तिसरा वाढदिवस
लग्नाचा तिसरा वाढदिवस
दोघांचा प्रेमविवाह. त्यात दोघेच घरात, दोघेही दोन्ही घरी लाडके त्यामुळे सकाळपासून फोन सुरू , तिच्या हट्टासाठी शक्य नसताना त्याने सुट्टी घेतली होती
कालपासूनच उत्सवाचा माहोल होता, तिने हौसेनें फुलपुडीवाल्याला दारावर लावण्यासाठी फुलांच भरगच्च तोरण बनवायला सांगितलं होतं
अंमळ उशीरा उठायचा मूड असताना त्या फुलवाल्यासाठी त्याला लवकर उठावं लागलं जरा किरकिरायला झालं.. एकतर रात्रीचं जागरण.. हा हा म्हणजे लाडाची लेक होती ना ती! मग अगदी पप्पा मम्मा पासनं ते तिच्या बहीणी इतर भावंड, मित्र मैत्रीणी , आँफीस मधले सहकारी याच्या बाजूनेही साधारण क्रम असाच बारा वाजले आणि दोन्हीकडून फोन सुरू झाले बोलणंही तसच म्हणजे तेच ठरलेलं शुभेछ्चांचा महापूर आणि थट्टा करण्याची ठरलेली( काहीशी कंटाळवाणी) पद्धत..
पण तरी मजा आली , अशी पुढची साठ वर्ष तरी हाच क्रम राहुदे असं त्याला मनोमन वाटलं होतं
पण सकाळी डोळ्यावर झोप असताना उठावं लागलं ही त्याला दिवसाची राँग सुरुवात वाटली कारण एकदा आपण उठलो की ही भर भर आवरून घे म्हणून मागे लागणार हे त्याला माहीत होतं यावरून कितीतरी रविवारच्या सकाळी दोघानी खडाजंगीत घालवल्या, तिन्हिसांजा गोडी गुलाबीत जायच्या ती बात अलहिदा
पण आजच्या दिवसाची सुरुवात खडाजंगीने नको म्हणून त्याने सावध पवित्रा घेतला.. तोरण ताब्यात घेतल्यावर तिच्याकडॆ देत तो तोंड धुवायला गेला तिने तोरण उलगडून बघितलं अगदी तिने सांगितल्या प्रमाणे भरगच्च सूंदर झालं होतं पण आज तिनेही समजुतदारपणेच वागायचं ठरवलं होतं ती आपणहून त्याला म्हणाली जरवेळ पड जा
मी मग हाक मारते.. त्याला तिच्या या बोलण्याने एकदम उमाळा आला
तो म्हणाला तू पण पड जरावेळ, इतक्या लवकर उठून काय करणार आहेस?
ती खट्याळपणे म्हणाली नक्को! तू एकटाच पड
मी आले तर स्वत: झोपणार नाहीस आणि मला झोपू देणार नाहीस.. लाडात यायला त्याला इतकं वक्तव्य पुरेसं होतं
मग काय.. हो नाही हो नाही करता करता गँसवरचं दूध उतू गेलं... तिने मन खाट्टू होऊ दिलं नाही.. त्यानेही समजुतीने घेतलं म्हणाला दूध उतू जाणं शुभं शकून असतो, ती म्हणाली पण हा शुभ शकून निस्तरण्यात बराच वेळ जातो नाss.. काल शेगडी धुतली होती.. आणि दूधही नाही.. तितक्यात त्याला सायकल वरून जाणारा दूधवला दिसला त्याने हाक मारली आणि खुणेने दूध आणायला सांगितलं
तो खिडकीशी आला कितना दूध लाऊ?
हमेशा इतनाच्य.. तो म्हणाला
भेजता हूँ म्हणत तो म्हणाला आपको मालूम पडा क्या?
काही काही स्वर काही वाक्यांची सुरुवात कशी असते ना?.. लगेच सगळ्या आशंका जाग्या होत आपापली जागा घेतात
क्या हुवा? त्याने धास्ताऊन विचारलं
गणपत गयाsss
समजलं असून अनाहूतपणे तो म्हणाला किदर?
क्या साब.. गणपत गया बोले तो.... म्हणत तो वळला
गणपत त्यांच्या काँलनीचा माळी कम हरकाम्या.. ते दोघं इथे राहयला यायच्या आधीपसनं तो इथे बरीच वर्ष काम करत होता.. हाडाचा माळी पाना फुलांवर प्रेम करणारा.. काँलनी स्वछ्च ठेवणारा देवभोळा माणूस.. त्याची सगळी माणसं वाईला त्याच्या गावी, तो फारसा कधी गावी गेल्याचं स्मरत नाही, ही आँफीस्मधून आल्यावर चहा करायची तर बरेचदा त्याला चहा द्यायची, कधी पँटीस आणले तर आवर्जून त्याला बोलवायची पँटीसला तो वडॆ म्हणायचा.. गणपत गेल्याचं ऐकून दोघेही अस्वस्थ झाले दारावर तोरण वगैरे लावणं आता शक्यच नव्हतं
इतक्यात फुलवाला परत आला.. येताना तो दूध घेउन आला होता.. हा दूध घेउन कसा आला? हा प्रश्न मनात घोळत असताना त्यानेच उत्तर दिलं
भाऊ बातमी तर कळली ना तुम्हाला? दोघेही मानेनेच हो म्हणाले
मग ते तोरण देता का परत?मला नाही वाटत तुम्ही आता दारावर लावाल
आँर्डर आहे.. वाया नाही जायचं.. तिने तसच उचलून त्याला परत देऊन टाकलं
गणपत गेला हे वाईटच झालं पण आपण आपला मूड जाऊ द्यायचा नाही, साधेपणाने घरतल्या घरात आपण आपला दिवस साजरा करू म्हणत दोघे एकमेकांची आणि स्वत:ची सुद्धा समजूत काढत राहिले
त्याच मूडमधे दोघानी चहा घेतला आणि ती अंघोळीला गेली.. ती अंघोळीला गेली आणि खिडकीशी दूधवाला हजर
एक बात पुछनी थी?.. पुछो खिशाकडॆ हात नेत तो म्हणाला
दुधवाला घाईने म्हणाला.. नही नही पैसा नही चाहिये
क्या है.. गणपत के रिश्तेदार तो मुलुकसे आने से रहे.. दो बेटीयाँ है पर उनका मुलुख और दूर कही है.. गणपत की जोरू तो गये सालही गुजर गयी
मुझसे क्या पुछना था? त्याने त्याला आडवत विचारलं
ये मैय्यत का सामान थोडी देर आपके बाल्कनीमें रखा तोचलेगा क्या?
हम दोस्त्लोगही उसके अब सगे रिश्तेदार है... उसकी उम्र इस काँलनी में गुजरी
सेक्रेटरी से परमिसन मिल गयी है
गणपत को यहाँ लाकर हम यहँसे उसे ले जाने वाले है
थोडी देर की बात है... इंसानियत के नाते त्याने सामान ठेवायला हो म्हंटलं
सामान ठेऊन तो गेला आणि ही अंघोळीहून आली नेहमीप्रमाणे तुळशीला पाणी घालायला गेली आणि अचानक समोर अंत्यविधीचं सामान बघून ती बिथरली
जवळ जवळ किंचाळलीच शीsss हेss काsssय
तो समजवायला यायच्या आतच तिच्या नकळत तिने समजुतीचे सगळे दरवाजे खटाखट बंद केले होते
मग जो वादंग माजायचा होता तो माजला जो जाळ उठायचा होता तो उठला
आणि त्याने तडकाफडकी आँफीसला जायचा निर्णय घेतला
ती खूप रडली हे काय अभद्र वगैरे काय काय बोलत होती, दूध उतू गेलं तर तो शुभ शकून आणि आजच्या दिवशी हे अभद्र आपल्या दाराशी आलं तर मी घाबरायचं नाही चिडायचं नाही? त्यात तिचा भर हाच होता की आपला दिवस काय होता? साजरा नाही केला तरी... तिला नक्की काय काय वाटत होतं हे तिला नीट मांडता येत नव्हतं
आणि त्याच्या मते जे समजवायचं ते समजाऊन झालं होतं
आपण तळ मजल्याला राहतो, तळमजल्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत
त्यात आपली बल्कनी उघडी अगदी साहजिक होतं ते त्यात इतका आकांत करायची गरज नव्हती.. शेवटी जो गेला तो आपलाही कोणी लागत होता
मग इतकं होतं तर त्यानी डिसोजा अंकलची बाल्कनी निवडायची होती.. आता त्यानी आपली गँलरी का निवडली ? याचं उत्तर माझ्याकडॆ नाही आणि त्याक्षणी हा पर्याय माझ्या लक्षातही आला नाही
त्याचच तर दू:ख आहे म्हणत ती काही बाही बोलत राहिली
आणि तिला तशीच बोलती ठेवत तो आँफीस साठी बाहेर पडला
पण त्याने बाहेर पडल्यावर एक काम केलं तिच्या घरी फोन करून मम्माला सांगितलं तुझ्या लेकीला जरा घरी बोलाऊन घे, बिनसलय जरा एकटी स्फुंदत बसेल
मी संध्याकाळी येतो
मम्मा समजुतदार होती तिने लेकीला बोलाऊन घेतलं काय झालं काय झालं विचारत तिच्याकडून सगळं काढून घेतलं
आणि मग म्हणाली किती भाग्यवान आहेस बघ त्याला तुझी काळजी आहेच पण तो ऋणानुबंध जपणारा आहे, त्याने ते सामान ठेउन घ्यायला नकार दिला असता तर फार विशेष काही घडलं नसतं पण सामान ठेवायला दिल्याने तो त्या गणपतच्या दू:खात सहभागी झाला , जाणारा गेलाच पण बाकीच्यांची तुमच्या कडे बघण्याची दृष्टीच बदलेल..हे साहेब माणूसकी जपणारे आहेत हा लौकीक आपल्या परिसरात स्थायीक होण्यासाठी खूप मोलाचा आहे
त्यानेच मला फोन करून तुला बोलाउन घ्यायला सांगितलं होतं
आता तू ही शहाण्यासारखी वाग छान तयार हो आणि त्याच्या आँफीस मधे जा आज त्याला काम करू देऊच न्कोस त्याला तिथून बाहेर काढ आणि अख्खा दिवस बाहेरच सेलिब्रेट करा
इथे याला आँफीस्ला आलेला बघून बाँसला आश्चर्यच वाटलं
त्यात त्याचा मूड बघून त्याने त्याला केबीन मधे बोलावलं.. झाला प्रकार ऐकून बाँसने तिची बाजू घेतली.. म्हणाला तेरी वाईफ सयानी है, ये औरतें घर को लेकर इतना पझेसीव्ह रेहेती है इसलिये हम जैसे हरफन मौले लाईन पे रहते है
कोईभी औरत जो अपने घरसे गृहस्थी से प्यार करती हो वो ऐसे खास दिन अपने घरके चौखट पर ऐसा अर्थीका समान नही सेहे सकती,और वह भी सुबह सुबह उसकी फीलींग्ज समझनेके बजाय तुम उसे घर अकेला छोड के आये? बेवकुफ अगर और एक मिनिटभी तुम यहाँ रुके तो मैं तुम्हारी आजकी तनख्वाँ दुगनी काटूंगा.. जाओ जल्दी
तो झपाझप पायर्या उतरत असताना ती समोरून येताना दिसली त्याने नजरेने तिला कधीच कवेत घेतलं पण प्रत्यक्षात तो ते करू शकला नाही
दोघे नं ठरवता वाटेतल्य़ा देवळात गेले... आणि मनोमन निवांत होण्याचा क्षण त्यानी तिथे अनुभवला
कारण त्यांच्या दारावर लागणारं तोरण देवळाच्या गाभार्यावर लागलं होतं ते बघता क्षणीच तिने तोरणओळखलं ... आणि मिळालेला कौलही ओळखला

काय लिहू समजत नाही....पण असच लिहित रहा. ....
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteही गोष्ट मी आधी वाचली होती. पण आज परत वाचताना डोळ्यात अगदी पाणी आले. मला नेहमी वाटत की आपल्या गोष्टी परत परत वाचाव्याशा वाटतात. त्याचा आज अनुभव आला. गोष्ट तीच पण मी बदललो, त्यामुळे गोष्टीचा परिणाम वेगळा. फारच छान. आयुष्याचा खजिनाच हाती आला आहे. जपून ठेवला पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद. शुभेच्छा.
अरविंद केळकर
औंध, पुणे.