संवाद
नकार कळवणारा फोन आला तो नेमका तिनेच घेतला
नकार कळवणार्यालाही कदाचीत नकार कळवायचं दडपण आलं असावं
फोन उचलल्या उचलल्या फोन कोणी घेतलाय याचा विचार नं करता , कोण बोलतय न विचारता त्याने असलेला नकार कळवून टाकला
तिने नकार ऐकला आणि शांतपणे बरं म्हंटलं, वर थँक्स सुद्धा तो बुचकळ्यात पडला थँक्स कशासाठी? त्याने विचारलं ती म्हणाली निदान तुम्ही नकार कळवायची तसदी घेतलीत बरेचजण ती ही तस्दी घेत नाहीत मुलीकडच्यानाच वाट बघून चार फोन करावे लागतात नाहीतर खेटे घालावे लागतात...
क्षण्भर थांबून ती म्हणाली
तुम्हाला हे स्थळ पसंत नाही हे मी सांगेन बाबा ना पण नकार का दिला नाही विचारणार? ती मनापासून हसली म्हणाली नकाराला अनेक कारणं असतात होकाराला एकच ते कोणतं ? त्याने मोकळ्या स्वरात विचारलं ते होकार असेल तर कळतं नकार असल्यावर काय तो जरा अडखळला चाचरला म्हणाला माझ्याकडून होकारच होता होता म्हणजे? तिने बोलणं वाढवत विचारलं होकार होता म्हणजे होकार आहे.. पण एक घोळ झालाय, म्हणून तुमच्याकडून नकार यायच्या आधी आबा म्हणाले.. ओह! इगो सांभाळताय का? आता काय सांभाळायचय? मला वाटलं होतं नकार ऐकून जो कोण असेल तो फोन ठेऊन देईल, जास्त बोलावच लागणार नाही फोन तुम्हीहीठेऊन देऊ शकत होतात, फोन तुम्ही केला होतात,आणि नकार कळवूनही झाला होता पण फोनवर तू येशील असं नव्हतं वाटलं पण अजून मी कुठे सांगितलय.. ती मीच आहे पण तरी मी ओळखलं तुला पाहिलं ना तेंव्हाच ओळखलं होतं मन म्हणालं ती हिच आहे ती हिच आहे मग नकार का दिलात ? तुमच्या घरी आल्यावर कळलं , आपली बरोबरी नाही होऊ शकत त्यात विवाह मंडळाने एक घोळ घातला माझा पगार दहा हजाराने जास्त सांगितला, तो तेव्हढा होईलही पण अत्ता तेव्हढा नाही मग हे तुम्हाला बाहेरून कळलं असतं तर? म्हणून नकार? दुसरा काय उपाय होता? होकार असता तर उपाय शोधण्याला अर्थ होकार आहे असं धरून चाल हात धरून चालता येतं होकार कसा धरून चालणार बाई? मग होकार आहे असं समज जेंव्हा समजायचं तेंव्हा तुम्हाला नाही समजलं आणि आता मला सांगताय समज म्हणून? तुझा होकार होता? होता म्हणजे आहे पण आपली बरोबरी नाही होऊ शकत तुझं घर आणि आपलं घर.... तुम्ही ज्याला माझं घर म्हणताय ते माझ्या दादाचं घर आहे, हे वैभवही त्याने मेहेनतीने कमावलं आहे मी निवृत्त स्टेशन मास्तराची तीन मुलींपैकी मधली मुलगी आहे जिला परिस्थिती म्हणजे काय जिद्द म्हणजे काय स्वप्न म्हणजे काय आणि सोबत म्हणजे काय हे समजतं तो खुळावल्या सारखा झाला, म्हणाला मी घरी काय सांगू ? ती म्हणाली हे पण मीच सांगू? तू तू घरी काय सांगशील? हे मी तुम्हाला कशाला सांगू? बाबाना भेटायला कधी पाठवू सांगा लग्नाची तारीख ठरवली की पाठव तुझ्या बाबाना माझा निरोप दे फक्त मुलगी हवी आहे, नारळ सुद्धा नको, कोकणात आपल्या नारळाच्या बागा आहेत म्हणावं आणखी काही? आणखी आहे ना मला होकारा मागचं कारण कळलं सांगा ते अत्ता कशाला सांगू? वेळ आली की सांगेन ती वेळ कधी येईल? ते आता आपल्या दोघांवर अवलंबून आहे, एक काम कर तुझे बाबा येऊदेत सावकाश तू अत्ता घरी येशील? मी न्यायला येतो या म्हणत तिने फोन ठेवला, आणि फोन ठेवायचं त्याच्या लक्षातच आलं नाही

ओघवती भाषा आणि सुंदर शब्द !
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteमोहनमाळ हा नवीन कथासंग्रह आहे , जमल्यास नक्की वाचा
आता काय लिहावे असा प्रश्न पडलाय.इतके सरळ सोपे सहज लिहीलय की दाद द्यायला पण शब्द सुचत नाहियेत मला. खुपच सुंदर.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद..
Deletekhup ch sundar
ReplyDeleteवा ...काय लिहीता तुम्ही...मी तुमच्या कथा पुन्हा पुन्हा वाचते...कित्येक तोंडपाठ आहेत... मुख्य म्हणजे उगाचच अवघड..जड शब्द नसतात... सहज सुंदर असतात.. तुम्ही तुमच्या कथांवर मराठी मालिका काढा ना... रेशीमगाठी सारखी.... छोट्या छोट्या गोष्टींचा एक एपिसोड ...
ReplyDeleteKhupach mast idea aahe... mala pan patala.. 👌🏼👌🏼👍🏻👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Delete🙏 🙏 🙏 🙏
ReplyDeleteNehmipramanech Sundar. 🙏👍
ReplyDeleteEkadam manala bhidanara lihita tumi... Sundar Katha..oghavati bhasha
ReplyDeleteखुपच छान कथा...अगदी नेहमी लिहिता तशी.... असा संवाद सर्वच माणसां मधे घडो अशी सदिच्छा....🙏🙏
ReplyDeleteसहज सोपी सुंदर कथा..... नेहमीप्रमाणे आवडली
ReplyDelete