ओघळ
आज डेंटीस्ट कडे गेलो होतो.. बाकी कुठे नाही पण समं दू:खी मंडळी इथे जमतात एकमेकाकडॆ सहानभुतीने पाहतात.कारण वेदनेचं प्रमाण वेग वेगळं असलं तरी वेदना एकच असते... तरी आमच्या निलम कडे वातावरण चांगलं असतं एक तर मंद स्वरात जूनी गाणी दिलासा देत असतात आणि खिडकी बाहेरच्या हिरव्या गार वृक्षांची तालबद्ध सळ सळ वेदनेने हैराण झालेल्या जीवाला धीर देत असते
...आणि आज तर माझ्या समोर माय लेकरांचा विलोभनिय खेळ चालला होता..ते सहासात महिन्याचं चुळबुळणारं गोलमटोल गाठोडं आईचा अख्खा चेहरा चाटून काढत होतं.. तिच्या बटा ओढत होतं तिच्या कपाळावरची टिकली काढण्याचा तर त्याने चंगच बांधला होता...
आमच्या माईनंतर बाळाशी इतक्या अगम्य भाषेत बोलणारी ही आई बर्याच वर्षानी पाहयला मिळाली आमच्या ताईला आई सांगायची अगं ताईsss जरा बाळाशी बोबडे चार शब्द बोलावेत गंss गायीला हम्मा म्हणावं कावळ्याला काऊ म्हणावं त्या त्या दिवसात त्या त्या शब्दांची मौज काही औरच असते.. आणि या उलट माईला सांगावं लागायचं मधूss तुझ्या बोलण्याची बाळाला सवय झाली ना तर त्याला शाळेत जड जाईल होsss..
.हे आठवून मला खुदकन हासूच आलं हिच्याही बाळाला शाळेत जड्च जाणार असं वाटून गेलं.कँ कँ बँ बँ तँतँ जे काही चाललेलं होतं त्यामुळे .. आनंदाचा डोहं माझ्या अवती भवती पसरल्या सारखा झाला होता आणखी एक दोघे होते त्यांचीही वेगळी अवस्था नसावी.आमच्या पैकी कुणाचीच ती भाषा नव्हती तरी आम्ही त्यांच्या संवादात आम्ही रमून गेलो होतो
. ती आपल्या लेकराशी आपली वेदना विसरून खेळत होती.. मी ठरवून टाकलं हिचा नंबर येइल तेंव्हा या गुलामाला आपण संभाळायचं मलाही बाळाशी बोबडे बोल बोलून बरेच बरेच दिवस झाले.. हल्ली आया लहानपणीच बाळाशी इंग्लीश बोलायला सुरुवात करतात तो बघ मून.. डाँगी कुठाय,क्रो कसा साऊंड करतो...यात कुठे बोबडे बोल येणार?
ही आत गेली की बाळाला आपण सांभाळायचं या विचारानेच मी तयारीत राहिल्या सारखा झालो थोडासा उतावीळ सुद्धा.. मला सुद्धा माझ्या दातदुखीचा विसर पडला होता..आणि तेव्ह्ढ्यात निलम ने दार उघडलं आणि एक बाई बाहेर आली.. निलम्च्या बोलण्यावरून कळलं ती त्या बाळाची आई होती.. तिने ज्या पद्धतीने त्या बाळला त्या बाईकडून घेतलं त्यात अधिकार जास्त होता.. इतक्यावेळ किलबिलणारं ते वातावरण एकदम स्तब्ध होऊन गेलं ओरखडा सगळ्यांच्याच मनावर उठला...
ते मुल त्या बाईच्या स्टायलीश कडेवर सूटच होत नव्हतं.विसंगती टोचण्या इतकी जाणवली त्या आधीच्या बाईने चोरट्या नजरेनं आमच्याकडे बघितलं... आम्ही तिलाच निरखत होतो ती एक्दम रिकामी रिकामी झाली ते बाळ अजूनही त्याच बाईशी खेळायला धडपडत होतं पण ही बाई त्याला आवरत होती अडवत होती...दोन क्षण थांबून ती माऊली बाहेर जायला लागली तसं त्या बाळाने जोरात उसळी मारली त्याचा अर्थ त्याच्या स्टाईलीश आईने असा लावला की त्याला फीड करायची वेळ झाली...
प्राजक्तावरून शेवटचं फूल खाली सांडल्यावर प्राजक्त कसा होईल?... तशी ती बाई होऊन गेली..
.त्या बाळाला घेऊन त्याची आई बाहेर गेल्यावर तिथे दोघं तिघं असूनही सगळं रिकामं होऊन गेलं ..
पिनड्राँप सायलेंस...............

Comments
Post a Comment