थांबलेली गोष्ट
महादेव मोर्डेकर, वयवर्ष साठ, व्यक्तिमत्व प्रसन्न, हसतमुख ,माणूस सूखी.समाधानी? माहीत नाही
शंभू हे नाव कसं कधी मिळालं ? कोणी दिलं ? माहीत नाही. पण परिघातली माणसं शंभूच म्हणतात संदर्भानुसार हाक बदलते शंभूकाका, शंभूमामा अगदी शंकरशंभू हाक मारणारे सुद्धा आहेत. एकूण काय शंभूरावाना हाका मारणारे आणि हाकेला ओ देणारे बरेचजण आहेत.
पण तरी त्यांच्या डायरीत एकटेपणा ठायी ठायी डॊकावतो.संध्याला त्यांच्या बायकोला तेच आवडत नाही. सगळं कसं मनासारखं चाललेलं असताना हा कसला विसंगत सूर?
मनातल्यामनात शंभू मनासारखं या शब्दावर आक्षेप घेत असतात.
डायरी चाळली तर पानोपानी हीच तक्रार आहे. तक्रारही कुणाकडे नाही. कुणाबद्दल नाही तरी तक्रार आहे..समांतर चालणारी.
हा मनाचा खेळ ही असू शकतो. पण शेवटी आपण जगतो ते काय मनाचा खेळच तर आहे.साठीजवळ आलेल्या इसमाला हा खेळ प्रकर्षाने जाणवत असावा.
शंभू मोर्डेकर सध्या त्या स्टेज मधून जात असावेत. संध्याला त्याची कल्पना येणच शक्य नाही. कारण तिचा जगायचा हव्यास अजून कमी झालेला नाही. आता ती सुद्धा पंचावन वर्षांची आहे पण आपल्या दोन मुलींच्या बहाण्याने ती पून्हा पून्हा जगू पाहतेय. संध्या तशी खरच भाग्यवान. रूपरंग परमेश्वराकडून आपण घेऊन येतो तर त्याने खरच सढळ हाताने तिला देऊ केलेलं. जन्माला आली तेही नवकोट नारायणाच्या पोटी ती ही एकुलतीएक
म्हणूनच शंभूच्या आईने हा प्रस्ताव आल्यावर लगेच घाई केली. आणि शंभू मानसीक गॊंधळात सापडलेला असताना त्याचा संध्याबरोबर साखरपुडा करून उरकून घेतला..
आईला आभाळ ठेंगणं झालं आणि त्याला त्यावेळी आईचा आनंद महत्वाचा वाटला. संध्या चांगलीच होती. तिच्या कक्षेत राहून तिने शंभूवर भरभरून प्रेम केलं पण त्यासाठी त्याला स्वता:ची कक्षा सोडून तिच्या कक्षेत सामील व्हावं लागलं . घडताना ते सहज घडत गेलं शंभूच्या कर्तुत्वाला वाव मिळत गेला आणि सगळं मनासारखं घडतय असच त्यालाही वाटत राहिलं
पण आताशा जुन्या डायर्या चाळताना त्याला काहीतरी सलतय. जे कोणी मान्य करणार नाही. गोची हीच आहेकी तक्रार आहे पण कोणाबद्दल नाही, आणि कोणापाशी करावी तर तसा वाव नाही.
नाहीतर शंभूचं स्वत:चं मत म्हणाल तर त्याला कुंभारगड सोडायचच नव्हतं. दोन डॊंगरांच्या मधे वसलेलं कुंभारगड. चार रस्ते सोळा गल्ल्या असलेलं कुंभारगड बारा पिंपळ नऊ वड... बैठी शाळा असलेलं कुंभारगड चिंचेचं रान रानातली पाऊलवाट तिथे जोग्याचा तलाव तलावा शेजारी नलीनीचं घर असलेलं कुंभारगड.
नलीनी... कान्हेरकर वकिलांची एकुलतीएक मुलगी. सावळी, टपोर्या डॊळ्यांची
लांबसडक केस असलेली नलीनी.. शंभूला पाहून खुदकन हसणारी...दोघांची खास ओळख होती दोघं ओळखून होते...दोघानी ठरवलही होतं फक्त एकमेकाजवळ मान्य करायचं बाकी होतं पण त्यासाठी भेटणं आवष्यक होतं आणि आज उद्या करत तेच राहून जात होतं आज ही परिक्षा उद्या ती परिक्षा आज याची तयारी उद्या त्याची तयारी यातच शंभूचे दिवस जात होते कान्हेरकर वकिलही त्याची आस्थेनं चौकशी करायचे..नलीनीला माहीती मिळायची... त्यातच शंभूचं लग्न ठरल्याची बातमी तिला मिळाली...
कुठल्यातरी ईंटव्ह्युसाठी हे तेजोदर साहेब आले आणि त्यानी शंभूला बरोबर हेरलं त्याला आग्रहाने घरी घेऊन गेले आणि संध्याला भेटवलं. नलीनीच्या अपोझीट संध्या गोरी गोरीपान आत्मविश्वासाचं तेज असलेली चुणचुणीत मुलगी.. शंभूच्या मनात तरंग उठले पण ते एका तरुण मुलाच्या मनात सहज उमटूशकतात तेव्हढेच. पण तेजोदर साहेब घाई करून शंभूच्या आईला भेटले आणि घटनानी इतका वेग घेतला की शंभूच्या हातात काही राहीलच नाही
जुन्या डायरीची जुनी पानं चाळताना तर शंभूला हे फार जाणवायला लागलय की आईने शंभूवरच्या प्रेमाचा फार गैरफायदा घेतला. असं म्हणणं क्रुतघ्न पणाचं ठरू शकतं पण साठीला आलेल्या माणसाला निदान स्वता:जवळ तरी अशी धाडसी विधानं करायचा अधिकार असायला हवा
साध्या साध्या गोष्टीत मायेचा सूर पकडत आईने त्याला आपल्या मनासारखं करायला लावलय. मग जेवण झालेलं असताना "आता इतकीच भाजी उरली आहे खाऊन टाकना..इथपासून ते उन्हाळ्यात गच्चीत झोपायला जायचं की नाही, कुंभारगडच्या गावच्या जत्रेत कधी जायचं हे ठरवण्यापर्यंत तीच पुढाकर घ्यायची तुझ्या भल्यासाठी म्हणत म्हणत ती आपल्या मनसारखं करवून घ्यायची
आता जायच्या आधी तिने लेकाकडून घोकून घेतलं माझं ऐकलस पण मला सांग काय वाईट झालं? त्याला आक्रंदून सांगावसं वाटत होतं वाईट काहीच झालं नाही पण मनासारखही काही झालं नाही. मला कुंभारगड सोडायचं नव्हतं मला तिथेच राहून स्व्त:चा छोटासा व्यवसाय सूरू करायचा होता लहान मुलांसाठी क्लासेस सूरू करायचे होते त्याने आणि त्याच्या मित्राने तसं ठरेवलही होतं सूखात राहिलो असतो त्या दोन डॊंगरांच्या मधे... रोज सायंकाळी नलीनी बरोबर जोग्याच्या तलावाकाठी फिरायला गेलो असतो...नलिनीची हौस म्हणून घराभोवती फुलबाग फुलवली असती.
संध्याने साथ दिली पण तिच्या कक्षेत राहून. तिने माझ्यावर प्रेम केलं ते तिच्या मनात होतं म्हणून पण माझ्यासाठी कोणी काहीच केलं नाही. संध्याला हा सूर पटत नाही कारण मला माझी तक्रार नीट मांडता येत नाही हे खरच आहे तक्रार अशी कुणाबद्दल नाही आणि स्वत:बद्दल स्वत:जवळ तक्रार करायची आपल्याकडॆ पद्धत नाही...नाहीतर मी कम्कुवत ठरलो इतकाच निष्कर्श निघतो.
लग्न् झाल्यावर तर शंभू गावाकडे परतलाच नाही. नलीनीच्या टपोर्या डॊळ्याना
तो नजर द्यायलाच घाबरला. मधे कान्हेरकर वकिल गेल्याचं कळलं पण तेंव्हा तो नेमका जर्मनीत होता. माधवने फोन वर विचारलं होतं नलूला भेटायला येणार नाहीस? हो येईन असं तो मोघम म्हणाला होता अत्ता तिला आपली गरज आहे ती आपली वाट बघत असेल हे तो स्व्त:जवळ दहावेळा घोकला होता पण प्रत्यक्षात त्याला पाऊल उचलणं नाही जमलं पण त्यालाही आता दहा वर्ष उलटून गेली..
अत्ता आई गेल्यावर.. संध्या धाकट्या मुलीकडे परदेशात गेल्यावर शंभूने बँग उचलली आणि कुणाला काही नं सांगता कुंभारगडचा रस्ता धरला
नलीनीला भेटायची ओढ उरली नव्हती....असं तो स्वत:ला बजावत होता. आता चार दिवस इथे राहयचं जोग्याच्या तलावापाशी फिरकायचं सुद्धा नाही. नलिनीचा विषय आपणहून काढायचा नाही, माधवने काढलाच तर आपण कोरडं राहयचं हे सगळे ठरवलेले निग्रह तो जोग्याच्या तलावापाशी बसूनच मनाशी घोकत होता. चाहूल लागली म्हणून त्याने बघितलं नलिनी उभी होती. तो संकोचला.. ती नाही.गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हतं. तिने हात पुढे करत त्याला वाढदिवसाच्या शुभेछ्चा दिल्या तेंव्हा त्याला आठवलं आपला आज वाढदिवस आहे. ती म्हणाली साठावं लागलं मनात तो म्हणाला म्हणजे हिलाही पंचावन पूर्ण...ती म्हणाली घरी ये शीरा घाटते... काही गिले शिकवे नाहीत सवाल जवाब नाहीत.. तू लग्न नाही केलस? हा प्रश्न फारच विसंगत वाटला असता.. ती गेली आणि माधव शोधत आला.तिला पाठमोरी जाताना बघत म्हणाला हे काय तलावाकाठी येणार न्व्हतास ना? माझ्याकडे उत्तर नव्हतं आणि मला कोणताही प्रश्न विचारायचा नव्हता.. पण काही प्रश्नांची उत्तरं नं मागता मिळतात तसा माधवच बोलायला लागला. नलीनीने लग्न केलच नाही. मी सुद्धा लग्नाबद्दल विचारलं होतं तिला, नाहीच म्हणाली.. तिचंही बरोबरच आहे वकिलसाहेब आजारी असायचे त्यांची देखभाल कोण करणार? त्यांच्यासाठी अविवाहीत राहीली बिचारी..
माधव बोलत राहीला आणि मन सांगत राहिलं वकिलांसाठी नाही ती तुझ्यासाठी अविवाहीत राहीली... माझ्यासाठी म्हणून कोणीच काही केलं नाही म्हणता म्हणता या पोरीने सारं आयुष्य माझ्या नावावर करून टाकलं. तू लग्न केलस पण त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही असच तिला म्हणायचं असेल
मी कसला लव्हाळ्यासारखा प्रवाहा बरोबर वाहत राहिलो आणि ही? दोन डॊंगरांच्या मधे खंबीरपणे उभी राहीली..केवळ माझ्यासाठी मला नं कळू देता....
एका क्षणात आयुष्य भरून गेलं...डायरीचं पुढचं पान कोरच राहून गेलं मनातलं सगळच कागदावर उतरवून चालत नाही....... आता उगाच तिचं नाव माझ्या नावासोबत गोवण्यात काय अर्थ आहे?..काही कहाण्या अशाच असतात ज्याना पून्हा सुरुवात असते पण शेवट नसतो...

Khup sunder aahe kathan. Great.
ReplyDeleteApratim....
ReplyDeleteAtushyachi khari katha je milavnyasathi ayushyabhar manus mar mar marto te milavnyachya nadat pathimage rahilel amulya kahitari ayushyala rite aslyachi janiv karun dete.
ReplyDelete👌निशब्द
ReplyDeleteअगदी राहून राहून माझ्या मनाला जे सध्या वाटू लागले होते त्याचे उत्तर सापडले... धन्यवाद मामाश्री..
ReplyDeletenalinicha gala rikama hota pan to shambhuchya navcha hota.......
ReplyDeleteawesome.... shabdanche jadugar ahat tumhi chandrashekhar gokhale sir..... hatts off........