लाडकी बाहुली

मकरंद सदाशीव जोशीचं अनघा केशव तुळपुळेशी रीतसर कांदेपोहे खाऊन आणि कैरीचं पन्हं पिऊन पत्रिकेतले छत्तीस गूण जुळल्यावर ठरवल्या प्रमाणे थाटामाटात लग्न झालं. रुखवत बघतानाचा फोटॊ छान आलाय तो आधी बघ असा त्याचा खास निरोप होता म्हणून त्याच्या लग्नाचा अल्बम आम्ही त्या फोटॊ पासून पाहिला. सीतेने रामाला बोटाने त्यांच्या उपवनात बागडाणारं सुवर्ण मृग दाखवलं आणि ती पोझ पिढी दर पिढी पुढे सरकत गेली आणि प्रत्येक सीता आपल्या रामाला काहीनी काही बोटाने दाखवत राहीली
तोच वसा आमच्या मकरंद्ने घेतला. अनघा सारख्या गोडेगोड मुलीवर सुद्धा तो वसा घेतल्या सारखच प्रेम करत असणार.माणसाने किती टिपिकल असावं याचं मकरंद सदाशीव जोशी उत्तम उदाहरण आहे.रविवार म्हंटलं की मटकीची उसळ हवीच नाहीतर डाळींब्या, आम्हाला जेवायला बोलावलं तर तँमेटोचं सार आणि फ्रुट सँलँड ठरलेलं मधे पाव भाजीचं फँड होतं पण ते फार टिकलं नाही.अनघाला उमा फार आवडते पण मकरंद तिला जाणून बुजून उमापासून लांब ठेवतो. का तर म्हणे उमा वहिनींची बातच और आहे...सुरुवातीला मी वाद घालायचो मग सोडून दिलं काहीमाणसं आहेत तशी स्विकारावी लागतात त्यातला आमचा मकरंद शिवराम जोशी. गोरा गोरा पान मनातून स्व्ता:वरच खुष असणारा "तू सुखात आहेस ना" असं अनघला मनापासूनविचारणारा.तिने लाजून मान खाली घातली की ती सूखात आहे असं समजणारा...
आणि तशी अनघा सुखातच होती कारण तिचं आमच्या मकरंद जोशीवर निरातिषय प्रेम होतं तिने सुद्धा त्याला तो आहे तसं स्विकारलं होतं.सगळं कसं गोडी गुलाबीने चाललं होतं वाँशींग मशीन पासनं ते कुलर ए सी पर्यंत सगळं घरात होतं मी घेऊन दिलं असा आव मकरंदच्या वागण्यात असतो. दिवाळी दसरा पाडवा गुढी पाडवा हे खास माहीतीपत्रक काढून साजरे करायचे सण
म्हणजे अनघाला दागिना केला साडी घेतली मुलूंड्च्या ताईला पैठणी घेतली. हिच्या मनात होतं म्हणून अत्तरदाणी घेतली आँफीस कडून पैसा मिळतो म्हणून कुलू मनाली ट्रीप केली
आपल्याकडे बहुतेक संसार असे आम धपके म्हणजे रामभरोसे होत असतात पार पडत राहतात चूक का बरोबरचा प्रष्ण नाही पण त्यामुळे नातं कसास लागत नाही. प्रेम सिद्ध होत नाही असं मला वाटतं. लहानपणी आम्ही एक निरर्थक खेळ खेळायचो. तू किती भात खाशील? एव्ह्ढा? एव्हढा? आणि मधेच विचारायचं वाघाला भिशील?
मला या दोघांचा आदर्श संसार असा वाटायचा . वाघाला भीशील? या प्रष्णाचं उत्तर"नाही" असच ठरलेलं असतं त्याला कोण काय करणार?
पण मकरंद सदाशिव जोशी सारखे प्राणी हे असेच प्रष्न गॄहीत धरत असतात
पण त्यांचं ही नातं एकदा कसौटीला लागलच
मक्या एक नंबरचा पझेसीव्ह. अनघाला कुणाचा स्पर्श नको म्हणून बस रेल्वे टाळणारा. मक्या घरी नसेल आणि मी कधी घरी गेलो तर बोलता बोलता अनघा मेनडोअर उघडं टाकणार कधी ते आमच्या कडे आले आणि मी अनघा शेजारी बसायची गुस्ताखी केली तर अस्वस्थ झालेला मक्या काही करून मला उठवणारच. त्याला बोलायच्या ऐवजी ही मलाच ओरडायची... उगीच त्याला चिडवू नका. एखाद्याला नाही आवडत .
काय नाही आवडत? का नाही आवडत? त्याचा कोणावर विश्वास नाही? स्वता:वर? बायकोवर? की आपल्या मित्रावर?
पण याला उत्तर नाही. हक्क आणि अधिकार यातला फरक लक्षात यायला तसा वेळच लागतो आणि कधी कधी तशी वेळ येतच नाही. माझ्यामते ते खरे दुर्दैवी...एकदा मक्याने मला विचारलं होतं वहीनी सिरियलमधे काम करतात तुला कसं चालतं? उत्तरा दाखल मी म्हंटलं हा प्रश्न तुला पडलाय तुलाच याचं उत्तर शोधायला हवं
आणि एकदा मकरंद सदाशिव जोशीला त्याचं उत्तर मिळालं
हायपरसीटी सारख्या बड्या माँल मधे म्हणे शनिवारी रविवारी बडी मंडळी खरेदीला येतात असं त्याने ऐकलं मॄणाल कुलकर्णी,सोनाली कुलकर्णी,सचीन खेडेकर,सतिश राजवाडे जवळून पाहयला मिळतात तिथे नेऊन आपण अनघाला वेगळाच आनंद मिळवऊन देतोय अशा थाटात मक्या त्या साध्या सुध्या मुलीला शनिवारी संध्याकाळी घेऊन गेला.... अगडबंब माँल तिथली चमक धमक. घरात कोंडल्या गेलेल्या अनघाला तर प्रत्येक चीजच निराली आणि अजुबा वाटेल अशी होती.हा पण नवख्या सारखा तिथे तिचा हात धरून फिरत होता. तिला कोणाचा धक्का लागणार नाही या साठी दक्ष होता पण शनिवारची संध्याकाळ... म्हणजे हौषे गौशे नवशे सगळेच एका छता खाली जमा होतात. त्या गजबजाटाची सवयच असावी लागते. 
आणि जे व्हायचं तेच झालं दोघं कसे कोण जाणे एकमेकापासून बिछडले. चार पावलांचा हिशोब चुकला आणि दोघे एकमेकाना दिसेनासे झाले वर्दळ अशी की सगळ्याच दिशांचा भवरा झालेला. गोरी गोरी पान नाजुकशी नितळ्कांतीची साधीसुधी अनघा हरवली बाप रे! हरवणे हा शब्द वाचताना जितका सहज तितकाच तो अनुभवताना महा कठाण , मकरंदने भान राखून आधी तिला शोधायचा प्रयत्न केला पण तो इतका भांबावला की आपण पुढे गेलो की मागे आलो हे ही त्याला कळेना ,  शेवटी नाईलाजाने त्याने आम्हाला बोलाऊन घेतलं. तेंव्हा मोबाईलचं एव्हढं प्रस्थ नव्हतं आम्हाला काय कारयचय ते दबडं? असं म्हणणारे लोक बरेच होते त्यात आपला नायक सुद्धा होता मला वाटलं अनघा हरवली म्हणून हा चिडला असेल वैतागला असेल पण तसं झालं नव्हतं तो केवीलवाणा झाला होता त्याला काहीकरून अनघा हवी होती. जस जसा वेळ पार पडत होता तसा तो चक्क रडायला लागला . मकरंदचं हे रूप मला नवं होतं,चार दोघे आमच्या भोवती घोळका करून उभे राहिले पण त्याला त्याची तमा नव्हती,एरव्ही बायको हरवण्यावरून आपण किती विनोद एकमेकाला सांगत असतो... पण बायको हरवली म्हणून रडणारा मकरंद कोणाला खटकला नाही..
माझ्या गळ्यात पडत तो म्हणाला तिच्या बाबतीत काहीही झालेलं असूदे फक्तं ती परत येऊदे रेsss परत येऊदेss मला कशाने काही फरक पडत नाही. फार फार प्रेम करतो रे मी तिच्यावर तिला हे माहीत आहे की नाही कोणजाणे? कुणी पळवून नेलं असेल कुठे कोंडून ठेवलं असेलअगदी गँग रेप झाला असला तरी मी त्याला गप्प करत दटावलं असं काही होणार नाही...पण मन चिंती ते वैरी नंचींती म्हणतात तशी त्याची गत झाली होती त्याचा पुरषी अहंकार जळून खाक झाला होता आणि माझ्यासमोर होता तो अग्नीदिव्यातून पार पडलेला एक प्रियकर .
मी म्हणालो शांत रहा आपण कंट्रोल रूमला कळवलय ते अनाऊंस करतायत त्यांचे गार्डही शोध घेत आहेत
पण मकरंदचं कशानेच समाधान होत नव्हतं... मी फार तिला बंधनात ठेवली.कधी कुठे एकटीने पाठवलं नाही. एकनिष्ठ असण्याचा वेगळा आदर्श तिच्या माथी मारला आता तिच्यावर कोणी बळजबरी केली असेल तर वेडी मला तोंड कसं दाखवू? म्हणून निघून जाईल रे..आणि आणि तिने जीव दिला तर?.....आणि बघे जे असतात ते बरेचदा वेगळाच सूर लावतात कोणी म्हणालं किसिके हाथ लगी तो वो थोडी उसे यही रखेगा ? कब का गाडी में डाल के हैद्राबाद सुरत..जाऊदे.. जितकी तोंड तितक्या गोष्टी..
पण तेव्हढ्यात गार्ड तिला घेऊन आला आष्चर्य म्ह्णजे ती शांत होती चुकामुक झाल्याचं कळल्यावर ती कंट्रोल रूम मधे जाऊन बसली तिने मकरंदचं नाव वर्णन सांगितलं ते मला शोधत येतील हे ही सांगितलं पण तिचं काही बोलणं ऐकायच्या आतच मकरंद सदाशिव जोशी घोळक्यासमोर आपल्या पत्नीच्या गळ्यात पडून निरागस पणे रडत राहीला,मुसमुसत राहिला 
.लाडकी बाहुली होती माझी एक मिळणार तशी ना शोधून दुसर्‍या लाख अशी आम्हाला एक कविता होती त्या कवितेचा अर्थ मला नव्याने कळल्या सारखं झालं..

Comments

  1. Apratim! Tumchi pratyek goshta manala bhidate Sir

    ReplyDelete
  2. कित्ती छान..

    ReplyDelete
  3. Apratim.....As usual....👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी