सुख

थकलेल्या आईचा एकदा
बसल्या जागी डोळा लागला
तेंव्हा तिचा छकुला
अगदी शहाण्या सारखा वागला
हळूच सारली त्याने
तिच्या मानेखाली उशी
अन शालही पांघरली
अगदी ती त्याच्यावर पांघरायची तशी
आईचे डोळे मिटले होते
तरी तिला दिसत होतं सगळं
तिला आपलं बाळ वाटलं
जगापेक्षा वेगळं
मायेनं ओथंबून तिचे
भरून आले डोळे
आणि आई रडते म्हणून तिचे बाळ
कासावीस झाले खुळे
आई आई म्हणत त्याने
गाठली तिची कुशी
कुशीत घेत आईने त्याला दिली
आपल्या हाताची उशी
मग काय ते वेडं बाळ
निवांत निजलं
अन आईच्या पदराचं टोक
ओल्या पापण्यांनी भिजलं...

Comments

  1. गोड वर्णन गोड नात्याचे.

    ReplyDelete
  2. खुपच सुरेख...

    ReplyDelete
  3. फारच छान , हृदयस्पर्शी

    ReplyDelete
  4. अप्रतिम.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी