सराईत

घराचा उंबरठा एकदा ओलांडला की सतरा उंबरठे ओलांडवे लागतात, माझंही तसच झालं, माईकडॆ सुरक्षीत होतो पण तिथनं दैवयोगाने बाहेर पडावं लागलं
आणि मग मजल दर मजल करत मी बारामतीकरांच्या अटोपशीर घराशी पोहोचलो.घरात स्थान नव्हतं पण राहण्यापुर्ती जागा होती, राहायची सोय
बजेट परवडाणारं होतं पण काही अटी जाचक होत्या त्यात महत्वाची अट म्हणजे काम असो वा नसो दुपारी बारा ते पाच घराबाहेरच राहायचं त्याला रविवारही
अपवाद नाही,मुबंई बंद, खग्रास सूर्यग्रहण,धो धो पाऊस यातलं काही असलं तरी..तेंव्हा माझं कामही भटकंतीचं होतं
माँडेल को आर्डीनेशन म्हणजे सतत संपर्कात राहावं लागायचं त्याकरता फिरावं लागायचं, चपला झिजवाव्या लागायच्या,डॊकं भिरभिरायचं
त्यात बारामतीकरांकडे आणखी एक जाचक अट होती मला फोन फक्त सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सातच घेता यायचे एरव्ही निरोप सुद्धा
त्यांची मर्जी असेल मूड असेल तर घेतले जायचे.त्यांच्या घरात मी सात महिने राहिलो पण तरी ते कुटूंब मला पुर्णपणे अनोळखीच राहिलं
तीन टगे निकम्मे मुलगे एक थोराड मुलगी, एक अधाशी कुत्रा दोन नोकर आणि सतत हिशोबात गढलेल्या त्या बारामतीकर बाई,आणि त्यांचे गंगावन लाऊन लाऊन केलेले लांब सडक केस
घरात कधीही नं दिसणारे त्यांचे मालक, मालक दिसले नाहीत तरी त्यांची दहशत सतत जपली जायची *आमच्या मालकाना नाही चालायचं " ्हे
पालुपद विष्णूसहस्त्रनामा सारखं निष्ठेने घोकलं जायचं. मग कळलं मालकांचा टॆंभा मिरवणार्‍या या बाई त्या बारामतीकरांच्या हौसेच्या बाई होत्या
दर महिन्याला बारामतीकर हौसेनं पैसे पाठवायचे त्यावर हे घर चालायचं पण पैसे पुरायचे नाहीत म्हणून पेईंग गेस्ट आणि मालकाना सं शय यायला नको म्हणून या
जाचक अटी..कधी कधी कार्दाऊन जायला व्हायचं
एक दिवस असच मला अंघोळीला जायला दहा मिनिटं उशीर झाला आणि ती थोराड मुलगी मला अंघोळीला जाऊ देईना.. बाई मधे पडेना
आणि नोकर? ते तर हुकुमाचे ताबेदार. सांगितलं तर खोटं वाटेलपण त्या थोराड मुलीने बाईची नजर चुकवून माझ्याकडे दहा रुपयांची
लाच मागितली दहा रुपये दे मग अंघोळ कर तेंव्हाचे दहा रुपये..( मसाले डॊसा आणि चहा घेतला तर एखादा रुपया परत यायचा)
निमुट दिले म्हणाली अँब्रोज करायच्या आहेत बाईला सांगितलं तर म्हणेल आण मी करून देते...ते ऐकण्यात मला इंटरेस्ट नव्हता.
उद्वेग आलाहोता त्यात घरा बाहेर पडणं गरजेचं होतं कारण ती अट मी मान्य केली होती आणि बाहेर जायला कारणच नव्हतं खिशाला
दहा रुपयांचं नाहक भगदाड पडलेलं असताना...परत बाहेर पडायचं निरर्थक चालत राहयचं बेघर असणं म्हणजे काय ते अशा क्षणी कळतं
डॊकं जड ,पोटात खड्डा ,तोंडाला चव नाही,जायला ठिकाण नाही
अशावेळी मी कित्येकदा माहीमच्या शितलादेवी मंदिरात जाऊन बसायचो ते पण्दुपारी बंदच असायचं पण मेधा तिथेच राहायचीत्यामुळे...
असो.. तर त्यादिवशीही असाच उसनं आवसान आणून मी बाहेर पडलो, पायानी कोणता रस्ता निवडला कोण जाणे, पावलानी किती वळणं
बिनातक्रार स्विकारली कोणजाणे पण अचानक डोळ्यासमोर एक भव्य विस्तीर्ण पंडाल दिसला गाद्यागिरद्या जागोजागी पंखे, सुशोभीत
केलेलं व्यासपीठ.लगेच आत डोकावायला मन धजावेना. बाकी कशाला नाही पण अपमानाला बेघर माणसं फार घाबरतात.पण पाहिलं तर तेव्हढ्यात
येण्याजाण्यावर रोकटोक नसावी असं वाटलं... तेव्हढ्यात पराग पोहनकर(नामवंत पत्रकार, माझा मित्र)पुढे आला"अरे तू इथे कुठे" असं म्हणत त्याने हात पुढे केला
मला मोठा आधार वाटला कारण मी माझी ओळख विसरून गेलो होतो ती त्याने लक्षात आणून दिली
बारामतीकरांचं घर सोडा पण बाहेर मला चार जण ओळखतात माझ्या कविता, कथा मी घेतलेल्या मुलाखती, मी लिहिलेलं परिक्षण रसिक
आवडीनं वाचतात आपण बेघर आहोत बेकार नाही याची जाणीव जिवाला खूप थंडावा देऊन गेली, तरूणपणी ही जाणीव मुलाना करून देणं
गरजेचं असतं आणि नेमक बहुतेक घरात मुलाना अशा वेळीच टोमणॆ मारून खिल्ली उडवून हतबल केलं जातं.. असो!
परागचा हात पकडून मी पंडालमधे प्रवेश मिळवला. मऊ मऊ गाद्या गरा गरा फिरणारे पंखे आणि बाहेरची रणरणती दुपार मी माझ्यावर खुष
आणि पराग म्हणत होता बरं झालं आलास द्न्यानेश्वरीवर अभ्यासपूर्ण प्रवचन सप्ताहं चालू आहे.. सप्ताहं? आज कितवा दिवस? मी माझी
सोय बघत विचारलं पराग उत्साहात म्हणाला आज पहिलाच दिवस आपले बरेचसे संवाद असेच आपल्या सोईनुसार पुर्ण होत अस्तात
प्रवचन सुरू झालं बोलणार्‍याचा दांडगा अभ्यास जाणवत होता, बोलायचं टेक्नीकही जमलेलं होतं पण मुद्दे खरे मांडत होता, आपणच आपला अहंकार कुरवाळत आपलं सोप्प असलेलं आयुष्य
कठीण करून ठेवतो आपल्याला आपल्या खर्‍या गरजा कळतच नाही आपलं स्वत:चं दू:ख कळत नाही स्वता:चा विचार करण्या आधी समोरच्याचा अंदाज बांधत बसतो.. तंतोतंत पटत होतं मला माझी सगळी धडपड
व्रुथा वाटायला लागली...खरं आहे ,सोपं आयुष्य जगायचं तर ह्यांचे धडे अनुकरणीय आहेत मला माझा भुतकाळ आठवला, घडलेले प्रसंग
आठवले मी त्यातच गुंतून गेलो सगळी जळमटं अंगाला चिकटल्यासारखी वाटायला लागली. प्रवचन कधी संपलं मला कळलच नाही
पराग घाई घाईने येत म्हणला चल चल तुझी बुवांशी ओळख करून देतो मी ही भारावल्या सारखा त्याच्या मागून चालायला लागलो
व्यासपिठावरून सगळं नश्वर आहे असं ठामपणे सांगणार्‍या बुवांच्या विश्रांतीची पंचतारांकीत व्यवस्था केलेली होती ती त्यांच्या अंगवळणी
पडलेली दिसत होती माझी त्यालाही काही हरकत नव्हती पण पराग मला त्यांच्या समोर घेऊन गेला ते विश्रांतीच्या मूड मधे पहुडले होते पराग  सारखा पत्रकार माझा हात धरून येतोय म्हणजे हा साधा दिसत नाही हे त्यानी ताडलं आणि बुवा मला बघून सराईतासारखे मंद स्मीत करत जरा
सावरून बसले, आता मी पाया पडणार या अपेक्षेने त्यानी नकळत मंचकावरचे पाय खाली सोडले त्यांच्या नजरेत पुढचा ठरलेला स्क्रीनप्ले
मला चक्क दिसत होता.चार क्षणातल्या या घडामोडी होत्या पण स्लो मोशन मधे मी त्या बघत होतो आणि त्यामुळे मी सावधच झालो. प्रत्येक्जण आप आपल्या प्रोफेशन प्रमाणे वागतो, तशीच त्याची मानसिकता होते
तशाच त्याच्या अपेक्षा बनत जातात मी आता त्यांच्या पाया पडणार याची खात्री की अपेक्षा त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती,मगाशी तेच म्हणाले होते अपेक्षा आली की मग अपेक्षाभंग ही ओघा ओघाने आलेच ही गुरफट अशीच तर गुरफटत जाते.. मला त्यांचा अपेक्षाभंग करण्याचा आसूरी आनंद मिळवावासा वाटला.. मी पाया पडलोच नाही
पद्धत म्हणून हात जोडले पण खूप मोकळं मोकळं वाटायला लागलं, बारामतीबाईंबद्दल वाटणारी तेढ सुद्धा शिथील झाली..सगळं तातपुरतं आहे
नश्वर आहे पण टाळता येण्याजोगं नाहीप्रत्येकाला प्रत्येकाची परिक्रमा पूर्ण करायची आहे.... रोज प्रवचनं घोकून घोकून त्या बुवांची त्यातून सुटका झाली नाही
मग आपण काय? सामन्य माणसं...

Comments

  1. याला जीवन ऐसे नाव!

    ReplyDelete
  2. Kiti mastt goshta. Jaganyatla virodhbhaas kiti chaan Mandalay... Apratim, dusrey shabd mahit. Tumchya goshtinchi me agadi manapasun vaat bhaghat asatey.

    ReplyDelete
  3. जगी सर्व सुखी असा कोण आहे..विचारे मना तूची शोधूनी पाहे....तुमच्या सारखी जगण्याचा खरा अर्थ कळलेली माणसं फारच कमी बुवा या भूतलावर...(बुवा म्हणजे वर उल्लेखलेले प्रवचनकार नव्हेत बरं..☺) असो..नेहमी प्रमाणे काही तरी शिकवून जाणारी कथा..🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी