घटना की गोष्ट?

काही योग नं ठरवता जुळून येतात तसा आज एक योग जुळून आला
जोगळेकरांच्या दोन्ही मुली आज साडी नेसल्या
म्हणजे लहानपणी घर घर खेळताना आईची नाहीतर आत्याची ओढणी.. साडी म्हणून गुंडाळली असेल, किंवा फँसीड्रेस च्या स्पर्धेच्या वेळी कधी साडी नेसली असेल तेव्हढीच
त्या नंतर इतक्या वर्षानी प्रथमच साडी नेसण्याचा घाट घातला गेला
मोठीला बघायला मुलगा येणार होता, आणि मोठीने साडी नेसावी असा तिच्या मावशीचा आग्रह होता..
आणि धाकटीच्या शाळेचा सेंडाँफ होता, त्या निमित्ताने सगळा ग्रूप साडी नेसणार होता.. दोघी एकदम तयार होत होत्या आणि जोगळेकरांचे डोळे सारखे पाणावत होते.. बाई त्याना दटावत होत्या तुमचं ना अतीच झालय हल्ली सारखे कसे डोळे भरून येतात हो तुमचे?
मुलगा फक्त मुलगी बघायला येतोय,... ताईला लगेच आजच्या आज हात धरून घेऊन जाणार नाहिये.. आणि धाकटी तर अजून लहानच आहे
आणि आपल्यावेळी मला काय बजावलं होतत आठवतय का?
उगीच पाठवणीला रडू नकोस, मला गिल्टी वाटेल, रीतसर लग्न करून नेतोय पळवून नाही, तिघी हसल्या पण त्याकडॆ जोगळेकरांच लक्षच नव्हतं कारण धाकटी तर अजून लहानच आहे
या वाक्यावर धाकटी जी रिआक्ट झाली, तिने जो लूक दिला ते जोगळेकरांच्या नजरेतून सुटला नव्हता, पण बोलायची सोय नव्हती
धाकटीच्या मैत्रिणींचे फोन वर फोन यायला लागले तशी ती साडी सांभाळत कशी बशी जायला लागली जोगळेकर म्हणत होते शाळेत सोडून येतो
पण मोठी साठी येणारे पाहुणे यायलाच ठेपले होते या घरी येऊन मुलगा दुपारच्या फ्लाईटने बेंगलोरला जायचा होता
त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला
तरी जोगळेकरानी खबरदारी म्हणून ड्रायव्हरला वेळेवर यायला सांगितलं होतं
आणि धाकटी गाडीने जायला तयार नव्हती
जोगळेकराना खरं तर बोलायचं होतं पण पण ते त्याना जमेना
नाहीतर सतराशेसाठ प्रश्न त्यांच्या अस्वस्थ मनात तयार होते
धाकटीने मोठीला शुभेछ्चा दिल्या, बाईनी दोघीना देवाच्या पाया पडायला लावलं मग जोगळेकरांच्या पाया पडायला लावलं दोघी बाईंच्या पाया पडल्या, मग
दोघी जोगळेकरांच्या पाया पडायला वाकल्या आणि जोगळेकर कळवळ्लेच म्हणाले काय गरज होती गं इतक्या भर भर मोठं व्हायची.?.
अत्ता अत्ता पर्यंत मी घरी आलो की माझ्या खांद्यावर चढून बसत होतात
धाकटी म्हणाली त्यात काय, ते आजही मी बसेन शाळेतून आल्यावर, पण आता निघते जरा हशा पिकला पण तरी जोगळेकरांचा मूड काही बदलला नाही..खबरदारी म्हणून ताईने धाकटीच्या साडीला आणखी एक पीन कुठेतरी टोचली
आणि दारावरची बेल वाजली
धाकटीला घाई झाली , पाहुणे आले तर मी उगीच अडकेन चल मी निघते म्हणत ती हळूच ताईला म्हणाली.. खरच आवडला तरच हो म्हण..
जोगळेकर घाई घाईने दुजोरा देते झाले.. हो हो .. तेच आपल्याला काही घाई नाही
हे जस्ट तुझ्या मावशीने सुचवलं म्हणून... बाईनी नजरेनी दटावलं म्हणून जोगळेकर गप्प झाले.. दार उघडून बघितलं .. दारात कोणीच नव्हतं
जोगळेकराना जरा आश्चर्य वाटलं पण चर्चा करायला मिळाली नाही कारण
धाकटी जिना उतरत असतानाच लीफ्ट जोगळेकरांच्या मजल्यावर थांबली.. मुलगा मोठीला बघायला आला होता
आज असा योग जुळून आला होता की जोगळेकरांच्या दोन्ही मुलीना मुलगे बघायला आले होते
घरी रीतसर पोहे चहासह मुलगी बघणं होणार होतं
आणि खाली वींग मधे मोहिल्यांचा धाकटा धाकटी साठी खोळंबला होता, अत्ता अधीरतेने त्यानेच घराची बेल वाजवली होती
आज ती साडी नेसणार आहे हे तिच्या मैत्रीणीकडून त्याला कळलं होतं
आणि कोणी आवडणं काय असतं हे तिला नुकतच कळत होतं.. कळायला लागलं होतं अणि कोणी नं सांगता त्याच्याशीच खूण पटली होती
इथे ताई त्या नवख्या मुलासमोर येताना बावरली होती , तो ही तिच्याकडे बघताना जरा अवघडला होता
इथे धाकटी सुद्धा तो नेहमीचा असुनही जरा बावचळली होती..आणि तो ही धिटाईचा आव आणता आणता जरा बावरला होता
घरी प्रश्न उत्तरांच्या फैरी झडत होत्या, चौकशी चालू होती मधेच हास्याच्या लकेरीने वातावरण हलकं फुलकं ठेवायचा प्रयत्न होत होता
आणि इथे कुठलाच प्रश्न नव्हता... होता तो फक्त संवाद..
गाडी पाशी ड्रायव्हर हजर असताना ती गेट पर्यंत चालत गेली आणि तिच्या मागे तो बाईक घेऊन गेला..

Comments

  1. खुप छान कथा...हलकी फुलकी...

    ReplyDelete
  2. खुपच छान कथा...मलाही दोन पर्‍या आहेत...लहान आहेत अजुन पण कधी मोठ्या होतील ते कळणार पण नाही...मग मात्र माझा जोगळेकर होईल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी