबातला श्री गजानन कदंबातच राहिला
सतीच्या वृंदावनाला मात्र अढळ स्थान मिळालं
अत्ता रीडेव्हलप्मेंट होताना कदंब गेला
पण सतीच्या वृंदावनाला मात्र कोणी हात लावयला धजावलं नाही .
नव्या इमारतीत प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्रशस्त जागेत ते वृंदावन आजही बघता येतं

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी