महिरप
तो घराची किल्ली आज न्यायची विसरला
आणि नेमका तिला आज यायला उशीर होणार होता
तिन्हिसांजेला बंद दाराशी जरा वैतागून बसल्यावर जरा वेळाने त्याला मनापासून आपलं घर पाठीशी उभं असल्या सारखं वाटायला लागलं
तिची वाट बघता बघता तिचा राग यायच्या ऐवजी त्याला त्या दोघांच सवयीचं झालेलं नातं नव्याने उमगलं तिचं आयुष्य पूर्णपणे त्याच्या भोवतीच फिरत होतं,अत्ता सुद्धा ती फक्त आपलाच विचार करत असेल या विचाराने तो सुखावला आणि खंतावलाही, कधी कधी एकांतात आपल्याला स्वत:जवळ कबुली देणं सोपं जातं तसं त्याचं झालं
आपण तिला फार गृहीत धरतो याची त्याला नव्याने जाणीव झाली आणि उगीचच बोच लागून राहीली..
लवकर ये भूक लागली आहे लवकर ये मला चीक चीक होतेय असे एक दोन मेसेज पाठ्वून झाले होते आता त्याने मेसेज केला सावकाश ये उगीच जिवाची तग मग करून येऊ नकोस आठच वाजतायत.. नेमका तो मेसेज तिला पोहोचत नव्हता
त्याला उगाचच उत्साह आल्या सारखं झालं इतक्या दिवसात कधी घरा भोवतीच्या बागेत तो फिरला नव्हता साधं लक्षही द्यायला त्याला जमलं नव्हतं
हौस त्याची आणि मेहेनत तिची या तत्वावर ती घरा भोवतीची बाग फुलली होती, आनंत मोगरा, दहा जातीचे गुलाब आणि त्याने गावाहून आणलेला कृष्ण्कमळाचा वेल हे तिच्या मेहेनतीने बहरुन आलेलं वैभव बघायचं तर दिवे लावणं गरजेचं होतं..
बागेत तसे दोन दिवे होते पण ते लावयचे तर घरात जायला हवं होतं
या विचाराने तो अधीकच घरी जायला आतूर झाला
ही आज सकाळी आपल्या आधी गेली नाहीतर ती घरी असताना किल्ली शिवाय आपण बाहेर पडलोच नसतो.. आता आल्या आल्या ती ओट्याशी उभी राहील,चहा करते म्हणेल आपण घरी असतो तर चहा केला असता निदान तिच्या वाश साठी गिझर तरी आन केला असता... चार वर्षात काय केलय आपण यातलं
आता शक्य नाही म्हणून पुळका आलाय त्याने परखडपणे स्वत:वर केलेल्या आरोपाने तोच पेटून उठला काही करून ती घरात शिरायच्या आत घरात शिरायचच
कसं शक्य होतं ते...
त्याने घराला दोन प्रदक्षीणा घतल्या
आणि देवघराच्या खिडकीची व्हेंटीलेटर्स त्याला उघडी दिसली त्या खिडकीला ग्रील नाहिये.हे लक्षात आल्यावर. तो अंधारतच वर चढला अंग तिरपं करून हात वाकडा करून त्याने दाराचा एक बोल्ड उघडला मग खिडकी उघडली मग बुटासहं देवघरात प्रवेश केला म्हणून देवाची क्षमा मागितली आणि आधी जाऊन त्याने बुट काढले परत देवासमोर उभा राहिला त्याला हात जोडले सारी म्हंटल त्याचे आभार मानले या घराने या देवाने आपल्याला खूप सुखात ठेवलय या जाणीवेने त्याला उभारी आली
त्याने गास पेटवला तो ही सिलेंडर खालून बंद असताना खटपट करून डोकं चालवून तो गास पेटवण्यात यशस्वी झाला त्याने दोघांचा तीन कप चहा ठेवला कारण चहा बरोबर मस्का खारी असली की चहा जास्त लागतो इतकं त्याला माहीत झालं होतं आणि कालच ती मस्का खारी घेऊन आली होती
इथे हा रंगात असताना ती घरापाशी पोहोचली गल्लीच्या तोंडाशी आल्या आल्या तिला तिचं टुमदार घर दिसायचं
रिक्षेतूनच तिने नोटीस केलं किचनचा दिवा लागलाय म्हणजे आज आपण दिवा विसरलो? कसं शक्य आहे?
का हा जाऊन ताईकडून किल्ली घेऊन आला इतक्यात तिला त्याचा मेसेज मिळाला सावकाश ये.. जीवाची तग मग करत येऊ नकोस..क्षणभर त्या मेसेजेची दखल घेण्यात गेला..मेसेज वाचताना तो तिला चक्क डोळ्या समोर बोलताना दिसला.सावकाश ये म्हणताना त्याचा स्वर त्याचा अविर्भाव तिला प्रत्यक्ष जाणवून गेला त्याच्या मिठीतून सुटताना जशी तिची तारांबळ उडायची तसच काहिसं अत्ता झालं
ती दाराशी आली तर मेन डोअर सेफ्टी डोअर दोन्ही बंद , कुलूप जसच्या तसं
आणि घरात तर याची खुडबुड सुरू... ही प्रचंड घाबरली भोवतीचा निरव परिसर तिच्या अंगावर आल्या सारखं तिला झालं ... हाक मारायची तरी कुणाला...आणि कोण येइल धाऊन?
आणि तिने धीर करून पोलीसात फोन लावला त्याना सांगितलं मी एकटी बाहेर उभी आहे आणि घरात कोणीतरी शिरलय मी सेफ आहे पण घरात् कोण शिरलय याची कल्पना नाही
तत्परतेने पोलीस आले.

.आणि पोलीस म्हणजे कोण ?
जो पोलीसात आहे म्हणून तिने ज्याला नकार दिला होता तो सावळा दणकट अभिजित नानल... त्याचा फोटॊ बघताच तिला तो आवडला होता सावळा भरगच्च मिशा असलेला त्याच्या भुवयाही नकाशी जुळत होत्या हसताना त्याचा तुटका दात उघड्यावर पडल्या सारखा दिसायचा एका क्षणात तिने त्याला या सर्व तपशिलासह न्याहळलं , याला नाकरलं आपण? तिने स्व्त:लाच प्रश्न केला त्याचीही अवस्था वेगळी नव्हती

तो ही तिला तसाच न्याहाळत राहिला ती समोर असून तिला शोधत राहिला.. तिचा नकार मिळाल्यावर त्याने एकदा भेटायची इछ्चा व्यक्त केली होती पण ती त्यालाही नाहीच म्हणाली होती
त्याही परिस्तिथीत तो हलकसं हसत म्हणाला शेवटी असे भेटणार होतो आपण त्याने बरोबरच्या हवालदाराना सुचना केल्या त्याना पोझिशन घ्यायला सांगितलं
आणि तिला धीर देत म्हणाला तुम्ही अगदी सेफ आहात आता दरवाजा उघडा ज्या अर्थी आत वावरल्याचा आवाज येतोय त्या आर्थी तो बेसावध आहे.. आवाजावरून तरी एकच व्यक्ती असावी असं वाटतय... तुमचे मिस्टरच नसतील ना? त्याने शंका व्यक्त केली
तिने लगेच त्याचे आलेले मेसेज दाखवले.. ओ के म्हणत तो कारवाईला सज्ज झाला
आणि तिने दार उघडलं दाराचा आवाज आल्या बरोब्बर तो तसाच टावेलवर उघडा बंब बाहेर आला तो ढाण टडाण करायच्या बेतात असताना तिच्या बरोबर पोलीस बघून त्याचच ढाण टडाण व्हायची वेळ आली तो गोंधळला.. पोलीस?
ती ही गोंधळली तू तू तू घरात कसा शिरलास?... अभिजितही लक्ष देऊन ऐकत होता मग त्याने सुद्धा थाट प्रोसेस सहं सगळा घटना क्रम सांगितला हा वेडू आहे याचा अंदाज तिला होताच आज खात्री पटली थोडं हसून बोलून झालं आणि तिनेही आपण अभिजितला आधीपासून ओळखत असल्याच ं सांगितलं अभिजितने हवालदाराना परत जायला सांगितलं आणि तो त्याच्या आग्रहा खातर चहा साठी थांबला
त्याने तिला अभिजितशी बोलत बसायला सांगितलं आणि अनायसे केलेला तिसरा कप तो बाहेर घेऊन निघाला तो जेंव्हा या दोघांसमोर आला तेंव्हा त्याच्या कानावर पडलं ती अवघडून विचारत होती तुम्ही लग्न केलत की नाही?
अभिजित हसून म्हणत होता आमच्याशी कोण करणार लग्न? आम्ही पडलो पोलीसातले
मुलीना वाटतं काही कामाचे नाहीत..ती उगीचच खजील झाल्या सारखी झाली
तो चहा घेऊन आल्यावर ती काहीच व्यक्त झाली नाही पण दोघे समोर बसल्यावर तुलना होणारच आणि तुलनेत आता तो ही पूर्ण मार्काने पास झाला होता ताई तेंव्हा सांगत होती केवळ पोलीसात आहे म्हणून नाही म्हणायचं याला काही अर्थ नाही तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू स्वत: विचार कर..
तिने स्वत: विचार केला आणि तिला सेफ लाईफ योग्य वाटली होती सेफ लाईफची व्यख्या तेंव्हा कुठे माहीत होती मग तिचं गप्पतलं लक्षच उडालं
पद्धतीचे चार शब्द बोलून तो गेला आणि तिच्या जवळ बसत त्याने विचारलं तू त्यला लग्ना संबंधी का विचारत होतीस? ती चपापली ते त्याच्या लक्षातही आलं नाही आपल्या दोघांमधे कोणी येऊ शकतं याची त्याला पुसटशी शक्यताही नव्हती, तो अगदी सहज होता आणि ती? ती सहज नव्हती मुंग्यांची एका लयीत जाणारी रांग विस्क्टली की पून्हा सलग व्हायला जसा वेळ लागतो तसं तिचं झालं, ती त्यासाठी प्रामाणीक प्रयत्न करत असतानाच त्याने तिच्या समोर चहा धरला... काय झालं ? असं खुणेनच विचारलं
ती काही बोलत नाही म्हंटल्यावर तोच म्हणला , आपल्या उजू साठी विचार करतेस का त्याचा? उजू म्हणजे त्याची धाकटी बहीण पण बघ बुवा पोलीसतला आहे उजूला चालेल का?
ती फणकार्यात म्हणाली नं चालायला काय झालं , पोलिसात असला म्हणून काय झालं ?
पुढेही ती दोन तीन वाक्य सलग बोलली पण मनातून या विरुद्धच बोलत होती
कोणत्याही संदर्भाने तो आता आपल्या आयुष्यात नकोच! असं ती मनाशी घोकत राहिली भोवती जे आहे ते आपलं आहे, आणि ते किती छान आहे.. ते छान तिला नेहमी पेक्षा अधीकच छान वाटायला लागलं,ही समाजने आखून दिलेली चौकट नाही तर ही आपण सजवलेली आपल्या आयुष्याची महिरप आहे.. या विचाराने ती सुखावली हळवी झाली..

मग तो ही अधिकच छान नुसता छान नाही खूप जवळचा हक्काचा वाटायला लागला हा किती विसंबून आहे माझ्यावर याला बोलून दखवता येत नाही पण याचं आयुष्य पूर्ण आपल्या भोवतीच फिरत असतं
आजही तो केवळ आपल्यासाठी हे दिव्य करत घरात शिरला असा वेडेपणा प्रेमात ओथंबलेला जिवच करू शकतो त्याचा उतावळेपणा तिच्यासाठी नवा नव्हता पण त्याचा आजचा अविष्कार तिच्यासाठी नवा होता मला उशीर होतोय म्हणून माझ्यावर चिडायच्या ऐवाजी माझं स्वागत करायला तो आतूर झाला,
तुलना करणं स्वाभावीक आहे पण त्यानंतर आपलं माणूस आपल्याला कोणाच्याही सक्ती शिवाय किंवा मजबुरी शिवाय आधीक आवडणं या सारखं भाग्य नाही,....

अतीव सुखाच्या जाणीवेने तिला हुंदकाच फुटला त्याच्या गळ्यात पडून ती मुसमुसायला लागली आणि तो त्याच्या परीने त्याच्या पद्धतीने तिची समजूत काढण्यात रमला..त्यात..बागेतले दिवे लावायचे राहून गेले
Lovely..Khup surekh likhan
ReplyDeleteFaar chhan ani Madhye doan teen divas sale navhata Kahi tyamule ajunach mastaaaa
ReplyDeleteकोकणात गेलो होतो, मी पण मीस्स करत होतो
Deleteपण नाईलाज होता
आधी वाचली होती... तेव्हा पासून favorite
ReplyDeleteनेहमी प्रमाणेच साधी...सरळ...पण मन:स्पर्शी कथा..जवाब नहीं आपका..🙏🙏
ReplyDeleteपुन्हा पुन्हा वाचली तरी पहिल्या वेळेसच वाचतो आहे, असे वाटते
ReplyDeleteमस्त!🌹
Tumchya katha mhanjey nakaratmakatela sakaratmak banavtat, choukat nasun mahirap... Ekdummm sundar kalpana...
ReplyDelete