काळजाचा तुकडा

रणरणतं ऊन म्हणजे काय ते मला आज कळलं
मला घरात बसून "बाप रे काय ऊन आहे " बापरे काय ऊन आहे करायला फार आवडतं.. त्यावर चर्चा करायलाही आवडतं
पण अत्ता नाईलाज झाला.. पामूचा फोन आला, मला वाटलं त्याच्या मेव्हणीचं लग्न ठरलं एकदाचं सांगायला फोन असेल पण तो भलताच हवालदिल झाला होता प्रचंड दडपणाखाली जाणवत होता.. असशील तसा लिबर्टी गार्डनला ये म्हणाला.. लिबर्टी गार्डन? इतक्या उन्हाचं? अमिताभने बोलावलं तरी येणार नाही असं ठणकाऊन म्हणालो
या वर तो एकच वाक्य आवंढा आवरत म्हणाला गुंडू हरवला रे .. दिसत नाहीये
खल्लास! यापुढे ऐकण्या बोलण्यासारखं काही नाहीच
समोर आले ते कपडे चढवले, आणि समोर आली त्या रिक्षेत बसलो.. लिबर्टी गार्डन म्हणालो आणि पामूला फोन लावला.. निघालो म्हंटलं पामू रडत रडत हो हो म्हणाला..
रणरणत्या उन्हाचा एक फायदा रस्ता नेहमीपेक्षा मोकळा मिळाला. बँकेजवळच्या गेट पाशी पामू उभा राहणार होता , मी तिथे पोहोचलो.... मला बगह्ताच त्याचं संपूर्ण अवसान गळालं... जरा शांत झाल्यावर तो म्हणाला अरे नेहमीसारखा फिरायला आणला होता रे..
मग? मी अधीरतेने विचारलं
काय झालं त्याने काय पाहिलं कोण जाणे? हिसका देऊन पळाला.. गेटमधून जायची सुद्धा त्याला उसंत नव्हती या इथून त्याने वाँल पार केली..
गुंडू सारखा गुणी शाहणा भू भू असा वेड्यासारखा वागू शकतो? माझा विश्वासच बसेना.. चार वर्षाचा व्हयाला आलाय तो, भलताच शहाणा आता सकाळी प्रत्येकाने गूड माँर्नींग गुंडू म्हंटल्याशिवाय त्याचं समाधना होत नाही, त्याच्या अंघोळीच्या वेळी त्याचे फोटॊ काढलेच पाहिजेत असा त्यानेच नियम घालून दिलाय, त्याला आता टी व्ही चा आवाज मोठा चालत नाही, मुलांवर ओरडलेलं चालत नाही लगेच मुलांची बाजू घेत तो मधे पडतो, त्याच्या चोमडेपणामुळे घरच्यांचं कँरम खेळणं बंद झालय
तो कुत्रा नाहिये रे , माझ्या कलेजाचा तुकडा आहे  असं म्हणत पामूने माझा आधार घेतला, त्याला धड उभंही राहावत नव्हतं त्याही अवस्थेत म्हणाला अरे आपण अशी नुसती पडायची अँक्टींग केली ना तरी आधार द्यायला धावत येतो , त्याच्या परीनं सावरायचा प्रयत्न करतो आणि  मग रागे सुद्धा भरतो, नीट चालता येत नाही का? असच त्याला म्हणायचं अस्तं
इतका घरात रुळलेला भू भू असा कसा पळाला?
मी पामूला म्हणालो आधी आपण घरी जाउया...
तो म्हणाला घरी आहे कोण? भैरवी मुलाना घेऊन माहेरी गेली आहे, तिच्या बहीणीचं लग्नाचं बघतायत ना
आणि आई झोपली असेल.. गूंडू हरवला हे तिला सांगायचं डेअरींग माझ्यात नाही
अरे मग काय .. पोलीसात जायचं का?
कुत्रा हरवल्याची कंप्लेंट पोलीस घेत असतील का? त्याची शंका रास्त होती
मुळात तो पळालाच का? असं पामू पून्हा पून्हा बोलत होता
घरचं कोणी अचानक आलं असेल का?
नाही अशी मान हालवत पामू म्हणाला फोन करून बघितला सगळे मजेत आहेत तिथे, घरी येण्याचा त्यांचा विचारही नाही, काय करू रे? कुठे शोधू?
मला त्याच्या मागे धावायला दोन सेकंद उशीर झाला त्यात त्याने कधी गल्ली पार केली कळलं नाही , त्याला धाववण्यासाठी समुद्रावर नेलं तर धावत नाही, पायात घोळत राहतो.. समुद्राची भिती वाटते ना?.. स्वत:शी हासत तो म्हणाला कधी त्याची घाबरगुंडी उडाली तर किती क्य़ूट दिसतो सांगू? अगदी तान्ह बाळ रेss अशावेळी तर त्याला बाळासारखं कडेवर घ्यावं लागतं
अत्ता फिरायला आणायचं कारणही हेच संध्याकाळी मोठे कुत्रे येतात रे बागेत मग आमची स्वारी .. पामू रडायलाच लागला.. मला अचनाक सौरभ सावंत आठवला पोलीसातला दिलदार माणूस.. त्याला सांगितलं आमचा भू भू हरवला पण तेंव्हा तो नेमका गावदेवीत होता म्हणून त्याने आणखीन एकाचा नंबर दिला नशीबाने तो ही मला ओळखणारा होता तो म्हणाला काका तुम्ही निवांत घरी जा बरेचदा लहर लागली तर हे जीव सरळ घरी जाऊन बसतात
मला फोटॊ सेंड करा चार तास वाट बघा आम्ही शोध सुरू करतो.. पामूच्या फोन मध्ये शंभर पेक्षा जास्त गुंडूचे फोटॊ होते त्यातले त्यानी मी पुरे पुरे म्हणे पर्यंत नव्वद फोटो  पाठवले
तेव्हढ्यात आईचा फोन आला, हा फोन घ्यायला तयार नाही, आई वाट बघत असेल तिला काय सांगू? शेवटी त्याच्याकडून फोन घेत मी आईशी बोललो
आई म्हणाली तुम्ही तिथे काय करताय? गुंडू कधीच घरी आलाय
इतक्यावेळ रडकुंडीला आलेला पामू, गुंडूच्या आठवणीने मुसमुसणारा पामू , देवाला भलभलते नवस बोलणारा पामू गुंडू सुखरूप घरी आलाय हे कळल्यावर अमुलाग्र बदलला.. अगाऊ झालाय कारटा असं काय काय दात ओठ खात बोलत तरा तरा चालायला लागला त्यामुळे एरवी दहा मिनिटाचा रस्ता आम्ही पाच मिनिटात पार केला
या अनुभवावरून माझ्या एक लक्षात आलं तुम्ही कुठल्याही योनीत जन्म घ्या रुणानुबंध पूर्वजन्मीचे असले तर नातं निरपेक्ष आणि निर्मळ असतं
मग तुमच्या पोटी तुमच्या बाळानी जन्म घेतलेला असो नाहीतर दुसर्‍या योनीतला जिव तुम्ही जबाबदारीने घरी आणलेला असो
कौतूक तेच प्रेम तेच कळकळ तीच आणि उसना आणलेला राग ही तसाच
दाराशी पोहोचलो तर मेहेमुद घरात गुढगे दुमडून बसलेला.. आईच्या मांडीवर गुंडू एकदम सेफ होता , पामूला बघून त्या मुक्या जिवाला आपली चूक कळली
तो घशातून आपल्या कुणाला जमणार नाहीत असे अनाकलनीय आवाज काढायला लागला आईच्या मांडीवर उताणं पडून दोन्ही हात जोडायला लागला आई खुदू खुदू हसत होती त्यामुळे पामूचा पारा आणखीनच चढला, तो पुढे सरसावला तशी अजीजी करत महमुद म्हणाला साब उसका गलती नही है
तू गप रे तुमको पता नही आज इसने कितना परेशान किया है मुझे..
पता है साब तो वरमल्या आवाजात बोलला
आम्ही सगळे त्याच्याकडे बघायला लागलो
मेहमुद म्हणाला गुंडू हमको देखकरही भागा... आप किदरकू थे पता नही पर उसने मुझे देखा और पेहेचान गया
पामू ऐकतच राहिला, मग पामू म्हणाला अरे हा मेहमुद आपल्याकडे रोज अंडी पाव, नानकटाई द्यायला यायचा तेंव्हा हा गधडा असेल तीन महिन्याचा.. ते दिवस असे होते मुलांची शाळा होती , मी बरेचदा टूर वर भैरवी तिच्या फर्म मधे बिझी, दिवसभर गुंडू आईसोबत घरी, बर आता आई कबूल करणार नाही पण तेंव्हा गुंडू आईला घरात नको होता त्यामुळे ती गरजे पुरतं लक्ष द्यायची
अशावेळी हा आला की गुंडूला लहानमुलासारखं कडेवर घेऊन फिरायचा त्याच्याशी खेळायचा बोलायचा त्याला सायकलवरून फिरवायचा.. पण मधे काय झालं कोण जाणे हा गायबच झाला.. मला वाटतं तीन वर्ष हा गायब होता
रस्त्यात दिसला असता तर मी ओळखलाच नसता याला
आपने क्या? किसिने भी नय पय्चाना कईजनने पयचान के भी ध्यान नही दिया
अंसारीभाईने वापस धंदे पे रखनेसे मना किया, दोस्तोने कमरे में जगा देनेसे मना किया
कितनेजनने तो पयचान देने से मना किया
बुरी तरहसे टुट गया था, वापस जाने की सोच रहा था, मगर वापस जाता भी तो किदर को? इतनेमें ये नन्हीसी जान भागते हुए आया और इस किदर मेरेसे लिपट गया इस किदर मेरे को चाटा के मेरी प्यासही बुझ गयी.. मैने उसे वैसाही गोद मेंउठाया जैसे उस वक्त लेता था, अपुनको भी सकून मिला ,पता नही चला ये आया कहाँसे? इदर उदर देखा कोई नही था तो मै उसे इदर कू ले आया
उसे कुछ मत बोलना साहब उसने मेरा टुटा हौसला जोडा हैं
मैं हार गया था, इमानदारीसे यहाँ रहा मेरी कोई गलती नही था फिरभी मैं चुपचाप यहाँसे चला गया था वापस आया तो सब अंजान लगने लगा... पर इस जानने मुझे यकीं दिलाया मेरी पेहेचान मुझे लौटादी, अब देखना साहब मैं वापस अपनी जगा बनाउंगा
आज से इसे घुमाने ले जानेकी जिम्मेदारी भी मेरी..
कौतूकाने पामूचा ऊर भरून आला होता पण तो रागवल्याचं नाटक करत बसला आणि गुंडूनेजे त्याला मस्का लावायचं मिशन हाती घेतलं त्याला तोड नाही
रणरणत्या उन्हात गेल्याचंं अगदी सार्थक झालं

Comments

  1. फारंच सुंदर.प्राणी खूप जीव लावतात.आमच्याकडे एक मांजर होती.ती गॅसच्या दोन्ही शेगड्यांच्या मध्ये पाय दुमडडून बसायची.पण शेजारच्याच शेगडीवरच्या दुधात कधीच तोंड घालायची नाही.आणि एखाद्यावेळेस तोंड घातलं किंवा एखा्या वेळ्स चुकून घरीत शी केली, की दिवसभरात यायचीचच नाही.कधीतरी रात्री येऊन पायाशी झोपी जायची.

    ReplyDelete
  2. He sagala kharach hota ka ho tumachyabarobar ....vishwasach nahi Basar ki ha kalpanavilaas aahe .... Pamu ani Gundu kaay Mehmood ani aai suddha dolyasamor aali !!!!

    ReplyDelete
  3. Apratim.. amachya kade pan ek bhu bhu hoti.. tila pan bolalela sagala kalaycha.. tichich athawan aali hi goshta wachun.. khup chan

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी