कानावर आलेली बातमी
घर बसल्या काही बातम्या कानावर येतात तशी कुणाल सराफने जोयाशी लग्न केल्याची बातमी कानावर आली. तसा अंदाज होता, तशी चर्चा होती पण इतक्या तडकाफडकी असं काही होईल असं वाटलं नव्हतं.
पण जोयासाठी घरदार सोडून कुणाल बाहेर पडला होता, आणि कुणालचं घरदार म्हणजे साधं घर नव्हे, आठशे खिडक्या नऊशे दारं असलेलं गोविंदपंताचं घर,गोविंदपंत म्हणजे आमच्या इथली किती मोठी असामी आणि कुणाल त्यांचा
एकुलता एक सद्गुणी लाखोमें एक असा मुलगा दिसायला म्हणाल तर विनोदखन्नाच्या मोठ्या मुलासारखा फक्तं त्याला केस कमी आणि आमच्या कुणालची जुल्फं म्हणजे काय विचारता? अहो असणारच माई अजून
पदरानं डोकं पुसायच्या . असा कर्तब्गार मुलगा रोज हक्काने पदराने डोकं पुसून घेत असेल तर त्या माउलीला किती धन्य धन्य वाटत असेल नाही?
कुठून ही जोया या मुलाला भेटली कोण जाणे? ना जातीची ना धर्माची. करते काय तर कोरिओग्राफर चिन्नीप्रकाशची असिस्टंट, राहते कुठे? तर हाँस्टेल वर
गोवींदपंताना कसं चालेल हे सगळं..
पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसं...
कुणाल घर सोडून गेल्यावर आम्हाला भेटलाच नाही नाहीतर हिने तरी नक्की कान धरून त्याला विचारलं असतन. तसे आम्ही माईना भेटायला गेल्यावर भरल्या गळ्यानी माईनी विचारलं होतं कधी दिसतो का गं तो.. पंताना ही चौकशीही आवडली नव्हती त्यानी दम भरायच्या थाटात समजावलं होतं" माई चिरंजीव त्यांच्या मर्जीने गेलेत त्याना जाऊदे नसत्या चौकशा नकोत
पण चौकशा नं करताही बातम्या कानावर येतच होत्या, आता काय ते सद्ध्या
रेल्वेक्वाँर्टर्स मधे राहतायत , मग काय घाट्कोपरला मित्राच्या घरात...
केमिकल इंजिनियर आमचा कुणाल पण या बयेच्या मागे नाचता नाचता त्याच्या करियरची पुरती वाट लावली या बयेनं नाहीतर गोवींदपंत त्याच्या मदतीनं पनवेलजवळ प्लांट टाकणार होते.......
मग आम्ही पण गोरेगावला राहयला आलो मधे दोन तीन वर्ष उलटली आणि एकदा हायपरसिटी मधे जोयाला बघितली भलत्याच माणसा बरोबर , मजेत खरेदी चालू होती ट्राँली भरभरून दोघे सामान घेत होते ही म्हणाली हरकत नाही बला गेली आता फक्त कुणाल परत माईंकडे गेलेला असूदे. आशेनं चौकशी केली
पण... कुठल्या तोंडानंयेईल असं तिरसटासारखं पुटपुटत पंतानी फोन ठेवला
जनु कुणालचा मित्र आता तो भेटला की विचारायचं ठरवलं पण त्या आधीच एकदा अचानक कुणाल दिसला साधे मळके कपडे, पायात स्लीपर्स, आधीच्या श्रीमंतीच्या काहीच खुणा राहिल्या नव्हत्या हातात एक साधी पिशवी , रश्शी असं काहीतरी पंतांच्या मुलाला नं शोभणारं सामान घेऊन चाललेला..
समोर आला म्हणून बोलणं भाग होतं नाहीतर त्याला टाळलच असतं. म्हणजे त्याची परिस्तिती बघून असं नाही,पण तरी अवघडायलाच झालं.. तरी पटकन ही’ पुढे झाली छान हसून जुजबी बोलली जोयाचा विषय आम्ही काढलाच नाही फक्त हिने कुठे राहतोस विचारलं.. वाकोला तो म्हणाला आम्ही चेंबूरलाच रिक्षेने जाणार होतो ,वाटेत सोडू का विचारलं आमच्या मनात प्रश्न होते त्याच्या मनात उत्तरं होती पण तरी कोणी कोणाशी बोललं नाही त्याची गल्ली आल्यावर तो निमुट उतरून गेला . मग आम्ही ठरवलच पुढाकार घेऊन पंतांशी बोलायचं आणि काही करून जोयाला गाठायचं आणि खडसाऊन जाब विचारायचा जनूशी बोलणारच होतो कारण पंतांसमोर जाताना कोणीतरी सोबत घेणं गरजेच होतं..
नं बोलावता जनू दाराशी हजर, त्याला बघताच आम्ही उत्साहात सांगायला जाणार तर तोच म्हणाला तुम्हाला कुणाल भेटला होताना? तुला कसं माहीत ? हा प्रष्न विचारायला मिळालाच नाही कारण जनूच म्हणाला मला त्यानेच पाठवलय गैरसमज दूर करायला
कसला गैरसमज? आम्ही आवंढा गिळत विचारलं
तुम्हाला वाटलं कुणाल आता देशोधडीला लागला वहिनी त्याला सोडून गेली..
हो अरे... मी बोलायचा प्रयत्न केला मला आडवत तो म्हणाला तुम्हाला वहिनी माँल मधे दिसल्याचं तिने मला सांगितलं होतं ती बोलायला येणार होती पण तुम्ही इतक्या विचित्र नजरेने बघत होतात
अरे मग तो कोण होता तिच्या बरोबर? मी चाचरलो..
तो मँडी होता जोयाचा म्हणजे वहिनीचा असिस्टंट त्याला ती धाकटा भाऊ मानते आणि कुणालचाही तो खूप लाडका आहे
मग कुणाल का असा कंत्राटी कामगारासारखा...
जनू हसत म्हणाला अरे तो ही शेवटी गोवींदपंतांचाच मुलगा सामाजीक जबाबदारीपासनं लांब कसा राहील? व्यवसायात स्थीर स्थावर झाल्यावर त्याने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले ,आता सणांचे दिवस सुरू झाले ना म्हणून जुन्या पुराण्या मंदीरांची साफसफाई आम्ही सुट्टीच्या दिवशा करतो तेंव्हा सुद्धा आम्ही महालश्क्मीच्या मंदीरातून बाहेर पडत होतो कुणाल पुढे आला तेव्हढ्यात तुम्ही
त्याला गाठलत उदात्तंपणाचा आव आणत रिक्षा आँफरकेलीत तुमचा हिरमोड करायचा नाहीम्हणून तो निमुट तुमच्या बरोबर रिक्षेत बसला नाहीतर मागनं त्याच्या दोन गाड्य़ा जय्यत तयार होत्या...त्यात मी सुद्धा होतो
कुणालचं निमंत्रण घेऊन जनू आला होता.कुणालने आम्हाला त्याच्या घरी बोलावलं होतं.. बिझनेस मधे फार अल्पावधीत कुणालने बस्तान बसवलं.त्याचं बस्तान बसे पर्यंत जोयाने संसार
सांभाळला,घर चालवलं.जोयाला तिचं करियर घरापेक्षा मोठ वाटत नसल्याचं जनू सांगत होता
आणि कुणालचं घर म्हणजे वाकोल्याला चित्रकार डहाणूकरांचा बंगला सद्ध्या त्याने भाड्याने घेतला होता, त्याचा स्वता:चा बंगला नव्या मुंबईत आकार घेतोच आहे...
उगाचच खजील व्हायला झालं. ....कुणालची ही अवाक्याबाहेरची प्रगती बघून आनंद तर झालाच पण लाजही वाटली... कोणी जरा आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळा वागला तर...
आपण लगेच त्याच्या बाबतीत वाईटच विचार का करतो? नको तेंव्हा उद्दातं वागायची घाई का होते?
का आपण मोकळेपणाने नं बोलता मनाचे ग्रह करून घेतो?...

This comment has been removed by the author.
ReplyDeleteअनपेक्षित....
ReplyDeleteअगदी खरं!
ReplyDeleteKhare ahe
ReplyDelete