परिमल
ती लग्न होऊन या घरी आली ना
तेंव्हा बाकी सगळं ठीक होतं , ठीक म्हणजे छानच... बर्यापैकी मोठ घर, अबोल असली तरी मनानं सरळ असलेली सासू, बहिणीची माया लावणारी मोठी जाऊ आधार वाटेल असा मोठा दीर आणि जीव ओवाळून टाकावा असा लाडोबा नवरा आपले लाड करून घेण्यात पटाईत
घर या दोघींवर सोपवल्यावर सासू कधी लुडबुड करायला यायची नाही... हिची बडबड कौतूकाने ऐकत राहयची
एकच जाच होता स्वैपाकघराला असलेली प्रशस्त खिडकी उघडायची नाही अशी सक्त ताकीद होती
का तर प्रचंड दुर्गंधी येते, आणि ती कोणालाच सहन होत नाही... तशी ही मुळची हट्टी तिच्या आई समान वहिनीलाही तिच्या या हट्टीपणाचीच काळजी होती पाठवणी करताना हिच्या सासूच्या पाया पडताना वहिनी काकुळतीने म्हणाली होती बाकी लाखात एक आहे आमची मुलगी फक्त जरा हट्टी आहे, तेव्हढं सांभाळून घ्या...
वहिनीची अशी अकृत्रीम माया बघून सासूचेच डोळे पाणावले होते
पण आता चार सहा महिने झाले पण हिच्या हट्टीपणाचे काही गूण दिसले नव्हते..
एकदा हट्टाने तिने खिडकी उघडली होती पण प्रचंड दुर्गंधीने ती ही हैराण झाली त्या नंतर ती कधी ती खिडकी उघडायच्या भानगडीत पडली नाही
ती भानगडीत पडली नाही असं सासूला वाटत होतं
खरी मेख वेगळीच होती.. या घरचा दिनक्रम असा होता भल्या पहाटे उठायचं घरच्या देवपुजेला सगळ्यानी न्हाऊन बिऊन हजर राहयचं मग तिर्थ प्रसाद घेतला की न्यहारीची तयारी मग आधी पुरुष मंडळी न्याहारीला बसायची मग बायकानी बसायचं मग दुपारचा स्वैपाकाला लागायचं शक्यतो आपापल्या नवर्याना काय आवडतं हे लक्षात ठेऊन रोजचं रांधायचं सिझन नसेल तेंव्हा दोघे जेवायला घरी यायचे दुकानात गर्दी असेल तेंव्हा डबे पाठवायचे, ही डब्या बरोबर चिठ्ठी सुद्धा पाठवयची एकदा डब्याची अदलाबदल झाल्यावर तिच्या मोठया दिराने ही चिठ्ठी वाचली होती... असा प्रणय तर त्याला माहीतच नव्हता मग तो आपल्या बायकोला म्हणाला तू पण पाठवत जा ना अशी चिठठी
मग तर काय जावा जावांच अजूनच मेतकुट जमलं, दोघीच आपलं सारखं खुस फुस खुसफुस चालू असायचं दोघी खिदळल्या की सासूचं लक्ष जायचं दोघीना असं मैत्रीणींसारखं खिदळताना बघून सासू बसल्या बसल्या देवाला हाय जोडायची
पण हे सगळं उरकायला दुपारचा फक्त दीड वाजायचा पुढचा अख्खा दिवस बिचारीच्या अंगावर यायचा, मोठी जाऊ काय सवयीने झाक पाक करून आपल्या दोन लहानग्याना पोटाशी धरून छान चार तास झोपायची,,, हिला झोपच यायची नाही मग तिने एक धाडस केलं
एकदा या दोघी झोपल्यावर ती हिय्या करून घराला वळसा घालून मागच्या अंगणात गेली
अंगणापलिकडे छोटा बोळ होता बोळापलिकडॆ परधर्मियांची वस्ती होती, यांची काही बोलाचाली नव्हती वहिवाटीने सगळा कुडाकचरा यांच्या अंगणात टाकायची पद्धत झाली होती
छोट्या बहूला मागच्या अंगणात आलेलं बघून त्या वस्तीतल्या बायकानाही आश्चर्य वाटलं पण ती तेंव्हा तिथे दोन क्षणही थांबू शकली नाही इतकी दुर्गंधी आणि घाण पसरलेली होती ती तशीच घरी आली आणि डोक्यावरून चार घडे पाणीओतल्या शिवाय तिला चैनच पडलं नाही
पण मग मात्र तिने मनावर घेतलं तिने माळ्यावरचे गंमबुट मिळवले.. मेणकापडाचे हाताचे ग्लोज तयार केले आणि या दोघी झोपल्यावर ती त्या घाणीत चक्क उतरली
तिने ओला कचरा आणि सुखा कचरा वेगळा करायला सुरुवात केली..ते एका दिवसात आटपणारं काम नव्हतच वस्तीवरच्या बायका मुलं बघायलाच लागली रोज ही छोटी बहू येते आणि एकटीच सफाईला लागते, मग वसतीवरच्या बाया बापड्याना काय वाटलं कोण जाणे.. त्यानी आपणहून संवाद साधायचा प्रयत्न केला तशी तयारी तरी दाखवली काही अगदी अंगणा पर्यंत आल्या, दोन तीन दिवसात काम जरा अटोक्यात आल्या सारखं वाटत होतं
तिला तिथे काम करताना बघून वस्तीतल्या बुजुर्ग लोकानी सगळ्याना बजावलं उदरको कुडा कचरा फेकना नही.. कचरा फेकणं तर थांबलच पण तो कचरा सुद्धा त्या लोकानी उचलायला मदत केली म्हणजे माणसं बोलावली
आठवड्या भरात आंगण स्वछ्च दिसायला लागलं मग त्या बायकांची भीड चेपली मग त्या हिच्याशी आपणहून बोलायला यायला लागल्या
त्यातल्या बुजुर्ग बाईने तर दिलगिरी व्यक्त केली.. म्हणाली आदतच पड गयी ना इदरकू फेकनेकी.... कोन इतना दूर जावे.. ये तो आसान था
ती पण नम्रपणे म्हणाली तुमची तकलिफ वाढवली ना? पर क्या करे अपना घर है साफ तो रखनाही पडेगा.. ती बाई पण म्हणाली हां हां बराबर बराबर
मग आंगण साफ झाल्यावर तिच्या लक्षात आलं केवह्ढं मोठं आंगण होतं.. मग त्या बुजुर्ग बाईचाच नवरा मदतीला आला तो सरकारी कार्यालयात बागकामच करत होता त्याच्या मदतीने तिने सूंदर फुलबाग फुलवायचं मनावर घेतलं आणि तशी कामाला लागली. पावसाळा जवळच आला होता छोटी छोटी रोपटी तो पर्यंत अंग धरायला लागतील असं त्या माळ्यानी सांगितलं , त्यानेच छान छान फुलझाडाची रोपटी आणून दिली आणि त्याच्या मदतीने तिने ती नीट अंगणात लावली
बंद खिडकी बाहेर काय चाललय याचा या घरच्याना कल्पनाच नव्हती, ही आपली जमेल तशी मशागत करत होती, तो आता तिचा विरंगुळाच झाला होता, रोपट्यांकडूनही उत्कट प्रतिसाद मिळायला लागला.. काही तर फांदी पानी कळ्या फुलानी डवरली
पावसाची पहिली सर आली आणि सासूने डोक्याला हात लावला कारण पावसाच्या दिवसात खिडकी बंद असली तरी एक कुजका वास घर गाठायचाच
पाऊस सुरू झाला आणि सासू मनातल्या मनात त्या दुर्गांधीची वाट बघायला लागली पण ती दूर्गंधी काही येईना,पण खिडकी उघडून बघण्याचं धाडस काही होईना
आणि एका पहाटे पुजेच्यावेळी सासू बघते तर पुजेच्या थाळीत सोनटक्का, सायली,जास्वंद, मोगरा आनंताची फुलं.. आज ही फुलं कुठे मिळाली असं ती विचारणार तेव्हढ्यात एक अनोळखी प्रसन्न झुळूक घरभर फिरली त्यात फुलांचा गंध होता पावसाचा हवाहवासा वाटणारा ओलावा होता
झुळुकेची दखल सगळ्यानीच घेतली सगळे स्वैपाकघरात पोहोचले तर ही प्रशस्त खिडकी उघडून उभी होती
आणि बाहेरचा नजारा ? त्यांच्यासाठी अशक्य होता
सगळ्यात छान म्हणजे पलिकडे वस्तीवरचे त्यांच्या हद्दीतच पण जणू स्वागताला उभे होते... त्यानी हात हलवून अभिवादन केलं तसं यानी सुद्धा मोकळेपणाने , हात जोडून त्यांच्या अभिवादनाचा स्विकार केला.. त्या बुजुर्ग बायकानी पून्हा सासूकडे कबूल केलं हमारे खातर बहोत तकलीफ उठाया आपने कभी शिकायत नही किया
आणि या चमत्काराची सगळी कहाणी त्यानीच घरच्याना सांगितली
लाहन मुलाच्या उत्साहाने सगळे बागेत धावले.. आणि पाना फुलाने डवरलेली बाग बघून सगळ्यांचे डोळे पाणावले
कधी नाही ते दिराने तिला पोटाशी धरलं म्हणाला तुझा अण्णा लग्नात म्हणाला होता जरा हट्टी आहे सांभाळून घ्या
मनात आणेल ते ती करेलच तेंव्हा वाटलं होतं तू सहा महिन्यात घरात भिंत उभी करशील
पण तू तर भिंतीपलिकडच्याना आपलसं केलस, नाहीतर या वस्तीतल्या लोकांशी आम्ही कधी बोलू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं
सासूला आपल्या संपूर्ण कुटूंबाची नजर उतवायची होती तिने ती नजर उतरवायला तिच्या वहिनीलाच बोलावलं म्हणाली तुझ्याच संस्कारात वाढली आहे माझी हट्टी सून, तूच नजर उतरव म्हणजे मी निर्धास्त होईन.

हट्ट..... 👌
ReplyDeleteआपल्या गोष्टी वाचल्या की आमच्या आयुष्यात असाच सुगंध दरवळतो.
ReplyDeleteशब्दातीत
ReplyDeleteSuperb !!!!!!
ReplyDeletemazhi saglayt avadati katha, kitihi vela vachali tari pot bharat nahi. mala baraych vela baraych thikani hi katha athavate. aani dar veli vachatana shevti dolayt pani aani angaver shahare yetatch..
ReplyDeletekhup sunder... hatt asava tr asa... :)
ReplyDeleteकित्ती positively लिहिता तुम्ही.
ReplyDelete