सांगोपांग

पदूभटजी विष्णूपाद स्वामींचे निस्सीम भक्त, विष्णूपाद स्वामी जेंव्हा देहं धारण करून होते तेंव्हा पदूभटजींकडे दोनदा आले होते त्यात एकदा त्यांचे श्रीचरण धुतले तेंव्हा ते ओल्या पावलानी घरभर फिरले त्यात मधल्या खोलीच्या दाराशेजारी स्वामींच्या श्री चरणकमलांचे जे ठसे उमटले ते कायमचे... तो पदूभटजीच्या घराण्याला मिळालेला प्रसाद होता
पदूभटजीना अपत्य योग उशीरा होता पण विष्णूपादस्वामींच्या आशिर्वादाने त्याना पुढे दोन मुलगे झाले श्रीरंग आणि श्रीराम
पदूभटजी बरीच वर्ष जगले शेवटपर्यंत प्रकृती उत्तम, पंचेंद्रिय पूर्ण कार्यरत.... वृती..समाधानी
त्याना आपला निर्वाणकाळ कळला होता मोठ्या समाधानाने त्याना आपल्या लेकी सुना नातवंड पतवंडाना एकत्र यायला सांगितलं आपल्या दोन्ही मुलाना चार हिताच्या गोष्टी सांगितल्या दोन्ही मुलं गुणाचीच होती पदूभटजींच्याच तालमीत मोठी झाली होती पण तरी धाकट्याची वृत्ती जरा अस्वस्थ असायची... त्याला बाहेरचही जग खुणावायचं पदू भटजी असे पर्यंत त्यानी स्वत:ला आवरलं होतं पदूभटजी एकादशीचा मुहूर्त साधून गेले त्यांचं नीर्वाण म्हणजे एक सोहळाच होता डोळे मिटायच्या आधी साक्षात विष्णूपाद स्वामीनी विदेही असताना त्याना दर्शन दिलं तसच त्यांच्या मठाचे अधिपती गोवींद स्वामी स्वत: पदूभटजीना शेवटचा निरोप द्यायला आले होते...
दिवस कार्य पार पाडल्यावर गोवींदस्वामी जायला निघाले दोन्ही बंधू निस्सीम श्रद्धेने त्यांच्या पाया पडले... गोवींदस्वामीनी आपल्या पोतडीतून दोन चांदीचे शिक्के काढले म्हणाले स्वामी महात्म्यानी एकूंण एकावन्न शिक्के मला प्रसादासाठी दिले त्यातले आज पहिल्यांदीच मी दोन शिक्के काढतोय महात्मनांचा प्रसाद म्हणून तुम्हा दोघाना देतोय तुमचं कल्याण होईल...
दोघानी श्रद्धापुर्वक ते शिक्के स्विकारले आणि पुजेत ठेवले पुढे कर्मधर्म संयोगाने किंवा श्रीरामाच्या इछ्चेनुसार त्याला शहरात नोकरी मिळाली त्याने आपले बिर्हाड हलवले आणि तो शहरात स्थायीक झाला.जाताना आपला वाट्याचा शिक्का श्रद्धेने घेऊन गेला
.. श्रीरामाला दोन मुलगे एक मुलगी आणि मोठ्या श्रीरंगालाही दोन मुलगे एक मुलगी
त्यात पून्हा गम्मत अशी की धाकट्या दोघी दोन्ही घरात एकाच दिवशी येत्या झाल्या.. दोघींचा वाढदिवस एकाच दिवशी
त्याच वेळी श्रीरामाला व्यापाराची एक मोठी संधी चालून आली भांडवलाची गरज होती श्रीरंग खाऊन पिऊन सुखी होता त्याने जरी मदतीचा हात पुढे केला तरी त्याला मर्यादा होत्या पण तरी हिम्मत करून श्रीरामाने भांडवल उभं केलं पण तरी एकशेतीस रुपये कमी पडत होते जिद्दीला पेटलेल्या श्रीरामाने एक निर्णय घेतला आणि पत्निलाही पत्ता नं लागू देता प्रसादाचा चांदीचा शिक्का उचलला त्या शिक्क्याची डबी पुजेत होती आणि ती कायम तुळशीपत्र फुलानी झाकेलेली असायची पत्निला या चोरीचा पत्ता लागणं शक्य नव्हतं श्रीरामाने मनोभावे विष्णूपादांची क्षमायाचना केली व्यापार उद्यमला सहाय्य करायची प्रार्थना केली.. आणि तो शिक्का पेढीवर विकायला निघाला शिक्का बघून तो मारवाडीही चकीत झाल म्हणला अशी चोक्कस चांदी तुम्हाला भेटली कुठे?... त्याने मोजून एकशे पस्तीस रुपये दिले... आणि काय सांगू राव त्या भांडवलात हे एकशे पस्तीस रुपये काय पडले त्या भांडवलाचं भंडार झालं दिन दुगनी रात चौगनी अशी तरक्की धाकट्याची होत राहीली पैसा आडका जमीन जुमला कशाला काही कमी नाही सगळं मनासारखं मिळवल्यावर.. आता श्रीरामाला तो शिक्काही परत हवा होता तो खुपशी रक्कम मठाला दान करता झाला गोवींद्स्वामीनी निर्व्याज वृत्तीने त्याला आशिर्वाद दिले.. आणि जरा ओशाळत श्रीरामाने आणखी एक शिक्का त्यांच्याकडे मागितला पण स्वामीनी त्याला मात्र नम्र नकार दिला म्हणाले महात्मनांचा आदेश नाही तर तो प्रसाद तुम्हला परत कसा देऊ? तुम्ही तो शिक्का जिथे ठेवलाय तिथे तो सुखरूप आहे...
श्रीरंगाची मुलही शिकून सवरून मोठी झाली मोठा मुलगा तर डाँक्टर झाला पण तो गावातच प्रँक्टीस करत राहिला धाकटा प्रोफेसर झला पण तो ही जिल्ह्याचा गावी एका काँलेजात नोकरी करता झाला..
श्रीरामाची मुलं त्याच्यापेक्षा महत्वाकांक्षी निघाली त्यानी वडिलानी सुरू केलेला व्यवसाय जगभर पसरवला.. आता ते राजकारणात शिरण्याचे मनसुबे आखायला लागले आणि श्रीराम या आपणच वाढवून ठेवलेल्या व्यापाला घाबरला त्याला तो वेग सहनच होईना त्यामुळे.. जरा आजारी झाल्यासारखा झाला लगे़च श्रीकांत आला आणि काळजीने त्या दोघाना आपल्याकडॆ गावाला घेऊन आला
श्रीरामाच्या घरापुढे श्रीरंगाचं घर अगदी साधं होतं पण या दोघाना इथला निवांतपणा भावला इथली प्रत्येक गोष्टच साधी पण मनाला भावणारी
सकळी न्यहारीला साधे दही पोहे नाहीतर भाकरीचा काला असयचा शहरात त्याच्या घरी त्याचा स्वैपाकी ब्रेकफास्ट साठी अख्खं टेबलभर पदार्थ मांडायचा पण ही चव त्या पदार्थाना नव्हती... इथल्या सारखा झुळू झुळू वारा त्यांच्याकडे नव्हता या घरीही पाहुण्यांची ये जा होती पण तिथल्या सारखा कोरडेपणा यात नव्हता... श्रीरंगाची बायको श्रीरामच्या आवडी निवडी लक्षात ठेऊन रोज स्वैपाक करायची त्यात तिचा केवळ याला खुष करण्याचा हेतू नव्हता तर माया होती प्रेम होतं
आपलं वैभव या सुखापुढे थीटं वाटायला लागलं आपण तो शिक्का विकून पाप केल्याची भावना त्याच्या मनात बळावली.. तो अधीकच अस्वस्थ झाला घरचा डाँक्टर होता पुतण्या काकाकडे काळजीने लक्ष देत होता पण तरी काकाच्याअस्वस्थतेचं नेमकं कारण त्याला मिळत नव्हत शेवटी तो म्हणला काका जे मनात आहे ते स्पष्ट बोला आम्ही तुमचीच माणसं आहोत खात्री बाळगा..
आणि श्रीरामाचा बांध फुटला आणि त्याने प्रसादाचा शिक्का उद्यमासाठी विकल्याचं सांगितलं त्याच्या प्रियपत्नीला हा धक्काच होता..इतकी वर्ष आपण रिकाम्या डबीची पुजा करत होतो?
शेवटी दोन्ही बंधू सहकुटूंब विष्णूपाद स्वामींच्या मठात गेले झाल प्रकार गोवींदस्वामीना सांगितला ते म्हणाले हे सांगायला मुद्दाम इथे कशाला आलात? त्याने तो शिक्का जेंव्हा विकला तेंव्हाच मला कळलं मौज बघा याने ज्याला तो प्रसादाचा शिक्का विकला तो मात्र तो शिक्का जिवापाड जपून आहे आणि त्याच्या वृत्तीत भलताच फरक पडलाय
आणि इथे येऊन क्षमा मागायची काहीच गरज नाही तो तुम्हला दिल्रेला प्रसाद होता त्याचा विनियोग तुम्ही तुमच्या मताने करू शकता
मग श्रीराम म्हणला मग असं का झालं ? दादाच्या घरी साध्या पाण्याच्या घोटातही स्माधानची चव आहे ती माझ्याकडे का नाही?
गोवींदस्वामी मंद हसत म्हणाले अरे महात्मन समाधानच वाटत फिरत असतात त्या बदल्यात तू सुख मागितलस महात्मनानी तुला दिलं श्रीरंगाने तो प्रसाद जपला म्हणून समधान त्याच्यापाशी राहिलं
मग आता मला कधीच समधान मिळणार नाही का?
आता मात्र गोवींदस्वामी जोरात हसले म्हणाले हा तुच तयार केलेला भ्रम आहे आणि त्याच भ्रमात तू राहतोयस अरे नोकरी धंद्यासाठी तू घर सोडून शहराकडॆ रवाना झालास,आणि हवं ते तू मिळवलस , मग हवं ते मिळालं याचं समाधान नाही का? पण आणखी हवं आणखी हवं करत बसलास तर समाधान आणखी मिळाल्यवरच मिळेल मग हे आणखी कधी आणि कुठे थांबवायचं हे तुझं तुलाच ठरवायला हवं
आणि दुसरं असं की तू आता तुझ्या मूळ घराशी तुलना करतोयस
कारण ते मूळ घर तुच परकं समजायला लागलायस, नाहीतर नीट विचार कर कामधंद्याच्या निमित्ताने तू शहराकडॆ रवाना झालास याचा अर्थ हे घर तुझं नाही का? हा मोठा बंधू तुझा नाही का? आईसारखी माया करणारी वहिनी तुझी नाही का?
तुझा डोलारा तू शहारत उभा केला असलास तरी पाया हाच आहेना? दोन्ही भाऊ एकाच पदूभटजींची अपत्य आहात महात्मनांच्या आशिर्वादाने तू उत्कर्ष साधालास तर मोठ्याने समधान राखलं तुम्ही दोघे एकत्र आहात हे कधी विसरू नका म्हणजे दोन्ही तुमच्याकडे राहील...असं म्हणूया
महात्मनाना हेच अपेक्षीत होतं म्हणून त्यानी तुम्हा दोघाना वेगवेगळे शिक्के दिले श्रीरंग समाधानात होता म्हणून त्याला सुखाची वेगळी गरज भासली नाही याचा अर्थ तू चुकलास असा होत नाही आयुष्य परीपूर्ण जगायचं तर दोन्ही गोष्टी हव्यातच फक्त सुप्त अहंकारापोटी तुम्ही विलग होता ते होऊ नका भले आपआपल्या व्यापात रहा पण मनाने वृत्तीने एक रहा की सगळं तुमचच आहे... अतीव आनंदाने श्रीरामाला ग्लानी आली गोवींदस्वामी त्याला मायेने थोपटत राहिले... आता तो शुद्धीवर आलाकी त्याची नवी सुरुवात असेल

Comments

  1. Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  2. Aaj farak kalala, kitti sundar sangitli gosht tumhi. Agdi hatala dharun firat firat. Samadhana cha arth shodhna suru.

    ReplyDelete
  3. Samadhaan bhetle vachun... Adbhut... 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मूक अभिनय

दुसरी आई

ओळ्खीची मामी